Tuesday, 23 December 2014

बहुरूपी.

टीव्ही च्या जमान्यात अनेक कला नाहीशा झाल्या .
करमणुकीचे साधने नव्हते तेव्हा लोककला सदर करणारे अनेक कलावंत होते .
त्यातील एक बहुरूपी....
अलीकडे झी .टीव्ही वर प्रशांत दामलेचे बहुरूपी नाटक बघितले .
आणि मला लहानपणी आमच्या गावात येणारा बहुरूपी आठवला .
अनेकदा त्याने घेतलेले सोंग हे अगदी हुबे हूब असे .कित्येकदा अस्सल व नक्कल यांतील फरक लोकना सहजासहजी ओळखू येत नसे
त्यांच्या अनेक सोगांमध्ये खेड्यातील पोलीसपाटील, मामलेदार , बाळंतिणी गर्भवती स्त्रिया, रडणाऱ्या बालकांचे आवाज, पशुपक्ष्यांचे आवाज देवाचे सोंगे जादा असत .. गावोगावी फिरण्या मुळे याच्या मध्ये शिक्षण घेणे शक्य नसल्याने अनेकदा हे निरक्षरच असत .
पोलीसाच्या वेशात येणर्या बहुरूपी ला अनेकदा अडाणी लोक खरच घाबरत असत .
पण काही वेळ लोकांचे मनोरंजन करून जे काही भेटेल ते घेऊन जात असत ते परत एक वर्षाने परत येत .
आज अनेक टीव्ही आहे .अनेक करमणुकीचे साधने आहे .अनेक लोककला सादर करणरे जसे काळाच्या ओघात नाहीसे झाले तसेच हे पण .....
बहुरुपीचे लग्नाचे आमंत्रण देणारे गाणे ...............
लग्नाला चला, तुम्ही लग्नाला चला...
उंदराची गाडी त्याला मांजराची जोडी
इतभर गाडी त्यात खंडीभर गडी
तुम्ही लग्नाला चला...
बिबळ्याचं काजळ घाला,
उतरंडीसंगं फुगडी घाला
तुम्ही लग्नाला चला...
जेवायला केली चिखलाची कढी,
दगडाची वडी, मस्करी लोनचं
गाढवाचं भजं, तरसाच्या पोळ्या
लांडग्याची खीर
लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला!
हितं काय जेवायचं नाही
तिथं काही खायचं नाही
तुम्ही मातर आल्याबिगर राहायचं नाही
शनवारचं लग्न, आईतवारची हळद
सोमवारी देवकार्य, न्् मंगळवारी वरात
ढेकणाची मोटार, विंचवाचे टांगे घोडे
आवरा लवकर चला...
आला बहुरूपी आला
लग्नाला चला, तुम्ही लग्नाला चला...!
लग्नाचे निमंत्रण देणा-या बाईचे सोंग घेऊन येणारा बहुरूपी या एका गाण्याने सबंध महाराष्ट्रात लोकप्रिय झाला. ...

No comments :

Post a Comment