मैत्री
मैत्री एक सुंदर नाते जे रक्ताचे नसून देखील जवळचे असते .
मैत्रीचा प्रवाह हा एखाद्या निर्मल झऱ्यासारखा असतो .
या प्रवाहात मग बालपणा पासून ते वृद्धापकाळा पर्यंत
कोणी न कोणी येऊन मिळते .,कधी मग जीवनाच्या अखेर पर्यंत
साथ देतात.तर काही आपली दिशा बदलतात ,काही वेळा गैरसमजा मुळे
दुषित होतात .तर काही बद्दल हा प्रवाह आटून जातो .
प्रवाहा तरी थांबत नाही .प्रवासात या प्रवाहाला अनेक लहान मोठे प्रवाह येऊन मिळतात… मित्रपरिवार वाढत जातो….
काहीना आपल्या प्रवाहात सामील होण्यास आपण नकार देतो .
मुख्य प्रवाहात येणारा एखादा लहानसा प्रवाहा नकोसा वाटतो ….
काही स्वताहून आपल्या प्रवाहातून बाहेर जातात .
त्यांना आपली दिशा आवडत नाही किवा ते खूप मोठे झालेले असतात .
हेच जीवन आहे ते चालूच राहते .
मैत्रीच्या सुदर नात्या बरोबर ,
आपण कोणाला विसरतो कोणी आपल्याला विसरतात ,
कधी तरी एखाद्या वळणावर अवचित भेट होते देखील .
ये जीवन है !
इस जीवन के !
यही है रंग रूप !
No comments :
Post a Comment