Wednesday, 29 November 2017

मी एक रुपयाची नोट बोलते.

मी एक रुपयाची नोट बोलते.आज माझा 100 वा वाढ दिवस आहे म्हणे.माझा जन्म झाला तेव्हा जागतिक पाहिले महायुद्ध चालू होते.माझा जन्म आज पासून शंभर वर्षा पूर्वी 30 नोव्हेंबर 1917 मध्ये झाला.त्यावेळचा ब्रिटिश राजा पाचवा जॉर्ज याचे चित्र माझा वर छापले गेले होते.अगदी साध्या हात कागदावर छापाई केली होती.1940 पर्यँय मी आहे त्या रूपातच राहिले.त्यानंतर1944 मध्ये मात्र चित्रात बदल होऊन पाचव्या ऐवजी 6 व्या जॉर्जचे चित्र छापण्यात आले होते.भारताला स्वतंत्र मिळाले आणि मी पुन्हा नवीन रूपात 1949 मध्ये चलनात आले.त्यावर के आर मेनन यांची सही होती.1953 मध्ये मात्र माझा रंगात बदल झाला.त्यावर के जी आंबेगावकर याची सही होती.1969 नंतर मात्र महात्मा गांधी यांचे छायाचित्रे आले.त्यानंतर अनेकांच्या सही असणारीमी बाजारात येत राहिले.माझी छपाई ही रिझर्व्ह बँक करत नसून ,भारत सरकार करते.माझ्या वर होणाऱ्या छपाई खर्च बघून माझी छपाई 1994 मध्ये बंद करण्यात आली.त्यानंतर पुन्हा मी चलनात आले 2016 मध्ये.आज मी 100 वर्षाची झाली.खरे तर एक रुपयाला कोण विचारते असेच वाक्य आज कालमी ऐकत असते.खरे तर नवीन बाळ जेव्हा जन्मला येते तेव्हा त्याचे जसे कौतुक होते तसे माझे सुरवातीला झाले.पण वय होते तशी माणसाची किंमत कमी होते.मग तो काही कामाचा राहत नाही तसे आज माझे झाले आहे.आज माझी व्हॅल्यू काही नाही .तरी काही असे लोक आहे जे आज माझा वर प्रेम करतात.मला आज ही सन्मान देतात .नवीन पिढीला मी माहिती व्हावी म्हणून माझा साठी करोडो रुपये खर्चून मलाखरेदी करत आहे.मला संग्रही ठेवत आहे.माझी संपलेली व्हॅल्यू बघून मला खूप वाईट वाटत असे पण आज मला पुन्हा ऐश्वर्य सम्पन्न वाटत आहे.मला कोणी विसरले नाही याचा अभिमान देखील वाटला.हीच माझी काहाणी.