कथा ४
आईस पत्र
प्रिय आईस ,सा .दंडवत
शाळेत असतानी नेहमी पत्र लिखाण करयला शिकवले जायचे .कधी आईलास तर कधी बाबाना पत्र कधी मित्रास पत्र .
आईस पत्र लिहीनेस सांगितले कि मला नेहमी वाटयचे असेच खरे पत्र तुला लिहिता आले असते तर किती बरे झाले असते ना .
पण तुला तर वचताच येत नव्हते ना.
माझा मनात काय चालयचे ते तरी तुला समजले असते ना .
का कोणास ठाऊक पण तू मला नेहमी इतर आया पेक्षा वेगळी वाटयची.
तुझा तापट स्वभाव मुळे तुझी नेहमी भीती वाटयची,
तू कधी आणि कोणता करणा मुळे चिडणार हे सांगता नाही यायचा .
खेड्यात आणि त्यातून शेतकरी परिवार म्हणजे खूप काम असायचे .
तुला पण खूप काम असायचे.खेड्यात एक वाक्य नेहमी बोलले जाते."शेती साठी किती माणसे असले तरी कमीच पडतात"
अगदी शाळेत असतान पासून शेतात करता येणारी मदत करयला लागयची.रविवार सुट्टी पण ती सुद्या शेतात जायची.
शाळेतून आला वर पण घरातले काम असायचे.
पण तू किती काम करते. म्हणून तुला मदत होयला पाहिजे म्हणून सगळे काम करयचे.
पण एक चूक झाली तरी तुला आवडायचे नाही.
तुला कोणाचा घरी गेलेला पण आवडत नसे.तू नेहमी समजून सागणं एवजी सगळ्या समोर रागवत असे.
तू रागवला वर जर रडू आले तर तू अजून रागवत असे मग डोळया मध्ये आलेला पाणी तसाच राह्यचा.
तू नेहमी का चिडत असे ते समजत नसे.पण मला कॉलेज ला जाणेस तुझा खूप विरोध होता.तरी बाबांनी मला कॉलेजला पाठवले.
मग तुझी चीड चीड अजून वाढली.त्यातच गावातील एक मुलगी मुस्लीम मुला बरोबर पळून गेली .
मग काय सगळ्या आया ना आपला मुली बद्दल भीती वाटयला लागली .
त्यात तू पण होती .
१० वी झाली आणि तुला वाटयचे आता लग्न करून टाकयला पाहिजे.
आपला मुलीचा हातून वेडे वाकडे काही होऊ नाही असे तुला वाटायचे पण ते तुला मला समजून सांगता नाही यायचा .
ते तू सांगयची पण रागने ओरडून .मग असा वेळी आपली आई असे का करते असे वाटयचे मला .
तुला काय सांगयचे आहे ते माझा लक्षात येतअसे.
.कधी कधी ओरडून तुला बोलवे वाटयचे मला समजते ग सगळे थोडा तरी तुझा मुली वर विस्वास ठेवत जा ग.
खूप खूप वाटयचे इतर मुली सारखे मी पण तुझा माडीवर डोकं ठेवावे तुझासी खूप बोलवे.
पण का काय माहित तू जवळची असी कधी वाटलीच नाही .
दोन पिढी मधील अंतर होते म्हणून असेल .
तुझा खूप गोष्ठी पटत असत आणि खूप पटत नसत .
तुला नेहमी लोक काय म्हणणार याचीच काळजी.
मुलीची जात आहे.सगळे आलेच पाहिजे .मुलीनी मुली सारखा राहावा हेच ऐकवत असे तू नेहमी .
आणि मला तेच आवडत नसे .
पण वाद घालन्या पेक्षा मी शांत राहत असे.मनातले कधी बोलताच नाही आले ग .
आणि मग तसीच सवय लागली .
आज पण तुझी हि मुलगी मनतले मनातच ठेवते ग.
खूप इच्छा असून पण तिला तिचे सुख दुख नाही बोलता येत कोणाला.
वयानुसार तू आता तर अजूनच जादा चीड चीड करत असते,मला माहित आहे तुला कोणी उलट उत्तर दिलेला आवडत नाही .
म्हणून मी तुझा सुनांना सांगितले आहे कि आईचा बोलणा कडे दुर्लक्ष करा .हेतू हाच होता कि त्यांनी तुला उलट काही बोलू नाही पण तू त्या मधून पण चुकीचा अर्थ घेतला.तुला वाटते मी तुझ्या बाजूना बोलण्या एवजी त्याची बाजू घेतली .म्हणून तू आता तर माझा वर जादा नाराज आहेस .
खूप काही तुला सांगवेसे वाटे खूप बोलवे वाटते .
पण आज देखील नाही बोलता येत ग.
फक्त एवढी अपेक्षा आहे कधी तरी तू मला समजून घेशील ................
१८ फेब्रुवारी २०१३
तुझी मुलगी
. आशा .
No comments :
Post a Comment