Tuesday, 23 December 2014

काय होतीस तू ???

काय होतीस तू.............
सकाळ मधील एक बातमी वरून .
छोट्याश्या आयुषात खूप काही मिळवण्याची इच्छा असते प्रत्येकाला 
असेच एक हुशार वीणा {नाव बदलेले } कोल्हापूर जिल्ह्यातील एका 
छोट्या गावातील गरीब परिवारातील ,चौथी मध्ये असतानी वडील 
हे जग सोडून गेलेले .सातवी पर्यंतचे शिक्षण गावात झाले .बारावीला
विज्ञान शाखेतून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. परिस्थिती अडचणीची
असली तरी इंजिनिअर व्हायचेच, या जिद्दीने झपाटलेल्या वीणाने
इंजिनिअरिंगच्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि टेली कम्युनिकेशन पदाविकी
साठी प्रवेश घेतला
पहिल्या वर्षित काही विषय मध्ये नापास झाली आणि तिच्या
आत्मविश्‍वासाला तडा गेला.
शिकत असतानाच तिनी आपल्या पुढील वर्गात शिकत असणर्या
एक मुला बरोबर प्रेम विवाह केला पण तो ३ महिने चालला
आणि ते अलग झाले .स्वतच्या गावात हनुमान मंदिराजवळ
असलेल्या पडक्‍या घरात ती एकटीच राहात होती. दिवसासुद्धा
एखाद्याला घरात जायला भीती वाटावी अशा पडक्‍या घरात
तिने एकटीने जगणे सुरू केले.
उदरनिर्वाहासाठी तिने गोकुळ शिरगाव एमआयडीसीत
एका कंपनीत चार हजारांची नोकरीही पत्करली. आर्थिक
चणचण आणि स्वत:चा औषधोपचार यातून तिची फरफट होऊ लागली.
परिस्थितीच्या फेऱ्यामुळे तिची गुन्हेगारी मानसिकता झाली.
त्यातून ती नापास असली तरी इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि टेली कम्युनिकेशनच्या
मिळविलेल्या ज्ञानातून तिला प्रिंटर आणि अन्य तांत्रिक बाबीची माहिती होती.
त्यातून तिने बनावट नोटा छपाई करण्याचा गंभीर गैरमार्गाचा वापर केला.
बनवलेल्या नोटा बाजारात वापरत असतानी तिला अटक झाली .
एक हुशार आणि जिद्दी मुलीची असा प्रकारे वाईट शोकातींक झाली .
योग्या मार्गदर्शन आणि घरातील लोकांचा पाठींबा नसेल तर .
काय होतीस तू काय झालीस तू असी बोलयची वेळ येते .

No comments :

Post a Comment