Tuesday, 23 December 2014

पाऊस

आज मुंबईत जोरदार वारे होते.पाऊस येणार असे वाटले पण नाही आला .
झाडे वाऱ्यामुळे खूप जोराने हालत होते.
मला आठवला माझा गावाकडील पाऊस .... 
पहिल्या पाऊसाची वाट तर सगळेच बघतात .
जादा करून शेतकरी आतुरतेने वाट बघत असतो .
खेड्यात अनेक शेतकरी गरीब असतात अनेकाची घरे हि पक्की
नसतात .
पहिला पाउस येण्या आधी खूप जोराचा वारा सुटतो .विजा चमकतात
आणि अनेकदा खूप भीती वाटते.घराचे छप्पर उडते .कधी खूप जीवपाड
जपलेले अंगणातील झाड कोसळते .
जोरात वारा उलट सुलट त्या मुळे अनेकदा शेतकर्याला स्वतः पेक्षा आपल्या
पाळीव जनावरे {गाई ,बैल .शेळ्या ,मेंढ्या }जे काही असेल त्याची जादा काळजी असते .
तर कधी घराचे छप्पर उडून जाते .आणि असा पाऊस हा एन्जोय नाही केला जात .
किवा असा पाऊसात ना कविता सुचतात आणि ना गरम भजी खाण्याची आठवण येते .
अनेकदा झाडे पडतात ते विजेच्या तारावर मग २,२ दिवस लाईट गायब होते .
जे खेड्यातील लोक आहे त्यांनी नक्की हा अनुभव घेतला आहे .
{मी असा पाउस खुपदा अनुभवला आहे .माझा लहानपणी वाऱ्यामुळे भर
पाउसात डोक्यावरील पत्र्याचे छप्पर उडालेले अनुभवले आहे .आज देखील
जोराचा वारा सुटला कि मला भीती वाटते }

No comments :

Post a Comment