कथा-२ मला पण शिकायचे होते .......
सिविल हॉस्पिटलचा एरिया नेहमीची पेशंटची गर्दी,औषधाचा वास डॉक्टर नर्स ची धावपळ सगळे नेहमी सारखे चालू आहे .
सिविल हॉस्पिटलचा एरिया नेहमीची पेशंटची गर्दी,औषधाचा वास डॉक्टर नर्स ची धावपळ सगळे नेहमी सारखे चालू आहे .
दूरदुरून आपल्या नातेवाईका साठी आलेले लोक चिंता ,काळजी .दुपारचे १२ वाजले अचानक अम्बुलांस आवाज आणि एका पाठोपाठ एक अम्बुलांस येऊन हॉस्पिटलच्या आवारात येऊन उभा राहिल्या .
अपघात झाला आहे .असे समजले आणि सुरु झाली एकच धावपळ स्ट्रेचरचा आवाज ,औषधाचा वास डॉक्टरची धावपळ,
आणि काही वेळातच महिला वार्ड मध्ये एका पाठोपाठ एक अशा १६,१७ महिला पेशंट भर्ती झाल्या .
कोणची डोकी फुटली होती कोणाचे हात मोडलं होते एकंदरीत खूप भयंकर अवस्था होती सगळ्याची .
आणि या सगळ्या बायका १६ ते ३० च्या आगे मधील होत्या .
कोणी बोलायच्या मनस्थिती मध्ये नव्हते .नन्तर त्याचे नाते वाईक आले .तेव्हा समजले या सगळ्या
बायका मजुरी करणर्या होत्या .दुसऱ्याच शेतात काम करणाऱ्या .आणि त्या दिवशी पण नेहमी प्रमाणे सगळ्या गावातील एक टेम्पोने शेतात काम करयला जात होत्या .ज्या टेम्पोने त्या जात होत्या त्या वरील ड्रायव्हर नवीन होता.म्हणजे त्याच्या कडे लायसन्स नव्हते .
आणि त्या मुळे त्याला गाडी कंट्रोल झाली नाही आणि रोडच्या बाजूला असलेल्या खड्यात टेम्पो उलटा झाला .तीन चार पलटी मारली .
मजूर असल्या मुळे सगळ्या कडे शेती कामा साठी असणारे विळे होते.आणि त्याच्या मुळे खूप जखमा झाल्या होत्या .
बघवत नव्हते असे हाल होते.
अगदी १८.१९ वर्षाच्या मुली होत्या त्या मध्ये.खूप छान दिसयला.त्याच्या बरोबर बोलल्या वर समजले.१६ वर्षात त्याचे लग्न झाले होते.काहीना एक मुल तर काहीना २ मुले होती.सगळ्यात धक्का दायक होते त्या तील कोणी शिकलेल्या नव्हत्या .काही मुली १४,१५ च्या होत्या लग्न न झालेल्या त्या पण कधी शाळेत गेल्या नव्हत्या आई बरोबर त्या पण कामा साठी जात होत्या.यांना का शिकवले नाही याचे उत्तर एकच होते .शाळा लांब आहे.आणि एनेकदा छोट्या मुलना सांभाळण्याचे काम असते या मुलीना,आणि सगळ्यात मेन म्हणजे काय करयचे शिकून कुठे जायचे आहे.चूल तर फुकयची आहे.आणि या कोणी आदिवासी किवा मागास वर्गात मोडणार्या नव्हते.खुल्या प्रवर्गात तील होत्या.याचे खूप अजीब वाटले .
टेम्पो वाल्यांनी पैसे भरले ड्रायव्हर दुसरा दाखवला होता.त्या मध्ये त्याचे जे लोक होते त्याने त्यांना खाजगी हॉस्पिटल मध्ये अडमिट केले होते.आणि आधी काबुल केले होते सगळा खर्च करणार पण नन्तर नाही बोलला.
मग काय हॉस्पिटल मध्ये नातेवाईकाची चर्चा सुरु वाद.ज्याच्या कडे हॉस्पिटल मध्ये येण्यास पैसे नाही.आपण गावच्या विरोधी बोललो तर आपल्यला काम भेटणार नाही मग काय जे होईल ते होईल आपण गप्पा राहू असे बोलयला लागले .
पण या मध्ये एक पेशंटची बहिण होती.२४,२५ वर्षाची असेल ४थी शिकलेली ती बोलयला लागली खूप काही आपण असे केले पाहिजे तसे केले पाहिजे आणि ती जे बोलत होती ते अगदी बरोबर होते.आणि अनेक पुरुष माणसे बोलयला घाबरत होती तिथे ती किती आत्मा विस्वसाने बोलत होती ती.पण त्याच वेळी अनेक जन हि जादा शहाणी आहे हिचे काय ऐकता असे बोलत होते.पण आपल्यला कोण काय बोलते या कडे लक्ष ना देता एकटी ठाम राहिली.आणि त्या नन्तर ते सगळे पेशंट खाजगी हॉस्पिटल मध्ये भर्ती करण्यास टेम्पो मालक तय्यार झाला .
पुढे काय झाले मला नाही माहित पण या मधून मला एक समजले.मी शिकली आहे आणि मी नोकरी करत नाही याचे मला नेहमी वाईट वाटत आले आहे.पण या बायकांना बघितले आणि मला माझा आई वडिलांनी शिकवले म्हणून मला माझे हक्क माहित तरी आहे.पण खरच माझाच गावा पासून काही किलोमीटर वर असणार्या या बायकाना ना शिक्षण ना स्वतच्या हक्काची जाणीव,यांना महिला संघटना माहित नाही कि माहिला दिन सुद्धा.एक थोडे शिकलेली मुलगी किती ठाम बोलते .पण मला शिकायचे होते ताई पण आईला शेतात मदत म्हणून मला शिकू दिले नाही आणि गावा कडे काय लवकर लग्न करतात ना.
खरच हि जर शिकली असती तर उगाच मनात आले ..........
No comments :
Post a Comment