उद्या संत सावता महारज पुण्यतिथी....
कांदा मुळा भाजी अवघी |विठाबाई माझी
लसण मिरची कोथंबिरी | अवघा झाला माझा हरि ||
वारकरी संप्रदायातील अनेक म्हणा संता पैकी सावता माळी एक होय .
सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील अरण हे त्यांचे गाव.संत सावता महाराज हे जातीने माळी होते आण्ाि ते शेती करत असत. म्हणून त्यांनी आपल्या अभंगामध्ये‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’ असे म्हटले आहे.शेतीच्या कामात प्रत्यक्ष भगवंत भेटतो अशी त्यांना खात्री आहे,ते पांडुरंगाच्या भेटीला पंढरपूरला कधीच जात नसत. खरे म्हणजे त्यांचे गाव पंढरपूरच्या अगदी जवळ होते.परंतु पंढरपूरच्या त्या मंदिरात जाऊन ज्या देवाचे दर्शेन घ्यायचे आहे, तो पांडुरंग शेतीच्या कामातच प्राप्त होत आहे,तर मग पंढरपूरला जायचे कशाला? असा त्यांचा सवाल होता. ते म्हणतात,‘प्रपंची असूनि परमार्थ साधावा। वाचे आळवावा पांडुरंग मोट, नाडा, विहीर, दोरी। अवघी व्यापिली पंढरी,’’असे म्हणणाऱ्या सावता महाराजांना त्यांच्या मळ्यातच विठ्ठलदर्शन होत असे.पण सावता महाराजांसारखा एक भक्त पंढरपूरलाच येत नाही, हे पांडुरंगाच्या लक्षात आले तेव्हा खुद्द पांडुरंगचया भक्ताच्या भेटीला जायला लागला आणि पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये एक नवा प्रघात पडला.अन्य संतांच्या दिंडया पंढरपूरला येतात,पण अरण ची दिंडी पंढरपूरला येत नाही . आषाढीची गर्दी संपली की पंढरपूरचा पांडुरंग आपली दिंडी काढतोआणि अरणला या आपल्या भक्ताच्या दर्शनला जातो .संत शिरोमणी सावतामाळी यांनी वयाच्या ४५ वर्षी आषाढ वद्य चतुर्दशी इ.स.१२९५ मध्ये
अरणभेंडी येथे संजीवन समाधी घेतली.
{फेसबुक पोस्ट २४ जुलै १४}

No comments :
Post a Comment