Tuesday, 23 December 2014

असेच काही पडलेले प्रश्न

काही पडलेले प्रश्न ???
दहावीचा निकाल लागला अनेक मुलांना खूप मार्क्स पडले ,
साहजिक अनेक आई वडिलंची अपेक्षा वाढते .
गेले चार पाच वर्ष पासून मुलांना best five मुळे ७० टक्केच्या पुढे मार्क्स 
पडतात .
उच्च शिक्षण म्हणजे इंजिनियरिंग किवा डॉक्टर ,
पण डॉक्टरची फी परवडत नाही मग अनेक पालकचा कल हा
इंजिनियरिंग डिप्लोमा कडे असतो .
आज मुंबई सोडून पूर्ण महाराष्ट्र मध्ये कुठे जा तुम्हला छोट्या तालुक्याच्या
ठिकाणी देखील Polytechnics कॉलेज दिसतील .
एक नाही तर अनेक ,अनेक कॉलेज हे राजकारणी लोकांचे आहे .
किवा मोठ्या बिजिनेस मध्ये असणर्या लोकांचे .
मग भरमसाठ फी .पण आपला मुलगा किवा मुलगी
इंजिनियर होणार म्हणून पालक मुलाची बौद्धिक पात्रता न बघता
फक्त त्यांना खूप मार्क्स पडले म्हणून इंजिनियरिंग पाठवताना दिसत आहे
मग अनेकदा असे दिसून आले आहे मुलांना अभ्यास झेपत नाही .पहिल्याच वर्षी मध्ये
के .टी लागते .घरच्या लोकांच्या अपेक्षा मग मुला कसे तरी पास होतात .
जेव्हा हि मुले नोकरी शोधायला बाहेर पडतात तेव्हा यांना कुठे नोकरी भेटत नाही
हे मी ग्रामीण भागात केलेले निरीक्षण आहे .
या सगळ्या नन्तर मनात एक प्रेश्न नक्की येतो .
या मध्ये काही उद्देश आहे का .
कॉलेज .नन्तर पुस्तके ,क्लास ,या सगळ्याचा मिळून काही हेतू आहे का ?
best five आणि शाळा कडे २० मार्क्स या मुळे मुलांना खूप मार्क्स देण्या मागे .
नक्की फायदा कोणाचा ??? 
कारण अनेक मुलांना १२ विला खूप मार्क्स कमी पडतात .





१}राजकारणात भाषा एक माध्यम, साधन असतं आणि ते हत्यार अवजार म्हणूनही वापरता येतं. काही मिनिटांतच या ब्रेकिंग 1इमेजची ब्रेकिंग न्यूज बनून जाते. माध्यमांनाही सतत काही थरारक, रोमांचक, स्फोटक, धक्कादायक सांगायची, द्यायची सवय लागल्यानं अशी विधानं लगेच पडद्यावर झळकू लागतात 
अचानक राजकारणी मंत्री काही तरी बोलतात .
ब्रेकिंग न्यूज म्हणून आपल्या समोर येते .त्या नन्तर जे काही बघयला 
भेटते ते समजण्या पलीकडील असते .
चर्ची म्हणून जो काही गोंधळ घातला जातो .असे वाटते हे लोक 
रस्त्यावर भांडत आहे ,
मेन म्हणजे पत्रकार त्यांना किती बोलू देता हा एक संशोधनाचा विषय आहे .
शेवटी काय बदनाम हुये तो क्या हुआ नाम तो हो गया



२}आज पसरलेले ट्यूशनचे जाळे बघितले कि वाटते पालक किती फि भरतात चांगली शाळा भेटावी म्हणून .

जर शाळा चांगली असेल तर मग ट्यूशनची गरज का ?
आज अगदी नर्सरी पासूनच मुलांना ट्यूशन असतात .
अशा वेळी आठवतात ते आमचे शिक्षक 
आमच्या वेळी तर अनेक पालक निरक्षर होते .
पण शिक्षक मुलावर किती मेहनत घेत असत .
आजच्या सारखी तेव्हा स्पर्धा नव्हती पण आपण जे शिकवतो
ते मुलांना आले पाहिजे हा आग्रह नक्की असायचा .
आज स्पर्धा वाढली भरमसाठ मिळणारे गुण यामुळे
आपले मुल कुठे मागे राहू नाही म्हणून ट्यूशन साठी मुलांना
पाठवले जाते .
पण या मुळे मुलांना वेळच मिळत नाही.शाळा आणि ट्यूशन
मुळे .
म्हणून आज गल्ली बोलत दिसतात ते ट्यूशन क्लास .
जसे शाळा चांगली आहे का नाही बघितले जाते तसेच क्लास पण .
परंतु तिथे शिकवणारे शिक्षक हे त्या पात्रतेचे आहे का हे बघितले जाते का?
शेवटी काय जीवघेण्या स्पर्धा असल्या मुळे हे शेवटी अपरिहार्य आहे त्याला काही
इलाज नाही .

फेसबुक पोस्ट  २७ जून १४ 


No comments :

Post a Comment