Sunday, 30 August 2015

वड

वड या शब्दा बरोबर खूप आठवणी आहेत .
माझ्या गावात खूप मोठे वडाचे झाड होते .
मी लहान असतानी गावात शाळा होती आमची तेव्हा 
शाळे साठी मैदान नव्हते .शाळा पासून दूरवर वडाचे झाड होते 
तिथे शाळेची प्रार्थना होत असे.मधली सुट्टी असो किवा पी .टी चा 
तास .पकडापकडी असेल .खो खो .कबड्डी असे अनेक खेळ येथे होत असे .
वड भोवती पार होता तिथे खेळत बसायचे .नाही तर त्याच्या पारंब्या
पकडून झोके घेत बसणे आमचा आवडता उद्योग होता.
नवीन शाळा तयार झाली आणि वडाचा सहवास पण संपला .
आम्ही लहान असतानी गावात गणपती असो किवा कोणता पण कार्यक्रम
असे तेव्हा पडद्यावर चित्रपट दाखवले जात असे .त्या काळात चित्रपटाचे
खूप आकर्षण होते .कोणता चित्रपट या वडाच्या झाडाखाली दाखवले जात असे.
त्याची जाहिरात एक महिना आधी सुरु होत असे "अमुक तारखेला अमुक
चित्रपट वडाच्या झाडा खाली दाखवण्यात येणार आहे "
अगदी बाजाराच्या दिवसी भोंगा लावून दिवस भर सांगितले जात असे .
आणि ते सांगताना ठिकाण वडाच्या झाडाखाली हे अनेकदा सांगितले
जात असे.चित्रपट असे रात्री ९ ला पण आम्ही घड्याळ नसल्या मुळे साडेसातलाच जाऊन बसत असू .
काही दिवसांनी गावात दोन दोन गणपती मंडळे तयार झाले आणि जिथे
गणपती तिथे चित्रपट दाखवले जाऊ लागले .
गावात रामलीला असो किवा सर्कस नाही तर गावात येणारी आषाढी वारीचे
वारकरी सगळे या वडाच्या झाडा खाली होत असे /
बदल होत असतात तसे बदल होत गेले.हे झाड आणि हि जागा गावाच्या
एक बाजूला असल्या मुळे काही काळाने दुर्लक्षित झाली.गाव दुसर्या बाजूने
विकसित होत गेले.माझे पण लग्न झाले आज ते झाड तिथे नाही आहे माहिती नाही .कधी त्या बाजूला जाण्याचा योग येत नाही.पण सतीचा वान सारखे
चित्रपट याच वडाच्या झाडाखाली बघितले.हे मात्र आज देखील आठवत असते .
गावातील ऐकमेव असलेल्या या झाडा खाली पूर्ण गावातील बायका पूजा करायला जमत असत .तेव्हा हि पूजा का करायची असे काही प्रश्न कोणाल पडत नसत.सगळ्या मग कसा नवरा असो ती पिणारा असेल तरी मना पासून पूजा करतांनी दिसायच्या .
आज गाव सोडून अनेक वर्ष झाले आहे पण वटपोर्णिमा म्हटले कि आठवते
मनात घर करून बसलेले ते वडाचे झाड

हाय फाय

प्रवास म्हटले कि अलग अलग अनुभव येत असतात.वेगवेगळ्या स्वभावाचे लोक भेटतात.काही तासाचा प्रवास पण खूप काही अनुभव येतात.माणसातील माणुसकी दिसते तसे माणसातील अहंकार सुद्धा दिसतो.माणसांना काही न समजणारे लोक देखील भेटतात.
थोड्या दिवसा पूर्वी नाशिक रोड वरून सकाळी सकाळी सेवाग्राम एक्प्रेस पकडली .नागपूर वरून येणारी हि ट्रेन आधीच भरून आली होती त्यात महिला डबा हा अतिशय लहान असल्या मुळे जागा नव्हती.एका बाकावर पूर्ण एक मुस्लीम परिवार बसलेले होते.त्यांना रिक्वेस्ट केली आणि थोडी जागा भेटली .काही तर जागा नाही म्हणून खाली बसले होते तर काही बायका झोपल्या होत्या.नागपूर वरून आलेल्या त्या बायका सगळ्या एकमेकीना छान ओळखायला लागल्या होत्या.कोणाची कोणा बद्दल काही तक्रार नव्हती.
इगतपुरी स्टेशन आले सगळ्यांना भूक लागली होती म्हणून कोणीं ना कोणी काही ना काही घेण्याचे ठरवले.कोणी चहा घेतला कोणी वडापाव,कोणी भजी
पाव घेतले .पाण्याच्या बाटल्या घेतल्या.ट्रेन येथे जास्त वेळ थांबते म्हणून .
आणि तेव्हाच तीन मुले आणि एक पस्तिशीची महिला अतिशय भारी कपडे महागडे घड्याळ हातात महागडा मोबाईल मुलाच्या हातात tab. तिची आई बरोबर डब्यात चढली.आल्या बरोबर स्वताची जड ब्याग धडकन खाली ठेवली ती एक बाईच्या पायावरच तो ओरडली नन्तर ती काढली आणि सुरु झाला तिचा आरडा ओरडा .थोडे सरका जागा द्या.पण जागा नाही तर कुठून देणार तिला.मग ती मग मुलांना बोलली वरती जिथे झोपायची जागा असते तिथे जाऊन बस.
तो मुलगा वरती चढत असतानी त्याचं पायात बूट तसेच होते सगळे काही ना 
काही खात होते.त्या मुळे बूट काढून वरती चढ सांगत होते पण ती बाई "आम्ही कार मधून आलो आहे " असे उत्तर दिले .तिचे हे वागणे बघून एक बाई बोलली 
मग कार मधेच जायचे का आली ट्रेन मध्ये.त्यावर ती काय वाटेल ते बोलायला 
लागली.सारखी हालचाल त्या मुळे कोणाचा पाव पडला कोणाचे भजे पण कोणी तिला काही बोलले नाही .पण ती सारखी बडबड करत होती.काय बायका आहे सरकत नाही हे नाही ते नाही .सगळ्या कडे ती अगदी तुच्छेतेने बघत होती.
त्याच वेळी काही बायकांनी चहा घेतला .ती जिथे उभी होती तिथे एक वयस्कर महिला बसलेली होती.तिनी चहा घेतला ,पण तिला अजिबात आवडले नाही तिनी जाणून बुजून हलका धक्का मारला पण ती महिला सावध होती .त्यामुळे ती बाजूला झाली आणि तो चहा त्या हायफाय च्या पायावर किंचित पडला बस निम्मित झाले आणि तिनी 
सरळ बाटलीभर पाणी पायावर ओतून दिले सगळे घाण केले .तोंडातून सारखे 
बडबड चालू अगदी वरतून ती हायफाय दिसत होती त्याला न शोभणारी .सडक छाप भाषा होती तिची .साल्ये फालतू लोक अजिबात अक्कल नाही .कुठून येतात 
आणि या पेक्षा खालची भाषा होती तिची सगळ्या आवक होऊन बघत होत्या .
ज्या खाली बसल्या त्यांना तिनी पाणी ओतले म्हणून उभे राहिला लागले .
त्यातील एक तिला बोलली म्याडम आपल्याला एवढा त्रास होती तर आल्या 
कशाला ट्रेन मध्ये स्पेशल गाडी करायची होती ना.बस ती लगेच ये साली चूप बस कोणी हिचे तोंड बंद करा .थांब पोलिसांनाच बोलावते म्हणून तिनी पोलिसांना बोलावले .
एक रेल्वे इन्स्पेक्टर डब्यात आला पण त्याच वेळी ती काही बोलणार त्या आधी 
सगळ्या एकदम बोलल्या साहेब जागा नाही म्हणून हि बाई भांडत आहे आणि हिचा धक्का लागला म्हणून चहा सांडला.पोलिसांनी बघितले एक सीटवर सहा बसले.तो काही बोलला नाही .निघून गेला आणि एक मुलाला पाठवून ती जागा साफ करून घेतली .पण सगळ्यांना तिचा खूप राग आला होता .तिचे मुले चुपचाप तिला बघत होते.कदाचित काय संस्कार घेणार होते ते आईचा काय माहिती.? ट्रेन चालू झाली सगळ्या एकमेकशी गप्पा मारत होते कुठून आले कुठे जाणार .हसत खेळत प्रवास चालू होता.त्या हायफाय बाई कडे कोणी बघत पण नव्हते .जशी ती तिथे नाहीच आहे.किती वेळ ती उभी राहणार होती .शेवटी 
जिथे तिनी घाण केली होती मुद्दाम तिथेच आता ती खाली बसली होती .
हळूहळू तिचा अहंकार कमी झाला होता .मी इतर पेक्षा अलग आहे याची तिची घमेंड कमी झाली होती.आता ती बाकी सारखी एक ट्रेन प्रवाशी होती.
हळू हळू एक एक स्टेशन येत गेले बायका उतरत गेल्या.एकमेकीना निरोप देत होत्या .त्या कोणाच्या कोणी नव्हत्या होता साथ काही तासाचा प्रवास ...
न विसरता येणारा .पण असे वागून त्या हायफाय बाईला कोणी विसरणार नाही 
काय मिळाले असेल तिला असे वागून .
नुसते कपडे चांगले असणे म्हणजे ती व्यक्ती खरेच चांगली असेलच असे नाही .
नाही का ?????
सगळ्याच्या मनात देवा बद्दल श्रध्दा असते.मग कधी ना कधी मंदिरात जावे वाटते.पण तेथील गर्दी आणि असलेली मोठी लाईन या मुळे मुश्किलीने हात जोडता येतात.त्यात मंदिरा बाहेर फुले हार विकणारे अक्षरशः मागे लागतात .
मग असे वाटते का आलो आपण येथे मनाला शांती मिळण्या पेक्षा अनेकदा मनस्ताप होतो .
पण काही गावात असे अनेक मंदिरे असतात.तिथे आपण गेलो कि आपल्याला 
खूप मानसिक समाधान वाटते.तिथे ना असते लाईन ना गर्दी मना पासून दार्शन
घेतल्याचे समाधान मिळते

मला दिसलेला {भावलेला }पाऊस .

मला दिसलेला {भावलेला }पाऊस .........
पाउस आवडत नाही असे कोणी भेटणार नाही.
प्रत्येक ठिकाणचा पाऊस अलग भासतो ना ?
अलग कसा त्याचे रूप अलग असते अलग वाटते .
आमचा तालुका नेहमी दुष्काळी म्हणून प्रसिध्द असलेला .
खूप पाऊस कधी बघितला नाही.आमच्या गावात तर छोटा ओढा असावा
तशी नदी तिला मी कधी पाणी बघितले नाही.म्हणून मला अचानक येणारा
पाऊस कधी आवडलाच नाही.अचानक सुटणारा वारा.चमकणाऱ्या विजा.अतिशय
भीतीदायक असे ते वातावरण.पहिला पाऊस त्या मुळे सुटणारा वारा आणि त्या बरोबर उठणारे वावटळ ,हवेत उडणारी धूळ जोरात हलणारी झाडे हे बघून भीती वाटत असे.पाऊस आल्यावर त्या मध्ये भिजणे किवा तो एन्जॉय करणे बाजूला राहत असे. एकाच धावपळ होत असे.सगळ्यात आधी काळजी सरपण आत ठेवा नाही तर चूल कशी पेटवणार.कपडे बाहेर असतील तर ते काढण्या साठी धावपळ ,गुरे ढोरे आता बांधन्यास होणारी धावपळ ,हे सगळे करत असे पर्यंत कधी कधी पाऊस संपून जात असे .त्यातच भिजणे होत असे .पण ते देखील सर्दी होण्यास
कारणी भूत असे.त्या वेळी पाउस आला आणि रस्त्यावर जर पाणी वाहायला लागले तरी वाहणारे पाणी बघून भीती वाटत असे .मोठे झाला वर अनेकदा पाऊस हा शेतात भेटत असे.मग भिजण्या शिवय पर्याय राहत नसे.
त्यात झाडा खाली उभे राहू नका झाडावर वीज पडते हि एक भीती सगळी कडे पाणी पाणी जमीन भिजून ओली मग चप्पल हातात घेणे आणि त्या मातीतून चालणे एक अलग अनुभव असतो पायला खूप माती चिकटते त्यातून चालणे तो मातीचा ओलसर मऊ स्पर्श ,पाउस मुळे अंघोळ केला सारखे स्वच्छ दिसणारी झाडे .गार सुटलेला वारा मधूनच शेतातून घरी येणे. आजच्या सारखे भजी नव्हते कधी आठवत .पण गरम भाकरी लसून चटणी किवा ज्वारीच्या लाह्या गरम बनवलेल्या नाही तर हावरी {सफेद तीळ }भाजून गुळ टाकून खाणे .
अनेकदा बाजरीची राहिलेल्या भाकरी तव्यावर गरम केलेल्या ज्याला आमच्या
कडे कोरके म्हणत ते खात बसायचे.मस्त वाटायचे तेव्हा....
वरवर शांत दिसणारी सगळ्याशी चांगली वागणारी माणसे कधी कधी प्रचंड 
डिस्टर्ब असतात.ती कशी आहे हे फक्त त्यांच्या रोज सहवासात असणारी माणसे सांगू शकतात ती खरे कसे आहेत.कारण बाहेरील समाज त्यांना एक चांगली व्यक्ती म्हणून ओळखत असतो.कधी तरी त्यांचा विचीत्र वागण्या बद्दल समजले कि आपण नावे ठेवतो .
या उलट काही माणसे दिसतानी वाईट आणि वागतात वाईट म्हणून आपण त्यांच्या पासून चार हात दूर राहतो .पण कधी तरी काही तरी घडते आणि त्यांच्या तील चांगुल पणा दिसून येतो .

अधिक मास

अधिक मास तीन वर्षातून एकदा येणारा महिना ,
आपण नेहमी एक म्हण ऐकतो.दुष्काळात तेरावा महिना .
जुने लोक हि म्हण का वापरात असतील .कदाचित त्या मुळे पाउस लेट 
होत असेल शेतात पीक उशिरा येत असेल आणि तो पर्यंत काय असे देखील असेल ना ?
पण या पेक्षा या महिन्यात जावयाला वाण {आमच्या कडे ज्याला धोडा खायला बोलावणे म्हणतात }देण्याची पद्धत आहे .
अधिक मास हा जास्त करून चैत्र ते अश्विन या महिन्याच्या जागे वर येतो .
अनेकांचे लग्न तुळशीच्या लग्ना नंतर ते आषाढ महिन्या पर्यंत होतात.
म्हणजे ज्या वर्षी अधिक मास आला त्या वर्षीच जर आपल्या मुलीचे लग्न झालेले असेल तर ,त्या मुलीचे आई वडील हे गरीब असतील लग्नातच जर त्यांनी मुश्किलीने खर्च केला असेल आणि त्याच वर्षी जर अधिक मास आला तर
जावयाला वाण दयायला लागतोच पण त्या बरोबर मुलीच्या सासू सासरे ,नणंद यांना पण जेवायला बोलवावे लागते.मग त्यांना खरच प्रश्न पडतो .जावई समजदार असेल तर काही नाही पण कधी कधी लग्नात एखादी मागणी बाकी असते ती आठवते.ती पण हवी असते मग .
यात पण गम्मत असते जावयाला बोलवायचे पण कधी कधी सासर्यला वाटते मी म्हणजे खूप मोठा ,तर कधी जावायला वाटते मी जावई आहे माझा मान जास्त
ठेवायला पाहिजे.मग या दोघा मध्ये बिचारी मुलगी कोणाची बाजू घेऊ .
असे होते तिला .........
त्यात नन्तर त्या मुलीला ऐकायला लागते काय पण कपडे दिले किवा काय भांडी दिली .मग त्या वस्तू शेजारी पाजारी दाखवून मुलीला ऐकवले जाते .
कधी कधी वाटते का आहे अश्या प्रथा ..

२/७/१५ 

"गोष्ट तशी गमतीची"

गेल्या शनिवारी "गोष्ट तशी गमतीची" हे नाटक बघायला गेले होते.
शशांक केतकर ,मंगेश कदम ,आणि लीना भागवत यांच्या यात भूमिका आहे .
आई आणि मुलगा ,वडील आणि मुलगा यांच्या नात्याची एक सुंदर गुंफण म्हणजे हे नाटक,आजूबाजूला अनेक घरात घडणारी आणि दिसून येणारी दोन पिढ्यांमध्ये विचारात पडत गेलेले अंतर, त्यातून येणारा दुरावा याचे चित्रण आले आहे.पण हे अंतर दाखवतानी कोणता ताण जाणवत नाही अगदी सहज 
दोन पिढ्यांमध्ये आचार विचारात पडत गेलेले अंतर, त्यातून येणारा दुरावा याचे चित्रण आले आहे.
चाकोरी बद्ध जीवन जगणारा बाप ,आणि त्या चाकोरी मोडून वेगळे काही करू बघणारा मुलगा यांच्या तील संघर्ष तर आई आपल्या या मुलाला समजून घेणारी.टिपिकल आयुष्य जगणारा बाप कधी कोणती हौस मजा करणे नाही कि बायकोला घेवून कुठे जाणे नाही.आहे ती नोकरी करणे त्यात खुश राहणे नवीन रिस्क न घेणे .पण मुलाला वाटते आपल्या आई वडिलांनी इतरा सारखे जगावे .म्हणून तो वडिलांना सांगतो आईला घेऊन चौपाटीला जा .
त्या नंतर एक भिडस्त नवरा आणि सगळ्या गोष्टी एन्जॉय करू पाहणारी बायको हे प्रसंग एकदम अफलातून ..........
नवीन पिढीनी नवीन तेच योग्य असे न समजता जुने बरोबर घेवून चालावे
आणि नवीन पिढी बरोबर जुळवून घेतले पाहिजे अशा काही संदेश देणारे हे नाटक .
शिवाजी मंदिरला हे नाटक होते प्रयोग संपला आणि अनेक जन मेकअप रूम मध्ये या कलाकारांना भेटायला गेले खरे तर पुढचा प्रयोगला जायचे असल्या कारणाने अनेक जन नाश्ता करत होते.बिचारा शशांक केतकर {श्री }
अनेकांना त्याच्या बरोबर फोटो काढायचे होते त्या मुळे तो सगळ्या बरोबर फोटो काढून घेत होता.मला मात्र लीना भागवतला भेटायचे होते.खूप छान वाटले तिला भेटून ...

"आम्ही दोघे राजा राणी "

प्रत्येक स्रीचे आई होणे हे स्वप्न असते आज हाच विषय असलेले नाटक बघितले "आम्ही दोघे राजा राणी "
सुप्रिया पिळगावकर आणि प्रशांत दामले अगदी मनाला भिडणारा विषय .प्रत्येक स्रीचे आई होणे हे स्वप्न असते. ते कोणाचे लगेच पूर्ण होते तर कोणाचे खूप प्रयत्न करून देखील पूर्ण होत नाही.लग्न झाले कि एक वर्ष होते तोच घरात चर्चा सुरु होते.पाळणा कधी हलणार ,अनेक नशीबवान असतात लगेच आई बाबा होण्याचे स्वप्न पूर्ण होते.पण काही अपवाद असतात.लग्न होवून काही वर्ष होतात तरी पाळणा हलण्याचे चिन्ह दिसत नाही .मग सुरवात होते.डॉक्टर कडे जाण्याची अनेक तपसण्या आणि त्याच बरोबर एक अपेक्षा 
रिपोर्ट तर नॉर्मल असतात.तरी काही फायदा दिसत नाही .मग सुरवात होते.जे कोणी काही सांगेल ते करण्याची अगदी देव धर्मा पासून उपास तपास सगळे काही केले जाते.या मध्ये असते त्या दोघाची प्रचंड मानसिक ओढाताण ,आणि एक दिवस समजते ती आई होणार आहे .दोघे पण खुश असतात .होणर्या बाळाचे स्वपन बघत असतात.त्याचे नाव ठरवतात.आणि तो दिवस येतो.पण बाळ पोटात मृत होते.आणि ती पुन्हा कधी आई बनू शकणार नाही.हे सत्य कसे तरी दोघे पचवतात .कुठे तरी मनाला स्पर्शून जाते हे नाटकरिपोर्ट तर नॉर्मल असतात.तरी काही फायदा दिसत नाही .मग सुरवात होते.जे कोणी काही सांगेल ते करण्याची अगदी देव धर्मा पासून उपास तपास सगळे काही केले जाते.या मध्ये असते त्या दोघाची प्रचंड मानसिक ओढाताण ,आणि एक दिवस समजते ती आई होणार आहे .दोघे पण खुश असतात .होणर्या बाळाचे स्वपन बघत असतात.त्याचे नाव ठरवतात.आणि तो दिवस येतो.पण बाळ पोटात मृत होते.आणि ती पुन्हा कधी आई बनू शकणार नाही.हे सत्य कसे तरी दोघे पचवतात .कुठे तरी मनाला स्पर्शून जाते हे नाटक

माझ्या फेसबुक पोस्ट


कधी कधी आपल्यला एकटे राहायचे नसते आणि कोणाशी बोलायचे पण नसते मग काय करावे समजत नाही बरोबर असणारे कोणी तरी काही तरी विचारत असते.आपण बोलायचे म्हणून बोलत असतो.होते ना कधी कधी असे पण 



प्रत्येक घराला एक दार असते.आणि त्या दाराला असतो एक उंबरा ,
उंबरा म्हणजे असतात एक मर्यादा ,काही बंधने ........
आपण उंबऱ्याच्या आता जे असतो तसे आपण जगत असतोच असे नाही .
उंबऱ्याच्या आता असते एक सुरक्षित असे आपले आपल्याला हवे असलेले आपले जग.नाही का ?



आयुष्यात कधी कधी अंधार आणि एकटे पणा बरा वाटतो.
स्वतावर विस्वास नसतो का दुसऱ्यावर माहिती नसते .
स्वताच्या नकळत मनाचे दरवाजे बंद केलेले असतात .
स्वत: शिवय तिथे कोणाला प्रवेश नसतो .
कधी तरी कोणी दरवाज्यावर येते.टकटक होते ती मना पर्यंत 
पोहोचते.पण बाहेरून कोणाला आता येऊ द्यावेशे वाटत नाही.
मनाच्या हा आणि ना मध्ये मग थोडे दार किलकिले करून
बघावे वाटते.आत येणारा खरच विस्वास ठेवण्या सारखा असेल का ?
मनाचे मनाशी द्वंद्व चालू असते .
येणाऱ्याला आत येऊ देण्यास मन घाबरत असते .
त्याने यावे हे पण वाटत असते .
तरी मन घाबरत असते ,कारण मनाचे खेळ असतात .
जे कधी संपत नाही .
असेच मनातले काही




भूतकाळातील हाल आपेस्टा आठवतात तेव्हा हे सगळे आपण सहन करून आलो .याचे आज आश्यर्य वाटते .मग आजचा वर्तमान भूत काळा पेक्षा नक्कीच चांगला आहे असे वाटते .कारण ये तो वक्त वक्त कि बात होती है !






कधी तरी मनात नसतानी काही तरी घडते.त्याचा असर खोलवर होतो.नंतर कोणती गोष्ट करातांनी मनात भीती बसते .नकळत आत्मविश्वास कमी होतो गेलेला आत्मविस्वास परत येण्यास खूप वेळ लागतो



अनेकदा काही माणसे दु:खाची रडगाणे गात बसतात.
. पण ते कधी विचारच करत नाही आपण का दु:खी आहे .
अनेकांच्या दु:खाचे कारण असते अति अपेक्षा ,एखादी गोष्ट दुसर्या कडे आहे मग ती आपल्या कडे हवीच हा अट्टाहास आणि मग येते ती ओढा ताण आणि त्या मुळे येणारी 
निराशा ,खरच आपल्याला कशाची गरज हे ओळखले पाहिजे म्हणजे झाले .
म्हणजे दु:ख होणारच नाही .....

फक्त निखळ मैत्री

कोणी आपले नाही ,कोणाचे आपल्यावर प्रेम नाही आहे .अशी ठाम समजूत होती तिची .नाही म्हणायला वरवर सुखी दिसणारा तिचा संसार होता .अनेक संसार तडजोडीचे असतात तसा तिचा देखील होता .तडजोड होती मुला साठी.
बाकीच्याचे लग्न होतात तसे तिचे पण झाले होते .का केले मी लग्न हा प्रश्न 
तिला नेहमी पडत असे.नवऱ्याला ती राहिली काय नाही काय कधी काही फरक पडला नाही .त्याच्या दृष्टीने तिचे अस्तित्वला कधी काही किमत नव्हती.
जाणार कुठे पाठी कोणाचा सपोर्ट नाही.मग तिचा पुढील सगळे रस्ते बंद होते .
्वताच भरारी मारण्याची हिम्मत तीच्यात नव्हतीच.आत्महत्या करण्याचे धाडस नाही म्हणून जिवंत आहे आपण हे कधी ती विसरली नव्हती.
स्वताच्या आयुष्याला तिनीच स्वताच्या काही मर्यादेच्या सीमा रेषा घालून घेतल्या .स्वताचे एक वर्तुळ तयार केले त्यात कोणाला प्रवेश नव्हता .
सोशल मीडिया मुळे तिला एक नवीन जगाची ओळख झाली .स्वताला घातलेल्या मर्यादेच्या सीमा थोड्या सैल झाल्या.
कोणाला तरी सांगून आपले दुख :कमी होते याची जाणीव झाली.
कोणी तरी तिच्या मनाच्या दारावर धडक दिली.काय होते कोणाशी बोललो तर
या विचाराने ती बोलायला लागली.पण कोणती सवय वाईट असते .याची तिला नेहमी जाणीव होती.तरी तिला ती सवय हवी होती आणि नाही देखील .
कधी तरी या मैत्री चे रुपानंतर जर प्रेमात झाले तर? येथे येऊन तिचे विचार
बोथट होत असत.जे नको तेच होते ,काय होणार एकदा भेटलो तर त्याच्या या उत्तरा वर तिचा कडे काही उत्तर नसते.कारण तिला माहिती असते.
एकदा भेटलो कि तो कधी परत तिला भेटणार नाही.
कारण तिला माहिती आहे त्याला आपण नक्की आवडणार नाही.
मग तो कायमचा खूप दूर जाईन .
न बघता कोणी तीच्याशी छान बोलत आहे.हे तिचा साठी खूप आहे.
विचारत हरवलेली ती खिडकी पाशी येते.बाहेर पाउस पडत आहे.तिला खूप आवडतो पाऊस .तिला भिजायचे आहे पाऊसात पण एकटी काय भिजणार तिला वाटते कोणी असावे पावसात भिजायला बरोबर.तिचा वर खूप प्रेम करणारे कोणी
मी आहे तुझा बरोबर बोलणारे कोणी.
मला फक्त तुझी मैत्री हवी आहे बोलणारे कोणी ...............

अधिक वाण आणि मरण

मागच्या आठवड्यात एक बातमी अनेकानी वाचली असणार ,"एका विवाहित प्राध्यापिकेस अधिक महिन्यातील आहेराच्या हट्टापायी जाळून मारण्याचे प्रयत्न कण्यात आले ."त्यात ती गंभीर भाजली .........
या बातमी मुळे अनेक जन दुखी झाले .तश्या प्रतिक्रिया पण सोशेल मिडीया वर 
उमटल्या .........अनेक कायदे आज महिलांच्या बाजूने असून देखील एक शिकलेले घरातील लोक असून देखील असे कृत्य कसे करतात .ते पण एक कमावती बायको असतानी ....असे का होते याचे मूळ आजूबाजूच्या समाजात दिसून येते.आता अधिक मास आहे.म्हणजे जावयाला वाटते आपल्याला सासरच्या लोकांनी आपल्याला बोलवावे आपला मान पान करावा,अनेक जावई खूप समजदार असतात.जे देतील त्यात खुश होतात.आपल्या आई वडिलांना सारखा मान ठेवतात.तर काही सासू सासरे स्वताची परस्थिती जर चांगली असेल तर जावयाला भरपूर काय काय देतात.मग काहीना त्यात जास्त अभिमान वाटतो.मग ते मला हे मिळाले ते मिळाले हे सगळ्यांना सांगत बसतात.परंतु त्याचा परिणाम कधी कधी वेगळा होवून देखील जातो.मग आपल्या सासू सासऱ्याची परस्थिती नसतानी देखील त्यांचा कडून अपेक्षा केली जाते.मग आपली बायको किती कमवते किती चांगली याचा विसर पडतो.त्यांना फक्त आठवतो आपला मान पान,आपण किती शिकलो आहे किती कमवतो आहे,मग बाकीच्यांना एवढे भेटले तेवढे भेटले.कुठे तरी इगो दुखावतो मग तो राग निघतो निष्पाप मुलीवर.
अश्या गोष्टी घडतात त्या पण आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या मानसिकते मुळे स्वताचा मोठे पण दाखवण्याची हौस असते.मग आपल्याला हे भेटले ते भेटले हे सांगत सुटतात.पण कोणी अश्या प्रथा बंद होयला पाहिजे म्हणून प्रयत्न करातांनी दिसत नाही.उलट काहीनी तर येथे फेसबुक वर काय भेटले त्याचे फोटो टाकले.
अनेक मुली आज शिकतात स्वता कमवतात त्यांना जर त्रास झाला तर त्या सरळ वेगळ्या होतात.तेव्हा त्यांना नावे ठेवले जातात.पण ज्या एकदा लग्न झाले तेच आपले घर हे मानतात त्यांना मग असे जाळून जायला लागते.मग किती कडक कायदे करा नाही तर काही करा ..
{बायकांच्या बाजूने कायदे आहेत काही त्याचा चुकीचा उपयोग करतात.पण सगळ्या तश्या नसतात हे अश्या घटना मधून दिसते.काही घटना मोठ्या प्रमाणात होतात तेव्हा माहिती पडतात.पण अश्या अनेक असतील त्रास सहन करत ज्यांचे दुख कधी जगा समोर येत नाही }

फेसबुक पोस्ट

आज दादर वरून चर्चगेट फास्ट ट्रेनने येत होते.एलफिस्टन स्टेशन जवळ 
ट्रेन येवून थांबली .का थांबली समजत नव्हते .अचानक स्ट्रेचर घेवून काही माणसे धावतानी दिसली.त्यांनी सांगितले रेल्वे रूळ ओलंडताना ट्रेन खाली कोणी आले .कोण असेल उगाच सगळ्याची चर्चा सुरु झाली .
त्याच वेळी स्टेशन जवळील बिल्डींग मधील एक चाळीश पंचेचाळीस वयाची बाई घरातील गाऊन वर तशीच आणि सतरा अठरा वर्षाची मुलगी धावत येतानी दिसल्या.खूप विचार मनातून भरभर येवून गेले.त्या बाईचा कोण असेल 
नवरा कि मुलगा कोण असेल ?
ट्रेन सुरु झाली पुन्हा सगळे काही पुन्हा पहिल्या सारखे .........
पण आज एका घरात खूप काही बदलणार आहे.जर तो घरातील कर्ता कमवणारा पुरुष असेल तर .त्या घरा पुढे खूप प्रश्न उभे राहणार आहे .पुढे काय ?
जर मुलगा असेल तर .त्या आई साठी न संपणारे दु:ख वाट्याला येणार.
नेहमीची असते तशी सकाळ असेल ना त्या घरात पण.ती महिला आपल्या कामात असेल.मनात देखील नसेल आज खूप काही बदलणार आहे.
{कृपया .वेळ लागला तरी चालेल पण असे रेल्वे रूळ ओलांडत जाऊ नका .
घरी कोणी असते तुमची वाट बघणारे हे विसरू नका .}

सुख

आपले सुख आपले असते .आणि त्यात अनेक वाटेकरी असतात .काही आपले असतात कोणी मित्र असतात काही नातलग असतात .कोणता आयुष्यातील आनंदाचा प्रसंगा मध्ये ते आपल्या बरोबर असावे वाटते ना .त्या शिवय कोणते तो आनंद आणि सुख कमी वाटते ना .
तसेच आपले दुख आपले असे किती म्हटले तरी ते कोणाला सांगावे वाटते ना .जगाला काय त्याचे असे म्हणून दुख कमी होत नाही .काय माहिती कधी तरी कोणी असे असेल देखील त्यांच्या कडे आपल्या दुखावर उपाय असेल सुद्धा.म्हणून दुखाचे रडगाणे देखील गात बसू नाही .नाही तर आपले म्हणतो तेच आपल्याला टाळतात .
असेच मनातले काही 

कांदा पोहे

काल चितळे काकांनी कांदा पोहे या वर पोस्ट होती ना आज माझा अनुभव लिहिते आहे.
बी .ए ची परीक्षा नुकत्याच संपल्या होत्या .मे महिना होता त्या मुळे कोणाचे ना कोणाचे लग्न असे.त्या दिवशी घरातील सगळे कोणाच्या ना कोणाच्या लग्नाला गेले होते.घरी मी एकटीच होते.आमच्या गावातील माझ्या वर्गात १० वी पर्यंत असणारा परंतु नापास झाला म्हणून शाळा सोडून घराचे काम करणारा धनगर समाज्याच माझा वर्गमित्र घरी आला.खरे तर तो मेंढ्या घेवून तो वर्षातील चार महिने दुसऱ्या गावाला फिरत असत.त्या मुळे त्यांच्या अनेकगावी ओळखी होत असत .बारा वाज्याच्या सुमारास तो घरी आला.त्याने बघितले आज घरी कोणी नाही.तो मला बोलला एक मुलगा आला आहे मी त्याला बोलावले आहे तुला बघायला.घरी तर कोणी नाही पण तो मुलगा आता एवढा लांब वरून आला आहे तर आपण बघण्याचा कार्यक्रम करू या ना ? काही नाही तू चहा आणि पोहे कर ते काय विचारातील ते सांग बाकी बघू नन्तर,मी त्यला सांगितले ठीक आहे.
"पण ते पाटावर वैगरे मी नाही बसणार सांगते आधीच ",एक तर मला असे कोणी कधी बघयला आले नाही .तो बोलला ठीक आहे.
काही वेळाने तो दोन मुला बरोबर येतानी दिसला त्या तिला एक असेल माझ्या अठरा एकोणवीस वर्षाचा आणि दुसरा चोवीस पंचवीस वर्षाचा .त्या मुळे मला समजले कोणता मुलगा बघयला आला आहे.त्याला दूर वरून बघून मी ठरवले हा आपल्याला तर पसंत नाही.कारण त्याची उंची दूरवरून बघून कमी आहे हे माझ्या लक्षात आले.आणि अचानक गम्मत करण्याची माझ्या मनात आले.
एक तर दुपार आमच्या कडे चुलीवर सगळा स्वयपाक होत असे.आता एवढ्या
उन्हात चूल पेटवायची आणि चहा पोहे करायचे खरच कंटाळा आला होता .
म्हणून मी ते जसे आले तसे मी समोर गेले नमस्कार वैगरे केला.बसयला दिले.
पाणी दिले.आणि त्यांच्या समोर बसले.ते बघून मी घाबरण्या एवजी तोच घाबरला.मला काही विचारणार त्या आधीच मी सांगितले.
माझे नाव.जन्मतारीख ,शिक्षण.आणि त्याला विचारले .
तुझे नाव काय ?
तुझे बोलल्या मुळे त्याची अजून त त प प झाली.
त्यांनी मला काही विचारण्या एवजी मीच त्याला खूप प्रश्न विचारले.
मी असे काही वागेल आणि माझा तसा स्वभाव नसल्या मुळे माझा वर्ग मित्र
थोडा वेळ शॉक झाला.पण नंतर त्याला खूप हसायला येत होते.शेवटी बिचारा तो मुलगा त्याला बोलला चाल आपण आता जाऊ यांच्या घरी कोणी असेल तेव्हा येऊ.आणि तो उभा राहिला मी लगेच बोलले अरे बसा ना ? मी चहा करते.
मी चहा नाही घेत .तो मुलगा बोलला
मग थांबा मी पोहे करते .मी बोलले
मला पोहे नाही आवडत तो मुलगा पटकन बोलला.
मग जेवण करा.नाही नका आम्ही जेवण करून आलो.
असे बोलून तो मुलगा घरच्या बाहेर देखील पडला.
मला खूप हसू येत होते.पण लगेच भीती पण वाटली आता आई काय म्हणाले.
आणि झाले तसे आई घरी आली तिला वर्ग मित्रा ने सांगितले.आई खूप चिडली .आता लोकांना माहिती होणार तू कशी मुलगी आहे.काही अक्कल आहे का नाही ?असे वागतात का ?खूप काही ऐकयला लागले.
नंतर वर्ग मित्राने सांगितले खूप घाबरला होता तो असे मुली अजून तरी मुलांना प्रश्न विचारत नाही .पण मला खूप बरे वाटले होते नेहमी काय मुलीनी खाली मान घालून बसायचे.प्रश्नाचे उत्तरे द्याचे म्हणून.
आज चितळे काकाच्या पोस्ट मुळे सगळे आठवले /

फेसबुक पोस्ट

मला हे आवडत नाही मला ते आवडत नाही.मी स्पष्ट बोलतो /बोलते असे म्हणणारे अनेक जण भेटतात ना ? रोखठोक असणे वेगळे आणि स्वता मी हे आहे मी ते आहे बोलणे वेगळे.कारण अशी माणसे वेळे नुसार आपले धोरण बदलतात.पण रोख ठोक माणसे कोणती वेळ आणि परस्थिती असो त्यांच्या धोरणे बदलत नाही मग त्यांच्या समोर त्यांचे आपले जरी असेल तरी .काही व्यक्ती या स्वता आपण खूप मोठे आहे हे स्वताच सांगत फिरतात .काही व्यक्तीना ते आवडत नाही मग ते तसे बोलतात.पण अहंकाराने आंधळे झालेले असतात त्यांना वाटते आपण फार कोणी असून आपला मजाक उडवला आहे .कोणती व्यक्ती अचानक अशी वागत असते का ? नाही .आधी आपण तिला चांगले ओळखत असतो चांगले समजत असतो.{ती व्यक्ती चांगली आहे असा आपला समज असतो }पण अहंकारा मुळे अनेकदा आपल्या नेहमी बघण्यातील व्यक्ती अजीब वागू लागते किवा त्याचे नेहमीचे वागणे बदलते.त्याचे विचार बदलले बघून अनेकदा मग त्याचे वागणे बघून जवळचे लोक दूर जातात.असे का होते विचार केल्या वर मग लक्षात येते.व्यक्ती अचानक बदलत नाही तर ती ज्या लोका बरोबर राहते त्याचा तिचा वर प्रभाव पडतो एवढा कि ती व्यक्ती आपले विचार विसरून जाते आणि तिचा वर ज्याचा प्रभाव आहे त्याच्या सारखे बोलयला लागते.काय चूक काय बरोबर याचा विचार न करता. आणि मग त्या व्यक्तीचे जवळचे एक एके दूर होत जातात कधी हे त्या व्यक्तीला पण नाही समजत.
पण कोणता हि प्रभाव हा काही काळा साठी असतो.माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही पण तो पर्यंत खूप उशीर झालेला असतो.सगळे दूर गेलेले असतात ज्याच्या प्रभाव मुळे झाले तो देखील मग हातात काहीच राहत नाही .

काय केले फेसबुक ने ?

काय केले फेसबुक ने ?
आमच्या  सारख्या  अनेकांना स्वताचे विचार {हुशारी किवा अक्कल }मांडण्याची 
संधी दिली.कधी काळी घराचे दारे सकाळी उघडली ती रात्री झोपतानी बंद होत असत.हळूहळू बदल होते गेले.कुटुंब छोटे होत गेले.माणसे आत्मकेंद्रित होत गेले.
चाळीत राहणारी एकमेकांना मदत करणारी एकमेकाची सुखदुख वाटून घेणारी माणसे हळूहळू चाळीतून फ्लैट संस्कृती मध्ये बंदिस्त झाले.नावा एवजी फ्लैट नंबर आणि फ्लोअर नंबर ने ओळखायला लागले.
सगळ्या सुखसोयी तर आल्या छान घरे झाली.पण माणूस मात्र एकटा झाला.
चाळीतील आणि आपल्या गावातील आठवणीत रमू लागला.पण माणसाला हवे असते बोलायला कोणी.मग टीव्ही किती बघणार ,माणसाला आनंद झाला तरी तो सांगायला कोणी हवे असते दु:ख झाले तरी ते सांगायला कोणी हवे असते.
फ्लैटस  संस्कृती मुळे मानसिक आजार वाढले हे काही दिवसा पूर्वी पेपर मध्ये आले होते.आणि या सगळ्यातून एक आधार सापडला तो म्हणजे फेसबुक .

फेसबुक मुळे आपले विचार जसे मांडण्याची संधी भेटली तशी,माणसे जमवण्याचा छंद असणारया माणसांना खूप समवयस्क आणि छान मित्र भेटले.
आपण आहे आपली विचार पूस करणारे कोणी आहे.याचे समाधान भेटले.
"हि अभाशी जगातली मैत्री खूप छान आहे.येथे नाही कोणी गरीब,नाही कोणी
श्रीमंत.ना कोणी कोणत्या धर्माचा,ना कोणत्या जातीचा,कोण शहरातले कोण खेड्यातले.कोणी छोटे कोणी मोठे."म्हणून हि मैत्री सुंदर आहे.
माझ्या सारख्या घरात राहणाऱ्या  गृहिणी आज आपले विचार मांडू शकतात.
ते फेसबुक मुळे.खूप सारे छान फ्रेंड भेटले.आपल्या राज्यातील काना कोपऱ्यातील
जिथे मी कधी जाणार नाही,गेले नाही.अशी अनेक माणसे भेटली जी मला कधी भेटली असती ती भेटली फेसबुक मुळे .......
असेच मनातले काही ...
!!!!आशा !!!! २३/७/१५

."वारी कालची आणि आजची

."वारी कालची आणि आजची 
फेसबुक वर गेले काही दिवस आपण अनेक वारीला विरोध करणाऱ्या नावे ठेवणाऱ्या पोस्ट बघितल्या म्हणून काही लिहावे वाटले.
वर्षानु वर्षाची चालत आलेली वारकरी संप्रदायाची परंपरा म्हणजे वारी .
आयुष्यात एकदा तरी पंढरपूरला जावे आपल्या देवाला डोळे भरून बघावे हि इच्छा असते.आता आजची वारी आणि पूर्वीची वारी जमीन आस्मानचा फरक पडला आहे .
पूर्वीच्या काळी वाहतुकीचे साधने नव्हते शेतात .पेरण्या झालेल्या असत.एकत्र कुटुंब पद्धती होती.चौदा पंधरा वर्षाचे असतानी लग्न होत असत.वयाच्या विसाव्या वर्षी अनेक जण बाप झालेले असत .वयाच्या चाळीसाव्या वर्षी आजोबा देखील.घरातील सगळे कामे आता मुले सांभाळण्यास समर्थ झालेली असत .मग असी माणसे आता आपण देवदेव करावा आपल्या दैवता ला भेटायला जावे .आजच्या सारख्या तेव्हा गाड्या नव्हत्या.मग दोन कपडे आणि थोडे पैसे घेवून लोक वारीला जात असत.स्वताचे सामान स्वता उचलत असत.अनेक गावात त्यांना जेवण दिले जात असे अनेक गावात फक्त पीठ किवा भाज्या मग वारीतील महिला स्वाता चूल बनवून स्वयापक करत.जातानि चालत जाणारी हि लोक येतांनी देखील चालत येत असत.त्या मुळे पूर्वीच्या काळी वारीत जाणऱ्या
लोकांची संख्या देखील कमी असे.ज्या गावात मुक्काम त्या गावातील लोक त्यांची व्यवस्था ठेवत असत.त्या मुळे आजच्या सारख्या समस्या तेव्हा नव्हत्या .धार्मिक गोष्टी कीर्तनातून प्रवचनातून ऐकायला मिळत .हेच कारण असे वारीला अनेक लोक जात.वारी आजची ....
आज अनेक वाहतुकीचे साधने झाले.कुठे जायचे तर झटपट जाता येते.
आज कुटुंब छोटे झाले.शेती हा मुख्य व्यवसाय न राहता आता नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणत झाला .शहर संस्कृती आली.मग नेहमी काम आणि बंद दाराच्या या संस्कृती मधून काही दिवस बाहेर जावे म्हणून अनेक जण देवस्थानाला भेट देतात.त्या पैकी एक म्हणजे आषाढ वारी.आणि तिला प्राप्त झालेले प्रशिद्धीचे वलय या मुळे दर वर्षी लोकांची वाढणारी संख्या हि नेहमी जास्त होत आहे .
त्यातून वारी सुरु होण्या आधी पासून मिडियाने घेतलेली दाखल हे पण एक कारण आहे वारीत जाणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे .प्रत्येक ठिकाणावरून अनेक छोट्या मोठ्या दिंड्या जातात .त्यांच्या बरोबर असतात.टेम्पो त्या मुळे पूर्वी सारखे सामान डोक्यावर घेयला लागत नाही.अगदी जेवण्याच्या सामाना पासून ते पाण्याच्या बाटल्या पर्यंत सगळ्या सोयी असतात.वारीला मिळालेली प्रशिद्दी या मुळे गावोगाव जेवण्याची सोय असते.पूर्वीची गावे आता मोठी शहरे झाली आहे.वारीचा सन्मान ठेवला जातो पण त्याच वेळी काही मुलभूत सुविधा वर ताण पडतो.मग ज्या गावा मधून हि वारी पुढे जाते तिथे मागे ठेवून जाते घाण आणि कचरा ,वारीचे उत्साहाने स्वागत करणारे अनेकदा त्या उत्साहाने साफ करतातच असे नाही मग खूप दिवस मागे राहतात त्याचे निशाण ..
तो गेला म्हणून मी गेलो असे अनेक जण जाणारे आहे.तुळशीची माळ घालून जाणारे आधी वारकरी दिसत आता अनेक कानात हेडफोन घालून जाणारे देखील दिसतात.वर्षानु वर्ष जाणारी हि वारी आहे आणि त्यात दर वर्षी वारकर्याची संख्या वाढत आहे हे सरकारला माहिती असते.वारी कोणत्या गावातून जाणार हे वेळापत्रक आधीच ठरलेले असते.मग त्या प्रमाणात मुलभूत गरजा असतात त्यांची सोय त्या प्रमणात का केली जात नाही.वारकरी देखील पेपर प्लेट आणि पाण्याच्या बाटल्या कुठे का फेकतात.वारी मध्ये आपण जात आहे तर कोणते व्यसन करून जावू नाही मग ते काही असो असे नियम का पाळत नाही त्या मुळे वारी कारण नसतानी बदनाम होते याची जाणीव का ठेवली जात नाही.
"वारी म्हणजे उत्साहा ,वारी म्हणजे तुकाबाचे अभंग ,वारी म्हणजे विठू माउलीचा गजर ."









2}वडील माळकरी विठ्ठल भक्त त्या मुळे नेहमीच त्याचा एकादशी उपवास असे.
बाकी करतात तसाच मी खिचडी खायला भेटवी म्हणून उपवास करत असे.
पण त्या दिवशी घरात आणि आजूबाजूल एक वेगळेच वातावरण असे.
बहुतेक मी लहान असतानी सगळ्याची घरे हि मातीची होती.त्या मुळे एकादशी असेल तेव्हा सकाळी लवकर उठायचे घराच्या भिंती आणि जमीन शेणाने सरावायची पूर्ण अंगणभर शेणाने सडा टाकायचा.एक वेगळे वाटत असे. मग त्या ओल्या सारवलेल्या जमिनी वरून घरात ये जा करत असू मग आई ओरडत असे.पण आमचे लक्ष खिचडी कधी होते या कडे असे.परस्थिती मुळे थोडी बनवली जात आणि मला जास्त हवी म्हणून आम्ही हट्ट करत असू.मग आई बिचारी स्वताला थोडी ठेवी.आज खिचडी भरपूर आहे पण खाऊ वाटत नाही.
असेच असते ना ?असते तेव्हा ते नको वाटते .

फेसबुक पोस्ट

दिशा देणारे कोणी हवे असते .दिशा भेटली कि दिशा दाखवणाऱ्या मागे जाण्यास अनेक जण तयार असतात.


समुद्राला बघून नेहमी मनात विचार येतो.त्याच्या सारखे विशाल मन आमचे का नाही ?त्याच्या सारखा संयम आमच्या कडे का नाही .?अनेक नदया अनेक झरे आणि घाणेरडे नाले सगळे येउन मिळतात .अनेकदा नको तो कचरा आम्ही त्यात टाकतो .पण सगळे स्वता मध्ये सामावून घेतो .जर का त्याने ठरवले मर्यादा सोडायची तर काय होईल .अनेकदा आपण बोलतो समुद्र खवळला आहे .किती खवळला तरी तो किनाऱ्याची मर्यादा पाळतो .मग आपण का नाही आपल्या मर्यादा पाळत आपले मन का सागरा सारखे विशाल नाही 
असेच मनातले काही 
!! आशा !!

छोटी कथा .

आज उगाच तुझी खूप आठवण झाली .कारण आज फ्रेन्डशिप डे आहे ना ?
मैत्री दिन .........
तुला कॉल केला असता आणि बोलले असते.आज काय आहे माहिती आहे का ?
माहिती असून सुद्धा मुद्दाम बोलला असता ."नाही बाबा मला नाही माहिती आज काय आहे "
मी सांगितले असते आज फ्रेन्डशिप डे आहे.माझे वाक्य पूर्ण होण्या आधीच .म्हणजे काय असते ते? तुझा प्रश्न आला असता.तुला काय बोलायचे हे न समजून मी आपली बोलले असते.आज मैत्री दिन आहे ना .असे म्हणून तुला शुभेछ्या देणार या आधीच तू बोलला असता.मैत्री दिन म्हणजे काय ?काय असतो मैत्री दिन .परत आपले मी न समजून आपले मित्र असतात त्यांच्या साठी असलेला दिवस.
मैत्रीला आहे हे दाखवायला मैत्री दिनाची गरज असते का ?
ते जाउदे मला आधी सांग मैत्री म्हणजे काय ?कोणाला मित्र म्हणायचे ?,मैत्रीची व्याख्या नेमकी काय आहे?एका पाठोपाठ मला बोलू न देता धबधबा अंगावर कोसळावा तसे तुझे प्रश्न माझ्या कानावर आदळले असते.
तुझा एवढी हुशार नाही रे मी.मग माझा गोंधळ होणार मी माझ्या अल्प बुद्धीला जे माहिती ते तुला सांगण्याचा प्रयत्न करणार.
"मित्र तो ज्याला आपण सगळे मनातले सांगू शकतो."मी 
सगळे विचार करून बोलत आहेस ना ?खरच आपण सगळे सांगतो आपल्या "मित्राला सांगू शकतो! .मला नाही हे पटत अश्या अनेक गोष्टी असतात ग ज्या आपण कधीच कोणाला नाही सांगू शकत". .मी तुझा या बोलण्यावर निरुत्तर होते.
तरी बोलते असे काही नाही पण प्रत्येकला वाटते ना आपल्याला एक तरी मित्र असावा.जो आपल्या सुखात आपल्या दुखात साथ देईन.संकटात आपली मदत करेल .
पुन्हा तू यावर बोलला असता.सुखात साथ देणारा म्हणजे काय ?मित्रच काय सगळेच साथ देतात.आणि दुखात साथ देणारा म्हणजे काय ?तू कुठे बघून चालणार पडणार पाय मोडून घेणार आता यात मित्र तुझी काय साथ देणार सांग ."पाय दुखणार होणर्या वेदना तुलाच सहन करायला लागणार मग यात मित्र काय साथ देतो सांग"..उगाच तू आपली पाय बांधून हॉस्पिटलच्या बेडवर पडली आहेस आणि तुला भेटण्यास मित्र येतात काय करतात ग ते ?तुला विचारणार कुठे बघत होती .बघून चालता नाही येत का ?कसे झाले हे सगळे आणि तू सांगत बसणार .याला दुखं वाटून घेणे बोलत असेल तर मला नाही पटत.! तू बोलत राहणार मी फक्त ऐकत राहणार मलाच वाटत राहणार मीच चुकीचे बोलले.
पण मग दुखात मित्राची मदत होते हे कसे नाकारता येणार त्यावर तुझे परत जगा वेगळे विचार ऐकवणार .हो पण मदत कशी काय करावी काय झाले कसे झाले हे न विचारात तर आता काय करायचे हे नुसते भेटणे नाही.तर तुझा जवळ कोण आहे का मी थांबू .औषधे आली का आणू हि मदत पटते का ?बस एवढीच तुझी मैत्रीच व्याख्या का अजून आहे तुझा प्रश्न ...
एक नवरा बायको छान मित्र असू शकतात ना ?मी 
अजिबात नाही नवरा हा नवराच असतो आणि बायको हि बायकोच असते ,
उगाच आपले काही तरी म्हणे नवरा हा मित्र असतो .आणि बायको मैत्रीण .
आता मात्र मला काही बोलणे सुचणार नाही मी शांत बसते.आणि तू छान हसतोस .नन्तर मी हसते का माहिती आहे .तुझे ते खरे हे सांगण्यात तू यशस्वी झालेला आसतो आणि मी माघार घेतलेली असते .मी बोलते ते काही बरोबर हे तुला माहिती असते आणि मला पण ,पण तू बोलत असतानी ऐकात राहावे वाटते .तुझा बरोबर वाद घालू वाटत नाही.
कारण तुझा सहज बोलण्यात अनेक गोष्टीचा नकळत मलाच उलगडा झालेला असतो .आपण दुखी आहे किवा आपल्या वाट्याला दु:ख आले .आणि जर आपल्यला कोणी मदत नाही केली किवा ऐकून नाही घेतले तर आपल्याला राग येतो ना ?मग ते कोणी असो आपले मित्र नातेवाईक त्यांनी आपल्याला दुखात मदत केली नाही म्हणून आपण नाराज होतो पण खरच काय अधिकार असतो आपल्याला त्यांच्या वर नाराज होण्याचा ते कुठे आपल्या दुखां साठी जबाबदार असतात ?
म्हणून तुझा बरोबर वाद घालू वाटत नाही आणि घातला तरी तू शेवटी बर तुझे खरे असे बोलून तूच कसा बरोबर आहे हे मला लक्षात न येऊ देतात पटवून देणार .तुला आवडत नाही तरी मी आज तुला मैत्री दिनाच्या शुभेच्छा देते आहे .
!!!मैत्री दिनाच्या खूप शुभेछ्या!!!
असेच मनातले काही !!आशा !!
२/८/१५

मनस्थिती

नेहमी सारखी दिवसाची सुरवात होते.काही नवीन नसते काही वेगळे नसते.
पण मन मात्र नेहमी सारखे नसते.काय होते आहे स्वताला कळात नाही.
एक प्रकारची उदाशी असते.पण का कशा मुळे ते समजत नाही.काही नको वाटते.
कधी कधी मग एखादी छोटी गोष्टी जिला वरवर बघितले तर काही महत्व नसते .अशी गोष्ट मग अजून मन उदास करते.कुठे तरी मनाची तगमग होते.जीव घुसमटतो.एकटे वाटते.कोणी तरी काही तरी सांगत असते .काही विचारात असते.ते मेंदू पर्यत जात नाही.मग समोरील कोणी तरी विचारात राहते काय झाले? .काय सांगणार काय झाले .उत्तर स्वताला तरी कुठे माहिती असते .
असेच मनातले काही .

असेच काही

शरीराला आजार झाला तर त्याचा मनावर परिणाम होतो का?ोो पण थोडा .शरीराल झालला आजार हा औषधे घेवून बरा होतो .पण आजारात मन काही काळासाठी हळवे होते .स्वभाव चिडचिडा होतो .म्हणजे शरीराच्या आजराचा मनावर परिणाम होतो .पण औषधे घेवून शरीराचे आजार बरा होतो .पण जर मनाला अजार झाला तर त्याचा शरीरावर मोठा परिणाम होतो जो दिसून येत नाही .म्हणून त्यावर औषधे लगेच घेतली जात नाही .दिवसेदिवस आजार वाढत जातो .आणि एक दिवस जेव्हा लक्षात येते एक तर व्यक्ती मनोरुग्ण होते .किवा पूर्णता वेडी .या आजाराचा परिणाम मग शरीरावर होतो .लवकर इलाज केला तर त्यातून बाहेर पडता येते नाही .
असेच मनातले काही .
!! आशा !!  


वाईट गोष्टीची एवढी सवय होते समाजाला कि मग चांगल्या गोष्टी जाचक वाटायला लागतात.



मोगर्याला कधी आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दयावी लागत नाही .त्याचा सुवास त्याच्या आजूबाजचे वातावरण प्रसन्न करत असतो .काही व्यक्ती अश्याच असतात जिथे जातात तिथले वातावरण प्रसन्न करत असतात .


आपण काही तरी बोलत असतो किवा बोलायचे असते.पण अनेकदा आपण भलतेच काही तरी बोलत बसतो.खरे तर तुम्हाला काही तरी बोलायचे असते.समोरच्याला काही ऐकायचे असते.पण तुम्हाला जे बोलायचे ते तुम्ही बोलत नाही .कधी कधी समोरच्याला देखील काही सांगायचे असते पण तो देखील असेच नको त्या विषयावर बोलत राहतो .असेच चालू राहते जे बोलायचे ते कधीच बोलले जात नाही.अनेकदा होते ना असे ?
असेच मनातले काही ...

लाईक कॉम्मेंत

आजूबाजूला अनेक स्वभावाचे लोक आपल्याला दिसतात किवा असतात.
प्रत्येकाची आवडी वेगळ्या वेगळ्या असतात.कोणाला काय आवडते कोणाला काय.प्रत्येकाचे मते वेगवेगळी आणि त्या मुळे मी बरोबर असे विचार दिसतात.
हे झाले वास्तव जगातले येथे जेव्हा मते वेगवेगळे येतात तेव्हा आपण त्याला चर्चा म्हणतो.येथे आपण कधी टोकाचे म्हणजे तुझे आता तोंड पण बघणार नाही असी भूमिका कधी नसते .
पण या आभासी जगात असे होते का ?
याचे उत्तर अनेकदा नाही असे येते.येथे वर्तमानात जगणारे अनेक आहे.तसे काही निष्पन्न न करणार्या भूतकाळात रमणारे देखील आहे.वर्तामानात जगणारे नेहमी आजचा विचार करतात मग त्यांच्या पोस्ट देखील तश्या येतात.तर काहीना इतिहासात रमायला आवडते मग आज ज्याचा काही फायदा नाही अश्या विषयावर ते पोस्ट टाकतात.ते मग इतिहासातील कोणत्यातरी व्यक्तीचे भक्त असतात किवा त्यांच्या वर त्यांचा प्रभाव असतो.त्यांना वाटते बाकीच्यांनी पण त्यांना वाटते तसेच वाटावे.पण असे होत नाही.मग आज आणि काल अशा वाद रंगतो.आणि अनेक दिवस एकमेकाचे फेसबुक मित्र हे एकमेकांना ब्लॉक करतात.
तर काही अतिशय संवेदना शील लेखन करतात.कोणाच्या पण डोळ्यात पाणी आणणारे त्यांचे लेखन असते.हे लोक जगत मित्र असल्या सारखे असतात.यांच्या पोस्ट वर सहसा वाद होताना दिसत नाही. ते असतात आणि नसतात असे येथे वावरत असतात.त्यांना सगळे ओळखत असतात.त्यांना कधी कोणी ब्लॉक करत नाही.वास्तव जगातल्या सारखे येथे पण अनेक जन "बदनाम हुआ तो क्या हुआ नाम तो हुआ "असे पण असतात.मग ते काही तरी वादग्रस्त पोस्ट टाकतात.आणि चूप बसतात मग अनेक जण त्यावर कॉम्मेंत करत बसतात.आणि हि व्यक्ती फक्त मजा बघत असते.
अनेक जन विचारवंत असल्या सारखे काही तरी लिहितात.ते जे लिहितात ते अजिबात सामान्य बुद्धीच्या लोकांना समजत नाही.त्यांचे लिखाण मध्ये एक वेगळा विचार असतो वरवर साधे वाटणारे हे लिखाण असते.पण ते सरळ नसते.त्यांना खूप काही सुचवायचे असते,पण सगळे विचारवंत नसतात त्या मुळे प्रचंड गोंधळ होतो.त्यातील विचार राहतो बाजूला आणि विषय नको तिकडे जातो.मग पोस्ट करणारी व्यक्ती आता काय बोलू म्हणून शांत बसते.आणि बाकीचे उगाच हे असे ते असे म्हणून कॉम्मेंत मध्ये वाद घालत बसतात.
खरेच फेसबुक मानवी स्वभावाचे एक न उलगडणार कोडे वाटते कधी कधी ...........
असेच मनातले काही
!!आशा !!

संग्रहित फेसबुक पोस्ट

भारत कृषी प्रधान देश आहे असे आपण म्हणतो कि समजतो माहिती नाही पण आज शेतकर्याचे हाल बघून तसे वाटत नाही .आज अनेक अशा वर्ग आहे.जे मुख्य प्रवाहां पासून दूर आहे .स्वताचे हक्क देखील त्याना माहिती नाही.खूप मोठी विषमता आहे .एक वर्ग खूप पुढे गेला आहे तर एक वर्ग आज पण मागे आहे .पुढे जे गेले त्याना जाणीवच नाही जे मागे राहिले त्यांचा विचार करावा त्यांच्या साठी काही करावे .ज्या मुलांच्या हातात उद्याचे भविष्य आहे त्यांच्या पुढे आज काय आदर्श आहे .फक्त उच्च शिक्षण घ्या .कसा साठी तर चांगली नोकरी मिळावी या साठी आज जो तो फक्त स्वताचा विचार करत आहे एवढे वर्ष होऊन देखील खरंच आम्ही स्वतंत्र आहे का .



आयुष्य हे क्षणभंगुर आहे.
हे तर सगळ्यांना माहिती असते तरी सुद्धा या छोट्या आयुष्यात आपल्यला किती अहंकार ,गर्व ,स्वाभिमान आणि काय काय असते.आपण खूप काही कमावतो.अमाप पैसा ,बंगला गाडी आणि काय काय ?पण खरच आपण काही बरोबर घेवून जातो का ?नाही मग तरी आपण का माणूस असून अनेकदा माणुसकी नसल्या सारखे वागतो.खरी संपत्ती असते ती आपण आपल्या आजूबाजूला निर्माण केलेली मायेची माणसे ,अशी माणसे जी आपण गेल्यावर सुद्धा आपल्याला विसरत नाही.
छोटे आयुष्य असते त्यात मीच महान म्हणून आपण अनेकदा समोरच्याला समजून न घेता.त्याला काय म्हणायचे आहे हा विचार न करता अनेकदा खूप नावे ठेवून घेतो.कारण आपला अहंकार दुखावला जातो.पण जर हाच अहंकार बाजूला ठेवला तर ? नात्यात कधी दुरावा येणार नाही.
नाही का ???
असेच मनातले काही



माणसाने समजदार असावे ,जिद्दी आणि हट्टी नसावे नाही का ?




मानलेले नाते किती जरी चांगले वाटत असले तरी .अनेकदा रक्ताचे नाते शेवटी वरचढ ठरते.कदाचित हा माझा अनुभव आहे .कदाचित कोणते नाते जास्त करून पैश्यात तोलले जाते आजच्या जमान्यात .
याला अपवाद पण असू शकतात . 




प्रगती कशामुळे होते इतिहासात रमल्या मुळे कि वर्तमाना मध्ये जगून भविष्याचा विचार केल्या मुळे प्रगती होते .इतिहासात रमणे योग्य कि वर्तमानात जगणे .


एखाद्याचे आयुष्य हे चार चौघा सारखे नसते .पण काही प्रमाणात त्यासाठी ते स्वता जबाबदार असतात.त्यांचे विचार त्याला कारणीभूत असतात.मी बरोबर हा त्यांचा समज असतो .असे लोक समोरच्याला अजिबात समजून घेत नाही .आणि दुसर्याला दुखी करतात आणि स्वता आयुष्यभर दुखी राहतात .त्याचे खापर मात्र समोरच्या वर फोडतात .अश्या लोकाना कोणी समजावू नाही शकत .







आपल्या महाराष्ट्र असे राज्य आहे तिथे कोसावर भाषा बदलते.असे बोलले जाते.
मुंबई मध्ये बोलली जाणारी भाषा हि थोडी मिक्स असी भाषा आहे.म्हणून ती सुशिक्षिताची भाषा आहे असा काही लोकांचा समज आहे.कारण मुंबईत राहतात म्हणजे आम्ही सुशिक्षित असे अनेक लोकांना वाटते.
माझ्या बोलण्याचा अनेकांना राग देखील येईल.पण माझा अनुभव आणि अनेकदा बघितले आहे मुंबई मध्ये राहणारे लोक जेव्हा मुंबई बाहेरील कोणी मग ते किती शिकलेले असेल तरी सरळ घाटी किवा गावठी मुंबई भाषेत जी .पी बोलतात.कोणाची हुशारी हि त्याच्या भाषेत असते का ?मग का काही लोक बोलण्यावरून कोणा बद्दल मत बनवतात.अनेकदा एखादी व्यक्ती हि गाव पातळीवर खूप नामांकित सुद्धा असते.यशस्वी असते.त्यांना खूप मान देखील असतो.फक्त ती गावाला किवा खेड्यात राहत असेल तर तिला खेडवळ किवा गावठी बोलणे योग्य आहे का ?
असेच मनातले काही ....





जे लोक एकच विषय पकडून त्यावर परत परत लिहितात.म्हणजे जे कुठे तरी वाद करणारे असते.किवा लोकांना तो विषय नको असतो.अश्या पोस्ट कडे लोक सरळ दुर्लक्ष करतात.गेले साडेचार वर्षातील अनुभव .....

डॉक्टर

डॉक्टर आणि नर्स मला या जगात सगळ्यात ग्रेट वाटतात .कारण त्यांच्या समोर कोण आहे (श्रीमंत कि गरीब )हे ते बघत नाही ते फक्त काम करतात .
आज मी हि पोस्ट टाकली.अनेकदा आपण एखाद्या आजाराने त्रस्त होतो.त्यावर उपाय हे डॉक्टरा कडे असतात.आज डॉक्टर खूप पैसे घेतात हे खरे आहे.
मुंबई मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत अनेक हॉस्पिटल काम करतात.
त्यामध्ये के .ई .एम,नायर ,जे.जे.हॉस्पिटल आणि कामा हॉस्पीटल या मध्ये मी स्वता उपचार घेतला नाही पणअनेकदा कोणा न कोणा बरोबर गेले आहे.
मुंबईमध्ये अनेकदा साथीचे आजार येतात. सगळे तर पैसेवाले नसतात.अश्या वेळी याहॉस्पिटल मध्ये एवढी गर्दी होते कि खाटा कमी पडतात.अश्या वेळी अक्षरशः खाली गाद्या
टाकून रुग्णाचा इलाज केला जातो.अश्या वेळी सगळे पेशंट हे चांगल्या घरातील असतात का?
कधी कधी फुटपाथवर राहणारी लोक सुद्धा असतात.तेव्हा डॉक्टर हाविचार करतात का? आपण इलाज करतो ते कोण आहे .त्यांची राहणी काय आहे? तो कसा दिसतो.? नाही ना?
म्हणून मला डॉक्टर हे दुसरे जीवन देणारे ग्रेट वाटतात.
मुंबई मध्ये जेव्हा कधी बॉम्बस्फोट होतात .तेव्हा याच हॉस्पिटल मधील डॉक्टर आणि सगळेच मग त्या नर्स असो कि वार्डबॉय सगळे काम करतात.जे.जे हॉस्पिटल मध्ये तर कुठूनकुठून लोक येतात.ते आजार खूप वाढलेला असतो तेव्हा.कधी कधी मोठे ऑपरेशन करून पण हा पेशंट वाचणार नाही हे माहिती असून सुद्धा फक्त शेवट पर्यंत प्रयत्न म्हणून ऑपरेशन् केले जाते.हेतर झाले मुंबई मधील ...परंतु प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक सी.वी.ल हॉस्पिटल असते.तिथे अनेक गरीब रुग्णाचा इलाज होतो .हो पणअनेकदा तिथे चांगलाच अनुभव येईन याची ग्यारंटी नसते.
अनेक हॉस्पिटल आज एखादे फाईव स्टार हॉटेल असावे असे दिसतात आणि असतात.मग त्यांची फी भरमसाठ असते.जी सामन्य लोकांना परवडत नाही.पण अनेक मोठे डॉक्टर आज ट्रस्ट किवा सरकारी हॉस्पिटल साठी आपला वेळ देतात. हे आपल्याला माहिती सुद्धा नसते.
काही असले तरी नवीन जीवन देण्याचे काम डॉक्टर करतात हे सत्य नाकारून पण चालत नाही.

Wednesday, 26 August 2015

उपवास

उद्या श्रावणातील पहिला सोमवार ,
प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या देवाची पूजा करायची आवड असते.मला आवड आहे शिव पूजा करण्याची.
मी खरे तर अति देवभोळी अजिबात नाही पण मला आवडते पूजा करणे.लग्ना आधी मातीचे घर होते मग काय सोमवारी सकाळी लवकर उठून शेणाने जमीन सरावाने अगण भर सडा टाकणे.त्यावर रांगोळी काढणे.काही न खाता उपवास करणे.गावाच्या दुसर्या टोकाला असलेल्या मंदिरात जाणे हे माझे आवडते उद्योग असायचे.पूर्ण महिना कोणता ना कोणता उपवास आणि पूजा असे.
त्याकाळी घरोघर खेड्यात तरी टीव्ही कमीच होते.त्यामुळे श्रावणात कोणाकडे ना कोणाकडे नवनाथ हे ग्रंथ वाचला जात असे .दिवसभर शेतात काम असे म्हणून हे पोथीवाचन रात्री असे.ते ऐकायला शेजारी जमत.दरवर्षी तीच पोथी परत परत ऐकतानी कंटाळा देखील येत नसे.घरात पोथी आणि नंतर आरती होते असे त्या मुळे त्या कधी पाठ करायला लागले नाही.
आजूबाजूच्या वातावरणाचा नकळत असर होतो आपल्यावर.पूर्ण महिना किती छान वातावरण असे. त्यावेळी मोठे सांगतील ते ऐकण्याचा जमाना
होता त्यामुळे उपवास का करायचा त्याने काय होते असे कोणी विचारात नसत.श्रावण पाळत सगळे.काय होते श्रावणात नॉनव्हेज खाल्ले तर "आम्ही खातो आमचे मुले नाही राहू शकत खाल्ल्या शिवाय "असे कोणी म्हणत नसत .मोठ्या माणसांचा एक आदर असायचा ,
लग्न झाले आणि मुंबई सारख्या शहरात आले.आणि ज्या दिवशी नॉनव्हेज नाही खात तो दिवस उपवास हे नवीन समजले.
आजूबाजूचा असर नकळत होत गेला.हिंदू म्हणण्या पेक्षा मराठी लोक बिल्डींग मध्ये नावाला होते.मग काय कोणता उपवास लक्षात ठेव्तानी कालनिर्णय वर मोठे दिसतील असे गोल मारून ठेवायला लागत असे.आयुष्यात खूप काही बदलत गेले,आणि देवावरील विस्वास उडत गेला.सगळे उपवास सोडून दिले.पण किती काही असले तरी श्रावण महिना मात्र आज पण आवडतो.
खूप फुले आणणे हार बनवणे.घरात पोथी वाचन करणे हे मात्र आज पण मना पासून करते.
असेच मनातले काही

१६/८/१५