माझे गाव नाशिक शिर्डी रोड वर ,शिर्डीच्या आधी ३० कि .मी वर आहे .
आज पायी शिर्डीला खूप लोक चालत जातात .रोज पदयात्रा असतात पण वीस .बावीस वर्षा पूर्वी फक्त काही खास उत्सवा साठी आणि रामनवमी ला पदयात्रा जात असत .
रामनवमी एक तर मार्च किवा एप्रिल मध्ये असते .आणि मुंबईतून सगळ्यात मोठी पदयात्रा जाते .
पण पंचवीस वर्षा पूर्वी हि पदयात्रा छोटी असायची.सगळ्या जाती धर्माचे लोक असायचे.
आमचा गावात हि पदयात्रा सकाळी दाखल होयची .
नेहमी पाण्याची टंचाई असणारे आमचे गाव त्या वर्षी तर दुष्काळ असल्या कारणांनी अजूनच पाणी टंचाई .
रोड जवळ मंदिर आणि त्याच्या बाजूला आमचे घर होते .
सकाळी नेहमी सारखे पाणी आणयला बाहेर पडलो बघितले .पदयात्रे मधील १०,१२ लोक मंदिर जवळ बसले आहे खरे तर हे नेहमीचे होते आमचा साठी ..
पण त्या मधील दोन लोकाच्या पाया कडे लक्ष गेले .बिना चप्पल चालल्या मुळे त्याच्या पायाला भाजल्या सारखे मोठे मोठे फोड आले होते .
ते सगळे बघवले नाही आणि त्यांना मी घरी बोलवले मीठ घातलेले गरम पाणी दिले .
आई ने घरातल्यांनी त्याना अंघोळ करयला सांगितल्या .
त्या साठी खूप पाणी दूर वरून आणयला लागले .
नन्तर त्यांना जेवण दिले आमचा इकडेच त्या लोकनी आराम केला .
पदयात्रा निघायची वेळ झाली .
त्या मधील एक व्यक्ती माझा जवळ आली आणि मला बोलली .
हम सुबह से देख राहे ही तुम कितना काम कर रही हो !
मी हसले आणि त्याला सांगितले हे आमचे रोजचे काम आहे त्यात काय गावच्या मुलीना करयला लागते .
त्या वर तो जे बोलला ते मात्र कायम आठवत राहिले आज पण .
"बॉम्बे मे लडकिया इतना काम नही करती .साई की कृपा है,तुम भी शादी करके बंबई आ जाऊंगी ." मै साई से पार्थना करुंगा .
त्या व्यक्तीचे बोलणे खरे झाले.आणि पुढच्या वर्शी माझे लग्न झाले मी मुंबई ला आले .
ती व्यक्ती मला परत कधी भेटली नाही .पण त्यातील अनेकजन आज हि पदयात्रे मध्ये जातात आणि न चुकता आमच्या घरी पण येतात .
आज कोणी तरी बोलले साई बाबाचा आशीर्वाद आहे आणि हे सगळे आठवले आणि शेअर केले .
कधी कधी कोणाचे बोलणे आणि मनापासूनचे आशीर्वाद कामी येतात ना .......

No comments :
Post a Comment