Sunday, 20 December 2015

माझ्या फेसबुक पोस्ट


एक स्मित हास्य कोणाला आपलेसे करण्यास पुरे असते .तेच स्मित कोणाकडे बघून उपरोधिक पणे केले तर आपले परके होवून जातात.






एखाद्या व्यक्तीचा खूप आदर वाटतो .ती असते आदर करण्या सारखी ...

सगळ्यांना मान देणारी .पण आपण तिचा बरोबरीचे असून तिला मान सन्मान मिळतो .यश तिचा पायाशी नेहमी लोळण घेते .आपण कुठे कमी नसतो तरी यश मिळत नाही. मग ज्यांना यश मिळते त्यांच्या बद्दल आधी असूया तयार होते.मग हळूहळू त्याचा नासूर होतो.आणि मग त्या व्यक्तीला शत्रू समजतो.सगळ्यात मोठा शत्रू.......पण असे का होते त्या व्यक्तीचा राग का येतो.राग नेमका कोणाचा असतो .आपल्या अपयशाचा का ?
समोरील व्यक्तीच्या यशाचा .समजत नाही .
मग यश मिळवण्यासाठी वाटेल ते ....
यश मिळते आणि अहंकार वाढतो ...
पण जाणीव असतेच आपण जे करतो त्याची...
असेच मनातले काही

यश मिळते आणि अहंकार वाढतो ...
पण जाणीव असतेच आपण जे करतो त्याची...
असेच मनातले काही






चित्रपट आपली संसकृती सांगत असतो .त्या काळात लोक कसे राहत होते किवा एखादी आदर देणारी व्यक्ती नक्की कशी होती ते जाणवून घायला कोणालाही आवडते पण ते साठी अभ्यास करावा "मुघले आझम' किवा उमराव जान हे चित्रपट आठवतात .अगदी त्या काळातील दागिने यावर सुद्धा बारीक विचार केला गेलेल्या दिसतो .कदाचित तेव्हा पैसे या पेक्षा कलाकृतील जास्त महत्व दिले जात असावे .
येणारा बाजीराव मस्तानी आल्या नंतरच समजेल कसा आहे .दोन्ही खांद्यावर पदर घेणाऱ्या पेशवाई मधील स्रिया बघायला भेटतात का ? आणिखी काही समजेल लवकर .
असेच मनातले काही

येणारा बाजीराव मस्तानी आल्या नंतरच समजेल कसा आहे .दोन्ही खांद्यावर पदर घेणाऱ्या पेशवाई मधील स्रिया बघायला भेटतात का ? आणिखी काही समजेल लवकर .
असेच मनातले काही







आजच्या पिढीला इतिहास वाचायला जास्त आवडत नाही .एक निरीक्षण .....त्यांना आवडते आज मध्ये जगायला ,पण इतिहास हा जेव्हा चित्रपट आणि मालिके मधून समोर येतो तेव्हा ते नक्की त्याबद्दल चर्चा करतात ,बघतात . पण गरज असते इतिहास नीट वाचण्याची तो समजून घेण्याची ,पुढील पिढी समोर तो जसा आहे तसा मांडण्याची .फक्त भव्य दिव्य करण्याकडे आणि केवळ बाजारात विकला जावा म्हणून त्यात नको ते घुसवून ,चुकीची माहिती देणे पण बरोबर नाही ना ?

काही लोक कारण नसतानी दुसर्यांना रडवण्यात धन्यता मानतात तर काही लोक कारण नसतानी दुसर्यांचे आसू पुसण्यात धन्यता मानतात .१७ feb




पैशाने दिखावा करता येतो माणसे विकत घेता येतात .माणसे गोळा करता येतात .पण माणुसकी आणि चागले पणा पैशाने नाही मिळत .



वेदना झाल्या कि डोळ्यात पाणी येते .पण ते वेदनेचे आहे हे समजायला मन तसे असायला हवे .नाही तर ते रडगाणे वाटणारे त्यावर हसणारे एक दिवस रडतात .
आपण कोणाला हसलो कोणच्या दुखावर हसलो हे समजून पचात्ताप होतो पण तेव्हा वेळ गेलेली असते .देवाच्या लाठीला आवाज नसतो बोलतात .तसे होते .ती कधी तरी पडते मग जसे करावे तसे भरावे याचा अनुभव येतो .आज आहे तो उद्या राहीलच हि समज माणसाला एक दिवस नियती नक्की चपराक देते .{17feb}
‪#‎असेचमनातलेकाही‬


नको ते बोलून आत्मविस्वास घालवणारे असतात तसेच पुढे येवून उम्मीद देणारे असतात .तेव्हा समजून जा तुम्ही चुकत नाहीत .


दोन शब्द मनापासून कोणाशी बोला ,कोणाच्या चेहऱ्यावर नक्की हसू दिसेल .दोन शब्द रागाने बोला ,हसरा चेहरा नक्कीच रडवा होईल .आपण काय करायचे ते आपण ठरवायचे .{२२ feb १५ }



व्यक्ती जेव्हा शून्यातून यशाच्या शिखरावर पोहचते .तेव्हा त्याच्या बरोबर असतात प्रामाणिक जीवाला जीव देणारी माणसे,त्यांना कशाची अपेक्षा नसते.
आपली व्यक्ती मोठी होणे यातच त्यांचे समाधान असते.यशस्वी व्यक्ती विसरत नाही आपल्या जीवाला जीव देणाऱ्या माणसाना .......पण वेळ बदलते यशस्वी व्यक्ती भोवती स्तुती करणाऱ्या स्वार्थी लोकांचा गराडा पडतो.नाविलाज असतो किवा यशाची हवा डोक्यात जाते.नकळत जीवाला जीव देणारे हळूहळू दूर होत जातात.यात दोष कोणाचा असतो .परस्थिती नुसार बदलता न येणाऱ्या माणसांचा ....
कोणतीही गोष्ट अति झाली कि ती नको वाटते .मग ती किती आवडणारी असली तरी .


नावे ठेवणे हा मनुष्य स्वभाव आहे आणि असतो .मी नाही तसा किवा तशी असे किती म्हटले तरी हा गुण प्रत्येका मध्ये असतोच .पण मला नेहमी वाटते एखादी व्यक्ती अशी का वागते याचा विचार जर त्याच्या जागी जावून केला तर ,आपण त्या व्यक्तीला समजून तर घेऊ शकतो ,आणि जमेल तशी मदत करू शकतो असे मला वाटते .



आयुष्यात छोट्या गोष्टींना खूप महत्व असते.पण त्यांना छोट्या समजण्याची चूक केली तर त्या पुढे जावून खूप मोठ्या होतात .







असेच मनातले काही

एक व्यक्ती कधी दुसऱ्या व्यक्ती सारखी नसते .अगदी मग ते दिसणे असो कि बोलणे .चालणे. आणिहि विचार सुद्धा हे माहिती असून अनेकदा अनेक "मी नाही तुझा सारखा .किवा मी नाही त्याचा सारखा "असे वाक्य का बरे बोलत असतील .




अति विचार हे दिशा हीन नावे सारखे असतात .जिला कधी किनारा मिळत नाही.


कधी तरी खोटे बोलून बघा,खरे आपोआप बाहेर येते...............


स्तुती आवडत नाही असे कोणी भेटणार नाही ,फक्त ती किती खरी किती खोटी हे ओळखता आले पाहिजे .

नाही ओळखता आले तर अधोगती ठरलेली 

आयुष्यात काही दिवस विसरायचे म्हटले तरी विसरता येत नाही .कुठे तरी वाईट आठवणी मनावर घाव करून गेलेल्या असतात .त्या आठवणी जर हलाखीच्या परस्थिती मधील असतील तर त्या नेमक्या आनंदाच्या क्षणी आठवतात .मग नकळत डोळे कधी भरून येतात ते पण समजत नाही .

अपमानाचा घाव म्हणजे सुदर प्रतिबिंबाला गेलेला नाजूक तडा .जो कधी भरला जात नाही

अतिशय खरी आणि वास्तव म्हण .......

सगळे सोंगे आणता येतात पण पैशाचे नाही .........
आणि पैशाच ठरवतो माणसांची किमत ........
कमीतकमी आजच्या जगात तरी .......

कोणती गोष्ट जेव्हा नवीन असते तो पर्यंत तिचा बद्दल आकर्षण असते ,तिचा बद्दल ओढ असते .नंतर येणारा तोच तोच पणा यामुळे मग त्यातील आकर्षण संपून जाते .मग ती गोष्ट नकोशी वाटते .मग ते काही असो .एखादी वस्तू .अथवा एखादी व्यक्ती किवा आणखी काही .खरे तर माणसाचे मन हे चंचल असते .त्याला नेहमी नवीन काही हवे असते .मग त्या साठी जुने मागे पडते .नकळत .....

जिंदगी किती सुदर शब्द आहे ना.म्हणजेच जीवन,.आपल्यला जन्म आई वडील देतात.चालयला शिकवतात.त्यांना जमेल तसा रस्ता दाखवतात .संस्कार देतात .परंतु या जीवन रुपी रस्त्यावरून आपल्यला चालायचे असते.ते कसे आपण ठरवायचे असते.रस्त्यात खाच खळगे येणार ,अनेक वळणे येणारआपण ते कसे पार करतो,आणि या जीवन रुपी चित्रात कोणते रंग कुठे आणि कसे भरतो हे तर आपल्यावरच असते ना


कोणी तरी वर्षानुवर्षे आठवणी काढावी,नतमस्तक व्हावे ,असे महान कार्य कारावे लागते.त्यासाठी लागते प्रचंड मेहनत आणि जिद्द मग तेव्हा ती ठरते समाज बदलाची मोठी नादी.........



चित्रपट आणि विरोधक


वाद कुठे घालावा????
ज्या विषयाची पूर्ण माहिती असेल आणि अभ्यास असेल तिथे नाही का ?
संजय भन्साळी यांनी इतिहासचे विकृत्तीकरण केले आहे असे बोलले जात आहे .
काल काही लोकांनी तो चित्रपट दाखवू नाही म्हणून पुण्यात आंदोलन केले .
त्यावेळी काही पत्रकारांनी आंदोलना करणाऱ्यांना काही प्रश्न विचारले .
जसे "पहिला पेशवा कोण आणि त्यांना पेशवा हे पद कोणी दिले "?
बाजीराव पेशव्यांनी लढलेली पहिली लढाई ?
या प्रश्नाचे उत्तर त्या आंदोलन करणाऱ्यांना देता आले नाही .ते चूप बसले .
आता प्रश्न असा आहे.मराठ्याचा अभिमान असणारे ,पेशव्याचा अभिमान असणाऱ्यांनाया आंदोलकांना हे माहिती असू नाही .मग आपण भन्साळी कडून काय अपेक्षा करणार नाही का ?
आंदोलन करणारे मराठी प्रश्न विचारणारे मराठी मग त्यांनी पत्रकारांना का नाही विचारले .
काशी बाई आणि मस्तानी एकत्र नाचली होती का ?
पेशवे कालीन बायका असा प्रकारे साडी घालत होत्या का ?
मिडिया नेमका कोणाची बाजू घेतो .
आंदोलन करून आंदोलक कोणाला मदत करतात .
माहिती नाही पण या सगळ्याचा फायदा चित्रपटाला नक्की होतो असे वाटते .
असेच मनातले काही

नात्याचे प्रकार



सख्खे आणि मानलेले नाते.......
कोणाला वाटते सख्खे नाते किती मतभेद झाले तरी ते तुटत नाही.
जसे पाण्यावर लाठी मारून पाणी वेगळे करता येत नाही तसे सख्खे नाते असते.
तर कोणाला वाटते मानलेले नाते सख्या नात्या पेक्षा बरे ...
अर्थात हा ज्याचा त्याचा अनुभव आहे.
अनेकदा सख्खी नाती केवळ अतिअपेक्षा किवा कर्तव्याच्या नावा खाली होणर्या त्रास मुळे तुटतात. अनेकदा मग एकमेकाची तोंडे न बघण्यापर्यंत ताणलेली नाती काही दुवे {घरातील वडिलधारे} यांच्या मुळे परत जुळले जातात देखील ,मानलेल्या नात्या मध्ये जास्त अपेक्षा या नसतातच. आणि काही करणामुळे जर मानलेले नाते तुटले तर.तेपरत जुळण्याची शक्यता कमी असते.होपण अनेकदा आम्ही त्यांचे कोणी नसून त्यांच्या साठी हे केले ते केले हे मात्र बोलले जाते.माझ्या मते सख्या आणि मानलेल्या नात्या पेक्षा वरचढ ठरतात ते शेजार्याच्या बरोबर असलेले नाते ,कोणत्या दुखात सगळ्यात आधी धावून येतात ते शेजारी.किती सहज नाते असते. अर्थात सगळ्यांना चांगले शेजारी भेटणे ज्याचे त्याचे नशीब असते .असेच मनातले काही

नाते मातीशी



आपल्या हाय फाय गाडीतून तो जात होता रस्त्यावर वर्दळ नव्हती .
रस्त्याच्या दुतर्फा ज्वारीची मस्त पीक शेतात डोलत होते .सकाळची वेळ होती .हवेत मस्त गारवा होता .गाडी मधून खाली उतरण्याचा मोह त्याला झाला .एका बाजूला गाडी उभी करून तो खाली उतरला .जवळच्या शेतात बोर चालू होते त्याचे पाणी कोणी तरी शेताला देत होते .त्याने पायातील आपले बूट काढले .त्याच्या पायांना ओल्या मातीचा थंडगार स्पर्श झाला .पाण्यात हात घातले किती थंड पाणी होते .खूप वर्षाने त्याने हा मातीचा आणि पाण्याचा स्पर्श अनुभवला.किती वेळा तो बिना चप्पलचा अश्या ओल्या माती मधून धावला होता .पडला होता .त्याचे मन भूत काळात गेले .
छोट्या गावातील वडिलांचे छेत्र हरवले म्हणून आई बरोबर मामा कडे येवून राहिलेला .एक प्रकारे आश्रित .आई बरोबर जे काम सांगितले जात ते करणे एवढे माहिती असलेला .एक सज्जन मास्तर आयुष्यात आले आणि शिक्षणा मुळे आयुष्य बदलते हे समजले .मग फक्त जिद्द आणि जिद्द .यशाची एक एक पायरी कधी चढत कधी वरच्या पदावर गेला हे समजले नाही .
या सगळ्यात मागे राहिले गाव आणि बाल सवंगडी ...


दूर वरून "जय जय रामकृष्ण हरी " आवाज आला आणि तो भानावर आला .
कुठे तरी भजन चालू होते .नकळत खेचले जावे तसा तो त्या आवाजाच्या दिशेने गेला .एक मंदिरात कीर्तन चालू होते .सात दिवस चाललेल्या सप्ताह आज काल्याच्या कीर्तनाने संपत होता .
त्यांनी एका मानसं कडून टाळ घेतला .आणि तो टाळकऱ्या मध्ये जावून उभा राहिला .कीर्तन कर महाराज

 अभंग म्हणत होते .
"किती कर हा संसार नर देह मातीला जाणार "
तो देखील भजनात तल्लीन होऊन गेला .
आज त्याला मनात खूप समाधान वाटत होते .
तो लहान असतानी गावात एकमेव कर्यक्रम होत असे तो म्हणजे गावातील सप्ताह ,रोज भजन ,पारायण ,प्रवचन आणि रात्री कीर्तन .गावात नुसती धमाल असे .आणि त्याला ते सगळे आवडत असे .कीर्तानात नेहमी टाळकरी म्हणून तो उभा राहात असे .अभंग तर तोंडपाठ मग काय बाबा कीर्तन करत असतानी हा योग्य अभंग म्हणून नेहमी बाबांना आडवे जात असे .आयुष्यात खूप काही मिळवता मिळवता खूप काही मागे सुटले ...
मनापासून देवाला प्रणाम केला आणि वर्षातील सात दिवस कुठल्या world टूर करण्या पेक्षा गावाला जायचे आपल्या मातींत आपल्या माणसात हा निश्चय करून तो आपल्या पुढच्या प्रवासाला निघाला .
असेच मनातले काही .
{काल्पनिक }
छोट्या गावातील वडिलांचे छेत्र हरवले म्हणून आई बरोबर मामा कडे येवून राहिलेला .एक प्रकारे आश्रित .आई बरोबर जे काम सांगितले जात ते करणे एवढे माहिती असलेला .एक सज्जन मास्तर आयुष्यात आले आणि शिक्षणा मुळे आयुष्य बदलते हे समजले .मग फक्त जिद्द आणि जिद्द .यशाची एक एक पायरी कधी चढत कधी वरच्या पदावर गेला हे समजले नाही .या सगळ्यात मागे राहिले गाव आणि बाल सवंगडी ...दूर वरून "जय जय रामकृष्ण हरी " आवाज आला आणि तो भानावर आला .कुठे तरी भजन चालू होते .नकळत खेचले जावे तसा तो त्या आवाजाच्या दिशेने गेला .एक मंदिरात कीर्तन चालू होते .सात दिवस चाललेल्या सप्ताह आज काल्याच्या कीर्तनाने संपत होता .त्यांनी एका मानसं कडून टाळ घेतला .आणि तो टाळकऱ्या मध्ये जावून उभा राहिला .कीर्तन कर महाराज अभंग म्हणत होते ."किती कर हा संसार नर देह मातीला जाणार "तो देखील भजनात तल्लीन होऊन गेला .आज त्याला मनात खूप समाधान वाटत होते .तो लहान असतानी गावात एकमेव कर्यक्रम होत असे तो म्हणजे गावातील सप्ताह ,रोज भजन ,पारायण ,प्रवचन आणि रात्री कीर्तन .गावात नुसती धमाल असे .आणि त्याला ते सगळे आवडत असे .कीर्तानात नेहमी टाळकरी म्हणून तो उभा राहात असे .अभंग तर तोंडपाठ मग काय बाबा कीर्तन करत असतानी हा योग्य अभंग म्हणून नेहमी बाबांना आडवे जात असे .आयुष्यात खूप काही मिळवता मिळवता खूप काही मागे सुटले ...मनापासून देवाला प्रणाम केला आणि वर्षातील सात दिवस कुठल्या world टूर करण्या पेक्षा गावाला जायचे आपल्या मातींत आपल्या माणसात हा निश्चय करून तो आपल्या पुढच्या प्रवासाला निघाला .असेच मनातले काही .{काल्पनिक }

Friday, 20 November 2015

आजच्या महिला

आज आपण बोलतो समाज सुधारला आहे .खूप काही बदलले आहे.आज स्रिया शिकत आहे आपल्या पायावर उभ्या राहत आहे.महिला सक्षम झाल्या आहे .महिलाना न्याय देण्यासाठी महिला संघटना आहेत.महिलांच्या बाजूने कायदे आहे.पण आज देखील किती कायदे तळागाळातील महिला पर्यंत पोहचले आहेत.
शहर पुरत्या मर्यादित आणि साक्षर महिला साठी काम करणार्या किती महिला संघटना खेड्यात जावून महिला साठी झगडत आहेत.अपवादाने असतील पण फारशा नाही.आज देखील पुरुषी मानसिकतेचा मोठा पगडा जाणवतो.आज पण कुठे तरी स्रीला दुय्यम वागणूक मिळते.तिला काही गोष्टी करण्या पासून रोखले जाते.
"स्त्रीने स्वताला पती मध्ये त्याच्या घरात स्वताला समर्पित केले पाहिजे"स्वाध्याय परिवारातील काही लोक घरोघर जातात.लोकांना भेटतात.त्यांच्या बरोबर अशीच चर्चा चालू असतानी त्यातील एक वयस्कर व्यक्ती जे बोलले ते विचार करायला भाग पाडते. सुशिक्षित असणारे हे लोक जर अशा विचार करत असतील तर......प्रश्न हा आहे नेहमी स्री ने तडजोड केली आहे करत आहे.मग आजच्या बदलत्या काळात पुरुषाने का नाही बदलायचे.आज कायदे असून देखील अनेकदा महिलांवर अन्याय होतच आहे.हो मान्य आहे अनेक महिला या कायद्याचा चुकीचा उपयोग करतात.सासरच्या लोकांना त्रास देतात.म्हणून सगळ्या सारख्या असे होत नाही ना ?
आज पण आम्ही मुला कडील म्हणून एक वेगळ्या तोऱ्यात वागणारे भेटतात.आणि त्याच्या या विचारांना खतपाणी घालणाऱ्या महिलाच असतात.
आज पण मुलगा हावा असा विचार आधी केला जातो.एक मुलगी किवा फक्त मुलगी असेल तर अनेक प्रश्न विचारले जातात."मुलगीच आहे का ? एक तरी मुलगा हावा होता "हे ऐकवले जाते.
टीव्ही वर येणर्या मालिका आणि त्यात दाखवले जाणारे भपके बाज लग्न या मुळे आपल्या मुलाचे लग्न असे होयला पाहिजे हि अपेक्षा केली जाते.जर त्यात काही कमी राहिले तर पुढील वादळाचे बीज तिथेच पडते .मग सुरवात होते त्रास देण्यास मग मुलगी कमवती असो नाही तर नसो.तिला ऐकवले जाते तिचा माहेरची कमी .......बदल हवा तो होईल पण अजून अनेक वर्ष जावे लागेल.तळागाळातील महिला पूर्ण साक्षर होतील स्वताचे हक्क समजून घेतील तेव्हा.

शिक्षा

शाळेत आधी शिक्षक शिक्षा करतच होते ,तेव्हा आई वडील अजून मारले तरी चालेलं असे बोलत.पण त्या शिक्षकांना मुलांना बद्दल खूप काळजी असे. अगदी स्वताच्या खिशातून पैसे फी आणि पुस्तका साठी देणारे शिक्षक देखील होते.अनेकदा पालकांना शिक्षक ओळखत असत.कुठे भेटले तरी मुलाची प्रगती समजत असे.आजच्या सारखे सगळे पालक हे साक्षर नव्हते म्हणून त्यांना आपल्या मुलाने खूप शिकावे हि अपेक्षा असे .मग शिक्षक सांगतील ते योग्य असे होते .हळू हळू परस्थिती बदलत गेली आज अनेक पालक हे साक्षर आहेत .मुले शाळेत काय करतात त्यांना माहिती असते स्पर्धा वाढली,त्यामुळे प्रत्येक पालकांना आपल्या मुलांना चांगले मार्क्स मिळावे हि अपेक्षा वाढली .
मग आले क्लास.शिक्षक शाळेत चांगले शिकवत नाही हा समज या मुळे वाढत गेला.अनेक शिक्षक हे फक्त एक नोकरी म्हणून शिक्षक होतात .अनेक शिक्षका मध्ये मग मुलांना शिकावतानी लागणारा पेशन्स नसतो.त्यात बदलती परस्थिती आणि वाढते टेन्शन यामुळे अनेक शिक्षक मग छोट्या करणा वरून मुलांना जबर शिक्षा करतात.त्यात मुलांना दुखापत होते.टीव्ही वर बातमी येते.
मग आठवतात आमचे शिक्षक त्यांनी केलेली शिक्षा ...एकाच वेळी हातावर घेतलेल्या दहा दहा छड्या .लाल झालेले हात पण घरी सांगायची सोय नव्हती .कारण अजून शिक्षा होत असे.
असेच मनातले काही ..

नवरंग आणि साड्या

गणपती उत्सव संपले नवरात्री उत्सव पण संपला बघता बघता दिवाळी येणार आणि जाणर.
नेहमीचा रुटीन चा कंटाळा येतो त्यातून हे सन उत्सव एक वेगळा आनंद देतात.
यामागे काही करणे नक्की असतात.म्हणून तर सन साजरे केले जातात .
माणसे हे समूह प्रिय असतात.कोणी एकटा जगू शकत नाही त्यांना दु:ख विचारणारे कोणी हवे असते तसे सुख आणि आनंद साजरे करायला कोणी हवे असते .आणि तो करता येतो सन आणि उत्सवाच्या वेळी .
नवरात्री हा जास्त करून महिलांचा सन समजला जातो.स्री ला एक शक्ती समजली जाते.पण तिला त्याची जाणीव व्हयला हवी .घर आणि नोकरी सांभाळणारी आजची स्री ,अनेक क्षेत्रात यशस्वी होते आहे .आणि त्याच बरोबर आपल्या परंपरा देखील ती सांभाळण्याचा प्रयत्न करते .
अनेक महिला आज उच्चशिक्षित असून गृहिणी देखील आहेत .काही मुला साठी चांगली नोकरी सोडून आनंदाने गृहिणी होतात .छोट्या शहरात नाही पण मुंबई सारख्या बंद दरवाज्या च्या आत राहणारी स्री जेव्हा मुले थोडी मोठी होतात .तेव्हा तिला नेमके काय करावे हे समजत नाही .तिचे जग हे तिचे घर असते .
आणि अश्या महिला साठी हक्काचे व्यासपीठ भेटले ते फेसबुक मुळे .
घरात राहून जगाशी संपर्क करता आला .आणि येथे त्यांना आपण एकटे नाही याची जाणीव झाली .
नोकरी करणाऱ्या महिला एकत्र येवून सन उत्सवाचा आनंद घेतात .पण आमच्या सारख्या कधी बाहेर न पडणार्या गृहिणीना कुबेर सारखा एक हक्काचा ग्रुप भेटला जिथे आम्ही ९ दिवस मस्त नवरात्री साजरी केली .वर्षानु वर्ष घेतलेल्या साड्या आम्ही बाहेर काढून घरात का होईना ते घातल्या .आमच्या मुलांना फोटो काढायला लावले,प्रत्येक रंगाची साडी शोधताना आमचा भूतकाळ समोर आला ."अरे हि साडी आहे माझ्या कडे ,लक्षातच नव्हते "असे उद्गार स्वताशी काढले.मग कोणी बहिणीनि दिली तर एखादी भाऊबीज भेट निघाली आणि खूप साऱ्या आठवणी जाग्या झाल्या .फोटो कोणी कोणी टाकला हे बघतानी मजा पण आली .कोणी काही बोलो किती नावे ठेवली तरी कधी कधी काही गोष्टी खूप आनंद देवून जातात.हेच खूप आहे .आणि त्याच्या आठवणी कायम मनात राहतील .त्या




साडी आवडत नाही असी स्री कोणी नसेल,साडी मध्ये कोणती पण भारतीय स्री छानच दिसते .आज पण खेड्यात साड्या जास्त वापरल्या जातात .मुंबई सारख्या शहरात जिथे रोज ट्रेनचा प्रवास असतो .धावत पळत बस पकडायला लागते .आणि मुंबई मधील असणारी गरमी या मुळे साडी पेक्षा ड्रेस घालणे सुटसुटीत असतो .तरी देखील अनेक बायका कडे खूप साड्या असतात .कुठल्या तरी सणाला घेतलेल्या .तसाच पडून असतात .कधी घालायच्या असा प्रश्न .मग फ्याशन जाते .आणि ती साडी घालायला नको वाटते .
पण काही वर्षा पूर्वी नवरात्री मध्ये नऊ दिवस नवरंगाच्या कपडे घालण्याची नवीन पद्धत सुरु झाली .आणि बिचारया कपाटात "कधी तरी आमचा नंबर येईन याची वाट बघणाऱ्या ", साड्या घातल्या जावू लागल्या ,एक ड्रेस कोड असल्या सारख्या .कोणी काही बोलत असले तरी छान वाटते असे सारखे कपडे घालणे एक अलग फील येते .माझ्या माहिती नुसार सगळ्या कडे सगळ्या रंगाचे ड्रेस आणि साड्या असतातच .कोणी खास नवीन विकत घेतात असे नाही .
त्या निमित्ताने जर एक वेगळ्या प्रकारे नवरात्री साजऱ्या करत असेल तर कोणी त्याची टिंगल का करावी .शाळेत तर सारखे कपडे घालतच होते ना ?

श्रद्ध { पित्र}

लहान असतानी श्राद्ध पक्ष {पित्र} असे तेव्हा घरात काही तरी आहे असे वाटे.
तेव्हा एवढेच माहिती होते कि आपल्या गेलेल्या माणसाना या दिवशी आठवण करून जेवण दयायचे असते .मनात येत असे मग एकाच दिवस का ?
पण घरात त्या निम्मित्ताने तांदळाची खीर केली जात असे .चण्याच्या पिठाच्या वड्या केल्या जात .सकाळ पासून घरात छान वातावरण असे .खरे तर भाद्रपद महिना हा खरे तर शेतात कामचा महिना असतो पण पित्र म्हणून त्या दिवशी कामाला सुट्टी .त्या निम्मिताने घरात घरातील व्यक्ती शिवय गावातील कोणी ना कोणी जेवायला असायचे .एखादा सन असल्या सारखे वाटे तेव्हा ,आजच्या सारखे कोणी विचारत नसे का करायचे हे सगळे ,सगळे करत आणि मनापासून करत .मुंबई मध्ये आले आणि वेगवेगळ्या विचारची ओळख झाली .नाही केले तर काय होते असे बोलणारे देखील भेटले .मग मला पण कधी कधी वाटे खरच केले पाहिजे का ? हे सगळे .याचे उत्तर मला लवकरच भेटले .मी ख्रिचन लोका मध्ये राहते .हा धर्म तर जगात अनेक ठिकाणी आहे मग हे लोक कुठे करतात पित्र असे काही .हो नाही करत ते हिंदू धर्मात करतात .मग हे लोक काय करतात .त्यांच्या मध्ये पण आपल्या गेलेल्या लोकांना आठवण्याचा एक दिवस असतो .तेव्हा ते त्यांच्या समशान भूमीत जातात .आणि गेलेल्या व्यक्ती साठी पार्थना करतात .कदाचित असेच मुस्लीम लोका मध्ये आहे .
यातून मला एकच समजले धर्म कोणता असो .प्रत्येक मध्ये सारख्याच प्रमाणत काही प्रथा पाळल्या जातात फक्त त्यांचे स्वरूप अलग आहे .
आपण आपल्या आई वडिलांचे स्मरण म्हणून पित्र करतो .आणि ते करावे असे मला वाटते कारण मनुष्य जन्म फक्त असा असावा ना ज्यात हे सगळे करता येते .

१२/१०/15

माझ्या फेसबुक पोस्ट

आईवडिला साठी आपली मुले हेच सर्वस्व असतात .त्यांच्या जन्मा पासून ते प्रत्येक वेळी ते मुलांना चांगले आयुष्य आणि भविष्य देण्या साठी धडपडत असतात .मग त्या साठी मुला साठी किवा मुली साठी एखादया खास दिवसाची गरज आई वडिलांना वाटत असते का .? दिवस हे आठवण करण्या साठी असतात .पण ते कधी आपल्या मुलांना विसरत नाही मग आठवण्या साठी असा दिवस का ?मदर डे किवा फादर डे मुलाना मात्र तो दिवस आईवडिलांची आठवण काढण्यास साजरा करवा लागतो .नाही का ?
अनेक मुले आईवडील याना विसरून जातात नाही का ?





रोज आपल्याला दिवसाच्या सुरवाती पासून ते अगदी झोपे पर्यंत अनेक लोक भेटतात .अनेक स्वभावाचे ,अगदी फटकळ तर काही दोन तीन वाक्यात आपल्याशी करणारी ,तर काही व्यक्तीचे व्यक्तिमत्व असे असते कि त्यांना बघताच त्यांची आपल्यावर छाप पडते .पण अश्या माणसांच्या स्वभावाची जेव्हा ओळख होते तेव्हा आपल्या मनात त्यांच्या बद्दल आदर राहीलच हे सांगत येत नाही .कारण काही माणसे हे प्रचंड अहंकारी असतात .मग तो कशाचा असेल .पण कधी कधी आपण जे नाही ते दाखवताना अनेक व्यक्ती मात्र नको तो अहंकार बाळगून असतात .का ? असे आपल्याला वाटते .कारण अश्या व्यक्ती सारासार विचार न करता बोलतात .ते बोलातानी ते विचार पण करत नाही , आपण समोरच्या लोकांचे मन दुखावतो तेव्हा नकळत आपण आपल्या बुद्धीची किती कुवत आहे हे दाखवून देतो .असे लोक लगेच ओळखायला येतात त्यांना इग्नोर करणे हा उत्तम उपाय असतो .पण काही लोकांना असे लोक ओळखू येत नाही मग ते बसतात डोके लावत .पण यामुळे होते काय ? बाकी लोकांचे मनोरंजन होते .हे लक्षात येत नाही .
तर काही लोक अतिशय बुद्धिमान असतात .त्यांचे साधे बोलणे देखील मन लावून ऐकायला देखील आवडतात .असे लोक कधी जास्त बोलत नाही .वाद घालत ते शांत पणे बघत असतात .कारण त्यांना जास्त बोलण्याची गरज नसते आपण काय आहे हे दाखवण्याची गरज नसते ..कारण त्यांनी एक ओळ लक्षात ठेवलेली असते .
अनंत वाचाळ बरळती बरळ
असेच मनातले काही


ऑक्टोबर

माझ्या फेसबुक पोस्ट

वेळ कधी सांगून येत नाही .म्हणून आजच्या परस्थिती वरून कोणाचे मुल्यांकन करू नका .आज काही नसलेली व्यक्ती उद्या अश्या उंचीवर पोहोचलेली असेल ज्याचा आपण विचार पण केलेला नसेल .मग आपल्याला आपल्या बोलण्याचा पश्चाताप होयला नको .
असेच मनातले काही {एक होता कार्व्हर ,पुस्तक वाचून मनात आलेले काही विचार }



अनेकदा छडा छडी ला कंटाळून मुलीची आत्महत्या अशा बातम्या येतात तेव्हा वाटते .मुली मरतात पण ते त्रास देणारे जिवंत आणि मोकळेच राहतात .मरायचे पण अशा लोकांना का जिवंत सोडायचे .त्यांना का मारून मग का मरू नाही .



आपल्याला आई वडील कसे लहानचे मोठे करतात .त्यावर बरेच आपले नेचर घडत असते .देवाने आपल्यला काही दिले नाही पण जे दिले तेच खूप समजून खुश राहणे शिकवले असेल तर पुढे जावून कोणा बद्दल आपल्या मनात मत्सर तयार होत नाही जे आहे ते आपले नशीब समजून आपण परस्थितिचा सामना करायला शिकतो .कारण रडून किवा दुखाचे रडगाणे गावून कधी परस्थिती बदलत नाही { अशा वेळी तहानलेला कावळ्याची गोष्ट आठवते }.
असेच मनातले काही



कोणता निर्णय हा चूक कि बरोबर हा परस्थिती नुसार घेतला जात असला तरी तो किती बरोबर आणि किती चूक हे पुढील काळात त्याच्या परिणाम वर किती चूक बरोबर होतो हे दिसून येते .निर्णय बरोबर तर कल्याण होते नाही तर त्याचे कायम स्वरूपी भयानक परिणाम सहन करावे लागतात .मग नंतर त्यावर किती बोला काही फायदा नसतो .
त्या पेक्षा आज काय करता येईन हा विचार करणे कधी योग्य नाही का ????????



ज्या बद्दल आपल्याला जास्त माहिती नाही .त्यावर न बोलणे न लिहिणे योग्य असते नाही का ? मग ते काही असो ,इतिहासातील एखादी व्यक्ती किवा आणखी कोणी .......


....
आयुष्यात कधी कधी काहीच नको वाटते .नेमके काय वाटते समजत नाही .सांगता येत नाही .काही तरी वेगळे वाटत राहते .आयुष्याचा कंटाळा आला सारखे होते .का कसा साठी सगळे असे वाटत राहते .नकली चेहऱ्यांचा पण कंटाळा येतो 
....................
माझ्या फेसबुक पोस्ट 
ऑक्टोबर  २०१५

माझ्या फेसबुक पोस्ट

माणसाला नेहमी आपल्याला जे आपल्याला सोयीचे आणि चांगले असेच आवडते .मग ते काही असो .{बोलणे ,वाचणे,लिहिणे } बरोबर ना ?




जसे जसे आयुष्य पुढे जाते तशा गेलेल्या दिवसांच्या आणि भल्या बुऱ्या घटनाच्या आठवणी वाढत जातात .मग कधी त्या खूप कटू असतात .त्यांच्या आठवणी सुद्धा डोळ्यात आज देखील पाणी आणतात .तर काही सुखद घटनाच्या आठवणी आज पण चेहऱ्यावर हास्य आणतात .सुखद असो कि दुखद आठवणी आणि त्यांच्या बरोबर जोडली गेलेली माणसे आठवून आज पण मन बैचेन होते हे मात्र खरे .


अति परीचयाने आवज्ञा .हि म्हण कधी कधी खूप खरी आहे असे वाटते .


साधे पणा आणि ढोंगी पणा या मधील फरक ओळखता आला पाहिजे ना ?



घटना घडून जातात आठवणी मागे राहतात .आठवणीतील माणसे कधी आपल्याला विसरून जातात .पण त्यांच्या आठवणी मात्र येत राहतात .ज्या त्रास दायक असतात .तर कधी सुखद .दोन्ही मुळे त्रास होतो हे मात्र नक्की .मग वाटते ज्यांची आपल्याला आठवण येते .ते काढत असतील का आपली आठवण .कदाचित नाही कारण त्यांनी आपल्याला खूप मागे सोडून ते पुढे गेलेले असतात .



काही चांगल्या आणि मनाला आनंद देणारया गोष्टीत प्रवाहाला विरोध करण्या पेक्षा प्रवाहात सामील होणे कधी चांगले नाही का .


एखादी गोष्ट करता येत नसेल किवा ती जर मिळत नसेल तर .सरळ आवडत नाही सांगायचे .सो सिंपल.  




मला जे आवडते ते सगळ्याना आवडावे .मला जे आवडत नाही ते इतरांना आवडू नाही .हा हट्ट जर सोडला तर सगळ्यात आनंद घेता येतो .नाही का ?




व्यक्ती कोणत्या पदावर आहे त्यावरून त्याच्या बोलण्याला महत्व प्राप्त होते .नाही तर गल्लीत काही बोला कोणी ऐकत नाही .




माणसात राहण्याची सवय लागली कि एकटे राहणे नको वाटते .पण जर एकटेपणा .एकांत आवडायला लागला का .मग कोणी आजूबाजूला नको वाटते 




ढोंगी माणूस हा अनेकांना फसवत असतो पण अतिशय चांगल्या माणसाना फसवताना तो दहा वेळा विचार करतो .




विस्वास आणि विस्वासघात येत काय फरक आहे.खूप मोठा एकामुळे आयुष्याला चांगली दिशा मिळते तर दुसऱ्या मुळे माणूस आयुष्यातून उठतो.
तरी विश्वासावर जगावे लागते . विस्वासघातच्या अनुभवातून कोलमडून न जाता पुन्हा नवीन सुरवात करायला लागते.
असेच मनातले काही






निर्णय चुकतात आणि आयुष्य चुकत जाते .कधी तरी अनेक ,गोष्टीचा,निर्णयाचा पश्चाताप होतो .पण वेळ कधीच हातातून गेलेली असते .अनेक निर्णय केवळ लोक काय म्हणतील म्हणून घेतले जातात .त्याचा त्रास मात्र निर्णय घेणार्याला भोगायला लागतो .मग वाटते परत मागे जावे .दुनिया जाये भाड में,आपल्यला हवे तसे जगावे .बिनधास्त मनासारखे.




सुसंस्कृत,सभ्य,सज्जन असण्याचे काही तोटे असतात.कारण त्यांनी तसेच असावे असी अपेक्षा केली जाते.गमतीवर काही बोलणे पण लोक सिरीयस घेतात.किवा तुझा सारख्याला हे पटत नाही म्हणून मोकळे होतात..

दिवाळी

जशी जशी दिवाळी जवळ येते .तसंतसे लहान असो कि मोठे असो बाजार वेगवेगळ्या समाना मुळे फुलून जातात.काही घेणे असो नाही तर नसो असेच जावून बघावे बाजारात,....बाजारात सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतात ते लहान मुलांचे कपडे .खास करून मुलीचे किती व्हरायटी फक्त बघत राहावे.
मोठे मोठे शोरुम असो कि अगदी छोट्या पाटीमध्ये वस्तू घेवून बसलेली एखादी आज्जी ,किवा लहान मुलगा असेल .कोणी तरी सामान विकत आहे कोणी घेत आहे .ज्यांची विक्री जास्त होते त्यांचे खुश चेहरे ,मना सारखी खरेदी झाली म्हणून घेणारे खुश ,मस्त वातावरण असते.हो या सगळ्या गर्दीत कंटाळतात ते छोटे मुले.पण काही घ्यायचे नसले तरी बाजारात नक्की एक फेरी मारावी.
दिवाळी आली असे वाटते.



आपल्यावरून जग ओळखावे अशी एक म्हण आहे.पण आजच्या जगात नेमका उलट अर्थ घेतला जातो.म्हणजे आज मी जसा जगतो आहे ज्या स्थिती मध्ये आहे तसेच जग आहे असे वाटते अनेकाना ,त्यामुळे समोरची व्यक्ती आणि तिची परस्थिती समजून घेतली जात नाही .आणि माणसे ओळखण्यात कुठे तरी कमी पडतात मग अनेकजण .




प्रगती मध्ये साथ देणार्यांना .यश मिळाल्यावर जे विसरतात .ते लवकरच जमिनी वर पण येतात .




आजच्या जगात {बाजारात }तीच वस्तू जास्त चालते .जी कमी टिकते
.{कमी टिकते म्हणून तर दुसरी घेतली जाते.}
म्हणून तर गुणवत्ता आणि टिकवू पणा देणारे मोठे नावे आज बाजारातून गायब झाले.





दिवाळी आली कि खरेदी आली .काहीना चांगली पारख असते ते छान खरेदी करतात .काहीना काय घ्यावे काळात नाही जे छान दिसते ते घेवून येतात .कौतुकाने कोणाला तरी दाखवतात ,आता सगळ्यांची आवड सारखी कशी असणार एकाला जो रंग आवडतो तो दुसर्यांना कसा आवडणार मग काही सरळ बोलतात.हा काय रंग आहे का ? किवा एवढे पैसे गेले बरोबर नाही .
अश्या वेळी काय होते ज्यांनी काही घेतले असेल त्याला अचानक वाटायला लागते त्याने जे घेतले ते बरोबर नाही ,मग त्याच्या मनात नकरात्मक विचार येतात.आणि त्याचा आनंद गायब होतो .
मान्य आहे त्यांनी घेतलेली वस्तू बरोबर नाही ,तर सरळ तसे बोलू नका .
आपले म्हणणे आपण मन न दुखावता मांडू शकतो ना ?
"अरे हा रंग छान आहे पण ,तो अमुक अजून छान दिसला असता ,किवा घेतली ना वस्तू छान आहे पण महाग पडली ," अश्या शब्दा मध्ये आपण सांगू शकतो .
नाही का ? ज्या मुळे कोणाचे मन पण दुखावले जात नाही .
असेच मनातले काही





कोणतीही व्यक्ती हि एकटी राहू शकत नाही ,म्हणजे काय आनंद आणि दु:ख व्यक्त करायला त्यांना कोणी हवे असते .आयुष्यात खूप काही हवे असते पण खूप प्रयत्न करून देखील काहीना ना मिळते काहीना नाही .काही लोका साठी शुल्लक असणारी गोष्ट काही लोकांना खूप प्रयत्न करून मिळते मग त्यांना गगना एवढा आनंद होतो .अर्थात तो कोणाला सांगावा वाटतो .पण सगळे लोक मिक्स होणारे नसतात .कमी बोलतात कमी मित्र असतात .किवा आजच्या बंद दार संस्कृती मुळे तो व्यक्त करता येत नाही .असे लोक मग ते आपल्या वाल वर टाकतात .कोणाला tag करतात त्या पेक्षा हे बरे ना ?
त्यावर त्यांना हसू नका .नाही पटत लाईक नका करू .उलट होता आले तर त्याच्या आनंदात सामील व्हा ..
समोर फक्त अंधार असतो पुढे काही दिसत नाही.एकच मार्ग दिसत असतो.सगळे संपवण्याचा ......आयुष्यात आशा निराशाचे खेळ चालू राहतात ,यश अपयश येत असते.अशी वेळ येते पुढे फक्त अंधार दिसत असतो.पण हे विसरता कामा नाही त्या अंधारात कोणाचे दोन डोळे तुमचा कडे बघत असतात.तुमचा आधार तुटला असे वाटत असते तेव्हा तुम्ही कोणाचा आधार असता.हे विसरायला नको ........
अपयश येते निराशा येते.हे चालूच राहणार पण आयुष्य अनमोल असते.
मनात खूप असते ना ? ते मनात ठेवू नका कोणाशी तरी बोला ......
एक वाट बंद असेल तेव्हा एक वाट नक्की कोणा मुळे भेटेल पण ......

पुरुष दिवस का ???

पुरुष दिवस का ???
आज अनेक पोस्ट वाचून समजले आज पुरुष दिन आहे.नेहमी कोणते ना कोणते दिवस असतात.सवय झाली ना ? पण आज जरा वेगळे वाटले.
महिला वरील अत्याचार चा विरोध म्हणून महिला संघटना स्थापन झाल्या.पुरुष प्रधान संस्कृती मध्ये महिलांना त्रास होता.हे जग जाहीर आहे.. हुंड्यासाठी सासरच्या लोकांकडून होणारे शारीरिक आणि मानसिक अत्याचार, प्रसंगी तिचा बळी देणे, अत्याचारातून मुक्ती मिळविण्यासाठी आत्महत्या यातून तिला संरक्षण देण्यासाठी शासनाने ४९८ अ हे कायद्याचे नवीन कलम लागू केले.
हळूहळू काळ बदलत गेला.स्रीया साक्षर झाल्या.स्वताच्या पायावर उभ्या राहू लागल्या.त्यांना स्वताच्या हुशारीची जाणीव झाली.पुरुषाचे वर्चस्व असलेले अनेक ठिकाणी स्रिया काम करू लागल्या.येथेच स्री आणि पुरुष समानता संघर्षाचे बीज रोवले गेले असावे.
फक्त स्रिया पिडीत हि संकल्पना हळूहळू बदलू लागली.४९८ कलमाचा गैरवापर करण्यास काही महिलांनी सुरवात केली.यातून मग अनेकदा काही दोष नसतानी अनेक जन भरडले जावू लागले.स्वता कमवतो याचा कुठे तरी काही महिलांनी अहंकार झाला त्यातून मग पुरुषांना त्रास देण्याच्या घटना घडू लागल्या.पण लोक लाजे मुळे आणि समाजात बायको याला त्रास देते, " याला बायको घाबरत नाही ' असे म्हणून कोणी हसू नाही म्हणून ,अनेक पुरुष महिला कडून आणि त्यांच्या घरातील लोका कडून होणारा मानसिक त्रास सहन करत राहिले.४९८ कलम नुसार असलेला कायदा हा दखलपात्र, अजामीनपात्र आणि तडजोड नसलेला असा कायद्याचा त्या गैरवापर करू लागल्या. कजाग स्त्रिया पती व सासरच्या लोकांविरुद्ध कुठलीही खोटी तक्रार करून त्यांना छळू लागल्या. अनेक निरपराध पुरुष व त्यांचे कुटुंबीय पोलीस आणि कायद्याच्या कचाट्यात नाहक भरडले जाऊ लागले. त्यामुळे पत्नीपीडित पुरुषांचा प्रश्नही गंभीर होऊ लागला.यातून काही पुरुष एकत्रित आले आणि १९९१ मध्ये नागपूर मध्ये पत्नीपीडित पुरुष मंच आणि स्त्री अत्याचार पीडित पुरुष विकास संस्थान केल्या .महिला कडून अत्याचार होतो हि गोष्ट हसण्यावारी नेली जात होती त्यामुळे या संघटना अपयशी झाल्या
मात्र २00५ मध्ये बंगलोर येथे सेव्ह इंडियन फॅमिली फाऊंडेशनची (सिफ) स्थापना झाली आणि इंटरनेट मुळे आज देशातील अनेक संस्था या संस्थेला जोडल्या गेल्या आहेत.या मुळे पुरुषाच्या समस्या कडे लक्ष वेधले जाऊ लागले.
खरे तर पुरुष हे कमजोर नसतात.ते कधी रडत नाही .असे मनावर बिंबवले जाते.पण आजच्या टेन्शन च्या या जगात पुरुषांना पण अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते .फक्त घरातच नाही तर अनेक ठिकाणी पुरुषांना पण मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते .मग पुरुष फक्त नवरा असेल असे नाही . पुरुष मग भाऊ असेल किवा वडील ,स्री पुरुष समानता असावी पण फक्त समानता म्हणून फक्त बरोबरी नसावी .असावी समजदारी जी दोघांनी दाखवण्याची गरज असते .
पुरुष दिन म्हणून असेच मनातले काही .

वासुदेव

माझ्या लहानपणी आमच्या गावात बाजाराच्या दिवशी वासुदेव येत असे.मंगळवारी आमच्या गावात बाजार असे तेव्हा शेतातील कामाला सुट्टी असे.
सकाळ पासून मग घर सारवणे हे काम चालू असे ,दुपार पर्यंत हे काम असे .आमचे घर रस्त्याच्या बाजूला असल्या मुळे अगदी सकाळ पासून सायकल ठेवणारे ,गाडी बैल वाले येत असे .त्यांना पाणी तर कधी जेवण पण देणे हे आईवडीलंची सवय होती .अनेकदा याचा त्रास पण होत असे पण या सगळ्यात आम्ही वाट बघत असायचो ती आमच्या घरी येणाऱ्या वासुदेवाची .तो यायचा पण "वासुदेंव आला हो वासुदेव आला " असे म्हणत नाही तर आपल्या एका पिशवीत सगळे सामान भरून साध्या कपड्यात .तो यायचा नेहमी प्रमाणे "अक्का मी आलो झाला का तुझा स्वयपाक "काय केले मग आज कालवण,झाले असेल तर दे .त्याला पाणी आणि जी असेल ती भाजी दयायची ,तो जेवण करायचा मग त्याचे एक एक कपडे तो घालायचा .त्याचा कडील मोर पीस खूप आवडत असे आम्हाला .मग आम्ही त्याला गाणे बोलायला लावत असू .छान गाणे म्हणायचं नाचून दाखवायाचा .आता येतो म्हणून पुढे जायचा .
साधी भोळी माणसे एवढ्याश्या गोष्टीवर तोंड भरून आशीर्वाद दयायची .
दारात आलेला रिकामा हाताने जावू नाही म्हणून घरातील ओंजळ भर धान्य त्यांना दिलेच जायचे .
गाव आणि गावाची माणसे मात्र कायम मनात राहिले .काल अनेक वर्षाने माझ्या बिल्डींग वासुदेंव आला .छान गाणे म्हणत होता .त्याला काही पैसे दिले .घरात बोलवावे जेवण करणार का विचारावे वाटले पण .लगेच आठवले हि तर मुंबई आहे .असे कोणावर पण विस्वास नाही ठेवता येत .मन मात्र भूतकाळात गेले .गावाला येणारा तो वासुदेव आठवला ......मनात आले कुठे असेल तो आता ,असेल का ? त्याची मुले आता काय करत असतील? .उत्तर नसलेले अनेक प्रश्न ....
असेच मनातले काही



रवा लापशी

१ वाटी  लापशी रवा {मध्यम जाड ] १ वाटी गुळ {कमी गोड हवा तर पाऊण
 वाटी }तीन वाट्या पाणी ,चिमुटभर वेलची पूड ,दोन चमचे तूप .
तुप टाकून मंद gas वर लापशी रवा भाजून घ्यावा .तीन पाणी उकळत ठेवावे .त्यातच गुळ टाकावा .गुळ पूर्ण विरघळा कि ते पाणी घाळून घ्यावे [ अनेकदा गुळात खडे कचरा असतो }भाजलेल्या रव्यात ते पाणी टाकावे .पाच मिनिट झाकण ठेवावे .नंतर शिजला कि नाही बघावे .हलवून त्यात वेलची पूड टाकावी .
{मुंबईत पिवळा गुळ मिळतो .लापशी पिवळी दिसते } आवडत असेल तर काजू ,बदाम टाकावे .
फोटो -गुगल सर्च 

Sunday, 27 September 2015

बाप्पाचे मनोगत

माते मी आज येतो आहे ....
किती कंटाळा आला आहे ग !कधी एकदा तुझा कडे येतो असे झाले आहे .
सगळे जोरात जयघोष करत आहेत ,"गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या "पण मला हा आवाज आता नको झाला आहे .नको नको ते गाणे ऐकून माझे कान दुखायला लागले आहे .
माते तुला आठवते मी मस्त तुझा जवळ बसलेला असतो .शांत पणे ...
पण दरवर्षी माझे हे भक्त येतात आणि मला तुझा पासून दूर घेवून जातात .
एकीकडे मला जायचे नसते म्हणून मी तुझा हात घट्ट पकडून ठेवतो तर दुसरी कडे माझे भक्त मला बोलावत असतात .या सगळ्यात माझी ओढाताण होते .
माझी इच्छा नसते जाण्याची कारण दहा दिवश ते गाणे ऐकयला नको वाटतात .माझे आगमन म्हणून सुद्धा हे लोक रस्ते अडवतात .मिरवणूक काढतात .कोण आजारी कोण असेल कोणाला त्रास होत असेल हे पण बघत नाही .अनेक तास वाहतुकीचा खोळंबा करून हे मला मंडपां मध्ये घेवून जातात .माझ्या नावाने वर्गणी जमा करतात .कोणाची ऐपत नसते तरी त्यांना वर्गणी देण्यास भाग पाडतात .हे कमी कि काय म्हणून मला बघयला लोक येतात अगदी मनापासून पण त्यांना मी दिसत नाही कारण माझ्या मंडपांला पडदा असतो .मग पास घेवून माझे दर्शन लवकर होईल हे सांगितले जाते .बाकीचे पाय दुखतात तरी रांगेत उभे राहतात हे मला बघवत नाही .काही तर व्यक्ती किती मोठी हे बघून त्यांना सरळ माझ्या पर्यंत घेवून येतात .गरीब भक्तांना धक्काबुक्की करतात .हे बघून माझे मन दुखी होते .
मी सगळी कडे एकाच रुपात असतो मग तो मंदिरात असो कि छोट्या मूर्ती मध्ये मग हा बाप्पा नवसाला पावतो तो बाप्पा नवसाला पावतो असे हे लोक का बोलतात .नको तिथे का गर्दी करतात .मोदक ते पण किती प्रकारचे त्यात अनेकदा भेसळ असते .ते पण नाही बघवत ,
पण माते काही भक्त आहेत ग असे ते मला मना पासून बोलवतात म्हणून मला जावे लागते तुला सोडून .काही भक्त असतात ग त्यांच्या घरात माझ्या मुळे ख़ुशी येते,त्या भक्ता साठी मला जावे लागते .त्याच भक्ता साठी मी हे शीला मुन्नी गाणे सहन करतो .कारण तेच भक्त असतात माझी मनापासून पार्थांना करतात .साधा का होईना मोदाक माझा समोर ठेवतात .त्याच भक्तांना साठी मी येतो .आज एकीकडे आनंद होतो आहे .आज मी तुझा कडे परत येतो आहे .आणि वाईट देखील वाटत आहे .माझ्या लाडक्या भक्तांना मी सोडून येतो आहे .
माते मी येतो आहे .......

Saturday, 26 September 2015

भाकरीची गोष्ट ......

भाकरीची गोष्ट ......
खूप भूक लागली कि पटकन ताटात भाजी भाकर घ्यायची आणि खावून टाकायची .पण कधी आपण विचार केला का एक भाकर ताटात येई पर्यंत कशी आणि कुठून येते .अर्थात त्याची गरज वाटत नाही ,ना ?
शाळेत असतानी भाकरीची गोष्ट . नावाचा धडा होता नक्की आठवत नाही पण आनंद यादव याचा असावा .आमच्या कडे जास्त करून खाल्ली जाते ती बाजरी ,कमी पाऊस असल्या मुळे जिरायती पिक म्हणून बाजरी जास्त होते.
जून मध्ये पाऊस पडला कि शेतात ढेकळे फोडण्यासाठी वखर हाकला जातो शेत सपाट केले जाते..पाऊस पडला का सुरवात होते पेरणीस,ज्याला पाभर म्हणतात .त्यातून पेरणी केली जाते.पाभर मधून टाकलेले बी झाकले जावे म्हणून त्या मागे राहाक्या असतो .त्याने बी झाकले जाते . .बाजरी बरोबर मठ ,मुग ,आणि कुळीद पण टाकले जातात.कोणाला जास्त माहिती नसलेला वरी {भगर } सारखा दिसणारे एक धान्य असते ज्याला राळे म्हणतात .{आज कोणाला माहिती नसेल }हे पण पेरले जाते.आणि न पेरता बाजरी बरोबर येणारे आणि पिकाला त्रासदायक असे एक गवत देखील येते ते म्हणजे कोंबडा गवत.ज्या मुळे सगळे शेत पांढरे दिसते .
बाजरीची पेरणी झाली कि होते ती निदांनी .शेत जर मोठे असेल तर हे शक्य नसते .बाजरी पिक थोडे मोठे झाले कि कोळपणी केली जाते ज्या मुळे पिकतील गवत काढले जाते.यानंतर बाजरी जर चांगला पाऊस झाला तर जोमाने वाढते .बाजरीला फुलारा आला कि पाऊस पडला तर कधी कधी बाजारीवर रोग पडतो .ज्याला आरगड बोलतात .ज्या मुळे बाजरी काळी पडते .या सगळ्यातून जर पिक चांगले आले कि त्याची मग बाजरीची सोगणी केली जाते .सोगणी करायची त्याच्या पेंढ्या बांधायच्या त्याचे वघे घालायचे .ते सगळे एक ठिकाणी जमा करायचे .त्याची शेतात सुडी करायची .सोगणी करातांनी जर पाउस आला तर त्या पेंढ्या ओल्या मातीती राहून त्याला उदाई लागू नाही ओल्या पेंढ्या लवकर सुखाव्या म्हणून त्या उभ्या करून ठेवायला लागतात ज्याला कोचळे म्हणतात .त्यानंतर सुरवात होते खळे करण्यास ,शेतातील पिक खळ्यात आणले जाते .त्या आधी जमीन गोल आकारा मध्ये सारवली जाते.त्याला खळे म्हणतात .शेतातील बाजरी खळ्यावर आणून परत त्याची खळ्यावर सुडी केली जाते .जेव्हा वेळ असतो पाऊस नसतो तेव्हा त्यांची मोडणी केली जाते म्हणजे कणसे खुडणे .यानंतर आज आधुनिक पद्धतीने मशीन मध्ये धान्य काढले जाते .
पण पूर्वीच्या काळी मात्र मळणी केली जात असे .मग असे खळे महिना महिना चालत असे .यानंतर तयार होते बाजरी ,ती दळून आणणे मग पीठाची भाकरी बनवणे .या सगळ्या सोपस्कारा नंतर भाकरी तयार होते .
या सगळ्या कष्टाची जाणीव होती म्हणून पूर्वीचे लोक मूठ भर धान्य जरी सांडले तर एक एक दाणा जमा करत. पण आज असे करत नाही मुळात ताटात येणारी भाकरी असो कि चपाती ती कशी येते याची जाणीव कुठे असते .
एक फ्रेंड च्या कालच्या पोस्ट वरून हे सगळे आठवले म्हणून लिहिले.
फोटो -गुगल सर्च