Friday, 26 December 2014

गुरुपौर्णिमा

आयुष्य म्हणजे जन्मा पासून मृत्यू पर्यन्तचा प्रवास ...
या प्रवासात किती चढउतार असतात .....
कधी सुखाची हिरवळ हवीहवीशी ...
तर कधी दुखाचे चटके नकोशे .........
आपण मात्र चालत राहतो .....
मागे फिरून बघितले कि आपणच दचकतो ........
कारण अनेक विस्वास बसणार नाही असा संकटाचा
सामना आपण कसे करू शकलो .
हे आपल्याला काळात नाही .........
मग आठवण येते अनेक दुखाच्या आणि संकटाच्या
वेळी एक आधाराची शक्ती आपल्या बरोबर होती.
मग ती आई ,भाऊ ,मित्र ,मैत्रिणी ,आणखी कोणी...
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः|
गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ||
आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे "व्यास पौर्णिमा"! अर्थात "गुरुपौर्णिमा" !!
सगळ्यात पहिला गुरु कोण असते तर ,ती असते आपली आई .
ती आपल्याला या जगाची ओळख करून देते.बोलण्या पासून ते चालण्या
पर्यन्त सगळे शिकवते .
आई नंतर गुरु म्हणून आपल्या आयुष्यात येतात ते आपले शिक्षक .
ते आपल्याला विद्या देतात .अशी विद्या जी आपल्याला या जगात कबिल
बनवते .
शिक्षकाचे स्थान आपल्या आयुष्यात खूप वरचे असते .
चांगले शिक्षक मिळणे आपले नशीब असते .
आई आणि शिक्षका नन्तर आपल्या आयुष्यात आपल्या काही ना 
काही शिकवून जाणारी व्यक्ती हि आपली गुरु सारखीच असते.
मग ते मित्र असतील हितचिंतक असतील कि आणखी कोणी .
अशा सगळ्या गुरूना मना पासून प्रणाम .

फेस बुक पोस्ट 

No comments :

Post a Comment