Thursday, 11 December 2014

काही लोक कोसळणाऱ्या धबधब्या सारखे नॉन stop बोलत असतात .
अगदी मोकळ्या मनाचे ,पण जादा बोलणाऱ्या लोकांना कोणी सिरीयसली 
नाही घेत .स्वत:च स्वत:बद्दल सांगणारे .पण असे लोक आवडतात .
त्याच्या स्वभाव मुळे .
या उलट काही लोक न बोलणारे खूप अबोल .असे लोक कधी समजत नाही 
नेमके ते कसे आहे .काही विचारा समोरच्या माणसाचे बी पी वाढते तरी हे लोक
शांतच ..........
हे अनुभव जसे प्रत्यक्ष जीवनात येतात तसेच ,फेसबुक वर पण येतात .
काही लोक खूप साऱ्या पोस्ट वर कॉम्मेंत देतात ,मग ती कोणत्या पण
विषया वर असो .एका मागोमाग अनेक विषया वर असे लोक पोस्ट करतात .
तर काही लोक एक पोस्ट टाकणार आणि शांत बसणार ,
आपण आणि आपली वाल भली असे .कधी कोणाला लाईक करणार नाही
कॉम्मेंत देण्याच्या तर कधी फांद्यात पडत नाही .
याच्या पोस्टला कोणी कॉम्मेंत देऊ नाही तर नाही .
माणसाच्या विविध रंगी मनाचे दर्शन या आभासी जगात
पण होतेच नाही .
!!आशा!!

No comments :

Post a Comment