आज सकाळी बातम्या बघतानी एक विशेष बातमी बघितली .आज १२ डिसेंबर ला
दिलवाले दुल्हनिया ले जायंगे या चित्रपटाला मुंबईतील मराठा मंदिर या चित्रपट गृहात
आज १००० हफ्ते पूर्ण झाले .हे एक रेकोर्ड आहे .
खरे तर या चित्रपट आणि त्या विषयी माझे एक वेगळी भावना आहे .
जेव्हा हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा मी हॉस्पिटल मध्ये अडमिट होते .
मेट्रो चित्रपट गृहात हा चित्रपट चालू होता .त्यापासून पाच मिनिटावर
असलेल्या जी.टी हॉस्पिटल मध्ये मी होते .मला भेटायला येणारे लोक हे
तो चित्रपट बघून मला भेटायला येत आणि किती छान आहे हा सिनेमा हे सांगत
अनेकांना तो हम आपके कौन चा कॉपी पण वाटला होता .
आपण बरे झाले कि जाऊ बघयाला हे ठरवले होते .पण जमलेच नाही .
घरा पासून केवळ ५ मिनिटाच्या अंतरावर असलेल्या मराठा मंदिर हा चित्रपट
चालू आहे हे माहित होते तरी मी तो रिलीज झाल्या पासून ४ वर्षाने बघितला .
जेव्हा कधी हा चित्रपट टीव्ही वर येतो किवा त्या बद्दल वाचते तेव्हा मला आठवते
मी तेव्हा हॉस्पिटल मध्ये होते .आणि आपोआप वर्षाचा हिशोब होतो
आज पण तो मोर्निग शो ला चालू आहे .पण खरे तर तो बघयला कोण जाते का ?
अशा मनात एक प्रश्न येतो .हो जातात आज पण बघयला असा एक वर्ग आहे .
ज्यांना घर नाही .कुठे पण राहतात .मग मनोरंजन म्हणून सुट्टीच्या दिवशी जात
असतात .३ तास वेळ घालवणे हा एक हेतू आणि मेन म्हणजे तिकीट दर अतिशय कमी .
{चक्की वर काम करणारे मुले हे बोलतात ३ तास मस्त झोपता येते असे .तिथे त्यांना झोप
कशी येते काय माहित }
मुंबई सेन्ट्रल भागात असे अजून काही चित्रपट गृह आहेत .जिथे आज पण जुने चित्रपट
रिलीज होतात आणि चालतात .म्हणून आज पण त्याचे आस्तित्वा आहे .
तर काही चित्रपट गृह होते असे म्हणायला लागेल .
उदा .मिनर्व्हा ,अप्सरा ,नॉव्हेल्टी,

No comments :
Post a Comment