आज एक मे शाळेत असतानी नेहमी या दिवशी आमचा शाळेचा निकाल असायचा ,
आता बहुतेक आई वडील शिकलेले असल्या मुळे त्यांना आपल्या मुलाची प्रगती काय असते ते माहित असते .आमच्या वेळी असे नव्हते.बहुतेक आई वडील हे निरक्षर असायचे त्यांनाच जादा उत्सुकता असायची आपले मुले पास होतात कि नापास ,
आणि त्या वेळी रिझल्ट किवा निकाल न म्हणता पास नापास कधी आहे असेच विचारले जायचे .
सकाळी सकाळी शाळेत जायचे मनात धकधक आमचे काही वर्ग शिक्षक सरळ सरळ जी मुले नापास आहे त्याचे नाव सांगून टाकयचे आणि सगळे पास आहे हे सांगायचे .
खरा तर आपल्या मुलाला किती मार्क्स पडले या पेक्षा तो पास झाला याचा आनंद खूप असायचा .
१ मे ला शाळेतील दिवस आठवतात नेहमी .
No comments :
Post a Comment