कथा ५ .
आवडती आजी
आजी हा शब्द जरी उच्चारला तरी समोर उभी राहते ती एक प्रेमळ आजी .
माझ्या नशिबाने मला आजी नव्हती .माझ्या जन्माच्या आधी .आई आणि वडिलांचे
.आई वडील देवाघरी गेले होते .
जादा करून लोक शेती करणारे.दिवसभर शेतात जाणारे ,अशा वेळी मुलना बघयला असे ती आजी .
दुपारी शाळेतून घरी आल्यावर अनेक मित्र मैत्रिणीची आजी घरी असे ती त्याची वाट बघत असे .
घरी आल्यावर त्यांना प्रेमाने जेवू घालत असे .ते बघून मला नेहमी वाईट वाटत असे .
मी आणि माझे छोटे भाऊ घरी आल्यावर दिसत असे ते बंद दरवाजा .
आम्हाला मग खूप वाटायचे आम्हाला का नाही आजी .
"माणसा कडे एखादी गोष्ट नसेल तर तो नेहमी कोण मध्ये शोधात असतो ."
आमची मानलेली आजी .
आमच्या घर पासून काही अंतरावर राहणारी ८० वर्ष वय असलेली अशीच एक आम्हाला आजी
भेटली .
साडे पाच फुट उंची असणारी ,लांबसडक केस ,रागाने थोडी सावळी .
आजी .तिला चार मुलगे आणि दोन मुली .
एक मुलीला नवर्याने सोडले होते .त्या मुली आणि तिच्या तीन मुला बरोबर
आपल्या मुलाच्या शेजारी आजी राहायची .
अचानक आजीच्या मुलांनी आपल्या बहिणीला तिथून हाकलून दिले .
मुलगी दुसरीकडे राहायला गेली .पण आजी तिथेच राहिली .
सुना आलटून पालटून तिला जेवयला देत असे .
आजीला तंबाखू खांयची आणि तपकीर ओढायची सवय होती .
त्या साठी मात्र तिला कोणी पैसे देत नसत .
आजी अधून मधून आमच्या घरी यायची .
आम्हाला ती खूप आवडत असे .आई तिला तंबाखू साठी पैसे दायची .
काय नव्हती आजी ,सगळे काही होती आजी .आजीला कोणी गरोदर असेल तर
आजीच्या जीवावर बिनधास्त असत .आजी सुईण देखील होती .कोणी कधी यावो
रात्री अपरात्री आजी तयार असे .कधी एक पैसा न घेता .माझ्या आई बरोबर माझ्या आणि
भावच्या जन्मच्या वेळी आजीच होती .
आजी अजून खूप काही करत असे.
सुंदर गोधड्या शिवायाची ,फाटलेले कपडे तर असे शिवत असे समजत सुद्धा नसे
कुठे फाटले होते .ती छान चोळ्या शिवत असे .
जुन्या रद्दी पेपर पासून सुदर टोपले बनवत असे .
प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात छान चुली बनवत असे .तिनी मला देखील
छान चूल बनवायला शिकवले होते .पुरण पोळ्या तर अशा बनवत असे
हात लावला तरी लगेच विरघळतील असे .पीठ कमी आणि पुरण जादा .
आजीचे वय ऐंशी आणि च्या पुढे गेले तरी त्या सुई ओवत असे कपडे शिवत असे
आम्ही शाळेत जात असू .तेव्हा ती कधी तरी घरी येत असे .
पण जेव्हा तिचा सुना तीचाशी तुटक वागत असत अशा वेळी आजी
आमच्या घरी येत असे मी घरी असायचे तिला चहा करून देत असे
जेवायला देत असे .मग आम्हला तिची सवय झाली .मग आजी रोज आमच्या
घरी यायची काही न काही काम करत असायची कधी रिकामी बसली नाही .
स्वतः बद्दल खूप बोलायची ,मस्त गोष्टी सांगायची .देवाचे गाणे म्हणायची .
.माझे लग्न ठरले आणि आजी मग स्वतच्या घरी असल्या सारखी सगळे
करू लागली .लग्ना मध्ये पाठवणीच्या वेळी स्वताच्या पिशवीतून मला एक रुपया
दिला ."एवढाच आहे ग माझ्या कडे "असे बोलून माझ्या चेहरा ओंजळीत पकडून
सदा सुखी राहा अशा आशीर्वाद देतानी आजीच्या डोळ्यात पाणी होते .
मी मुंबईला आले मग आजीची भेट कमी झाली .पण ती येत राहिली आमच्या घरी .
माझ्या मुलीच्या जन्मच्या वेळी पण आजी होती ,हे करू नको ते नको सांगत राहायची .
घरात असेल तरी आजी आली कि तिच्या काठीचा आवाज आली कि समजायचे आजी आली .
मी आजारी पडले हॉस्पिटल मध्ये होते .आजी पण तेव्हा
खूप आजारी होती .आई तिला रोज भेटायला जात असे .स्वता आजारी असून ती माझी
चौकशी करत असे .मी हॉस्पिटल मधून घरी गावी गेले तेव्हा आजी या जगातून गेली होती .तेव्हा तिचे वय ९६ होते .
मला खूप लोक भेटायला येत .पण मला कोणाच्या काठी टेकत आल्याचा आवाज आला कि वाटायचे
आजीच आली .
आयुष्यात अनेक व्यक्ती येऊन गेल्या पण स्वताची आजी नसतानी जिनी त्याची कमी पूर्ण केली
त्या आजीला मी कधी विसरले नाही .अशी ऑल राउंडर आजीला कोण विसरेन ना ????
१५/१०/२०१४
No comments :
Post a Comment