Friday, 26 December 2014


डिसेंबर आला कि ३१ ला काय करायचे असे अनेकांच्या तोडून ऐकायला मिळते .
खरच इंग्रजी कैलेंडर नुसार नवीन वर्ष सुरु होणार असते .कसे साजरे करतो आम्ही ते .
मागे मी एका पोस्ट मध्ये लिहिले आहे मी ख्रिश्चन बिल्डींग मध्ये राहते .
पण गेले वर्षानुवर्षे मी बघत आहे हे लोक काय करतात ३१ डिसेंबरला .
ते सगळे रात्री चर्च मध्ये जातात १२ वाजता देवाची प्रार्थना करतात आणि नवीन 
वर्षाचे स्वागत करतात .
दुसऱ्या दिवशी १ जानेवारीला नवीन वर्षाची पार्टी असते .
आम्ही कसे साजरे करतो नवीन वर्ष अनेक जण ड्रिंक पार्ट्या करतात .
जेव्हा नवीन वर्ष सुरु होते तेव्हा हे लोक शुद्धीवर तरी असतात का ?
माझे लग्नाच्या आधीचे आयुष्य छोट्या खेडेगावात गेले .
नवीन वर्ष येत असे पण कोणी त्याच्या कोणाला शुभेछ्या देत नसे .
फक्त वही वर तारीख बदलत असे .
मला आठवते त्या काळात ज्या घरातील मुलगा किवा कोणी सदस्य
जर ड्रिंक करत असेल तर त्या घरातील लोकांना लोक खूप नावे ठेवत असत .
अगदी मुलगी अशा घरात देतानी अनेकवेळा विचार करत असत .
असे पिणारे माणसे एकटे पडत असत .
आज मात्र सगळे उलट झाले आहे एन्जोयच्या नाव खाली कोणते
कारण असू पार्ट्या केल्या जातात .
स्मोक करणे ,ड्रिंक करणे या मध्ये लोकांना थ्रील वाटते .
जो कोणी ड्रिंक करत नाही त्याला आता नावे ठेवले जातात .
"सोडा रे त्याचा विषय त्याला आयुष्याची मजा घेता येत नाही .घास फूस
खाणारा आहे तो " जा रे तू दुध पी असे म्हणून त्याची टिंगल केली जाते .
पण खरच ड्रिंक करणे स्मोक करणे चांगले आहे का ?
सिगारेटच्या पाकीटा वर लिहिलेले असते .ते आरोग्यास हानिकारक आहे .
तरी पिले जाते .
अनेकदा ड्रिंक एवढे केले जाते कि त्याचा असार दुसऱ्या दिवशी होतो .
ज्या घरात लहान मुले असतील आणि त्यांच्या समोर जर असा पार्ट्या होत
असतील आणि घरातील मोठे त्यांच्या समोर जर स्मोक करत असतील तर
त्या मुलांना ते मोठे झाल्यावर आई बाप "बाबा रे हे सगळे करू नको हे वाईट असते
असे सांगू शकत असतील का" ?
अनेक जण बोलतात आम्ही काय जादा घेत नाही .पण कधी कधी
एकच प्याला हा एक बाटली होते हे लक्षात येत नाही .
आज अनेक घरे आहे ज्या घरात कोणाचा नवरा कोणाचा मुलगा पितो
आणि त्या मुले होणारा त्रास हा आख्खे घर भोगत असते .
आज तर मोठ्या मोठ्या शहरत मुली देखील सरस स्मोक .आणि ड्रिंक करत आहे .
कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे .
पण जे काही मनात आले ते लिहिले .

Like ·  · 

No comments :

Post a Comment