अनोखा बदला 
{एक कथा }
आज गावातील यात्रा म्हणून सगळे गाव खुश आहे.
या छोट्याश्या गावात वर्षातून भरणारी यात्रा तशी सगळ्या साठी
खूप आनंदची गोष्ट होती .या निमित्ताने पाहुणे येत भेटी होत .
पाहिला दिवस यात्रा असी तसीच असे पण दुसरा आणि तिसरा दिवस
फुल यात्रा असे .
गौरी अशीच या गावातील एक सतरा अठरा वर्षाची मुलगी .
एक भाऊ आणि आई वाडीला बरोबर राहणारी,चौथी पर्यंत शिकलेली रूपाने
चारचौघी सारखी दिसणारी .
सावळी असली तरी डोळे मात्र खूप बोलके होते तिचे .
आईबाबा बरोबर शेतात काम करयचे आणि घरात आईला कामाला मदत
करायची असा तिचा दिवस होता .
एक समजदार आणि आईचे ऐकणारी मुलगी होती ती .
पण कोणी काही बोलले तर एकूण न घेणारी.
ती पण आज यात्रेत आपल्या मैत्रिणी बरोबर जाणार होती
स्वत साठी तिला काजळ ,पावडर ,आणि असेच खूप काही घायचे होते .
आज यात्रेचा दुसरा दिवस असल्या मुळे खूप गर्दी होती .
गावातील लोक बरोबरच बाहेरून आलेले पण खूप लोक होते .
गौरी आणि तिच्या मैत्रिणी यात्रा बघत काही आवडले तर घेत
फिरत होत्या .
फिरत असताना अचानक त्याच्या लक्षात आले कि काही टवाळ मवाली टाइप तरुण त्याच्या मागे मागे फिरत आहे .आणि यांना उद्देशून काही बोलत आहे .
ती आणि तिच्या मैत्रिणी थांबल्या तेव्हा त्या तिघा मधील एक किरकोळ
तबियत असलेला आणि दाढी वाढवलेला मुलगा तिचा समोर आला आणि बोलला
"मेरी रानी बनोगी क्या?मस्त दिसतेस ."
काही समजण्याच्या आत सनकन त्या मुलाच्या कानाखाली आवाज निघाला .
"ये राणी बनवणाऱ्या आरशात तोंड बघितले आहे का" ?गौरी जोरात ओरडली .
तिचा आवाज ऐकून गावातील लोक पण आले आणि त्यांनी त्या तिघांना
चांगला चोप दिला.
आज गौरीच्या घरी गडबड चालू आहे कारण आज तिला बघायला मुंबई वरून
मुलगा येणार आहे .
मुलगा कंपनीत कामाला होता .स्वताचे घर होते.त्याला आई वडील नव्हते. काका आणि काकू होते फक्त ते पण गावी राहत होते .मुलगा सगळ्यांना पसंत पडला.आणि गौरीचे लग्न झाले .
आपल्यला छान नवरा भेटला आता आपण मुंबईला राहणार म्हणून गौरी खूप खुश
होती .
आज तिचा संसार सुरु होणार होता.तिला काका गाव वरून घेऊन आले .
आणि त्यांना घाई होती म्हणून ते परत गावी गेले .कंपनीतून नवरा कधी येणार
म्हणून गौरी वाट बघत बसली .तिच्या डोळ्यात खूप सारे स्वप्न होते .
नवरा आला तशी ती खूप खुश झाली पण त्याच्या चेहऱ्या कडे लक्ष जाताच ती
घाबरली कारण तो आल्या बरोबर तिला दारूचा वास आला होता.त्याचे डोळे लाल
झाले होते .
तिनी चुपचाप त्याला जेवण दिले.पण तुझ्या बापाने असे जेवण केले होते का ?बोलत
त्याने तिचा अंगावर ताट भिरकावले .या त्याच्या अनपेक्षित वागणे बघून ती गागरून
गेली .काल पर्यंत गोड बोलणारा नवरा हाच का ? असा तिला प्रश्न पडला .
काही समजण्या आधी तिचा तोंड वर जबरदस्त फटका पडला.
फटका एवढा तीव्र होता कि तिचे समोरील दात पडले.खूप वेदना झाल्या मुळे
ती जोरात ओरडली .
हा हा हा हा तिचा नवरा हसत होता.त्याने तिला पाणी दिले दुखणे कमी होवे म्हणून
औषध दिले .झोपेची गोळी दिली .
दुसर्या दिवशी जाग आली तेव्हा दुपार झाली होती.तिला खूप त्रास होत होता .
ती रडत काही न खाता पडून राहिली .
पण आजची रात्र पण काही अलग नव्हती .परत कालची पुनरावृत्ती झाली होती .
नवरा अशा का वागतो तिला समजत नव्हते.विचारले तर तो फक्त हसायचा तिच्या कोणत्या प्रश्नाचे उत्तर तो देत नव्हता.
आज एक महिना झाला होता तिचा लग्नाला आणि तिचे समोरील सगळे दात पण
त्याच्या मारा मुळे पडून गेले होते.
आज काही झाले तरी अशा का वागतो याचे उत्तर मिळवायचे तिनी ठरवले .
पण तो रोजच्या सारखा हसत सुटला आणि तिचा संयम सुटला .
तिनी शक्ती एकवटून त्याला धक्का दिला आणि बाजूला पडलेला दांडा घेतला.
आणि ती त्याला मारणार तोच तो बोलला .सांगतो
आठव दोन वर्षा पूर्वीची तुझ्या गावातील यात्रा.
पण माझ्या गावातील यात्रेचा आणि या सगळ्याचा काय संबंध तिला काही काळात नव्हते .
"नीट बघ माझा कडे मी तोच आहे.ज्याच्या कानाखाली तू आवाज काढला होता .
मी तेव्हाच शपथ घेतली होती तुझे सगळे दात पाडीन आणि तुझा हातात देईन .
दोन वर्ष आधी व्ययाम केला ताबियात सुधारली. कराटे शिकलो .दाढी कडून टाकली
मग तुझाशी लग्न केले."
गौरी खरा तर ती घटना कधीच विसरून गेली होती .
तिला काळातच नव्हते हा कशा बदला 
आशा नवले
  • Write a comment...