Wednesday, 10 December 2014

डॉ. द्वारकानाथ कोटणीस


इतिहासात आदर्श घ्यावी किवा अभिमान वाटावी असे अनेक महान विभूती होऊन 

गेल्या आहे ,ज्यांनी स्वताच्या पलीकडे जाऊन फक्त जगाचा विचार केला .
असेच एक डॉ. द्वारकानाथ कोटणीस
दिनांक १० ऑक्टोबर १९१० रोजी सोलापूर येथे द्वारकानाथ कोटणीसांचा जन्म झाला.
१९३६ मध्ये त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.
१९३७ मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले.त्यावेळी चीनने पंडित नेहरूंना पत्र पाठवून वैद्यकीय मदत मागितली होती.१ सप्टेंबर १९३८ मध्ये ५ डॉक्टरांचे पथक तिकडे रवाना झाले.चीनमधील हवामान व प्रामुख्याने थंडी सहन न झाल्याने या पथकातील तीनजण मायदेशी परतले. मात्र डॉ. कोटणीस अगदी हलाखीच्या परिस्थितीतही तेथे टिकून राहिले व त्यांनी चिनी सैनिकांची अतिशय तन्मयतेने सेवा केली. याकामी त्यांचे सहकारी डॉ. बसू यांनी डॉ. कोटणीस यांना मोलाची साथ दिली.
१३ दिवसांच्या लढाईत त्यांनी हजारो चीनी सैनिकांवर उपचार केले.त्या काही अवघड शस्त्रक्रिया हि होत्या.औषधांचा अपुरा पुरवठा,खाण्याची आबाळ,जपानी बॉम्बचा वर्षाव अशा परिस्थित डॉ.कोटणीस आपली जबाबदारी निभावत होते.
याचदरम्यान त्यांनी कुओचींग लान या चीनी नर्सबरोबर लग्न केले..जखमी सैनिकांच्या देखभालीसाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.अतिश्रम,कुपोषण,दुषित हवामान यामुळे त्यांची तबियत खालावत गेली.त्यातून त्यांना फेफरे येऊ लगले.तरीही ते थोडे बरे वाटले कि रुग्णांची सेवा करत.खेड्यातील लोक् तर त्यांना देवदूत मानू लागले.
अखेर एका खेड्यात त्यांचा मृत्यू झाला.तो दिवस होता ९ डिसेंबर १९४२.चीनमध्ये त्यांचे भव्य स्मारक आहे .{भारतात आहे का असे स्मारक माहित नाही}
डॉ.कोटणीस यांच्या जीवनाची कथा व्ही.शांताराम यांनी अजरामर केली.त्यांनी काढलेला 'डॉ.कोटणीस कि अमरकहाणी' हा चित्रपट केवळ हिंदुस्तानात नव्हेतर जगभर गाजला आहे


No comments :

Post a Comment