स्वच्छता अभियान वरून आठवले .
कसारा स्टेशन.संध्याकाळची ६.१७ ची कसारा सी .एस.टी.ट्रेन .ट्रेन सुटायला अजून अर्धा तास बाकी आहे .वडापाव .भेळ ,असे अनेक फेरीवाले डब्यात फिरत आहेत .कोणी ना कोणी काहीना काही विकत घेत आहे .डब्यात खिडकीच्या बाजूला एक वयस्कर जोडपे बसले आहे .त्याच्या समोर सीटाच्या दुसर्या टोकाला एक १७ ते १८ वय असणारा एक मुलगा बसला आहे .त्या मुलाचे सगळ्या डब्यात लक्ष होते .त्या वयस्कर जोडप्याने दोन वडापाव घेतले .खावून झाले.सवय नुसार वडापाव घेतलेला कागद गोळा केला आणि खिडकीतून खाली फेकला .त्याच क्षणी तो मुलगा उठला आणि खाली गेला ते कागदाचा गोळा घेऊन परत आला .आणि त्या वयस्कर माणसाच्या मांडीवर टाकला .आणि बोलला ."तुमच्या घरात अशा कचरा टाकला तर आवडेल का तुम्हाला "त्याच्या या वागण्यावर ते वयस्कर जोडपे भयंकर चिडले .तुला काय करयचा आहे टाकणार आम्ही .असे बोलून त्यांनी परत खाली फेकून दिला .तो मुलगा परत गेला परत घेऊन आला .आणि त्याचा कडे दिले .असे तीन वेळा झाले .चिडलेले ते जोडपे बोलले ठीक आहे इकडे कुठे कचरा पेटी दाखव .नाही ना मग कचरा टाकायचा कुठे .?पिशवीत घेऊन जा आणि कचरा पेटीत टाका .तो मुलगा बोलला ..या वर त्या मुलाचे संस्कार आई वडील सगळे काही काढले त्या जोडप्याने .पण हे सगळे घडत असतानी डब्यातील एकानी पण कचरा खाली टाकला नाही .आपल्या जवळ ठेवला .इंजीनिरीयांग करत असलेला तो मुलगा खूप पोट तिडकीने बोलत होता .घर माझे तसा देश माझा .....या गोष्टीला १० वर्ष होऊन गेले आज तो मुलगा ३० च्या आस पास असेल .आज पण तो तसाच असेल का ?आणि आज पण त्या वयस्कर जोडप्याने विचारलेला प्रश्न तसाच आहे नाही का ?कचरा पेटी कुठे आहे ?जीवन खूप सुंदर आहे .पण कधी कधी अनेक गोष्टी करायच्या राहून जातात आयुष्यात एक निराशा भरून राहते आपण काही करू शकत नाही याची एक खंत असते .आजून पण आपण काही करू शकतो याची जाणीव होते . .जसा दिवस संपताना सूर्य मावळतो.पण त्याच वेळी मावळतीचे सुंदर रंग आकाशात दिसतात .मन प्रसन्न करून जातात .असाच माझा एक प्रयत्न @असेच-मनातले-काही ....... माझ्या शब्दात #,मावळतीचे रंग
Sunday, 14 December 2014
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

No comments :
Post a Comment