३}आमची शाळा
प्रत्येकाच्या आयुष्यात स्वताचे घर जेवढे प्रिय असते
तशी स्वताची शाळा ,आणि शाळेतील आठवणी ...
आज मी माझा शाळे बद्दल लिहिणार आहे.
माझे गाव तसे खेडेच पण सगळ्या सुविधा असलेले,
१० वी पर्यंत शाळा बँक ,दुकाने ,पोलिस स्टेशन सगळे होते आमच्या गावात.
पहिली ते चौथी पर्यंत प्राथमिक शिक्षण झाल्या नन्तर पाचवी पासून नवीन शाळा .
खरे तर त्या वेळी आमच्या गावात शाळेची इमारत नव्हती.गावातील अलग अलग ठिकाणी
वर्ग भरत असत.पण त्या वेळी खूप चांगले शिक्षक होते .त्या मधेच नन्नावरे म्हणून सर होते .
अजून पण शिक्षक असणार त्याच्या बद्दल जादा माहित नाही.शिक्षक आणि गावकरी मिळून
नवीन शाळे साठी इमारत बांधायचे ठरवले .आणि शाळे साठी जागा ठरली .
सुरवातील फक्त पाच खोल्या बांधल्या गेल्या .दरवाजे नाही खिडक्या नाही .सिमेंट प्लास्टर
नाही .फरसी {लाद्या }नाही .खाली फक्त वाळू ,परंतु खूप मोठे ग्राउंड असा शाळेत आमचा सहविचा वर्ग सुरु झाला .
मग रविवारी शाळेत बोलावले जायचे श्रमदान करण्या साठी .वाळू वाहणे,दगड वाहणे.ग्राउंड साफ करणे .
पण हे सगळे विद्यर्थी आनंदाने करायचे .आणि हे सगळे करातांनी नेहमी बरोबर असायचे ते आमचे नन्नावरे सर
आमचे हिंदीचे सर शाळा म्हणजे त्याचे दुसरे घर होते,सहावी संपे पर्यंत अजून तीन वर्गाचे काम सुरु झाले .
सातवी संपे पर्यंत नवीन बांधलेल्या खोल्या मध्ये ऑफिस ,प्रयोग शाळा ,स्टाफ रूम बनवले गेले .
मग पूर्ण शाळा एकच ठिकाणी दोन वेळेत सुरु झाली .पाचवी ते सातवी सकाळी आणि आठवी ते दहावी दुपारी
आता आमची शाळा दुपारी असायची शाळेचे थोडे थोडे काम चालूच होते.
बघता बघता दहावीच्या वर्गात गेलो .त्या वेळी शिक्षक म्हणजे मुलांना मना पासून शिकवणारे
सर्व मुलांच्या आईवडिलांना ओळखायचे त्या मुळे कधी रस्त्यात कोणत्या मुलाचे वडील भेटले
तरी त्याच्या बद्दल मनापसून सांगणारे होते
दहावीला जादा वेळ घेऊन शिकवत असत.त्या काळात सगळ्या कडे घड्याळ नव्हते .
बोर्डिंग मध्ये जी मुले राहत होते त्यांना वेळेवर अभ्यास साठी स्वतः पाच वाजता उठाव्न्यासाठी
जाणारे आमचे सर होते .
शाळेच्या इमारती बरोबर शाळे साठी जे मोठे ग्राउंड होते.त्या वर दहावीला असतानी आमच्या शिक्षकांनी सगळ्या
विद्यर्थी कडून झाडे लाऊन घेतले .अनेक मुले आता तर आम्ही या शाळेतून जाणार आहे मग आम्ही का हे काम करायचे
असे विचारयला लागले तेव्हा
'हि तुमची शाळा पाच वर्ष तुम्ही इथे राहिले या इमारती बरोबर तुमच्या खूप आठवणी आहे
पण तुम्ही आज इकडे झाडे लावणार ,तुम्ही येथून जाणार पण हे झाडे मोठे होतील या झाडच्या सावलीत नन्तर येणारे विधार्थी
बसतील आणि ते पण या शाळेचे असतील "
इंग्लिश आणि गाणित मध्ये पास होणे त्या वेळी खूप अवघड होते .अनेक मुले या दोन विषयात हमखास नापास होत .
इंग्लिश विषय साठी बस्ते सर होते आणि आमचे वर्ग शिक्षक देखील तेच होते .
आमचा वर्ग दहावी ब म्हणजे फक्त दंग करणारी मुले असे समजले जायचे .
म्हणून त्या वेळी नवीन आलेल्या प्राचार्यांनी आमच्या वर्गच्या दरवाज्यावर भिंती वर लिहिले
"नो दिसिप्लेन नो सक्सेस "
या गोष्टीची चर्ची पूर्ण शाळेत झाली .मग काय आमचे वर्ग शिक्षक वर्गात आले आणि त्या दिवशी अतिशय कडक असलेले
आमचे इंग्लिश चे बस्ते सर एक वेगळ्या रुपात आमच्या समोर आले.खूप दु;खी मनापासून बोलणारे माझा वर्गला नाव ठेवले
आता माझा वर्गातील जादा मुले पास झालेच पाहिजे.असा त्यांनी निर्धार करून टाकला .
बघता बघता दहावी संपली .त्या वेळी बोर्ड परीक्षा साठी दुसर्या गावात जावे लागत असे .
बसची सोय नव्हती येण्या जाण्याची सोय नव्हती.ज्या गावात बोर्ड होते तिथेच १५ दिवस राहायला लागत असे .
असा वेळी बरोबर असायचे ते आमचे शिक्षक .
परीक्षा संपली शाळा पण संपली .दहावीचा निकाल लागला आणि आमच्या वर्गातील जादा मुले इंग्लिश मध्ये पास झाले .
आमच्या शाळेचा त्या वर्षी सगळ्यात जादा निकला लागला .म्हणून त्या त्याच वर्षी आमच्या शाळेला दहावी बोर्ड भेटले .
आज बारावी पर्यंत शाळा आहे .अनेक मुले शिक्षण घेत आहे .
पण आज देखील शाळा आणि आमचे सर मनात घर करून राहिले आहे .कधी न विसरण्या साठी .
१७ जून २०१४
No comments :
Post a Comment