Tuesday, 23 December 2014

आला आषाढ-श्रावण

आला आषाढ-श्रावण आल्या पावसाच्या सरी; 
किती चातकचोचीने प्यावा वर्षा‌ऋतू तरी
आषाढ-श्रावण यालाच ग्रामीण भाषेत आखड आणि सरवन
म्हणतात.
इंग्रजी महिन्या नुसार जून जुलै मध्ये पाऊस पडतो .
मराठी जेष्ठ आणि आषाढ मध्ये शेतात पेरणी झालेली असते.
नवीन पिक शेतात उभे राहते.
हाच तो महिना असतो जेव्हा मागील वर्षाचे धान्य संपत येते .
आणि म्हणून मी लहान असतानी अनेकदा ऐकले आहे .
आखडत आखडते ,आणि श्रावण मध्ये नवी धान्य शेतात
तयार होते. आणि जुने धान्य संपते .
म्हणजे एक म्हण बोलली जायची आखडत आखडते आणि
सरवन मध्ये सरते .
पण आज चित्र खरच उलट झाले आहे.अजून पाऊस नाही
मग धान्य तर संपत आले पण नवीन यांचे अजून बीज पण
अंकुरले नाही .
ये रे पाऊसा बळी राजा तुझी वाट बघत आहे .

फेसबुक पोस्ट २२ जुलै १४ 

No comments :

Post a Comment