अमृता शेरगिल
सर्च इंजन गूगल डूडल कडून एक महान चित्रकार अमृता शेरगिल यांची १०३ वी जयंती साजरी केली जात आहे .गूगल ने आपल्या होम पेज वर तीन सामान्य महिलांचे फोटोचे डूडल चित्र रूपाने सदर केले आहे .अमृता शेरगिल हि एक सुप्रसिद्ध भारतीय महिला चित्रकार होती त्यांना २० व्या शतकातील एक महान चित्रकार समजले जाते .त्यांचा जन्म बुडापेस्ट (हंगरी) मध्ये झाला होता .अतिशय श्रीमंत परिवारा मध्ये त्यांचा जन्म झाला होता .जेव्हा त्या आपल्या हेन्गेरीयान आई बरोबर पेरिस कला बद्दल समजून घेण्यास फ्रान्सला पोहोचल्या तेव्हा त्यांचे वय फक्त १६ वर्ष होते.सुरवातीला त्यांनी ग्रैंड चाऊमीअर मध्ये पीअरे वेलण्ट आणि इकोल डेस बीउक्स-आर्टस मध्ये ल्यूसियन सायमन च्या मार्गदर्शन खाली त्यांनी अभ्यास केला .
त्या १९३४ मध्ये भारता मध्ये परत आल्या.वयाच्या बाविसाव्या वर्षी त्या चित्रकार बनल्या होत्या .चित्रकारा मध्ये जे असामान्य प्रतिभावान कलाकारा मध्ये असणारे सगळे गुण त्यांच्यात आले होते .पूर्णपणे भारतीय नसतानी देखील त्यांना भारतीय संस्कृति बद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती .जेव्हा त्या पेरीस मध्ये शिकत होत्या तेव्हा त्यांनी एक पत्र लिहिले होते त्यांना भारता मध्ये परत येण्याची उत्सुकता आहे.त्यांनी स्पष्ट केले होते कि आपण एक चित्रकार या नात्याने आपले नशीब आपल्या देशात अजमावून पहायचे आहे.बाविसाव्या वर्षी पाश्चिमात्य असून देखील त्यांचे १९३३ मधील हे विचार खूप महत्वाचे मानले गेले.त्या काळात भारतीय महिला या व्यावसायिक शिक्षण घेत नव्हत्या .तेव्हा महिला या फक्त रोजंदारी किवा नोकर म्हणून काम करत असत.खूप थोड्या महिला होत्या ज्या व्यावसायिक शिक्षण घ्यायच्या पण त्याला व्यावसायिक रूप देत नव्हत्या.अश्या या काळात अमृता आपली चित्रकार म्हणून एक वेगळी ओळख बनवून दाखवणार होती .भारतात परत येणे म्हणजे एक मजबूत उद्देश आणि काही तरी करून दाखवण्याची जिद्द होती त्या परत आल्या आणि अजिबात वेळ न घालवता कामाला सुरवात केली .कामाला वेग दिला .पेरीस मध्ये असताना त्यांना जाणवले कि युरोप मधील चित्रकला वर्तमान संस्कृती पासून तीस साल मागे आहे पण भारत मध्ये आल्यावर त्यांना १९३० मध्ये त्यांना जाणवले कि त्या चित्रकला मध्ये ३० वर्ष पुढे गेल्या आहे.१९६० नंतर भारतीय चित्रकारांनी अमृता सारखी
आत्मविश्वास आणि निश्चय याची ओळख देण्यास सुरवात केली .
भारतात आल्यावर त्या सिमला मध्ये स्थायिक झाल्या.त्यांच्या जीवन पद्धती मध्ये खूप बदल झाला.येथील गरीब लोकांच्या जीवनावर त्यांनी चित्र काढण्यास सुरवात केली .त्यांच्या चित्रात उदास आणि निराश आणि आयुष्यातील खालीपण दिसून येते .१९३५ मध्ये त्यांचा सिमला फाईन आर्ट सोसायटीच्या वतीने सन्मान करण्यात आला.परंतु त्यांनी तो घेण्यास नकार दिला .
१९४० मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटी कडून बक्षीस दिले गेले.१९३५ नंतर अनेक छोट्या मोठ्या शहरा मध्ये त्यांच्या चित्राचे प्रदर्शन भरवली गेली.अनेक राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय संग्रहालयात त्यांचे चित्र आज पण बघयला मिळतात .
अमृता यांनी आपला हंगेरियन चुलत भाऊ याच्या बरोबर १९३८ मध्ये लग्न केले आणि त्या त्यांच्या पूर्वजांच्या घरी गोरखपुर मध्ये राहायला गेल्या .१९४१ मध्ये त्या त्यांच्या पती बरोबर लाहोर ला गेल्या .तिथे त्यांच्या पहिले प्रदर्शन होणार होते .परंतु त्या एकाएकी आजारी पडल्या आणि केवळ वयाच्या २८ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला .
फोटो सौजन्य-गुगल सर्च
शे
