Tuesday, 23 December 2014

आज महिला सगळ्या क्षेत्रात काम करातांनी दिसत आहे.त्याच्या हक्का साठी लढतानी दिसत आहे .
पण एक काळ असा होता महिलांना कोणतेच हक्का नव्हते.आणि त्यात महत्वचा हक्का शिक्षणाचा ज्या मुळे आज सगळ्या क्षेत्रात महिला दिसत आहे .
सावित्रीबाई फुले पहिल्या शिक्षिका ,ज्यांनी मुली साठी पहिली शाळा काढली .
त्या साठी त्यांना किती विरोध सहन करयला लागला .
महिला शिकू लागल्या आणि हळू हळू प्रगती झाली.महिला घर बाहेर पडून काम करू लागल्या.पण परस्थिती म्हणता येईन एवढी आज पण खरच सुधारली आहे का ?
आज महिला दिन साजरा होतानी दिसत आहे पण ते फक्त शेहारात आणि मोठ्या गावात आज पण अनेक ठिकाणी आज काय आहे हे महिलांना माहित देखील नाही .
आज देखील मुलीना शिकायचे असते.पण अपवाद सोडला तर त्यांना शिक्षणाची संधी दिली जात नाही .
अनेक ठिकाणी आज पण मुलीची मर्जी विचारात न घेता अठरा वर्ष आधी लग्न केले जाते .
आज देखील मुलीच्या सासरी हुंड्या साठी छळ होतो.अनेक ठिकाणी न्याय देण्या साठी जात पंचयात आहेत.त्याच्या कडून पण महिला वर अनेक न पटणारे बंधने घातली जातात.
आज महिला दिन साजरा करातांनी असे वाटते या देशाची पंतप्रधान .राष्ट्रपती माहिला होऊन गेल्या तिथेच आज हि मूलभूत हक्का साठी महिलांना झगडावे लागत आहे .
जेव्हा सगळ्याच थरातील महिलाना खऱ्या अर्थाने आपले हक्क आणि कायदे समजतील तो खरा महिला दिन .....

फेसबुक पोस्ट ८ मार्च २०१४ 

No comments :

Post a Comment