Friday, 26 December 2014

बस मध्ये प्रवास करातांनी मला नेहमी वाटते बस म्हणजे आपले आयुष्य आहे .
प्रवासात अनेक लोक भेटतात थोड्याश्या वेळात काही आपलेशी होऊन जातात .
कायमचे आठवणीत राहतात .तर काही कारण नसतानी भांडण करतात .
ते थोड्या वेळा साठी पण नको वाटतात.
आयुष्य खूप छोटा असते.आणि या आयुष्याच्या या वाटे वर खूप माणसे भेटतात .कधी दु:खात कधी सु:खात .कधी चांगले कधी वाईट .कारण नसतानी त्रास देणारे कधी देवा सारखे मदतील येणारे.कोणते पण नाते नसतानी आपले होणारे .तर कधी जवळचे असून दुस्मना सारखे वागणारे .
पुढे काय होणार हे माहित नसते पण मागे जे घडून गेले त्याच्या कडू गोड आठवणी मात्र नेहमी बरोबर असतात .
वाईट आठवणी त्रास देतात.गोड आठवणी मनाला आनद देतात.
दिवस जात राहतात अनेक माणसे येत राहतात आणि जातात आयुष्य चालू राहते बस सारखे एक एक स्टोप पुढे .
आयुष्य म्हणजे जन्मा पासून मृत्यू पर्यन्तचा प्रवास ...
या प्रवासात किती चढउतार असतात .....
कधी सुखाची हिरवळ हवीहवीशी ...
तर कधी दुखाचे चटके नकोशे .........
आपण मात्र चालत राहतो .....
मागे फिरून बघितले कि आपणच दचकतो ........
कारण अनेक विस्वास बसणार नाही असा संकटाचा
सामना आपण कसे करू शकलो .
हे आपल्याला कळत नाही .........
मग आठवण येते अनेक दुखाच्या आणि संकटाच्या
वेळी एक आधाराची शक्ती आपल्या बरोबर होती.
मग ती आई ,भाऊ ,मित्र ,मैत्रिणी ,आणखी कोणी..

समाधान

कथा -६ 
समाधान आज दिवाळी काही करून त्याला घरी पोहाचायचे होते
एका महत्वच्या कामा साठी तो एका हॉस्पीटला भेट देण्यास  गेला होता .ते गाव  शहरा पासून दूर होते। त्याच्या  साठी  एकदम अनोळखी असे. कार्यक्रमास  उशीर  झाला  त्यामुळे 
निघायला उशीर झाला होता .दिवाळी असल्या मुळे ड्राईव्हर सुट्टीवर 
होता .त्या मुळे तो स्व:ताच गाडी चालवत होता .रस्त्याच्या आजूबाजूला 
छोटी छोटी गावे दिसत होती .कुठे लाईट होती कुठे नव्हती .रस्त्यावर
वाहनाची ये जा देखील नव्हती . त्यात थंडीचे दिवस  आणि  अमाव्स्याची  रात्र त्यामुळे  सगळी  कडे  लवकर अंधार  पसरला  होता ,जेवढा स्पीडने चालवता येईन तेवढ्या
स्पीड ने तो गाडी चालवत होता .
आणि अचानक गाडी थांबली .काय झाले त्याने खाली उतरून
बघितले पण काही समजत नव्हते .रस्त्यावर कोणी नव्हते .
त्याने आजूबाजूला बघितले .दूरवर एक घर दिसले .
इकडे काही मदत भेटेल या विचाराने तो घर कडे चालू लागला .
लाईट नव्हती जसजसा तो घर जवळ गेला तेव्हा त्याच्या लक्षात आले .
घर समोर मोठे अंगण होते .ते शेणाने सरावले होते .सगळी कडे
खूप  समोर खूप  पणत्या लावल्या होत्या .
घरच्या दरवाज्याच्या बाजूला छोटे छोटे खाती [कोनाडे ]होती त्यात पणत्या ठेवल्या
होत्या त्याचा प्रकश सगळी कडे पसरला होता . सगळीकडे असणाऱ्या  त्या  अंधारात  त्यांचा उजेड छान  वाटत  होता।  घरा  पु ढे रंग न भरलेली सुंदर रांगोळी काढलेली होती .
घरात कदाचित पुरण पोळी बनवली जात असावी तिचा वास येत होता .
काही वेळ तो विसरून गेला आपण कुठे आहे .
अचानक कुत्र्याच्या भूकण्या मुळे तो भानावर आला .
घरातून एक माणूस बाहेर आला .त्याला तो  बोलला माझी गाडी खराब झाली आहे म्हणून मी आलो .काही मदत भेटेल का जवळ  ग्यारेज  आहे का ?
तो माणूस बोलला नाही जवळ नाही येथून  दहा पंधरा  किमी वर आहे .
पण आता तिकडे कसे जाणार आणि आज तर दिवाळी ते लवकर बंद पण झाले असणार .
आपली काही हरकत नसेल तर तुम्ही राहा आज आमच्या कडे .त्याने  खिशातून  मोबाईल  काढला .कोणाला तरी फोन करून  दुसरी  गाडीची  व्यवस्था  करावी असे  त्याला  वाटले  पण  तेथील  वातावरण  बघून   तो भारावून गेला होता .काही आठवत होते .काही तरी सापडले होते .
त्या माणसाच्या विनंतीला मान देऊन तो घरात गेला .
किती साधे घर होते ते मातीच्या भिंती गवताचे छप्पर 
छोट्या छोट्या दोन खोल्या होत्या..त्याने आजूबाजूला बघितले .
एक खोलीत एक खाट होती साधी रस्सीने विणलेली .एका कोपऱ्यात देवाचे 
साधासा देव्हारा  त्या समोर काही  फुले  होती ,बाजूला  केरसुणी  आणि  एका ताटात  काही  धान्य ठेवलेले होते  .तीच  त्यांची  लक्ष्मी  पूजा  होती .गरीबाची  पूजा अशीच  असते असे  तो मनात पुटपुटला .दुसऱ्या कोपऱ्यात दोन लोखंडी पेट्या .त्याच्या वर छान रचून ठेवलेल्या
गोधड्या आणि चादरी .बस एवढेच काय ते सामान .
बाजूच्या घरात चूल स्वयपाकाची भांडी बस .
घरात पण दिवे लावले होते रॉकेलचे .एक चटई अंथरून देत तो माणूस
बोलला बसा पाहुणे .पाणी दिले .घरात एक लहान मुलगा होता .
त्या माणसाची बायको सून आणि मुलगा असे पाच माणसाचे ते घर होते .
तो मात्र भूत काळात गेला खूप मागे असेच त्याचे घर होते .आई वडील आणि तो .
दुसर्याच्या शेतावर मोलमजुरी करून पोट चालवणारे त्याचे आई वडील आणि तो .
आपल्या मुलाने खूप शिकावे हाच त्याचा ध्यास होता .शाळेत तो खूप हुशार होता .
नेहमी वर्गात पहिला .पाचवीला गेला आणि वडील साप चावून जग सोडून गेले .
तरी पण आई ने हिम्मत नाही हरली शिक "मी आहे ना, असेच ती बोलायची .
शेतातील कामा बरोबर तिनी चार घरी धुणीभांडी सुरु केली .
तो पण रविवारी कोणच्या हॉटेलमध्ये काम करी .कधी  कोणाच्या शेतात  आई  बरोबर  कामाला  जात असे .
१० विला तो जिल्ह्यात पाहिला आला .आणि त्याला शिष्यवृत्ती भेटली .आता त्याला शहरात
शिकायला जावे लागले .आईला सोडून जाताना त्याला  खूप वाईट वाटले .
पण नेहमी काम काम या मुळे त्याची आई आजारी पडू लागली .तिनी दुखणे अंगावर
काढले .आपण डॉक्टर कडे गेलो तर खूप पैसे लागणार म्हणून ती मुलाला काही समजू
देत नसे.दुखणे जादा वाढले आणि त्याचा एकुलता एक आधार पण संपला .
जिथे कोणी नाही त्या गावात का जायचे म्हणून तो पुन्हा कधी गावी गेला नाही .
खूप शिकला मेहनत केली .आणि डॉक्टर झाला .परदेशात जाऊन आला .
त्याची मेहनत बघून एक डॉक्टर ने आपली डॉक्टर मुलगी त्याला दिली .
आज शहरातील एक नामाकीत हॉस्पिटलचा तो मालक आहे .
खूप पैसे कमावले .गाड्या आहे .मोठा बंगला आहे .
काय नाही आहे .त्याच्या कडे पण तरी काही तरी कमी आहे हेच त्याला जाणवत राहते .
काय ते त्याला समजत नाही .
पाहुणे चहा घ्या लवकरच सैपाक होईल मग जेवण करू..
आणि तो त्या आवजाने भानावर आला .चहा घेताने त्याला समजले .
हा शेळीच्या  दुधाचा चहा आहे .जसा लहान असतानी तो घ्यायचा .
त्याने सहज विचारले लाईट नाही मग टीव्ही नाही .कसे राहतात तुम्ही .
आम्ही मोलमजुरी करून जगणारी माणसे ,सकाळ झाली कि कामावर जायचे
दिवसभर कष्ट करून  दमून घरी यायचे जेवण करयचे आणि झोपून जायचे .
कशाला हवा आम्हाला टीव्ही .दर महिन्याला  येणारे  लाईटचे  बील  पण  परवडत नाही .
"पण मग जगात काय चालू आहे कसे समजणार तुम्हाला "तो
"जगात काय चालू आहे ते समजून काय करायचे साहेब " त्यांनी काय पोटाला भेटणार आहे का ?
पोट भरणार आहे .
तेवढ्यात जेवण तयार आहे चला जेवयला म्हणून त्याची बायको ने आवाज दिला .
चुली समोर जेवणाची ताटे मांडली होती .सगळे ताटावर बसले .त्याच्या बायकोने एक ताट
घेतले आणि ती बाहेर गेली .आणि त्याला आठवले जेव्हा कधी असा सन असे तेव्हा त्याची
आई देखील असे करत असे .आकाशाच्या दिशेने ते ताट पकडून ती ते दाखवत असे .
नंतर ते ताट गाई समोर ठेवत असे .असे का करते असे त्याने आईला विचारले होते अनेकदा .
"अरे आपल्यला प्रकाश देणारे चंद्र ,सूर्य .हे आकशात असतात ना म्हणून .गाई  आपल्यला
दुध देते म्हणून ."असे आई त्याला सागत असे .
आज त्याला खूप काही काही आठवत होते .आरशा वरील धूळ झटकून टाकावी आणि त्यात
आपलेच प्रतिबिंब लख्ख  दिसावे तसे .
साधे जेवण पुरण पोळी ,भजी ,कुरडई.सार {कटाची आमटी }.बस बाकी काही नाही .न लाडू आहे
ना करंजी चकली काही नाही .
पण दिव्याच्या उजेडात चाललेले ते जेवणाची चव जगात त्याला कुठल्या पण हॉटेल मध्ये
भेटली नव्हती .
कोण होती हि माणसे त्याची पण किती प्रेमाने त्यांनि कसली अपेक्षा न ठेवता त्याला जेवायला
घातले होते .
आज त्याला आई खूप आठवली .आपले ते घर आठवले .त्या घरात असलेले प्रेम आठवले .
त्याला त्याच्या आयुष्यातील कमी समजली .सगळे होते त्याच्या कडे पण नव्हते असे घर .
मातीच्या भिंती ,शेणानी सारवलेली जामीन .कोणता सन असतानी घराचे ते वेगळे रूप .
त्याच्या कडे होता बंगला आधुनिक सुविधा असलेला .पण त्याच्या मनातील ते घर कधी गेलेच
नव्हते . म्हणून प्रत्येक दिवाळीला त्याला एक प्रकारची उदासी येत असे का ? हे त्याला समजत नव्हते .
आज त्याला सगळे लक्ख समजले .आणि त्यांनी मनाशी एक निर्णय घेतला.
त्यांनी आपला मोबाईल काढला आणि घरी फोन केला .मी उद्या माझ्या जन्म गावी जातो आहे .
या गोष्टीला आता दोन वर्ष झाले आहे .त्याच्या जन्म गावी त्याने मोठे हॉस्पिटल बांधले आहे .
बाजूला एक छोटे घर आहे जे मातीच्या भिंती आणि गवताचे छप्पर असलेले आहे .
जिथे त्याला समधान भेटते आई आहे आपल्या बरोबर हे जाणवत जगातील कोणत्या  गोष्टीने  न  भेटलेले समाधान आज त्याला भेटले .
ज्या घरात तो गेला आणि त्याला  हि प्रेरणा भेटली ती कुटुंब आता त्याच्या बरोबर आहे .
आता त्याचे एकच ध्येय आहे .त्याच्या आई सारखे कोणी इलाजा शिवाय राहू नये .
२६/१०/२०१४ 

आवडती आजी




कथा  ५                                                                                                      .
आवडती आजी

आजी हा शब्द जरी उच्चारला तरी समोर उभी राहते ती एक प्रेमळ आजी . माझ्या नशिबाने मला आजी नव्हती .माझ्या जन्माच्या आधी .आई आणि वडिलांचे .आई वडील देवाघरी गेले होते . जादा करून लोक शेती करणारे.दिवसभर शेतात जाणारे ,अशा वेळी मुलना बघयला असे ती आजी . दुपारी शाळेतून घरी आल्यावर अनेक मित्र मैत्रिणीची आजी घरी असे ती त्याची वाट बघत असे . घरी आल्यावर त्यांना प्रेमाने जेवू घालत असे .ते बघून मला नेहमी वाईट वाटत असे . मी आणि माझे छोटे भाऊ घरी आल्यावर दिसत असे ते बंद दरवाजा . आम्हाला मग खूप वाटायचे आम्हाला का नाही आजी . "माणसा कडे एखादी गोष्ट नसेल तर तो नेहमी कोण मध्ये शोधात असतो ." आमची मानलेली आजी . आमच्या घर पासून काही अंतरावर राहणारी ८० वर्ष वय असलेली अशीच एक आम्हाला आजी भेटली . साडे पाच फुट उंची असणारी ,लांबसडक केस ,रागाने थोडी सावळी . आजी .तिला चार मुलगे आणि दोन मुली . एक मुलीला नवर्याने सोडले होते .त्या मुली आणि तिच्या तीन मुला बरोबर आपल्या मुलाच्या शेजारी आजी राहायची . अचानक आजीच्या मुलांनी आपल्या बहिणीला तिथून हाकलून दिले . मुलगी दुसरीकडे राहायला गेली .पण आजी तिथेच राहिली . सुना आलटून पालटून तिला जेवयला देत असे . आजीला तंबाखू खांयची आणि तपकीर ओढायची सवय होती . त्या साठी मात्र तिला कोणी पैसे देत नसत . आजी अधून मधून आमच्या घरी यायची . आम्हाला ती खूप आवडत असे .आई तिला तंबाखू साठी पैसे दायची . काय नव्हती आजी ,सगळे काही होती आजी .आजीला कोणी गरोदर असेल तर आजीच्या जीवावर बिनधास्त असत .आजी सुईण देखील होती .कोणी कधी यावो रात्री अपरात्री आजी तयार असे .कधी एक पैसा न घेता .माझ्या आई बरोबर माझ्या आणि भावच्या जन्मच्या वेळी आजीच होती . आजी अजून खूप काही करत असे. सुंदर गोधड्या शिवायाची ,फाटलेले कपडे तर असे शिवत असे समजत सुद्धा नसे कुठे फाटले होते .ती छान चोळ्या शिवत असे . जुन्या रद्दी पेपर पासून सुदर टोपले बनवत असे . प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात छान चुली बनवत असे .तिनी मला देखील छान चूल बनवायला शिकवले होते .पुरण पोळ्या तर अशा बनवत असे हात लावला तरी लगेच विरघळतील असे .पीठ कमी आणि पुरण जादा . आजीचे वय ऐंशी आणि च्या पुढे गेले तरी त्या सुई ओवत असे कपडे शिवत असे आम्ही शाळेत जात असू .तेव्हा ती कधी तरी घरी येत असे . पण जेव्हा तिचा सुना तीचाशी तुटक वागत असत अशा वेळी आजी आमच्या घरी येत असे मी घरी असायचे तिला चहा करून देत असे जेवायला देत असे .मग आम्हला तिची सवय झाली .मग आजी रोज आमच्या घरी यायची काही न काही काम करत असायची कधी रिकामी बसली नाही . स्वतः बद्दल खूप बोलायची ,मस्त गोष्टी सांगायची .देवाचे गाणे म्हणायची . .माझे लग्न ठरले आणि आजी मग स्वतच्या घरी असल्या सारखी सगळे करू लागली .लग्ना मध्ये पाठवणीच्या वेळी स्वताच्या पिशवीतून मला एक रुपया दिला ."एवढाच आहे ग माझ्या कडे "असे बोलून माझ्या चेहरा ओंजळीत पकडून सदा सुखी राहा अशा आशीर्वाद देतानी आजीच्या डोळ्यात पाणी होते . मी मुंबईला आले मग आजीची भेट कमी झाली .पण ती येत राहिली आमच्या घरी . माझ्या मुलीच्या जन्मच्या वेळी पण आजी होती ,हे करू नको ते नको सांगत राहायची . घरात असेल तरी आजी आली कि तिच्या काठीचा आवाज आली कि समजायचे आजी आली . मी आजारी पडले हॉस्पिटल मध्ये होते .आजी पण तेव्हा खूप आजारी होती .आई तिला रोज भेटायला जात असे .स्वता आजारी असून ती माझी चौकशी करत असे .मी हॉस्पिटल मधून घरी गावी गेले तेव्हा आजी या जगातून गेली होती .तेव्हा तिचे वय ९६ होते . मला खूप लोक भेटायला येत .पण मला कोणाच्या काठी टेकत आल्याचा आवाज आला कि वाटायचे आजीच आली . आयुष्यात अनेक व्यक्ती येऊन गेल्या पण स्वताची आजी नसतानी जिनी त्याची कमी पूर्ण केली त्या आजीला मी कधी विसरले नाही .अशी ऑल राउंडर आजीला कोण विसरेन ना ????
१५/१०/२०१४





आईस पत्र



कथा ४ 

आईस पत्र 
प्रिय आईस ,सा .दंडवत
शाळेत असतानी नेहमी पत्र लिखाण करयला शिकवले जायचे .कधी आईलास तर कधी   बाबाना पत्र कधी मित्रास पत्र .
आईस पत्र लिहीनेस सांगितले कि मला नेहमी वाटयचे असेच खरे पत्र तुला लिहिता आले असते तर किती बरे झाले असते ना .
पण तुला तर वचताच येत नव्हते ना.
माझा मनात काय चालयचे ते तरी तुला समजले असते ना .
का कोणास ठाऊक पण तू मला नेहमी इतर आया पेक्षा वेगळी वाटयची.
तुझा तापट स्वभाव मुळे तुझी  नेहमी भीती वाटयची,
तू कधी आणि कोणता करणा मुळे चिडणार हे सांगता नाही यायचा .
खेड्यात आणि त्यातून शेतकरी परिवार म्हणजे खूप काम असायचे .
तुला पण खूप काम असायचे.खेड्यात एक वाक्य नेहमी बोलले जाते."शेती साठी किती माणसे असले तरी कमीच पडतात"
अगदी शाळेत असतान पासून शेतात करता येणारी मदत करयला लागयची.रविवार सुट्टी पण ती सुद्या शेतात जायची.
शाळेतून आला वर पण घरातले काम असायचे.
पण तू किती काम करते. म्हणून तुला मदत होयला पाहिजे म्हणून सगळे काम करयचे.
पण एक चूक झाली तरी तुला आवडायचे नाही.
तुला कोणाचा घरी गेलेला पण आवडत नसे.तू नेहमी समजून सागणं एवजी सगळ्या समोर रागवत असे.
तू रागवला वर जर रडू आले  तर तू अजून रागवत असे मग डोळया मध्ये आलेला पाणी तसाच राह्यचा.
तू नेहमी का चिडत असे ते समजत नसे.पण मला कॉलेज ला जाणेस तुझा खूप विरोध होता.तरी बाबांनी मला कॉलेजला पाठवले.
मग तुझी चीड चीड अजून वाढली.त्यातच गावातील एक मुलगी मुस्लीम मुला बरोबर पळून गेली .
मग काय सगळ्या आया ना आपला मुली बद्दल भीती वाटयला लागली .
त्यात तू पण होती .
१० वी झाली आणि तुला वाटयचे आता लग्न करून टाकयला पाहिजे.
आपला मुलीचा हातून वेडे  वाकडे काही होऊ नाही असे तुला वाटायचे पण ते तुला मला समजून सांगता नाही यायचा .
ते तू सांगयची  पण रागने ओरडून .मग असा वेळी आपली आई असे का करते असे वाटयचे मला .
तुला काय सांगयचे आहे ते माझा लक्षात येतअसे.
.कधी कधी ओरडून तुला बोलवे वाटयचे मला समजते ग सगळे थोडा तरी तुझा मुली वर विस्वास ठेवत जा ग.
खूप खूप वाटयचे इतर मुली सारखे मी पण तुझा माडीवर डोकं ठेवावे तुझासी खूप बोलवे.
पण का काय माहित तू जवळची असी कधी वाटलीच  नाही .
दोन पिढी मधील अंतर होते म्हणून असेल .
तुझा खूप गोष्ठी पटत असत आणि खूप पटत नसत .
तुला नेहमी लोक काय म्हणणार याचीच काळजी.
मुलीची जात आहे.सगळे आलेच पाहिजे .मुलीनी मुली सारखा राहावा हेच ऐकवत असे तू नेहमी .
आणि मला तेच आवडत नसे .
पण वाद घालन्या पेक्षा  मी शांत राहत असे.मनातले कधी  बोलताच नाही आले ग .
आणि मग तसीच सवय लागली .
आज पण तुझी हि मुलगी मनतले मनातच ठेवते ग.
खूप इच्छा असून पण तिला तिचे सुख दुख नाही बोलता येत कोणाला.
वयानुसार तू आता तर अजूनच जादा चीड चीड करत असते,मला माहित आहे तुला कोणी उलट उत्तर दिलेला आवडत नाही .
म्हणून मी तुझा सुनांना सांगितले आहे कि आईचा बोलणा कडे दुर्लक्ष करा .हेतू हाच होता कि त्यांनी तुला उलट काही बोलू नाही पण तू त्या मधून पण चुकीचा अर्थ घेतला.तुला वाटते मी तुझ्या बाजूना बोलण्या एवजी त्याची बाजू घेतली .म्हणून तू आता तर माझा वर जादा नाराज आहेस .
खूप काही तुला सांगवेसे वाटे खूप बोलवे वाटते .
पण आज देखील नाही बोलता येत ग.
फक्त एवढी अपेक्षा आहे कधी तरी तू मला समजून घेशील ................
 १८ फेब्रुवारी २०१३
                                                                                                    तुझी मुलगी 
.                                                                                                  आशा .

नशीब

कथा -३ 

नशीब 
छान गुलाबी नववारी साडी हाताला महेंदी.
काळी सावली साधारण उंची असलेली मनात अनेक स्वप्ना घेऊन सासरचे माप ओलांडले तिनी .
गावातीलच सासर भेटले ,त्यातून मुलगा जुनी अकरावी शिकलेला .तिचा पेक्षा जरा उजवाच .
त्यातून एकुलता एक.सासर माहेर मध्ये एक किलोमीटरचे अंतर .
.आपण जरी शिकलो नाही तरी नवरा शिकलेला भेटला काही तरी नौकरी करीन .
खूप खूप खुश होती ती .पण म्हणतात न सगळे स्वप्ना कधी पूर्ण नाही होत तिचे पण तसेच काहीसे झाले .
एकुलता एक असले मुले नवरा काही काम करत नव्हता .एक् वर्षात एक छान मुलगी झाली .पहिली मुलगी म्हणून खूप लाड  झाले तिचे ती पण आई झाल्यामुळे   खुश  होती.पण कोणता आनंद जादा  दिवस राहत नाही तसाच तिचे झाले लागोपाठ तीन मुली झाला
तिसरी मुलगी झाला वर नवरा बेशुद्ध होई पर्यंत दारू पील.मग ते एक व्यसन झाले कायमचे .
काम न करता घरातच बसून राह्यला लागला.
मग सुरु झाला तिचा जीवनाशी  संघर्ष
मुळातच खूप स्वाभिमानी आणि प्रमाणिक आपली कुणी कीव करावी हे तिला अजिबात आवडत नसे.
आपला मुली साठी आपल्यला खूप कष्ट करयचे आहे.हे तिनी मनाशी पक्का ठरवले.
मिळेल ते काम सासूचा मदतीने  करण्यास  सुरवात केली .दिवसाची सुरवात हॉटेल मध्ये विहिरेचे चार  पिंपा पाणी भरायचे
घरातले करयचे आणि शेत वर जायचे
अगदी बाळात होई पर्यंत सगळे काम करत असे ..फक्त बारा दिवस विश्राती परत काम सुरु पण सहा मुली झाल्या .मुलगा  व्हायला  ापाहिजे  म्हणून किती उपवास किती नवस केले पायी देवला जाणे .एकदाचे देवा नी ऐकले आणि सहा मुलीचा नन्तर तिला सातवा वा मुलगा झाला असे वाटले तिनी सगळे जग जिंकले.
सहा मुली आणि दोन मुले .पण कधी डॉक्टर माहित नाही .
नवरा काम तर करत नव्हताच उलट ती काम करयची आणि हा पैसे मागत असे नाही दिले कि रोज घरात तमाशा .
घरातील होते नव्हते ते सामान पण त्यंनी विकून टाकले .दागिने तर नव्हतेच तिचा कडे
तिचा कडे होती ती खूप कष्ट करयची तय्यारी.
कधी तरी हरला सारखी व्हायची मग एक वाक्य बोलयची मी काय आहे
आहेव ना रांडकी कुंकू लाव आणखी {म्हणजे ना मी सुवासिन ना मी विधवा कुंकू लावयचे फक्त }
कोणी तिला सहानुभूती दाखवली तर ती जाम चिडायची .मला कोणाची मदत नको आहे मी भक्कम आहे माझा घर साठी.
आपल्यला मुली आहे नवरा काही करत नाही मग आपण कसे  करणार मुलीचे लग्ना कोणची मदत किवा सहानुभूती नको आहे.जे करयचे ते आपल्यला .
कोण काय बोलणार त्यचा कडे लक्ष न देता तिनी आपला बारा वर्षाचा मुलीला शाळातून कडून घेतले .आणि आपला बरोबर काम ला घेतले दुसर्या   मुलीना भांडी घास याला लावले .फक्त सतरा  वर्षाची असणारा मुलीचे तिनी साधे मंदिरात लग्न लाऊन दिले .दुसर्या वर्षात दुसरीचे पण तसेच करून दिले 
आपली बायको खूप काम करते हे बघून नवरा पण थोडा काम करयला लागला.अतिशय कष्टाळू  होती ती कधी रिकामी बसलेली तिला कोणी बघितले  नाही
दोन मुलीचे लग्न झाले थोडे पैसे जमा झाले आणि तिनी स्वत साठी मंगल सूत्र घेतले .त्य दिवसी तिचा आनंद बघण्या  सारखा होता .
तिचा मुली तिचा सारखा खूप काम करयची तय्यारी असलेला त्यामुळे त्यांची पण लवकर  लग्न झाली .मुलगा पण दहावीला नापास झाला म्हणून लगेच कंपनीत  कामाला लागला दुसरा मुलगा साठी तिनी गाई घेऊन दिला .आता खर्च कमी आणि घरात येणारा पैसा जादा
महिला बचत गटाची ती सभासद झाली.
तिला सरकारी कर्ज भेटले.त्यातून तिनी आपला शेतात विहीर खोदली नशिबाने विहिरीला पाणी लागले
खूप मेहनत करून तिनी आपला शेतात कांदे पिकवले .नशीब आणि मेहनत अतिशय प्रचंड  भाव असतानी तिचे कांदे विकले गेले .एकदम ३ लाख भेटले .तिचा  कष्टाचे  चीज झाले होते.
आपली मुला छोटे असतानी पाउस आला वर घरात पाणी यायचे झोपयला जागा राहत नसे .सरकारी मदत भेटली मग एक छोटा घर बांधले .पण आता तिचा मनात विचार आला आपल्यला कडे आता पैसे आहे आपण बंगला बांधायचा .
घर बांधायला सुरवात झाली .पण दुष्काळ असला मुले पाणी विकत घ्यायला लागयचे उगीच रोज सातशे  रुपये नको जायला म्हणून पूर्ण घर साठी तिनी स्वतः डोक्या वर पाणी वाहिली .
हे करत असतानी ती विसरून गेली आपण आयुष्यभर कष्ट  केले आहे .आता आपले शरीर थकले आहे .पण आपले घर होत आहे या आनंदात तिचा हे लक्षातच नाही आले .त्यात तिला काही महिना पासून डॉक्टरांनी तिला मधुमेह आहे म्हणून गोळ्या चालू केला होत्या .पण मला काय नाही होत कशाला पाहिजे गोळ्या म्हणून तिनी काही दिवस गोळ्या नाही घेतला .
पण व्हायचा तेच झाले पाणी भरत असतानी ती चक्कर येऊन पडली  .आणि बेशुद्ध  झाली .चार दिवस कोमात  गेली परत सुद्धी वर आलीच नाही
.आपला घर आता होत आला .मग आपण मोठी पूजा करयची नवीन घरात नवीन सून  आणायची  .
पण आज ती घराचा बाहेर सफेद चादर मध्ये शांत झोपली होती. सगळे स्वप्न असेच राहिले होते .
अख्खा गाव जमा झाला होता .किती कष्ट  केले सुखाचे दिवस आले आणि देव नी बोलवले .
काय पण नशीब !
प्रत्येकाच्या  तोडी हेच वाक्या होते .
२६ फेब्रुवारी २०१3

आमची शाळा

३}आमची शाळा 
प्रत्येकाच्या आयुष्यात स्वताचे घर जेवढे प्रिय असते
तशी स्वताची शाळा ,आणि शाळेतील आठवणी ...
आज मी माझा शाळे बद्दल लिहिणार आहे.
माझे गाव तसे खेडेच पण सगळ्या सुविधा असलेले,
१० वी पर्यंत शाळा बँक ,दुकाने ,पोलिस  स्टेशन सगळे होते आमच्या गावात.
पहिली ते चौथी पर्यंत प्राथमिक शिक्षण झाल्या नन्तर पाचवी पासून नवीन शाळा .
खरे तर त्या वेळी आमच्या गावात शाळेची इमारत नव्हती.गावातील अलग अलग ठिकाणी 
वर्ग भरत असत.पण त्या वेळी  खूप चांगले शिक्षक होते .त्या मधेच नन्नावरे म्हणून सर होते .
अजून पण शिक्षक असणार त्याच्या बद्दल जादा  माहित नाही.शिक्षक आणि गावकरी मिळून 
नवीन शाळे साठी इमारत बांधायचे ठरवले .आणि शाळे साठी जागा ठरली .
सुरवातील फक्त पाच खोल्या बांधल्या गेल्या .दरवाजे नाही खिडक्या नाही .सिमेंट प्लास्टर 
नाही .फरसी {लाद्या }नाही .खाली  फक्त वाळू ,परंतु खूप मोठे ग्राउंड असा शाळेत आमचा सहविचा वर्ग सुरु झाला .
मग रविवारी शाळेत बोलावले जायचे श्रमदान करण्या साठी .वाळू वाहणे,दगड वाहणे.ग्राउंड साफ करणे .
पण हे सगळे विद्यर्थी आनंदाने करायचे .आणि हे सगळे करातांनी नेहमी बरोबर असायचे ते आमचे नन्नावरे सर 
आमचे हिंदीचे सर शाळा म्हणजे त्याचे दुसरे घर होते,सहावी संपे पर्यंत अजून तीन वर्गाचे काम सुरु झाले .
सातवी संपे पर्यंत नवीन बांधलेल्या  खोल्या मध्ये ऑफिस ,प्रयोग शाळा ,स्टाफ रूम बनवले गेले .
मग पूर्ण शाळा एकच ठिकाणी दोन वेळेत सुरु झाली .पाचवी ते सातवी सकाळी आणि आठवी ते दहावी दुपारी 
आता आमची  शाळा दुपारी असायची शाळेचे थोडे थोडे काम चालूच होते.
बघता बघता दहावीच्या वर्गात गेलो .त्या वेळी शिक्षक म्हणजे मुलांना मना पासून शिकवणारे 
सर्व मुलांच्या आईवडिलांना ओळखायचे त्या मुळे कधी रस्त्यात कोणत्या मुलाचे वडील भेटले 
तरी त्याच्या बद्दल मनापसून सांगणारे होते 
दहावीला जादा वेळ घेऊन शिकवत असत.त्या काळात सगळ्या कडे घड्याळ नव्हते .
बोर्डिंग मध्ये जी मुले राहत होते त्यांना वेळेवर अभ्यास साठी स्वतः पाच वाजता उठाव्न्यासाठी 
जाणारे आमचे सर होते .
शाळेच्या इमारती बरोबर शाळे  साठी जे मोठे  ग्राउंड होते.त्या वर दहावीला असतानी आमच्या शिक्षकांनी सगळ्या 
विद्यर्थी कडून झाडे लाऊन घेतले .अनेक मुले आता तर आम्ही या शाळेतून जाणार आहे मग आम्ही का हे काम करायचे 
असे विचारयला लागले तेव्हा
'हि तुमची शाळा पाच वर्ष तुम्ही इथे राहिले या इमारती  बरोबर तुमच्या खूप आठवणी आहे 
पण तुम्ही आज इकडे झाडे लावणार ,तुम्ही येथून जाणार पण हे झाडे मोठे होतील या झाडच्या सावलीत नन्तर येणारे विधार्थी 
बसतील आणि ते पण या शाळेचे असतील "

इंग्लिश आणि गाणित मध्ये पास होणे त्या वेळी खूप अवघड होते .अनेक मुले या दोन विषयात हमखास नापास होत .
इंग्लिश विषय साठी बस्ते सर होते आणि आमचे वर्ग शिक्षक देखील तेच होते .
आमचा वर्ग दहावी ब म्हणजे फक्त दंग करणारी मुले असे समजले जायचे .
म्हणून त्या वेळी नवीन आलेल्या प्राचार्यांनी आमच्या वर्गच्या दरवाज्यावर भिंती वर लिहिले
"नो दिसिप्लेन नो सक्सेस " 
या गोष्टीची चर्ची पूर्ण शाळेत झाली .मग काय आमचे वर्ग शिक्षक वर्गात आले आणि त्या दिवशी अतिशय कडक असलेले 
आमचे इंग्लिश चे बस्ते सर एक वेगळ्या रुपात आमच्या समोर आले.खूप दु;खी मनापासून बोलणारे माझा वर्गला नाव ठेवले
आता माझा वर्गातील जादा मुले पास झालेच पाहिजे.असा त्यांनी निर्धार करून टाकला .

बघता बघता दहावी संपली .त्या वेळी बोर्ड परीक्षा साठी दुसर्या गावात जावे लागत असे .
बसची सोय नव्हती येण्या जाण्याची सोय नव्हती.ज्या गावात बोर्ड होते तिथेच १५ दिवस राहायला लागत असे .
असा वेळी बरोबर असायचे ते आमचे शिक्षक .

परीक्षा संपली शाळा पण संपली .दहावीचा निकाल लागला आणि आमच्या वर्गातील जादा मुले इंग्लिश मध्ये पास झाले .
आमच्या शाळेचा त्या वर्षी सगळ्यात जादा निकला लागला .म्हणून त्या त्याच वर्षी आमच्या शाळेला दहावी बोर्ड भेटले .
आज बारावी पर्यंत शाळा आहे .अनेक मुले शिक्षण घेत आहे .
पण आज देखील शाळा आणि आमचे सर मनात घर करून राहिले आहे .कधी न विसरण्या साठी .
१७ जून २०१४

मनातले घर



६ एप्रिल 2013





ने  नजर फिरवली कधी काळी मोकळी असणारी  जागा आत अनेक घरांनी घेतली होती
मंदिराचा बाहेर आली आणि तिचे पावले नकळत बाजूला असलेला पडक्या घर कडे वळाली ' .
आजूबाजूला बघितले  किती मोठी ती जागा अशीच  पडून होती सगळी कडे गावात आणि कचरा चालतानी अचानक तिला ठेच लागली खडक होता न तिथे .
नकळत ती भूतकाळात गेली.
इथेच तिचे घर होते या अगणात ती कितीदा खेळताना ती पडली होती ढोपरे फुटली होती .बघून  चालता येत नाही का म्हणून आईचा ओरडा खाल्ला  होता.
इथेच आपले घर होते.घर होते असे तिला वाटायचे . घर म्हणजे कच्च्या मातीच्या भिंती.शेणानी सारवलेली जमीन .छत म्हणून   उसाच्या पानाचे  {ज्याला गावाकडे पाचट म्हणतात } छप्पर .त्याच्या  बाजूला एक पक्के घर .
केवळ जेवण करण्यासाठी  चुली मुळे काळे होऊ नाही म्हणून बांधलेले हे घर ,
घर भरपूर मोठे.फक्त स्वयपाका पुरती  भांडी.पिण्याचे पाणी. एवढेच सामान बाकी घर रिकामे.
घराच्या बाजूला मोठे निंबाचे  झाड .
समोर मोठे अगण सगळा  खडक असलेले .
दारा समोर मोठे बोरीचे झाड .
थोड्या दूरवर बैल आणि गाई बधाण्याची  जागा .
या घरासी तिचे एक वेगळे नाते होते .
आठवड्यातून दोनदा शेणानी जमीन सारवणे तिला खूप आवडायचे.
सारवल्या  नन्तर हिरवी दिसणारी जमीन आणि मातीचा वास तिला खूप आवडायचा .मातीशी आपला एक अनोखे नाते आहे असे तिला वाटायचे
आजूबाजूला खूप शांतात पण हवीहवीसी वाटणारी.आजूबाजूला घर पण खूप दूर दूर .
शाळातून घरी आला वर जमिनी वर चटई टाकून अभ्यास करणे तिला खूप आवडायचे इथेच बसून अनेक लेखकाची पुस्तके तिने वाचाली होती.इथेच अनेक सु:ख दु:ख अनुभवले होते.
ती लहान होती तिचा पाठी वर एक सात वर्षांनी आणि एक पाच वर्षांनी लहान भाऊ म्हणजे ती मोठी आई वडील शेतकरी .
एक दिवस अचानक वादळ आले .घराचे छापर उडाले आणि तेव्हा पासून तिचा मनात वारेची आणि वादळाची  भीती बसली ती आज पर्यंत .
लग्न झाले ती मुंबई सारखा मोठा शहरात आली जिकडे तिकडे सिमेंटचे जंगल.जवळ जवळ मोठा मोठा बिल्डींग मोकळी जागा नाही.आज ती बिल्डींग मध्ये  राहते जिथे मातीचा काही संबध नाही .मातीशी कोणते नात नाही .
तिने अनुभवलेली  शांतता नाही.खूप सुबत्ता आहे घरात सुखाला  काही कमी नाही.पण तरी एक दिवस असा जात नाही तिला तिचे ते घर आठवत  नाही .खास करून कोणत्या पण सणाला तिचे आवडते काम होते ने घर सरवाने अगणात सडा टाकणे रांगोळी  काढणे .त्या नंतर एक पवित्र पणा  जाणवतो असे तिला वाटयचे
एक दिवस तिला फोन आला .कोणी तरी बिडी न विझवता  फेकली आणि तिच्या त्या घराला आग लागली .
आपले कोणी तरी गेले असे वाटून ती खूप रडली.
आई वडील ती जागा सोडून शेतात राहायला गेले.पण ती आज पण विचार करते जर तिला जर घर बांधण्याची  संधी भेटली तर ती असेच घर बांधेल  साधे तिच्या मनातले
तिला माहित आहे ते शक्य  नाही आहे.आता काळ बदलला आहे.
गाडी तयार  आहे निघू या आपण ड्रायव्हरच्या बोलणे मुळे ती भानावर आली .खूप जड मनाने ती तिथून निघाली .बालपणीच्या खूप सार्या आठवणी घेऊन ............

मला पण शिकायचे होते ...

कथा-२ मला पण शिकायचे होते .......
सिविल हॉस्पिटलचा एरिया नेहमीची  पेशंटची गर्दी,औषधाचा वास डॉक्टर नर्स ची धावपळ सगळे नेहमी सारखे चालू आहे .
दूरदुरून आपल्या नातेवाईका साठी आलेले लोक चिंता ,काळजी .दुपारचे १२ वाजले अचानक अम्बुलांस आवाज आणि एका पाठोपाठ एक अम्बुलांस येऊन हॉस्पिटलच्या आवारात येऊन उभा राहिल्या .
अपघात झाला आहे .असे समजले आणि सुरु झाली एकच धावपळ स्ट्रेचरचा आवाज ,औषधाचा वास डॉक्टरची धावपळ,
आणि काही वेळातच महिला वार्ड मध्ये एका पाठोपाठ एक अशा १६,१७ महिला पेशंट भर्ती झाल्या .
कोणची डोकी फुटली होती कोणाचे हात मोडलं होते एकंदरीत खूप भयंकर अवस्था होती सगळ्याची .
आणि या सगळ्या बायका १६ ते ३० च्या आगे मधील होत्या .
कोणी बोलायच्या मनस्थिती मध्ये नव्हते .नन्तर त्याचे नाते वाईक आले .तेव्हा समजले या सगळ्या 
बायका मजुरी करणर्या होत्या .दुसऱ्याच शेतात काम करणाऱ्या .आणि त्या दिवशी पण नेहमी प्रमाणे सगळ्या गावातील एक टेम्पोने शेतात काम करयला जात होत्या .ज्या टेम्पोने त्या जात होत्या त्या वरील ड्रायव्हर नवीन होता.म्हणजे त्याच्या कडे लायसन्स नव्हते .
आणि त्या मुळे त्याला गाडी कंट्रोल झाली नाही आणि रोडच्या बाजूला असलेल्या खड्यात टेम्पो उलटा झाला .तीन चार पलटी मारली .
मजूर असल्या मुळे सगळ्या कडे शेती कामा साठी असणारे विळे होते.आणि त्याच्या मुळे खूप जखमा झाल्या होत्या .
बघवत नव्हते असे हाल होते.
अगदी १८.१९ वर्षाच्या मुली होत्या त्या मध्ये.खूप छान दिसयला.त्याच्या बरोबर बोलल्या वर समजले.१६ वर्षात त्याचे लग्न झाले होते.काहीना एक मुल तर काहीना २ मुले होती.सगळ्यात धक्का दायक होते त्या तील कोणी शिकलेल्या नव्हत्या .काही मुली १४,१५ च्या होत्या लग्न न झालेल्या त्या पण कधी शाळेत गेल्या नव्हत्या आई बरोबर त्या पण कामा साठी जात होत्या.यांना का शिकवले नाही याचे उत्तर एकच होते .शाळा लांब आहे.आणि एनेकदा छोट्या मुलना सांभाळण्याचे काम असते या मुलीना,आणि सगळ्यात मेन म्हणजे काय करयचे शिकून कुठे जायचे आहे.चूल तर फुकयची आहे.आणि या कोणी आदिवासी किवा मागास वर्गात मोडणार्या नव्हते.खुल्या प्रवर्गात तील होत्या.याचे खूप अजीब वाटले .
टेम्पो वाल्यांनी पैसे भरले ड्रायव्हर दुसरा दाखवला होता.त्या मध्ये त्याचे जे लोक होते त्याने त्यांना खाजगी हॉस्पिटल मध्ये अडमिट केले होते.आणि आधी काबुल केले होते सगळा खर्च करणार पण नन्तर नाही बोलला.
मग काय हॉस्पिटल मध्ये नातेवाईकाची चर्चा सुरु वाद.ज्याच्या कडे हॉस्पिटल मध्ये येण्यास पैसे नाही.आपण गावच्या विरोधी बोललो तर आपल्यला काम भेटणार नाही मग काय जे होईल ते होईल आपण गप्पा राहू असे बोलयला लागले .
पण या मध्ये एक पेशंटची बहिण होती.२४,२५ वर्षाची असेल ४थी शिकलेली ती बोलयला लागली खूप काही आपण असे केले पाहिजे तसे केले पाहिजे आणि ती जे बोलत होती ते अगदी बरोबर होते.आणि अनेक पुरुष माणसे बोलयला घाबरत होती तिथे ती किती आत्मा विस्वसाने बोलत होती ती.पण त्याच वेळी अनेक जन हि जादा शहाणी आहे हिचे काय ऐकता असे बोलत होते.पण आपल्यला कोण काय बोलते या कडे लक्ष ना देता एकटी ठाम राहिली.आणि त्या नन्तर ते सगळे पेशंट खाजगी हॉस्पिटल मध्ये भर्ती करण्यास टेम्पो मालक तय्यार झाला .
पुढे काय झाले मला नाही माहित पण या मधून मला एक समजले.मी शिकली आहे आणि मी नोकरी करत नाही याचे मला नेहमी वाईट वाटत आले आहे.पण या बायकांना बघितले आणि मला माझा आई वडिलांनी शिकवले म्हणून मला माझे हक्क माहित तरी आहे.पण खरच माझाच गावा पासून काही किलोमीटर वर असणार्या या बायकाना ना शिक्षण ना  स्वतच्या हक्काची जाणीव,यांना महिला संघटना माहित नाही कि माहिला दिन सुद्धा.एक थोडे शिकलेली मुलगी किती ठाम बोलते .पण मला शिकायचे होते ताई पण आईला शेतात मदत म्हणून मला शिकू दिले नाही आणि गावा कडे काय लवकर लग्न करतात ना.
खरच हि जर शिकली असती तर उगाच मनात आले ..........


एक अधुरी कहाणी

कथा -५
एक अधुरी कहाणी

सुधा उंच गोरी दिसायला अतिशय छान .खूप बोलकी आईची अतिशय लाडकी
अभ्यासात जशी हुशार तशीच कामात पण तरबेज , वडील शिक्षक त्यामुळे नेहमी होणार्या बदल्या .नवीन शाळा नवीन मैत्रिणी ,नवीन लोक आता अशाच एक गावात सुधाच्या वडिलांची बदली झाली होती ,गाव तसे खूप छान होते . घर भेटले ते पण छान ठिकाणी समोर मंदिर ... घराची मालकीण राधा बाई अतिशय चांगल्या होत्या .भरपूर जमीन ,मोठे घर याचा त्यांना अजिबात गर्व नव्हता .राधाबाईचा मुलगा बाहेर गावी शिकायला होता . कोणाला आवडणारी सुधा राधा बाईना खूप आवडली . नवीन गावात राधा चांगलीच रुळली होती . एक दिवस अचानक राधाबाई चक्कर येऊन पडल्या ,त्यांना हॉस्पिटल मध्ये ठेवले . त्याच्या पोटात ट्यूमर असल्या मुळे ऑपरेशन करावे लागले . या काळात त्याची स्वताच्या मुली सारखी काळजी घेतेली सुधा ने , परीक्षा असल्या मुळे त्यांच्या मुलाला काही कळू दिले नाही . अचानक सकाळी सकाळी राधाबाईचा मुलगा विनय आला .तेव्हा सुधा त्यांना चहा देत होती .त्याने सुधाला बगीतले आणि त्याला ती खूप आवडली . रोज घरी येणारी सुधा बरोबर आता विनय बरोबर बोलयची .तो खूप हुशार होता तो बोलताने ती ऐकत बसायची . त्याची मैत्री आणि सुधाचे वागणे बघून राधाबाईने तिनी सून करून घेण्याचे ठरवले . पण मुलाला नोकरी लागली का मग . असेच दिवस जात होते ,विन्य आणि सुधाची मैत्री आता प्रेमात रुपातरीत झाली होती . घरापासून जवळ असलेल्या नदीवर ते तासनतास जाऊन बसत ,सुखी संसाराचे स्वप्न रंगवत नदीमधील खोल डोहा कडे बघत .तो त्याला खूप आवडायचा . विनय आय पी यस मधील लेखी परीक्षा पास झाला होता आता मेडिकल आणि मुलखात बाकी होत्या .आपण नक्की पास होणार यावर त्याचा पूर्ण विस्वास होता .मेडिकल टेस्ट साठी विनयला शहरात जावे लागले . चार पाच दिवसानी येणारा विनय महिना झाला तरी परत आला नव्हता . ती त्याला रोज फोन करत असे पण तो मात्र मी बिझी आहेम्ह्णून तिचे फोन घेत नसे . आता त्यांनी तिला मेसेज करणे पण बंद केले . राधाला काही समजत नव्हते विनयला काय झाले .हसरी ,बोलकी राधा आता अबोल झाली होती . तिची हि अवस्था तिचा आई बाबांना आणि राधा बाईना पण बघवत नव्हती . विनय परत आला .पण आता तो राधाशी बोलत देखील नव्हता . काय झाले हे सागत पण नव्हता . एक दिवस सुधाच्या बाबांनी बदली मागवून घेतेली .आता ते गाव सोडून जाणार होते . सुधा मनात खूप रडत होती .विनय काय चुकले रे माझे सांग तरी मला ,बोल माझाशी एकदा तरी बोल ..तिची उदाशी त्याचा पर्यंत जाताच नव्हती , आज सुधा हे गाव सोडून जाणार होती ,सामान बाधून झाले .ती राधाबाईना भेटायला गेली . त्यांना नमस्कार केला . राधाबाई रडत होत्या आणि सुधा देखील तिची नजर विनयला शोधात होती . "माझा समोर एकदा तरी ये रे मला तुला डोळे भरून बघू तरी दे " पण तो कुठे नव्हता . या गोष्टीला आता १० वर्ष झाले .विनया आता शिक्षण अधिकारी झाली आहे . तिनी लग्न केले नाही आज ती विनयच्या गावात शाळा तपासायला आली आहे . बस मधून उतरली आणि तिला जाणवले गाव खूप बदलले आहे , शाळेतील काम आटोपले आणि सुधाच्या नकळत तिचे पावले विनयच्या घरा कडे वळाले तिला वाटले आता तिथे नवीन बंगला असणार . पण ते घर होते तसेच होते .रंग नसलेले उदास वाटत होते . विनय आता गावी येत नसावा असे तिला वाटले . घरा समोर राधा बाई बसल्या होत्या आता त्या खूप वयस्कर वाटत होत्या . त्यांनी सुधाला लगेच ओळखले . सुधा त्याच्या पाया पडली .कोणी विनयचा विषय काढला नाही . चहा झाला सुधा बोलली मी नदीवर जाऊन येते . राधाबाई तिला थांब बोलल्या त्या आता गेल्या एक कागद घेऊन आल्या तो सुधाच्या हातात दिला आणि बोलल्या हे विनय ने तुझा साठी दिले आहे ,वाच . ती काही न बोलता नदीवर गेली .तिनी तो पेपर उघडला . आणि वाचायला सुरवात केली . प्रिय सुधा ... तू खूप रागावली असणार माझ्यावर माहित होते मला पण तू पुन्हा कधीना कधी येशील हे माहित होते मला , म्हणून हे पत्र तुझ्यासाठी , खूप प्रेम होते ग माझे तुझावर . पण ते नियतीला मान्य नव्हते .मी मेडिकल साठी गेलो तेव्हा समजले . मला ब्लड कॅन्सर झाला आहे .मी जास्त दिवस नाही जगू शकणार . आणि माझ्या शिवय तू माहित होते मला .पण मी तर या जगातून जाणारच आहे तर तुला दुखी नव्हते करायचे मला . म्हणून मी तुला धोका दिला असे दाखवले मला माहित होते तू ते सहन नाही करू शकणार पण माझ्या मरणाच्या दुखा पेक्षा ते बरे होते . सुधा तू गाव सोडून गेली .तू जेव्हा गेली तेव्हा मी तुला बघत होतो ग पण मी समोर असलो तर तुला खूप वाईट वाटेल म्हणून मी झाडाच्या मागे उभा राहून तुला बघत होतो .खूप रडायला येत होते डोळे भरून येत होते आणि बघता बघता तू दिसेनाशी झाली . तू गेली मला काही सुचतच नव्हते ग रोज या नदीवर येऊन बसायचो .सुधा मला माफ कर . सुधाच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या . अजून एक पेपर होता तो तिनी उघडला . प्रिय आईं बाबा . मी तर आता काही दिवसाचा सोबतो आहे मला माहित आहे पण तो पर्यंत मी कसा जगू मला सुधा शिवय जगणे मुश्कील आहे म्हणून मी नदी मधील डोहात आत्महत्या करत आहे .एक दिवस सुधा नक्की येईन मी तिचा साठी एक पत्र लिहिले आहे ते तिला द्या . म्हणजे विनयने मला धोका नव्हता दिला .तो फक्त माझा होता . काही वेळाने डुबुक आवाज आला . विनय तुझी सुधा पण तुझा कडे येत आहे हा आवाज .आला . काही वेळाने डुबुक आवाज आला . सगळे शांत झाले होते .पाण्यावर तरंग तेवढे दिसत होते .
११/१/२०१४
एखादी व्यक्ती आपल्याला आवडते म्हणजे नेमके काय आवडते .
व्यक्ती आवडणे म्हणजे ती पूर्ण व्यक्ती आपल्यला आवडते का ?
अर्थात नाही .
व्यक्ती फक्त दिसण्यावर आवडतात असे नाही ..
कधी आपल्यला त्या व्यक्तीचे विचार आवडतात .म्हणून ती व्यक्ती आवडते .
तर काही व्यक्तीचे बोलणे आवडते .
काही व्यक्तीचे हसणे तर काहीचे दिसणे आवडते .
काहीचे व्यक्तिमत्व ,त्याच्यातील बिनधास्त पणा आवडून जातो .

डिसेंबर आला कि ३१ ला काय करायचे असे अनेकांच्या तोडून ऐकायला मिळते .
खरच इंग्रजी कैलेंडर नुसार नवीन वर्ष सुरु होणार असते .कसे साजरे करतो आम्ही ते .
मागे मी एका पोस्ट मध्ये लिहिले आहे मी ख्रिश्चन बिल्डींग मध्ये राहते .
पण गेले वर्षानुवर्षे मी बघत आहे हे लोक काय करतात ३१ डिसेंबरला .
ते सगळे रात्री चर्च मध्ये जातात १२ वाजता देवाची प्रार्थना करतात आणि नवीन 
वर्षाचे स्वागत करतात .
दुसऱ्या दिवशी १ जानेवारीला नवीन वर्षाची पार्टी असते .
आम्ही कसे साजरे करतो नवीन वर्ष अनेक जण ड्रिंक पार्ट्या करतात .
जेव्हा नवीन वर्ष सुरु होते तेव्हा हे लोक शुद्धीवर तरी असतात का ?
माझे लग्नाच्या आधीचे आयुष्य छोट्या खेडेगावात गेले .
नवीन वर्ष येत असे पण कोणी त्याच्या कोणाला शुभेछ्या देत नसे .
फक्त वही वर तारीख बदलत असे .
मला आठवते त्या काळात ज्या घरातील मुलगा किवा कोणी सदस्य
जर ड्रिंक करत असेल तर त्या घरातील लोकांना लोक खूप नावे ठेवत असत .
अगदी मुलगी अशा घरात देतानी अनेकवेळा विचार करत असत .
असे पिणारे माणसे एकटे पडत असत .
आज मात्र सगळे उलट झाले आहे एन्जोयच्या नाव खाली कोणते
कारण असू पार्ट्या केल्या जातात .
स्मोक करणे ,ड्रिंक करणे या मध्ये लोकांना थ्रील वाटते .
जो कोणी ड्रिंक करत नाही त्याला आता नावे ठेवले जातात .
"सोडा रे त्याचा विषय त्याला आयुष्याची मजा घेता येत नाही .घास फूस
खाणारा आहे तो " जा रे तू दुध पी असे म्हणून त्याची टिंगल केली जाते .
पण खरच ड्रिंक करणे स्मोक करणे चांगले आहे का ?
सिगारेटच्या पाकीटा वर लिहिलेले असते .ते आरोग्यास हानिकारक आहे .
तरी पिले जाते .
अनेकदा ड्रिंक एवढे केले जाते कि त्याचा असार दुसऱ्या दिवशी होतो .
ज्या घरात लहान मुले असतील आणि त्यांच्या समोर जर असा पार्ट्या होत
असतील आणि घरातील मोठे त्यांच्या समोर जर स्मोक करत असतील तर
त्या मुलांना ते मोठे झाल्यावर आई बाप "बाबा रे हे सगळे करू नको हे वाईट असते
असे सांगू शकत असतील का" ?
अनेक जण बोलतात आम्ही काय जादा घेत नाही .पण कधी कधी
एकच प्याला हा एक बाटली होते हे लक्षात येत नाही .
आज अनेक घरे आहे ज्या घरात कोणाचा नवरा कोणाचा मुलगा पितो
आणि त्या मुले होणारा त्रास हा आख्खे घर भोगत असते .
आज तर मोठ्या मोठ्या शहरत मुली देखील सरस स्मोक .आणि ड्रिंक करत आहे .
कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे .
पण जे काही मनात आले ते लिहिले .

Like ·  · 

रक्षाबंधन



काल राखी पोर्णिमा होती सगळ्याच्या वाल वर व्हाटस अप सगळी कडे छान
छान शुभेछ्या फोटो मेसेज बघून छान वाटत होते ना ?
पण खरच सर्वाना आपल्या बहिणी आणि भाव वर एवढे प्रेम खरच आहे का ?
आज जमाना बदलला आहे.महागाई वाढली आहे .
प्रेत्यक जन फक्त स्वताचा विचार करत आहे .
लहानपणी एकमेकावर खूप प्रेम आणि जीव असतो .
किती निरागसता असते त्यात कोणता स्वार्थ नसतो .
हि माझी बहिण आहे हा माझा भाऊ आहे .हि एक निष्पाप भावना असते
पण आज अनेक घरात काय दिसून येते .जेव्हा पासून कायद्याने
मुलीना माहेरच्या संपत्ती मध्ये हिस्सा भेटायला लागला .
खरच तेव्हा पासून बहिण आणि भावा मध्ये असलेले नाते खरच
निकोप राहिले आहे का ?
अनेकदा भावाची परस्थिती अतिशय चांगली असते .
बहिणीची नसते तेव्हा किती भाऊ हे आनंदाने तिचा हिस्सा तिला देतात .
आणि असा किती बहिणी आहे ज्या आपली परस्थिती अतिशय उत्तम असून
देखील आपला हिस्सा नाकारतात .
या मुळे नात्यात एक कटुता येते .आज देखील जमिनी आणि संपती वरून सगळ्यात
जादा कोर्ट केस चालू आहे हे दिसून येते .
अनेकदा सख्या पेक्षा परके परवडले हे आपण नेहमी ऐकतो .
सख्खा भाऊ असून किवा सख्खी बहिण असून अनेक जन त्याच्या
कडे पटत नाही म्हणून पाठ फिरवून मानलेल्या नात्यानं जादा महत्व देताना
दिसून येतात .
उत्सव पेक्षा गिफ्ट ला जादा महत्व आले आहे .
अशा वेळी खरच मनात येते .आज आपण करत असलेले सन उत्सव या मध्ये
पहिल्या एवढा जिव्हाळा खरच राहिला आहे का 
फेसबुक पोस्ट 
११ ऑगस्ट

फोटो

आज फेसबुक आणि इतर अनेक नेटवरील सोशेल साईट वर आपण आपले फोटो शेअर करतो .अगदी काही मिनिटात ,
आयुष्यात अनेक अनमोल क्षण येतात .आणि असे हे अनेक अनमोल क्षण परत जिवंत करण्याच ,ते फील परत एकदा देण्याच काम करतात ते आपण काढलेले फोटो .
आज आपण कुठे गेलो किवा कोणत्या उत्सवाचे फोटो लगेच मोबईल वर कडून अपलोड करतो .
किवा face book वर शेअर करतो .
पण आठवते का जेव्हा डिजिटल कॅमेरे नव्हते .मोबोईल नव्हते .
रीळवाले कॅमेरे होते .तेव्हा जपून रीळाचे आकडे पाहत काढलेले फोटो ,आणि काढलेले फोटो धुवून येईपर्यंत असलेली उत्सुकता…
आणि फोटो आला नन्तर आपण कसे आलो आहे हे आधी बघणे .
स्वतचे फोटो बघून हसणे .
खरच एक अलग मजा होती ना त्या मध्ये ,आज पण जुने अल्बम बघून आपण ते क्षण परत आपल्या समोर जसेच तसे येतात ना .
आज जमाना खूप बदलला आहे .
आणि फोटोग्राफी सुद्धा,
इलेक्ट्रॉनिक डिजिटल कॅमेरा १९९० मध्ये जन्माला आला.
त्यानंतर सातत्याने डिजिटल कॅमेऱ्यामध्ये बदल होत गेले,
आज काल जादा मोबाईल मध्ये फोटो काढले जातात .
पण खास प्रसंगाचे फोटो काढयला हवे असतात ते फोटोग्राफर .
आज कोणता कार्यक्रम हा फोटो शिवय पूर्ण होत नाही .
आज जागतिक फोटोग्राफी दिन.सर्वा फोटोग्राफर आणि कॅमेरामन
यांना शुभेछ्या

फेसबुक पोस्ट 
१९ ऑगस्ट

चूक

एक उच्च पदावर काम करणर्या ऑफिसर चे घर सुंदर आणि सुशिक्षित बायको .एक गोड १२ वर्षाची मुलगी असे छान सुखी घर .
एक दिवस मुलगी शाळेतून घरी येते .सातवीला असलेली आपली मुलगी नेहमी
प्रमाणे शाळेत कायकाय अभ्यास दिला हे सांगेल .
पण मुलगी आईं जवळ येते आणि सांगते.
" माझ्या वर्गात एक मुलगा आहे आणि तो मला खूप आवडतो.
माझा त्याच्या वर प्रेम आहे. आणि मी ठरवले मी त्याच्या बरोबर लग्न करणार ."
आईला धक्का बसतो हि आपली बारा वर्षाची मुलगी हे काय बोलत आहे तिला
समजत नाही.ती तिला खूप रागावते .
संध्याकाळी मुलीचे वडील घरी येतात ती त्यांना मुली बद्दल सांगते .
ते अतिशय शांतपणे सांगतात मी मुलीशी बोलतो .
मुलगी जे आईला सांगते तेच वडिलांना सांगते .
तुझा विचार पक्का आहे ना ते मुलीला विचारतात .
"हो" मुलगी बोलते.
काही हरकत नाही तु त्याच्या बरोबर लग्न करणार आहेस तर करू शकते .
पण कायद्याने १८ वर्षाची झाल्यावर अजून तू छोटी आहेस .तो पर्यंत तू
त्याच्या बरोबर बोल फिर पण अभ्यास पण कर कारण लग्न करयचा तर तुम्हाला
चांगली नोकरी हवी ना .
मुलगी खूप खुश होती .काही दिवस जातात मुलगी परत वाडीला कडे येते .
"पापा आता मला त्या मुला बरोबर लग्न नाही करयचा त्याच्या बरोबर माझे विचार नाही जुळत आता मला दुसऱ्या मुला बरोबर लग्न करयचा आहे वडील परत बोलतात
ठीक आहे तुला हवे तसे होईल ,
खूप वर्ष जातात आई वडिलांनी बघितलेल्या मुला बरोबर मुलीचे लग्न होते.
ती आता एक मुलाची आईं असते ,
अचानक तीला या गोष्टीची आठवण येते .ती वडिलांना विचारते .
मी चुकीचे वागत होते तरी तुम्ही माझ्या वागण्याचे समर्थन का केले .
त्या वर वडील उत्तर देतात .
"तेव्हा तु असा वयात होती कि जर तु चुकत आहे असे सांगितले असते तर
तु चुकीचे समजले असते .आम्ही तुझे दुस्मन आहे असे तुला वाटले असते ."
या वय मध्ये विरोध सहन होत नाही मग जे करू नाही ते मुले करतात .हा वयाचा
परिणाम असतो .स्वताहून काही वर्षांनी समजते काय चूक काय बरोबर .
मुलगी फक्त हसली .
कारण तिला ते पटले होते .
कारण जर घरून विरोध झाला तर घरातून पळून जायचे असे काय काय मूर्ख
विचार केले होते आपण हे तिला आठवले .

वेगळ्या वाटा

बोल काहीतरी असी शांत नको राहू.
तुझ्या शांत राहण्याचा त्रास होतो आहे मला खूप,
बोल भांड हवे तर .तो बोलत होता,
आणि ती शांतपणे त्याच्या कडे बघत होती, काही न बोलता .
तिचे असे शांत रहाणे त्याला सहन होत नव्हते, त्याने तिचे दोन्ही खांदे पकडले 

आणि काकुळतीला येउन बोलला.
तो :बोल ग माझ्याशी . . . .
ती : काय बोलू सांग ,तुला माझ्या बोलण्याचा त्रास होतो मग का बोलू मी ,
तो .. मग भांड हवे तर .
ती...नाही आता मला भांडायचे नाही आणि बोलयचेपण नाही .
"मला माहित आहे आपल्या वाटा वेगळ्या आहे . त्या कधीच एक होणार नाही . 

मी तुझ्या वाटेवर कधी येऊ शकत नाही हे माहित होते तुला" .
तरी तुझी वाट सोडून तू माझ्या वाटे वर आला ,
माझ्या सुखात दुखात सामील झाला .
आयुष्यातील सगळी सुख देण्याचा प्रयत्न केलास .
आणि अचानक तुला तुझ्या वाटेची आठवण आली ,
मग. . . तू निघून गेलास, माझ्या मनाचा विचार न करता.
पण माझ्या वाटेवर तसे येत राहिलास अधून मधून.
तू मला जगायला शिकवलेस रे , जगाकडे बघायची एक नवीन नजर दिलीस,
ते मी कधीच नाही विसरणार.
तुला वाटले तर यायचे, नाही तर तुला न माझी आठवण न माझ्या वाटेची.
मी नाही येऊ शकत माझी वाट सोडून तुझ्या वाटेवर माहित आहे मला .
म्हणून आता मी तुज्या येण्याचे न येण्याची सवय करून घेतली .
शांत पणे बोलून ती आपल्या वाटे वर चालू पडली
तो हताश फक्त तिच्याकडे बघत राहिला .
आणि आपल्या वाटेवर चालू पडला .
आता त्यांचा वाटा अलग होत्या ,
किती मनात आणले तरी त्या कधी एक होणार नाही ,
हे माहित होते दोघांना . .
अगदी नदीचे दोन किनारे
 —

बैलपोळा ,



आज बैलपोळा ,
वीस पंचवीस वर्ष पूर्वीचा आणि आजचा पोळा ,
या मध्ये जमीन आस्मानचा फरक पडला आहे .
तेव्हा घरोघरी बैल होते .शेती करायचे साधन म्हणून ,
आज जमाना बदलला आहे 
आज शेती करण्याच्या पद्धती आधुनिक झाल्या आहे.
आणि पर्यायानी बैल कमी झाले.
अनियमित पावसाळा या मुळे शेतकरी देखील शेती सोडून
दुसरे कामे करायला लागले .
आज बैल पोळा होतो पण खरच किती उत्साह राहिला आहे .
त्या मध्ये हा एक प्रश्न आहे .
स्वताच्या मुला प्रमाणे काळजी घेतात शेतकरी आपल्या
बैलांची .
अशाच माझ्या आठवणीतील बैलपोळा.
गाव साधे होते ,लोक पण साधे होते .
कोक्रेटीकारणाचे वारे गावात तो पर्यन्ता आले नव्हते .
सकाळी सकाळी मग लगबग असे बैलांना घेऊन पुरुष माणसे
शेतात जात .
बायका मग घर सरवणे पूर्ण अगंण भर सडा टाकणे हे काम चालू
असत .
प्रत्येक घरातून मग पुरणाचा वास येत असे .
आजूबाजूल हेच असे .
दुपारी बैलांना सजवणे .
त्याना रंग देणे ,गोंडे बंधने ,
सगळ्यात छान असे ते त्याच्या गळ्यात वेगवेगळ्या
माळा घालणे किती छान छान असत त्या .
मी तर गमतीनी बैलानाचे दागिनी आहे ते असे बोलयाचे .
घुघुर माळ घंटाची माळ,कवडीची मण्याची किती प्रकार ,
असे सजलेले बैल बघायला किती छान वाटत असे .
तेव्हा गावाच्या वेशी बाहेर खूप मोकळी जागा होती .
सगळे बैल मग तिथे जमत .
किती वेगवेगळे रंगानी नटलेले ते बैल मस्त दिसत .
मला वाटते हा एकच असा दिवस असा असे सगळ्या गावातील
बैल एकमेकांना भेटत किवा दिसत असावे .
बैलांचा सन असून सुद्धा काही लोक आपले बैल पुढे जावे म्हणून
त्यांना मारत असत ते मला कधीच आवडत नसे .
आमचा एक बैल मारका होता म्हणून वडील नेहमी मागचे राहत .
आणि शांतपणे गावभर चक्कर मारून आणत असत .
घरी येई पर्यन्त अनेक ठिकाणी गावात बैलांना ओवाळले
असे .{जे नोकरदार होते .ज्याचा कडे बैल नसे }
घरी येई पर्यन्त खूप उशीर होत मग पुन्हा त्याची पूजा .
त्यांना पुरण पोळी असा कर्यक्रम होत असे .
पण असा पोळा आता आठवाणीतच राहिला आता
गाव झपाट्याने बदलले आहे .
आता शेतीच्या आधुनिक पद्धती tractor ने शेती केली जाते .
जिथे पोळा असे ती जागा पण आता रिकामी राहिली नाही .
माहित नाही आजचा पोळा आता कशा आहे .

फेसबुक पोस्ट 
२५ ऑगस्ट 2014

भंडारदरा

एक दिवसाच्या पिकनिक साठी भंडारदरा हे ठिकाण खूपच फेमस आहे .
या वर्षी जाणायचा योग आला .
कोणाला आवडेल असे ठिकाण पण माझे लक्ष मात्र नको त्या गोष्टीनी जादा वेधून 
घेतेले .
अतिशय खराब रस्ता ,खड्यात रस्ता होता कि रस्त्यात खड्डे .
४० कि मी च्या त्या रस्त्यावर कुठे पेट्रोलपंप नाही .
भाताचे शेतात खूप पाणी ,ओढ्यांना नद्यांना लाल गाळ मिश्रित पाणी सगळी कडे
कुठे कुठे तीन तीन ,चार शेतात घरे आजूबाजूला सगळा चिखल .
घरा पर्यंत जायला देखील रस्ता नाही .
कसे राहत असतील ते लोक पिण्याचे पाणी कुठून आणत असतील .
कधी कोण आजारी पडले तर त्यांना वैदेकीय उपचार तरी लवकर भेटत असेल का
डोंगरळ भाग लाईट तरी असेल का .
खूप सारे प्रश्न .
मेन भंडारदरा धारणा जवळ खूप गर्दी होती .त्या दिवशी खूप लोक आले होते त्यात
नाशिक मुंबई कडील लोक जादा होते .
धीगणं दारू पार्ट्या .अनेक पिलेल्या मुलाचे आरडाओरडा,
हे सगळे स्थानिक लोक बघत होते त्याच्या बरोबर बोलणे झाले .
हे लोक येतात मजा करतात .पण आम्ही लोक कसे राहत असेल हे कोणाला
नाही दिसत .
तो बोलत होता ते किती खरे होते .

फेसबुक पोस्ट 
२८ ऑगस्ट २०१४ 

उद्या १४ नोव्हेंबर म्हणजे बालदिन .....
पंडित जवाहरलाल नेहरूंचा १४ नोव्हेंबर हा जन्मदिन 'बालदिन' म्हणून भारतात साजरा केला जातो. 
मुला साठी असलेला पण खरच आजच्या छोट्या छोट्या मुलांना बघितले कि वाटते 
बिचारे बाल "दिन " आहे .
रोज सकाळी शाळेत जातानि छोट्या मुलांना बघितले कि त्याची खरच दया येते .
दोन वर्षाची मुले त्यांना नर्सरी {बालवाडीत } पाठवले जाते .
सकाळी झोपेतून उठवायचे जबरदस्तीने त्यांना तयार करायचे
त्यांना जायचे नसते मग रोज त्याची रडारड ...
आजच्या या स्पर्धेच्या जगात मुलांना खेळायला मिळत नाही .
खेळायला मैदान देखील आज नाही .
आज बालदिन साजरा होतो तो अनेक शाळेतून .बालदिनाचे कार्यक्रम देखील
होतात .
पण आज देखील असे मुले आहेत त्यांना माहित सुद्धा नसेल बालदिन असतो .
गरीब,फुटपाथ वर राहणारे ,अनाथ ,शाळा काय असते हे माहित नसलेले असे अनेक मुलं
आहेत .
आज देखील भटके विमुक्त लोक आहेत ,अनेक आदिवासी पाडे असे आहे .त्यांना माहित
असेल का बालदिन ....
जेव्हा सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार भेटेल .
कुठे रस्त्यावर फुले विकणारे ,हॉटेल मध्ये कपडा मारणारे .
बालकामगार दिसणार नाही .
तेव्हा खरा बालदिन साजरा होईल नाही का ?

फेसबुक पोस्ट 
१४ नोव्हेंबर २० १४ 

कधी थांबणार हे ????????

कधी थांबणार हे ????????
उत्तर महाराष्ट्रात गारपीट, कोकणात अवकाळी पाऊस
बळीराजाला पुन्हा अस्मानी तडाखा
आधीच शेतकरी आत्महत्या करत आहे .त्यात निसर्गाने त्यांची अजून परीक्षा 
बघण्याची ठरवली आहे .काल उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील बळीराजाला पावसाने 
जबरदस्त तडाखा दिला आहे .आज शेतकर्याची हलत खूप वाईट आहे .
कधी कधी पीक असून भाव नाही तर कधी पीक हाताशी येऊन पाउस होतेचे नव्हते
करत आहे .पीक छान आले आता उद्याचे स्वप्न बघणारे आज धाय मोकलून रडायची
वेळ आली आहे .
या महिन्यात विदर्भातील दोन शेतकऱ्यांनी अतिशय काळजाचा थरकाप होईल अशा पद्धतीनी आत्महत्या केल्या .
एका तरुण शेतकरी आत्महत्या साठी आपल्या शेतातील मोटारपंपाची विजेची तार काढून त्याने अंगाभोवती गुंडाळली आणि स्वत:च्या हाताने बोर्डावरील बटण दाबले! हाय व्होल्ट वीज प्रवाहा क्षणात तो भाजला गेला आणि काही वेळातच गतप्राण झाला.
तर एक शेतकर्याने कदाचित आपण गेल्यावर आपल्या अंत्यसंस्कारचा पण आपल्या कुटुंबांला खर्च नको म्हणून स्वतच शेताच्या एका कोपर्‍यात लाकडांचे सरण रचले, ते पेटविले आणि स्वत:ला त्यात उडी मारली . काही वेळात त्याचा देह जळून खाक झाला .
खरच का करत आहे आज बळीराजा असे .
कारण रोज बळीराजा आत्महत्या करत आहे आणि त्याचा कोणाला फरक पडत नाही .
मग सरकारांनी आता तरी दाखल घ्यावी असे असेल का ?
असे आत्महत्या होत आहे .कालच्या पावसामुळे कांदा, डाळिंब, द्राक्ष
पिकांची अक्षरश: माती झाली आहे .या शेतकऱ्यांना सरकार त्यांनी पण असे काही
पाऊल उचलण्या आधी मदत करेल का ?