Thursday, 11 December 2014

वक्त ,समय ,वेळ जीवनात या गोष्टीला किती महत्व असते ना 


वक्त ,समय ,वेळ जीवनात या गोष्टीला किती महत्व असते ना .रोजचे टेन्शन ,काम या मध्ये आपण किती अडकून पडतो.जसे बोलतात ना झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे .हेच चालू असते ..........
पण कधी कधी मागे वळून पण बघावे जीवनातील सु:ख दु:ख आनंदाचे प्रसंग ..........आपण चालून आलेल्या वाटा आणि त्या वरील आपल्या आठवण रुपी पाऊल खुणा ज्या नेहमी आपल्या बरोबर असतात .पण आपण कुठे तरी त्याच्या कडे दुर्लक्ष करत असतो आणि पुढे पुढे चालत असतो ......आणि कधी तरी अचानक आपण खूप मागे जातो ....सु:खद आठवणी मुळे आपण हसतो .तर दु:खद आठवणी डोळ्यात पाणी आणतात.रोजच्या धावपळ या मध्ये कधी तरी आपण खूप थकून जातो. मग या आठवणी मनाला फ्रेश करून जातात .

No comments :

Post a Comment