Sunday, 19 April 2015

चूल

         गेले दोन तीन दिवसा पासून अनेकांनी चुलीचे चित्र आणि चुली वरील काही कविता आणि पोस्ट टाकल्या आहे .त्या पोस्त बघितल्या आणिमन भूतकाळा बरोबर गावाला जाऊन पोचले .माझे सगळे बालपण खेड्यात गेले .आजच्या सारखे तेव्हा gas घरोघरी आले नव्हते .खेडे जास्त करून शेतकरी वर्ग जास्त प्रमाणात होता .प्रत्येक घरी गाई गुरे असत त्यामुळे शेणाच्या गोवऱ्या लावल्या जात .आणि त्याचा जळणासाठी उपयोग होत असे .शेतात असलेली काटेरी झाडे देखील जळणासाठी वापरत .ज्यांच्या कडे गाईगुरे नसत ते लोक लाकडाच्या वखारी असत .तिथून लाकडे घेत.सकाळ संध्याकाळ प्रत्येक घरात चूल पेटवली जात असे .चुलीतील धूर हा प्रत्येक घरातून बाहेर पडतानी दिसत असे .चुलीवर स्वयपाक करणे खरच कौशल्याचे काम होते एकाच वेळी चुलीतील जाळ कमी जास्त करणे .चटका बसू न देता काम करत राहणे ,          खरच धन्य होत्या
आधीच्या बायका .पावसाळा असेल तर लाकडे पेटत नाही .मग फक्त धूर आणि धूर होतो .आज फेसबुक फोटो टाकणे किती सोपे वाटते ना ,पण खूप अवघड असते .त्या जाळा समोर बसून ताप सहन करत धूर सहन करत काम करणे .आज मात्र परस्थिती खूप बदलली आहे ना ?
आज खेड्यात काही प्रमाणात gas चा वापर केला जातो .
ज्या मुले अचानक कोणी आले तर कमीत कमी चहापाणी लवकर करता येतो .नाही तर भर उन्हात किवा दुपारच्या वेळी परत चूल पेटवणे नको वाटत असे .आज धुराने भरलेले घर नाही .काळ्या भिंती नाही .आणि ती चूल पण नाही .जशी घरात आई नसेल तर ते घर वाटत नाही तसे छान अगण सरावलेले आहे .छान घर आहे त्यात चूल नाही तर ते घर वाटत नाही .
       घरात आई नाही दिसली कि कसे ओकेबोके वाटते ,
तसे मला आज खेड्या गावात गेले आणि त्या घरात चूल नाही
दिसली का वाटते हे घर नाही .आज खूप सुधारणा झाल्या सुंदर किचन झाले तरी मनात कुठे तरी कोपर्यात पेटलेली ती चूल आठवत राहते .आई सारखी मायने सगळ्याचे पोट भरणारी .कारण चूल आहे आणि तिचा जवळ आई हि असतेच असते .जी आपली वाटत असे .आज gas आहे आई असेलच असे नाही .त्या एवजी बाई असते .म्हणून आईच्या जेवणाची आठवण येतेच येते ,आणि आम्ही म्हणतो चुलीवरील जेवणाला चव होती .खरी चव कशाला होती आईच्या मायाने बनवाल्य्ल्या त्या
चुलीवरील जेवणाला .कारण दोघीच्चे पक्के नाते होते .घरभर न दिसणारी आई चुली जवळ हमखास दिसत असे .तिची हक्काची जाग होती ना ती ?
!!आशा !!
२४ मार्च १५
फोटो सौजन्य गुगल

No comments :

Post a Comment