ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत खोत यांचं मुंबईत निधन। खोत यांच्या 'उभयान्वयी अव्यव', 'बिनधास्त', 'विषयांतर' या कादंबऱ्या प्रसिद्ध।
कोकणातल्या देवगडमध्ये 7 सप्टेंबर 1947 रोजी जन्मलेले चंद्रकांत गणपत खोत, शिक्षणासाठी साठी महानगरी मुंबईत आले. या मायानगरीतल्या श्रमिक, श्रीमंत आणि तथाकथित उच्चभ्रू वर्गाचं जीवन त्यांनी संवेदनशील पणे पाहिलं. मराठी साहित्यातल्या मठपतींच्या विरोधात बंड पुकारणारा हा कवी मुंबई विद्यापीठातून मराठी विषयाची पदवी घेतल्यावर, बंडखोर जीवन जगला. 1960 च्या दरम्यान मराठी साहित्य क्षेत्रात सुरू झालेल्या बंडखोरीच्या नव्या प्रवाहात ते अग्रणी होते. तेव्हा सुरू झालेल्या लघुनियतकालिकाच्या चळवळीत प्रस्थापितांची कविता, कथा, कादंबरी हे सारं नाकारत त्यांनी, "अबकडई' हे लघु अनियतकालिक सुरू केले.
माझी लढाई माझ्याशीच आहे. ती कधीच संपू नये, असं वाटतं'', असं सांगणारे चंद्रकांत खोत यांना मुलुंडच्या साहित्य संस्थेनं अलीकडचं "जीवन गौरव' पुरस्कारानं सन्मानित केले होते .. एक काळ चाकोरी बाह्य आणि अति बंडखोर लेखनानं गाजलेल्या, वादग्रस्त झालेल्या चंद्रकांत खोत, यांनी जीवनाच्या उत्तरार्धात मात्र केलेलं लेखन हे लोकप्रिय ठरलं.
1977 मध्ये त्यांची "उभयान्वयी अव्यय' ही लघु कादंबरी प्रसिद्ध झाली आणि साहित्य क्षेत्रात वादळ उठलं. ही कादंबरी अत्यंत विकृत आणि अश्लिल असल्याच्या समीक्षकांनी केलेल्या टीकेच्या झोडीनं ही कादंबरी गाजली आणि वाजलीही. आपण जे लिहिलं आहे, ते प्रस्थापितांना मुळीच आवडणारं
नाही. पण, आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आक्रमण करायचा अधिकार या मूठभर समीक्षकांना नाही, अशा शब्दात खोत यांनी त्या समीक्षकाशी दोन हातही केले. ख्यातनाम समीक्षक आणि साहित्यिक नरहर कुरुंदकर यांनी मात्र या चाकोरीबाह्य लघु कादंबरीची प्रशंसा केली होती
बिंब प्रतिबिंब ,दोन डोळे शेजारी(विवेकानंदांच्या जीवनावरील कादंबरी) अतिशय गाजलेल्या आहेत

No comments :
Post a Comment