#मानसिक_क्रयशक्ती
(Psychological purchase power)
@सचिन मधुकर परांजपे
सकारात्मक विचारसरणीचा पाया (Base) हा आनंदमय आणि शुभ हवा असं मला वाटतं. सकारात्मक विचारसरणीचा या लेखातला संदर्भ हा आपण आत्ता श्रीमंती पुरता घेऊया. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात #श्रीमंती आणि #ऐश्वर्यसंपन्नत्ता या गोष्टीला कमीअधिक प्रमाणात महत्त्व आहेच (जी माणसं पैसा, श्रीमंती याला महत्व देत नाहीत अशांनी हा लेख वाचण्यात वेळ फुकट घालवू नये) माझ्या मते भरपूर पैसा हा तुमच्या आयुष्यातील ९९% समस्या चुटकीसरशी संपवू शकतो. १% तुमचं नशिब...
पैसा भरपूर शिल्लक असणे म्हणजे व्यक्ती श्रीमंत आहे असं मी मानत नाही. असलेल्या पैशाला क्रयशक्तीची बाजू मजबूत असणं अत्यंत गरजेचे आहे. क्रयशक्ती म्हणजे purchasing power. पैसा खर्च करुन सुखाची साधने, सेवा, गरजा, जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याची क्षमता. पैसा असला म्हणजे क्रयशक्ती असतेच असं नाही आणि पैसा अजिबात नसेल तरी क्रयशक्तीचा अभाव अर्थात असतो. गाठीशी पैसा नसताना क्रयशक्तीचा वापर केला तर मनुष्य कर्जबाजारी होतो (क्रेडिट कार्ड लोन्स ओव्हड्यू होणे वगैरे) पैसा असताना क्रयशक्ती नसणे हे कंजुसपणा किंवा कर्मदरिद्रीपणाचे लक्षण आहे. Believe me, प्रत्येक कंजुस आणि कवडीचुंबक माणसाचा मुलगा किंवा नातू उधळ्या असतो. तो साठवलेल्या पैशाचा सत्यानाश करतो. या लेखात आपण क्रयशक्तीचा समन्वय पहाणार आहोत.. तो मानसिक पातळीवर...
Thought is a matter असं गौतम बुद्ध म्हणतात. विचार ही एक वस्तू आहे. विचार घटना घडवून आणतात (किंवा बिघडवतात) मला मर्सिडीज बेन्झ एस क्लास किंवा रोल्स रॉईस फॅन्टम घ्यायची आहे. मला स्वित्झर्लंडला स्वतःच्या मालकीची आलिशान विला हवी आहे इथपासून मला फाईव्ह स्टार हॉटेलमधे डिनर करायचे आहे किंवा मला केल्विन क्लेन्सची डेनिम हवी आहे... या प्रत्येक इच्छा या काही कोटी रुपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंतच्या मुल्याच्या आहेत. या वस्तू हव्या असतील तर मला विविक्षित रक्कम खर्च करावी लागेल. ती रक्कम माझ्याकडे नसेल तर मला वस्तू मिळणार नाहीत इतकं सोपं गणित आहे. इथे आपण रोज एक छोटीशी Exercise करायची आहे....
आपल्या ज्या इच्छा अपूर्ण आहेत, ज्या गोष्टी/वस्तू/सेवा/साधने खरेदी करायची मनापासून तीव्र इच्छा आहे त्या कमाल पाच गोष्टी (maximum 5) मनात त्यांच्या अंदाजे मुल्यासकट तयार करायच्या. सुरुवातीला त्या गोष्टी अप्राप्य पण तरीही शक्यतेच्या टप्प्यातल्या निवडायच्या (उदा. आयफोन 11 Pro मॅक्स किंमत अंदाजे 1,24000) अशाच “तत्सम पाच वस्तू खरेदी करण्याची माझी इच्छा आहे आणि मजजवळ तेवढे पैसे आहेत” हे वाक्य तयार करुन ते एका कागदावर लिहून तो कागद कायम स्वतःपाशी बाळगावा. म्हणजे पाच वस्तूंची नावे, समोर अंदाजे किंमत आणि खाली एकूण किंमत व वर दिलेलं वाक्य... पेनाच्या शाईचा रंग, कागदाचा रंग, टाईप या गोष्टी दुय्यम आहेत. त्या कागदालाही कसलं बंधन, सोयरसुतक, मासिक पाळी वगैरे बंधने नाहीत. (तुमच्या मनात येईल ते कोणतंही बंधन नाही) तो कागद फक्त जवळ वॉलेटमधे बाळगायचा आणि दिवसातून दहा वेळा तरी वाचायचा. शक्यतो कोणालाही दाखवू नका. कागदाच्या अगदी तळाशी ज्यांच्याकडून तुम्हाला ही पोस्ट मिळाली ती व्यक्ती, मी आणि बाबाजींचे लेखी आभार मानावे (हे गुढ रहस्य आज देत आहे म्हणून) फक्त आभारप्रदर्शन लेखी करायचे (औपचारिक)
पाच वस्तूंच्या खरेदीची जी जी इच्छा पूर्ण होत जाईल त्या त्या वस्तू आणि किमतीवर काट मारायची. पाचही वस्तू खरेदी झाल्यावर तो कागद विसर्जन करायला हवा. लक्षात ठेवा हे काम फक्त मटेरियलिस्टीक, भौतिक वस्तूंच्या खरेदीसाठीच आहे (बाकी इच्छा नाही). In short, ज्या गोष्टी अप्राप्य आहेत त्या आपण नक्की खरेदी करु शकतो, तेवढे पैसे आपण लिलया खर्च करु शकतो हे तुमच्या आंतर्मनावर सातत्याने बिंबायला हवंय. आणि कालांतराने काही रक्कम उभी रहायला सुरुवात होते जी संबंधित वस्तूच्या खरेदीसाठीच आहे हेही समजून येते. याशिवाय काही शंका असल्यास विचारणे. सवडीने उत्तर देतो.
-सचिन मधुकर परांजपे (पालघर)
#बाबाजी_महाराजांचे धन्यवाद आणि हजारो वाचकांस निरोप्या म्हणून माझी निवड करण्यात आली त्याबद्दल आभार