Sunday, 27 September 2015

बाप्पाचे मनोगत

माते मी आज येतो आहे ....
किती कंटाळा आला आहे ग !कधी एकदा तुझा कडे येतो असे झाले आहे .
सगळे जोरात जयघोष करत आहेत ,"गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या "पण मला हा आवाज आता नको झाला आहे .नको नको ते गाणे ऐकून माझे कान दुखायला लागले आहे .
माते तुला आठवते मी मस्त तुझा जवळ बसलेला असतो .शांत पणे ...
पण दरवर्षी माझे हे भक्त येतात आणि मला तुझा पासून दूर घेवून जातात .
एकीकडे मला जायचे नसते म्हणून मी तुझा हात घट्ट पकडून ठेवतो तर दुसरी कडे माझे भक्त मला बोलावत असतात .या सगळ्यात माझी ओढाताण होते .
माझी इच्छा नसते जाण्याची कारण दहा दिवश ते गाणे ऐकयला नको वाटतात .माझे आगमन म्हणून सुद्धा हे लोक रस्ते अडवतात .मिरवणूक काढतात .कोण आजारी कोण असेल कोणाला त्रास होत असेल हे पण बघत नाही .अनेक तास वाहतुकीचा खोळंबा करून हे मला मंडपां मध्ये घेवून जातात .माझ्या नावाने वर्गणी जमा करतात .कोणाची ऐपत नसते तरी त्यांना वर्गणी देण्यास भाग पाडतात .हे कमी कि काय म्हणून मला बघयला लोक येतात अगदी मनापासून पण त्यांना मी दिसत नाही कारण माझ्या मंडपांला पडदा असतो .मग पास घेवून माझे दर्शन लवकर होईल हे सांगितले जाते .बाकीचे पाय दुखतात तरी रांगेत उभे राहतात हे मला बघवत नाही .काही तर व्यक्ती किती मोठी हे बघून त्यांना सरळ माझ्या पर्यंत घेवून येतात .गरीब भक्तांना धक्काबुक्की करतात .हे बघून माझे मन दुखी होते .
मी सगळी कडे एकाच रुपात असतो मग तो मंदिरात असो कि छोट्या मूर्ती मध्ये मग हा बाप्पा नवसाला पावतो तो बाप्पा नवसाला पावतो असे हे लोक का बोलतात .नको तिथे का गर्दी करतात .मोदक ते पण किती प्रकारचे त्यात अनेकदा भेसळ असते .ते पण नाही बघवत ,
पण माते काही भक्त आहेत ग असे ते मला मना पासून बोलवतात म्हणून मला जावे लागते तुला सोडून .काही भक्त असतात ग त्यांच्या घरात माझ्या मुळे ख़ुशी येते,त्या भक्ता साठी मला जावे लागते .त्याच भक्ता साठी मी हे शीला मुन्नी गाणे सहन करतो .कारण तेच भक्त असतात माझी मनापासून पार्थांना करतात .साधा का होईना मोदाक माझा समोर ठेवतात .त्याच भक्तांना साठी मी येतो .आज एकीकडे आनंद होतो आहे .आज मी तुझा कडे परत येतो आहे .आणि वाईट देखील वाटत आहे .माझ्या लाडक्या भक्तांना मी सोडून येतो आहे .
माते मी येतो आहे .......

Saturday, 26 September 2015

भाकरीची गोष्ट ......

भाकरीची गोष्ट ......
खूप भूक लागली कि पटकन ताटात भाजी भाकर घ्यायची आणि खावून टाकायची .पण कधी आपण विचार केला का एक भाकर ताटात येई पर्यंत कशी आणि कुठून येते .अर्थात त्याची गरज वाटत नाही ,ना ?
शाळेत असतानी भाकरीची गोष्ट . नावाचा धडा होता नक्की आठवत नाही पण आनंद यादव याचा असावा .आमच्या कडे जास्त करून खाल्ली जाते ती बाजरी ,कमी पाऊस असल्या मुळे जिरायती पिक म्हणून बाजरी जास्त होते.
जून मध्ये पाऊस पडला कि शेतात ढेकळे फोडण्यासाठी वखर हाकला जातो शेत सपाट केले जाते..पाऊस पडला का सुरवात होते पेरणीस,ज्याला पाभर म्हणतात .त्यातून पेरणी केली जाते.पाभर मधून टाकलेले बी झाकले जावे म्हणून त्या मागे राहाक्या असतो .त्याने बी झाकले जाते . .बाजरी बरोबर मठ ,मुग ,आणि कुळीद पण टाकले जातात.कोणाला जास्त माहिती नसलेला वरी {भगर } सारखा दिसणारे एक धान्य असते ज्याला राळे म्हणतात .{आज कोणाला माहिती नसेल }हे पण पेरले जाते.आणि न पेरता बाजरी बरोबर येणारे आणि पिकाला त्रासदायक असे एक गवत देखील येते ते म्हणजे कोंबडा गवत.ज्या मुळे सगळे शेत पांढरे दिसते .
बाजरीची पेरणी झाली कि होते ती निदांनी .शेत जर मोठे असेल तर हे शक्य नसते .बाजरी पिक थोडे मोठे झाले कि कोळपणी केली जाते ज्या मुळे पिकतील गवत काढले जाते.यानंतर बाजरी जर चांगला पाऊस झाला तर जोमाने वाढते .बाजरीला फुलारा आला कि पाऊस पडला तर कधी कधी बाजारीवर रोग पडतो .ज्याला आरगड बोलतात .ज्या मुळे बाजरी काळी पडते .या सगळ्यातून जर पिक चांगले आले कि त्याची मग बाजरीची सोगणी केली जाते .सोगणी करायची त्याच्या पेंढ्या बांधायच्या त्याचे वघे घालायचे .ते सगळे एक ठिकाणी जमा करायचे .त्याची शेतात सुडी करायची .सोगणी करातांनी जर पाउस आला तर त्या पेंढ्या ओल्या मातीती राहून त्याला उदाई लागू नाही ओल्या पेंढ्या लवकर सुखाव्या म्हणून त्या उभ्या करून ठेवायला लागतात ज्याला कोचळे म्हणतात .त्यानंतर सुरवात होते खळे करण्यास ,शेतातील पिक खळ्यात आणले जाते .त्या आधी जमीन गोल आकारा मध्ये सारवली जाते.त्याला खळे म्हणतात .शेतातील बाजरी खळ्यावर आणून परत त्याची खळ्यावर सुडी केली जाते .जेव्हा वेळ असतो पाऊस नसतो तेव्हा त्यांची मोडणी केली जाते म्हणजे कणसे खुडणे .यानंतर आज आधुनिक पद्धतीने मशीन मध्ये धान्य काढले जाते .
पण पूर्वीच्या काळी मात्र मळणी केली जात असे .मग असे खळे महिना महिना चालत असे .यानंतर तयार होते बाजरी ,ती दळून आणणे मग पीठाची भाकरी बनवणे .या सगळ्या सोपस्कारा नंतर भाकरी तयार होते .
या सगळ्या कष्टाची जाणीव होती म्हणून पूर्वीचे लोक मूठ भर धान्य जरी सांडले तर एक एक दाणा जमा करत. पण आज असे करत नाही मुळात ताटात येणारी भाकरी असो कि चपाती ती कशी येते याची जाणीव कुठे असते .
एक फ्रेंड च्या कालच्या पोस्ट वरून हे सगळे आठवले म्हणून लिहिले.
फोटो -गुगल सर्च









Friday, 4 September 2015

शिक्षक दिन

आज शिक्षक दिन ..
शिक्षण देवून या जगात लायक बनवतात ते शिक्षक .असे कोणी नसेल ज्यांना आपले शिक्षक आठवत नसतील .आज शिक्षक मुलांना शिक्षा करू शकत नाही .पण एक काळ होता  आपण जे शिकवतो ते मुलांना आलेच पाहिजे असा आग्रह असे आजच्या सारखे तेव्हा गुगल किवा संगणक नव्हते .मग मुलांना बेरीज, वजाबाकी,गुणाकार ,भागाकार,आलाच पाहिजे त्या साठी प्रथमिक शिक्षक हे पाढे शिकवत ते आलेच पाहिजे म्हणून रोज म्हणून घेत .नाही आले का छड्या खायला लागत .मग भितिनी पाढे पाठ केले जात .आज देखील हिशोब करतांनी त्याचा किती उपयोग होतो .
आणि आठवतात आमच्या प्राथमिक शाळेतील आमच्या बाई .आजच्या मुला सारखा आम्हाला त्यांचा कधी राग येत नव्हता उलट तेव्हा पण आदर होता आज पण आहे .
माध्यमिक शाळेतील शिक्षकांना तर आम्ही आज पण विसरू शकत नाही .एक वेगळा जमाना होतो तो .एखादा मुलगा आला नाही तर तो का आला नाही म्हणून दुसऱ्या मुलांना त्यांना का आला नाही हे बघायला पाठवत .मुलांना फी साठी पैसे नसेल तर स्वता देत असत .जादा तास घेत .प्रत्येकाच्या घरी लाईट नाही हे माहिती असे .त्यांचा अभ्यास झाला पाहिजे म्हणून रात्री अभ्यासिक चालू ठेवत .
 सगळ्या कडे घड्याळ नाही म्हणून बोर्डिंग मधील मुलांना पाहते उठवायला जाणारे आमचे शिक्षक आज पण आठवतात .दुसऱ्या गावात बोर्ड म्हणून बोर्डिंग च्या मुलाना स्वताच्या घरातून डबा माग वणारे ,अभ्यास करत नाही म्हणून मारणारे परंतु निरोप समारंभ वेळी रडणारे आमचे शिक्षक .कधी त्यांना आम्ही विसरू शकत नाही .त्या आमच्या शिक्षकांना आणि त्याच्या हाता खाली शिकून आज शिक्षक असणारया सगळ्या शिक्षकांना .शिक्षक दिनाच्या शुभेछ्या.

गोकुळ अष्टमी

श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीला रोहिणी नक्षत्र असताना कंसाच्या बंदिशाळेत,गोकुळात झाला म्हणून या दिवसाला गोकुळाष्टमी म्हणतात. संपूर्ण भारतात सर्व ठिकाणी अतिशय उत्साहात हा जन्मदिवस साजरा करतात. या दिवशी विविध खाद्यपदार्थ दही, दूध, लोणी एकत्र करून कालाविणे म्हणजेच “काला” होय. यालाच दहीकाला असे म्हणतात. या दिवशी दहीकाला करून खाण्याचा प्रघात आहे. श्रीकृष्णाचा हा आवडता खाद्यपदार्थ होता.
अष्टमीचा दुसरा दिवस गोपाळ काला असतो.या दिवशी दही हंडी फोडली जाते.पण हा सन साजरा करातांनी खरच त्यात श्रधा असते का ? असा प्रश्न आजचे उत्सव साजरे करतांनी मनात आल्या वाचून राहत नाही.
आज आपण इंटरनेटच्या जमान्यात जगत आहे असे बोलतो.पण सण का साजरे केले जात होते त्याचा हेतू काय होता हे समजून घेत नाही.
पूर्वीच्या काळी मनोरंजनाच्या साधने नव्हते.लोकांनी एकत्र यावे काही वेळ एकत्र
घालवावा .या हेतूने अनेक सन साजरे केले जात .श्रावण मध्ये सगळीकडे हिरवेगार झालेले असते .शेतातील बहुतेक कामे संपलेली असत .अश्या वेळी पोथी पुरण .भागवत सप्ताह चालू असत .पण आज काय होते.आज तर मनोरंजनाचे अनेक साधने असतानी सुद्धा आपण हे सन साजरे करातांनी काय करतो .उंच उंच दही हंड्या बांधल्या जातात.त्या फोडण्यासाठी मग अनेक गोविंदा पथके तयार होतात .लाखोच्या दही हंड्या फोडण्यासाठी आणि बक्षिसा साठी मग हे गोविंदा आपल्या जीवाची पर्वा करत नाही.
अनेक जण जखमी होतात.काही तर कायमचे अपंग होतात.त्यांच्या घराचे मग अश्या मुला कडे रडत बघत आयुष्य घालवतात.
आज सगळीकडे दुष्काळ पडला आहे अनेकांना एक हंडा पाणी मिळावे म्हणून किती पायपीट करायला लागते.आज अनेक शेतकरी आत्महत्या करत आहे .
आणि असे उत्सव साजरे करून किती खर्च केले जातात.किती पाणी वाया घालवले जाते.अनेकदा अश्या उत्सवा मुळे अनेक रस्ते बंद होवून जातात .जोरजोरात डीजे लावले जातात .कधी आजारी माणसे असेल तर त्यांना किती त्रास होतो. पण कोणी काही बोलू शकत नाही जर बोलणार तर त्यांना धार्मिक भावना दुखावल्या जातात .पण विचार केला तर सन हे सन म्हणून फक्त साजरे केले तर ? कोणाला त्रास न होता ? असे होवू शकते ना ?

फोटो -गुगल सर्च