Thursday, 31 March 2016

प्रेरणादायी



मन उदास होते गावी तर निघाले होते.भायखळ्यातून ट्रेन पकडली.खिडकीच्या बाजूचे सीट भेटले .मी जिथे बसले होते तिथून पूर्ण डबा दिसत होता.कसारा ट्रेन नेहमी सारखी गर्दी होती,पण मन उदास म्हणून मी सरळ खिडकी बाहेर बघत होते
.मन उदासअसेल तर कोणाशी बोलावे वाटत नाही.एक एक स्टेशन येत होते .डबा पूर्णभरला होता पण माझ्या बाजूला कोण बसले आहे .समोर कोण आहे.हे सुद्धा मी बघितले नाही.माझ्याच विचारात मी हरवले होते .समोरच्या सीट वरील बाई बोलण्याचा प्रयत्न करत होती पण मी लक्ष नाही दिले .
काय तुम्ही ६३ वर्षाच्या आहे, माझ्या बाजूची आणि त्या बाईच्या बाजूला बसलेली आणि मी एकदम बोललो .तेव्हा मी तिचा कडे नीट बघितले.५० च्या आसपास वाटावी अशी छान बाई होती ती,अतिशय देखणी.उंच गोरी सुंदर डोळे " हि पंचवीस वर्षाची असेल तेव्हा काय सुंदर दिसत असेल असे मनात येवून गेले"यावयातील तिचा उत्साह बघण्यासारखा होता.मनातील निराशा कुठल्या कुठे गेली.तीचाबरोबर बोलले .तरुण असतानी घरातील आणि नवरा त्रास देतो म्हणून ,घरातून दोन मुलांना घेवून गावाकडून मुंबईत आली.धुणे भांडे केले.रेल्वे पोलीस मध्ये भरती झाली.सगळे ठीक झाले,हि मजेत राहते म्हणून सासरचे लोक तिला घेवून जायला आले.पहिल्या सारखे मारहाण करायला लागले.सरळ कोयता काढला आणि धमकी दिली या समोर एकाएकाचा मूडदा पडते.तिचा आवेश बघून सगळे पळून गेले.मुलांना शिकवले ,स्वताचे घर घेतले.नवरा आला नंतर तिचाकडे

सुना आल्या जास्त नाटक करायला लागल्या ,सरळ मुलांना सुनांना बाहेरचा रस्ता दाखवला.आयुष्यभर कष्ट केले.माझी स्वताची पेन्शन आहे का ऐकू यांचे ....रोखठोक असणारी ती बाई बोलत होती.माझ्या बरोबर बाकी ऐकत होत्या.आसनगाव आली ती उतरून गेली,
जाता जाता माझ्या मनातील मरगळ घेवून गेली.
माझ्या बाजूची बाई बोलली ,खरच सगळ्याना नाही जमत ना असे ,ते पण तीसपस्तीस वर्ष आधी . .......


अनेक लोक मोठ्याने बोलतात { माझा आवाज पण मोठाच आहे}
पण कुठे हळू बोलावे कुठे मोठ्याने बोलावे हे आपण ठरवावे .
आज सगळ्या कडे मोबाईल आहे.त्यावर बोलताने अनेक जन
आजूबाजूला कोणी ऐकत आहे याचा विचार पण करत नाही .
मागे मुंबईला येतानी माझ्या बाजूला एक लेडीज बसली होती.
ती फोनवर बोलातानी मी येथे उतरणार तिथे उतरणार चालू होते.
मी जिथे उतरणार तिथे खूप सुनसान असते तिथे जरा भीती वाटेल
असे ती फोनवर बोलत होती .आणि खूप मोठ्याने बोलत होती .
समोरच्या सीटवरील लोक तिचे बोलणे ऐकत होते.त्यांना बसतानी
उतरण्याचे ठिकाण अलग सांगितले होते .पण जेव्हा तिला कुठे उतरायचे
हे ऐकले आणि ते तिला बोलले आम्हला पण तिथेच उतरायचे आहे.
ती उतरली आणि ते लोक पण...........
खरच एवढ्या मोठ्याने बोलण्याची गरज असते का????
प्रवासात तरी किती काळजी घेण्याची गरज असते.खास करून
महिलांनी ,स्वतासाठी तरी......
अनेकदा काही प्ल्यान ठरवतानी अनेक लोक एकत्र येतात .तेव्हा ते असेच
मोठ्याने बोलतात .मग दुसर्यांना त्रास होतो हे ते विसरतात.
असेच एक पोस्ट वरून असेच मनातले काही

रात्रीस खेळ चाले

रात्रीस खेळ चाले 

रात्रीस खेळ चाले या मालिके मुळे भूते असतात का नसतात हि चर्चा झाली.
पण अनेकदा मनाचा खेळ असतो हा अनुभव अनेकदा येतो.
मी लहान असतानी आमचा घरा पासून काही अंतरावर एक चिंचेचे झाड होते.आम्ही राहायचो त्या भागात लाईट आलेल्या नव्हत्या. चिंचेचे झाड खूप मोठे होते.जवळूनच रस्ता होता.कधी कोणाला तिथून जातानी भीती वाटत नसे.पण एक दिवस पहाटे पाणी आणायला गेलेली शेजारीण बोलली कि तिनी त्या
झाडा खाली एक सफेद साडीमधील बाई बघितली.बस त्या दिवसा पासून
बिनधास्त येणारे जाणारे लोक घाबरायला लागले. त्यात मी सुद्धा होते.मग अंधार पडला कि त्या झाडाच्या बाजूला आई जावू देत नसे.पण त्या एका बाई
व्यतरिक्त पुन्हा कोणाला कधी तिथे काही दिसले नाही .पण भीती मात्र वाटायची. पण आज विचार केला कि वाटते.त्या बाईला पहाटे पाणी कंटाळा येत असावे म्हणून तिनी असे सांगितले असेल का?
दुसरी एक घटना मुंबई मध्ये एक खोली भाड्याने घेतली होती .मुलगी फक्त एक वर्षाची होती.ज्या दिवसी मी त्या घरात राहायला गेले .तेव्हा शेजारी सगळे माझ्या कडे अजीब नजरेने बघत होते .मला वाटले मी नवीन आहे म्हणून असतील.तिथे जावून मला एक महिना झाला होता.मी कोणाशी ओळख नाही म्हणून बोलत नव्हते.पण एक दिवस एक आज्जी आली .मला बोलली तू का राहिला आली येथे.हे घर चांगले नाही.तुला येथे झोप येते का ? ती असे का बोलते समजत नव्हते.पण त्या नंतर तिनी जे सांगितले त्याने मी थोडीघाबरले.त्या घरातील बाईने घरातील बाथरूम मध्ये जाळून घेतले.नवर्याच्या त्रासा मुळे! तेव्हा पासून त्या घरात कोणी राहत नाही .म्हणजे त्या बाईचाआत्मा कोणाला त्या घरात राहू नाही.अमवस्या पौर्णिमेला घरा बाहेर उचलूनफेकतो. आज अमवस्या आहे सांभाळून ग बाई,असे बोलून त्या आज्जी निघून गेल्या.त्याच दिवसी नवरा नेमका घरी नाही.भाजी आणायला गेले.परत आले तर किचनची लाईट चालू ,मला पक्के आठवत होते मी बंद करून गेले होते मग हि लाईट चालू कशी,थोडी घाबरले .देवा जवळ दिवा लावला.देवाला पार्थना केली.आणि बोलले " याघरात एक सुवासिन गेली आहे,मी एक सुवासिन आहे.जर खरच तुझा आत्मा या जागेत असेल तर मला काही त्रास नको देऊ"देवा बरोबर तुझ्या नावाचा दिवा लावेल मी रोज.काय खरे काय खोटे
नाही माहिती पण त्या दिवसी आणि नंतर मला कधी काही त्रास नाही झाला.
पण प्रत्येक दिवसी दिवा आणि सणाचा नैवद्य मात्र मी अलग ठेवत असे..
नंतर वर्ष भर मी तिथे राहिले .नवरा आल्यावर समजले बटन लूज होते म्हणून लाईट आपोआप लागली.{ज्यांची खोली होते तो पण या कारणाने तिथे राहत
नव्हता.म्हणून बिना डीपोझीट त्याने आम्हाला खोली दिली होती.नंतर तो तिथे राहायला आला}
मनाचे खेळ असतात हे कधी काही नसतानी आपण एखाद्या गोष्टीचा अर्थकुठे तरी लावतो आणि घाबरतो.आत्मा ,भूत ,हे असतील कदाचित काही अज्ञात शक्ती
रात्रीस खेळ चाले या मालिके मुळे भूते असतात का नसतात हि चर्चा झाली.
पण अनेकदा मनाचा खेळ असतो हा अनुभव अनेकदा येतो.
झाडा खाली एक सफेद साडीमधील बाई बघितली.बस त्या दिवसा पासून 
बिनधास्त येणारे जाणारे लोक घाबरायला लागले. त्यात मी सुद्धा होते.मग अंधार पडला कि त्या झाडाच्या बाजूला आई जावू देत नसे.पण त्या एका बाई 
व्यतरिक्त पुन्हा कोणाला कधी तिथे काही दिसले नाही .पण भीती मात्र वाटायची. पण आज विचार केला कि वाटते.त्या बाईला पहाटे पाणी कंटाळा येत असावे म्हणून तिनी असे सांगितले असेल का?
नाही माहिती पण त्या दिवसी आणि नंतर मला कधी काही त्रास नाही झाला.
पण प्रत्येक दिवसी दिवा आणि सणाचा नैवद्य मात्र मी अलग ठेवत असे..
नंतर वर्ष भर मी तिथे राहिले .नवरा आल्यावर समजले बटन लूज होते म्हणून लाईट आपोआप लागली.{ज्यांची खोली होते तो पण या कारणाने तिथे राहत
नव्हता.म्हणून बिना डीपोझीट त्याने आम्हाला खोली दिली होती.नंतर तो तिथे राहायला आला}आशा नवले's photo.


निराशातून बाहेर पडतानी

निराशातून बाहेर पडतानी

कधी कधी आपण खरच निराश होतो.कोणाशी बोलू नाही वाटत.
जेव्हा मला असे वाटते तेव्हा अनेकदा 

 मी माझ्या गावी जाते.जिथे  माझा जन्म झाला.जिथे मी वाढले मोठी झाले.त्या माझ्या गावी.शेतकरी
 परिवारातील असल्यामुळे शाळे व्यतिरिक्तचा वेळ हा जास्त शेतात जात असे.घरात दरवाजे बंद करून
 बसणे काय हे माहिती नव्हते.लहान असताना पासून शेतात राखण करण्या सारख्या कामा पासून जे
 जमेल ते काम करण्याची सवय कधी बरोबर कोणी असे कधी कोणी नसे अश्या वेळी बांधावरील बाभळी 
किवा कोणत्या झाडा खाली बसणे.मग ती कोणती वेळ असो,दुपार असेलतर शांतता असे.शेत अगदी स्तब्द 
वाटे,मधेच वाऱ्याची झुळूक पिकांना हळुवार स्पर्श करून जाई बाकी शांत.पण जर एकदम सकाळ असे तेव्हा
 आताच रान जागे झाले आहेअसे वाटे.सगळीकडे एकदम प्रसन्न वातावरण असे जे मन प्रसन्न
करत असे. दिवसातील सगळ्यात आवडती वेळ म्हणजे संध्याकाळ ....सूर्य अस्ताला गेला आहे.संधी प्रकाश

 पडला आहे.शांत मंद वारे वाहत आहेत.सगळ्यांना घराची ओढ लागली आहे.मग शेताच्या बांधावरून ,छोट्या
छोट्या पायवाटावरून रानातून घरा कडे निघालेले गुरे ,त्यांच्या गळ्यातीलघुग्रांचा आवाज त्या शांतते मध्ये एक

 वेगळा नाद करत असे .

दूर वर पसरलेले शेत आता निद्रस्त असे वाटायचे .................

म्हणून गावी गेले कि मी पुन्हा हे अनुभवते.

चप्पल न घालता शेतातील मातीमधून चालते.बांधावरील बाभळी खाली बसते.आसपास कोणी नाही.कुठे 
तरी चिमण्या चिवचिव करत असतात.येथेच मी मला सापडते.निराश असलेले मन विचार करते.
बाभळी हे असे झाड आहे जे कोणी लावत नाही.ते शेताच्या बांधावर आपोआप येते.काटेरी असते तरी खूप 

उपयोगी असते .त्यांच्या सरपण म्हणून उपयोग होतो.आणि सावली म्हणून पण.मनात येते .शेतातील झाडे 
याना कधी वाटत असेल आपण एकटे आहे.नियमाने उगवणारा सूर्य त्याला नाही का कधी कंटाळा
येत .त्याला नाही का निराशा येत .दूर दूर पसरलेले शेत बघून वाटते ."या मातीने किती पिढ्या बघितल्या 

असतील ना? माझ्या सारखे किती आले किती गेले.ती मात्र आहे तिथेच आहे".अनेक जीवांचे पोट भरते .
ती पण कधी निराश होत असेल का ???? हिवाळा येतो ,हेमंत शिशिर ऋतू येतो.झाडावरील सगळे पाने 
गळून जातात.पर्णहीन ते झाडे बघयला पण नको वाटतात.माणसाच्या मनाचे थोडे तसे होते नाही.कोणाच्या
 तरी वागण्यामुळे किवा काही घटना मुळे आपण निराश होतो.


पण जसा हेमंत शिशिर संपतो आणि वसंताचे आगमन होते झाडाला नवीन पालवी येते. तशा काही घटना घडतात .
आणि आपण पुन्हा उत्साही होवून जीवनाला सामोरे जातो.

Tuesday, 15 March 2016

माणसातले देव ......

             माणसातले देव .......
देव देवळात नाही माणसात शोध असे आपण नेहमी एकतो किवा बोलतो .मग अश्या माणसातील देव आपल्याला अनेकदा भेटतात आणि मदत करून जातात आपण फक्त बोलतो "देवा सारखा धावून आला /आली .
             मग ते कोणी असते अगदी आपल्याला वेदनामुक्त करणारे डॉक्टर सुद्धा .अर्थात प्रत्येकाचा अनुभव वेगळा वेगळा असू शकतो.कोणाला वाईट अनुभव देखील येतो .किवा अनेकांना वाटते ते पैसे घेतात आणि त्यांचे काम करतात.माझा बरोबर मात्र अनेकदा चांगला अनुभव आला आहे आणि अशाच एक डॉक्टरा बद्दल मी आज लिहिणार आहे.वरळी येथे पोद्दार आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर आहे.येथे नेहमी अनेक पेशंट येत असतात.अनेकदा शेवटचा पर्याय आयुर्वेदिक करून बघू म्हणून अनेकजण येतात.अशाच पेशंट मधील मी एक ....

            अनेक ठिकाणी उपचार करून फरक पडत नाही म्हणून शेजारीण मला तिचा बरोबर चार वर्षा पूर्वी येथे घेवून गेली.बघू येथे तरी काही फरक पडेल का बघावे म्हणून गेले.खूप गर्दी बघून अंदाज आला.डॉक्टर नक्कीच चांगले असणार.माझा नंबर आला आणि समोर, डॉक्टर मनोहर गुंड्डेटीवार.प्रत्येक डॉक्टरांना पेशंटची हिस्ट्री सांगायला लागते.ती सांगून झाली.शांतपणे ऐकून औषधे दिली.काही प्रश्न नाही.पण त्या औषधाचा फरक पडला.गेली चार वर्ष मी तिथून औषध घेते.महिन्यातून दोनदा जावे लागते.खूप पेशंट असतात.सकाळी आठ वाजता ओ .पी .डी सुरु होते .खूप गर्दी असते कधी दोन तर कधी तीन देखील वाजतात.पण मी कधी त्यांना मध्ये चहा मागवून घेता ना किवा मधेच जेवणास जातानि बघितले नाही. 

          अनेकदा आपण बोलतो कि नकरात्मक ऐकून आपण देखील नकरात्मक होतो.माणसाने नेहमी चांगले वाटेल असे बोलावे.पण येथे खूप पेशंट असतात.अर्थात सगळे वयस्कर आयुष्याचा कंटाळा आलेले.दुखण्यामुळे त्रस्त झालेले.हे पेशंट जेव्हा डॉक्टरा समोर येतात तेव्हा त्यांना आपल्याला किती त्रास आहे हे सांगायचे असते.आणि ते सांगतात.पण सकाळ पासून या सगळ्या पेशंटचे बोलणे ऐकतात.शांतपणे,अगदी खूप त्रास होतो डॉक्टर "मरावे वाटते !"असे देखील पेशंट बोलतात.{अर्थात मी देखील त्यात होते }शांतपणे काही नाही मी औषध देतो ते घ्या बरे वाटेल .असे बोलून समजवतात .

       अनेकदा दोन तीन तास बसायला लागते असा वेळी एक तर पुस्तक वाचते किवा बाजूला जे पेशंट असतात त्यांचा बरोबर बोलत असते.ते-व्हा जाणीव होते आपले दु:ख किती कमी आहे.येथे येणारे अनेक पेशंट हे "घराचा दरवाजा अतिशय मजबूत दिसणारा पण ,आत घराला सगळे टेकू दिल्या सारखे कमजोर "असे वाटतात .काही पेशंट हे स्वता उठता बसता येत नाही.त्यांना उचलून आणले जाते .सहा सहा महिने पेशंट येथे राहतात.स्वताच्या पायावर चालत जातात.लकवा मारलेले अनेक पेशंट येथे बघून माणसाचे काही खरे नाही.असे काय गुन्हा असतोकि माणसाला देव एवढे लाचार करत असेल हा प्रश्न मनात आल्या वाचून राहत नाही .पेशंट पेक्षा त्यांचा बरोबरील लोकांची ओढाताण आणि पेशंटची चीड चीड बघून वाटते आपले दुखं किती छोटे आहे.अश्या पेशंटला जगायला उम्मिद्द देतात ते डॉक्टर ....


त्यांचा मधील संयम बघून कोणती अशी शक्ती असते यांचा कडे कि सगळ्यांचे बोलणे ते शांतपणे ऐकत असतील.ते बोलणे कमी आणि रडगाणे जास्त असते ते पण एक पेशंट चे नाही तर साठ सत्तर ,एकदा न राहवून मी त्यांना हा प्रश्न विचारला पण होता "तुम्ही शांतपणे सगळ्यांचे कसे ऐकू शकता "यावर त्यानी छान उत्तर देले होते."आजाराने कंटाळलेला व्यक्तीला त्याचे कोणी ऐकावे ,विचारपूस करावी वाटते .त्यातून त्यांचा अर्धा आजार बरा होतो "अगदी सुट्टीवर असले तरी आपल्या पेशंट बरोबर बोलणारे हे डॉक्टर ,कधी मी त्यांना त्रस्त चिडलेले बघितले नाही.केंद्र कडून चालवले जाणारे या हॉस्पिटल. पगार घेवून आपले काम करणारे हे डॉक्टर किवा पोद्दार मध्ये काम करणारे सगळे .माणुसकी मधून काम करतांनी बघून कुठे तरी वाटते.हे सगळे माणसातले देव आहे .

      आज त्यांचा बद्दल असेच मनातले काही लिहावे वाटले.

Sunday, 13 March 2016

म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असते

"आपण लक्षात घ्यायला हवे नलू ,म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असते "
नटसम्राट नाटकातील एक सवांद ,पण मनापर्यंत जाणारा ....आप्पा उर्फ गणपतरावांचा जावई त्यांच्या मुलीला बोलतो .यावर ती बोलते."हे ठीक आहे.पण या दुसऱ्या बालपणाला आई कुठून आणायची ?"किती विचार करायला लावणारा हा प्रश्न .....खरे तर हे नाटक जेव्हा लिहिले होते तो काळ ७० चा म्हणजे चाळीस पंचेचाळीसवर्ष आधीचा,तेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होती.मुलांनी आईवडिलांना सांभाळायचे असते.हा समाज मान्य असा नियम होता असे म्हंटले तरी चालेन.हळूहळू बिभक्त कुटुंब पद्धती आली आणि प्रत्येकाला स्वताची जागा {स्पेस ]हवी असे वाटायला लागले.त्यात मग कोणी लुडबुड करू नाही असे वाटायला लागले.मग ते आई वडील आसले तरी,येथून सुरवात झाली मग वृद्धाच्या समस्यांची."हे ठीक आहे.पण या दुसऱ्या बालपणाला आई कुठून आणायची ?"हा प्रश्न पुर्वी नव्हता का ? होता तेव्हा हि होता.पण तेव्हा तो जाणवत नव्हता.कारण "एका बालपणाला सांभाळायला दुसरे बालपण असायचे "!एकत्र कुटुंब पद्धती मुळे घरात सुना मुले आणि नातवंड असत आणि ती नातवंड म्हणजे वृद्धाचे बालपण सांभाळणारी आई असायचे ! आणि त्यांना समजून घेण्याचे काम करायचे लहान मुले.एकाच घरात सगळे एकत्र राहत त्यामुळे एका पेक्षा अनेक नातू आणि पणतू देखील असायचे.सुना कामात असतील तेव्हा मुले सांभाळण्याचे काम आजोबा आज्जी कडे असे.आई पेक्षा आज्जी आजोबा जवळचे वाटायचे मग.अगदी मग चिमुकल्या बोटांनी पकडून "चला आजोबा आपण मंदिरात जावू ,किवा आपण खेळू "असे म्हणून स्वता बरोबर आजी आणि आजोबाना जीव लावायचे.आज्जी किवा आजोबा जेवले तरच मी जेवणार म्हणून हट्ट करायचे.काही वर्षा पुर्वी असे दृश्य अनेक घरात दिसत असे.त्यामुळे आपल्या नातू पणतू मध्ये रमणारे आजी आजोबा मुळे बाकी कोणाला त्रास देखील होत नसे.कारण एका बालपणाला दुसरे बालपण सांभाळून घेत असायचे.मी वरळीच्या पोद्दार हॉस्पिटल मध्ये १५ दिवसातून एकदा जात असते.जवळ जवळ चार वर्षा पासून जाते.मला तिथे नेहमी दोन वयस्कर व्यक्ती भेटतात.सत्तरच्या पुढे वय असणार.त्यातील एकाला गुढघे दुखीचा त्रास आहे.म्हणून ते औषध घेण्यास येतात.आणि त्यांच्या बरोबर नेहमी त्यांचा मित्र असतो.अगदी सावली सारखा.दोघे येतात कधी दोन तास कधी तीन तास देखील बसायला लागते .मी त्यांना नेहमी बघते.पण या वेळी त्यांचा नंबर माझ्या पुढे होता.त्याना विचारले तुमचा घरी कोणी नाही का ? त्यांनी हो म्हणून फक्त मान हलवली.मी पुढे काही बोलले नाही.त्यांनी औषध घेतले ते माझ्या आधी बाहेर पडले.थरथरत्या हाताने एकमेकला आधार देत ते गेटच्या बाहेर पडत होते.मी नेहमीच त्यांना असे जातानी बघते.पण काल मी त्यांना जातानि बघितले आणि मी स्वताशीच बोलले............म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असते "" पण या दुसऱ्या बालपणाला आई कुठून आणायची ?"असेच मनातले काही

Thursday, 10 March 2016

दूर  कुठे तरी जावे खूप दूर .......
फसव्या या दुनियापासून दूर ..........
नजर जाईन तिथपर्यंत शांतता.
एखाद्या निष्पर्ण अश्या बाभळी खाली बसावे ...........
तिला सांगावे मी तुझा सारखीच आहे ग !
जगाला काटेरी दिसणारी ...........

संस्कार म्हणजे  काय ?
जे समाजाला मान्य असते ते करणे .समाजा विरोधी न जाणे .
मग समाज काय म्हणेल या भीतीनी जगत राहणे .
मन मारून जगणे.जे हवे ते मिळत नाही .ते मिळवण्याची हिम्मत न होणे 
म्हणून त्याला आमचे संस्कार हे गोंडस नाव दिले जाते .
समाज काय म्हणेल म्हणून सुंदर आयुष्य न जगता ,मनाचे दरवाजे कायमचे 
बंद करून टाकणे.स्वताच स्वताच्या कोशात जगणे .
मनाच्या या दारावर कोणी  तरी येवून दस्तक देवू  बघते .
पण पुन्हा संस्कार ,समाज . दार उघडण्याची हिम्मत होत नाही .
कोणी तरी दारावर येवून परत गेले याची खंत मग जगू हि देत नाही ...........
मनाचे दार उघडले जाते तो पर्यंत  उशीर होवून जातो ...
दारावर दस्तक देणारा निघून गेलला असतो ....
अनेक प्रश्न मागे ठेवून ......................
आयुष्यात अनेकदा परिसा सारखे कोणी हवे असते.
पण नेहमी दगडच भेटलेले असतात.खडबडीत टोकदार हात आणि मन 
रक्तबंबाळ करणारे ,अचानक परीस हातात येतो.पण दगड  समजून त्याला फेकून देण्याची 
चूक होते.त्याचे अस्तित्व आणि मूल्य समजतच नाही.
जेव्हा समजते तेव्हा उशीर झालेला असतो .परीस हातातून गेलेला असतो .
पुन्हा त्याला मिळवण्याची धडपड व्यर्थ असते.
याला नशीब किवा नियती म्हणत असावं का ?

काही क्षण चालायचं तुझा बरोबर ...........
स्वच्छ   समुद्र किनारा ............
हातात तुझा हात ........
निशब्द तू ....
निशब्द मी .......

निशब्द  हा  किनारा ...........
काही न बोलता  ,खूप काही बोलायचे ............

आभास

तत्व ,स्वभिमान ,प्रामाणिक पणा ,एकनिष्ठता ,बोलायला  किती सहज आणि  सोपे  शब्द  असतात  ना  ???
पण कधी  कधी  हे  शब्द आयुष्य मुश्कील करतात.कोणी  तरी आपले असावे असे प्रत्येकाला वाटते .काही नशीबवान  असतात त्यांना सगळे काही  मिळते .पण काहीना कोणी  नसते .आणि  त्याची त्याना सवय होते.
एक प्रकारची कठोरता  येवून  जाते मग स्वभावात.सगळ्या कडे  एक नजरेने  बघण्याची सवय होवून  जाते.
अचानक कोणी  येते आपुलकी दाखवते.पण ते समजतच नाही. एकाच नजरेने बघण्याची सवय झालेली असते ना ?
मग अविस्वास दाखवला  जातो समोरचा वर,नकळत कोणालातरी दुखावले जाते.
नंतर जाणीव होते त्यांचा असण्याची , पण उशीर झालेला असतो .
कोणी  खूप  जवळ येवून  दूर गेलेले असते .
आयुष्याच्या रखरखीत रस्त्यावरून एकटे चालतानी ....
कोणी असावे असे वाटते .......
दूर वरून कोणी येतांनी दिसते ..........
काही  क्षण मन सुखावते .........
पण  तो एक आभास असतो .........
कोणी तरी येण्याचा  .............

Wednesday, 2 March 2016

असेच मनातले काही

ठाण्या मध्ये एकच व्यक्तीने आपल्या घरातील १४ लोकांना मारून स्वता आत्महत्या केली .त्याची बातमी करण्यास गेलेला रिपोर्टर अटैक येवून मरण पावला .एकूण १५ लोकांचा जीव गेला.कारण काही समजले नाही .
पण प्रश्न पडतो असे का घडते .का माणसे असे क्रूर झाले.
एक दिवस असा नसतो कोणी तरी कोणाची हत्या केली.आता काही गोष्टीचे काही वाटणे बंद झाले आहे ,काय कारण असेल याचे.आपण आज विज्ञानामुळे 
बोलतो जग जवळ आले पण खरच असे झाले आहे का ? 
आता एक क्लिक वर जगातील कोणती माहिती समजते .म्हणून आता आपल्याला कोणाची गरज राहिली नाही हा एक नवीन भ्रम तयार झाला आहे का ? आधीच्या काळी माणसे एकमेकावर अवलंबून होते .काही माहिती पाहिजे असेल तर एकमेकांना विचारले जात असे.माणसात सवांद होता.
समोरासमोर आल्या मुळे चेहरा दिसायचा मनात काय चालू आहे समजत असे .
मग त्या व्यक्तीला बोलते केले जात असे.आज जगातील कानाकोपर्यात आम्ही सोशल साईट मुळे मित्रमैत्रिणी तर बनवत आहे .रोज एकमेकांना भेटतो बोलतो ,पण खरच आम्ही सगळे खरे बोलतो का ?
जे बोलतात ते खरे हे मानायला मन तयार नसते कारण अनेक जन खोटे बोलून अनेकांना फसवत असतात .मग अश्या वेळी सवांद होतो पण मनातील बोलले जात नाही ते मनात राहते .वरवर नॉर्मल दिसणारे लोक मनातून खूप अस्थिर झालेले असतात .मग कधी तरी त्यांच्या कडून भयानक घडून जाते.आपण फक्त बोलतो तो ती शांत होता मग असे कसे झाले विस्वास बसत नाही.घटना ज्यांच्या आसपास घडते त्यांना ये गोष्टीनी खूप मोठा फरक पडतो .माणसाचा माणसावर विस्वास राहत नाही.मग सगळ्या नात्या कडे संशयाने बघितले जाते.
म्हणून आज खरच आज गरज आहे ती संवादांची एकमेकाशी वास्तव मध्ये  बोलण्याची ...
‪#‎असेचमनातलेकाही‬