Sunday, 12 April 2015

बांगड्या ......

बांगड्या ......
छान किणकिण वाजणाऱ्या अनेक रंगाच्या .....
नव वधूच्या हाताची शोभा वाढवणाऱ्या ....
सौभाग्य लेणे म्हणून आज पर्यंत त्यांच्या कडे बघितले जाते .
आपल्या भारतीय संस्कृती मध्ये सुवासिनीचे एक लेणे .
मी लहान असतानी पासून नेहमी बघत आले आहे .खेड्यातील बायकांना हातातील बांगड्या जर फुटल्या आणि जर हातात एक पण बांगडी जर राहिली नाही तर त्या भुंड्या हाताने काही खात नसत .मग हाताला रुमाल किवा एखादा कपडा बांधत .
या मागे त्यांचे विचार पती निष्ठाशी निगडीत असे .पती जिवंत असतानी हातात बांगड्या आणि 
गळ्यात मंगळसूत्र असायला हवे तसे कसे काही खायचे नाही ..म्हणजे आपल्या पतीला काही होऊ नाही हि भावना असावी ,कारण पती निधना नंतर या गोष्टी म्हणजे कुकू पुसले जाते मंगळसूत्र काढले जाते आणि बांगड्या फोडल्या जातात .म्हणून असे करत असतील का ?त्या बायका ,आज देखील खेड्यात असे करतात बायका .
लग्न मध्ये आमच्या कडे बांगड्या भरणे हा एक कार्यक्रम असतो .मुलीला जसा लग्नाचा चुडा असतो .चूडा हा फक्त नवरी मुलीला असतो पण त्याच वेळी गावातील बागड्या भरणाऱ्या कासाराला {बांगड्या जे विकण्याचे आणि भरण्याचे काम करतात ते } घरी बोलावले जाते मग शेजारी आणि पाहुणे आलेल्या बायकांना मग बांगड्या भरण्याचे काम चाले .खरे तर काचेचा बांगड्या आज खूप महाग आहे .अनेकदा हातात खूप बांगड्या असून देखील त्या बायका आधीच्या बांगड्या फोडून नवीन भरतात .जर चुकण कोणी राहिले तर "एक काच तरी भरली का ?अशा नाराजीचा डायलॉग ऐकायला लागतो .
बांगड्या पण किती दोन दोन डझन पेक्षा कधी कधी जास्त असतात .मला नेहमी नवल वाटते एवढ्या बांगड्या घालून या बायका कसे काम करतात .त्यात काहीच्या बांगड्या कधीच फुटत नाही .तर काहीना अजिबात टिकत नाहीत .आज बांगड्या न घालण्याची फ्याशन आहे .परंतु जेव्हा एखादी मुलगी सासर वरून माहेरी येत असे तेव्हा तिचा हातात जर बांगड्या नसेल तर.काय माणसे आहेत पोरीच्या हातात एक काच सुद्धा नाही ...
म्हणजे तिला किती सासुरवास आहे असे समजले जाई .
आमच्या गावा कडे सगळ्या रंगाच्या बांगड्या घालतात पण मुंबईत मात्र फक्त हिरव्या
बांगड्या घातल्या जातात .
पण आज नवीन नवीन सुंदर बांगड्या बाजारात असतात .काचेच्या आणि मेटल च्या
सुद्धा ..सुंदर ड्रेस असो किवा साडी बांगड्या मुळे सौदर्यात अजून भर पडते .हे मात्र नक्की
किती नाही म्हटले तरी बाजारात गेल्यावर या बांगड्या आकर्षित करतातच .
असेच मनातले काही ....
३ एप्रिल १५


No comments :

Post a Comment