Saturday, 28 October 2023

व्यसन

कोणते व्यसन असो ते वाईटच मग ते कोणी करत असो.स्त्री की पुरुष...

आम्हाला हवे तसे आम्ही जगू असे बोलून आयुष्याला फाट्यावर मारणारे अनेक आहेत.आज काल कोणत्या गोष्टीची एन्जॉयमेन्टची कल्पना खूप बदलली आहे.कोणत्या गोष्टीची पार्टी म्हणजे ड्रिंक हवे असेच बघायला मिळते.जे ड्रिंक करत नाही त्यांना वेड्यात काढले जाते हे अनेकदा बघायला मिळते.

खरे काय खावे काय प्यावे ज्याचा त्याचा प्रश्न असतो.पण त्या गोष्टी करू नाही.त्या स्वतासाठी.आपल्या आरोग्या साठी.जर सिगारेटच्या पाकिटावर लिहिलेले असते.आरोग्यास हानिकारक आहे तर ते खरच हानिकारक असते.म्हणून तर त्यावर तसे लिहिले असते.फक्त दुसरा कोणी पितो म्हणून मी पितो  किंवा पिऊन बघितली तर आपण आपल्या स्वतःच्या आरोग्या बरोबर खेळतो हे समजायला हवे.

शहरात लोक काही करतात म्हणून त्याचे अनुकरण खेड्यातील लोक करतात किंवा आजचे तरुण तरुणी करतात.असे बोलणे साफ चूक आहे.मान्य खेड्यातील लोकांना शहरी जीवनाचे कुतूहल असते.तेथील फॅशनचे वेड असते.म्हणून तो प्रत्येक गोष्टीचे अनुकरण करत नाही.अपवाद कुठे नसतात तसे काही अपवाद ठरतात.

खेड्यातील मुलांना आपल्या परिस्थितीची नेहमी जाणीव असते.भले मग त्यांनी आधुनिक पोशाख जरी स्वीकारला असला तरी.फक्त काही फोटो बघून किंवा कोणाला एन्जॉय करताना बघून कोणी लगेच तसे करत नाही.जर तसे असते तर अनेक चित्रपट बघून कधी ते तसे वागले असते.

आपला नवरा परक्या बाई कडे जातो म्हणून स्वता ड्रिंक करणारी मीना कुमारीचा साहेब बीबी और गुलाम चित्रपट बघून कोणती बाई प्यायला लागली हे तर कधी बघितले नाही.अनेक बायकांचे नवरे हे दारू पिऊन 24 तास नशेत असतात.काही काम करत नाही.त्यांना त्यांची बायको सांभाळते.हे चित्र अनेक खेड्यात दिसते.म्हणून कोणती बाई नवरा पितो म्हणून ती पिते हे बघितले नाही.

मी एक छोट्या खेड्यातुन मुंबईत आले.दोन्ही जीवन पद्धती बघितल्या.दोन्ही मध्ये जमीन अस्मानचा फरक बघितला.खेड्यात वाढलेली मी अनेकदा भांबावून गेली.ग्रामीण जीवनातील झालेले संस्कार माणुसकी या शहरी जीवनात अनेकदा कुचकामी वाटले.पण आपल्यावर झालेले संस्कार अगदी खोल रुतलेले असतात.ते किती मोहाचे क्षण आले तरी सुटत नाही याचा अनुभव घेतला.
मी पूर्ण व्हेज तर आजूबाजुंल रोज नॉनव्हेज खाणारे.एवढेच नाही तर   त्यांच्या प्रत्येक प्रोग्रॅम मध्ये ड्रिंक केले जाते.अगदी बायका देखील.म्हणून मला कधी  वाटले नाही ते सगळे करावे.तुम्ही कोणाला किती फोल्लो करा किती कोणा बरोबर राहा त्याने फरक पडत नाही.

आज सरस मुली स्मोक करतात.ड्रिंक करतात.त्यांची त्याची आपली कारणे आहे.कोणाला त्यात थ्रिल वाटते.कोणाला गरज.मुंबई सारख्या शहरात अनेक ठिकाणावरून मुली येतात.एकट्या राहतात कधी कामाचे प्रेशर कधी सगळे झटपट मिळावे म्हणून स्वीकारलेले चुकीचे मार्ग.त्यातून आलेले डिप्रेशन .....टोकाचा एकटे पणा......मुंबईत भरपूर पैसे आहे.पण दुःख वाटून घेण्यास कोणाला वेळ नाही.सगळी दारे बंद......

खरे तर काही कारणे असले तरी कोणते व्यसन कधी अयोग्यच.मग ते कोणी करो.

मुंबईतील मरीन ड्राईव्ह माझे आवडते ठिकाण ,अनेकदा येथे जाऊन बसते.अनेक तरुणाई येथे मोठ्या संख्येने येते.मी फक्त निरीक्षण करत असते.कोणी येऊन चुपचाप फक्त समुद्रा कडे बघत बसणारे.कोणी प्रचंड उत्साही.नकळत कानावर पडणारे संवाद........खूप काही सांगून जातात.मग माझेच मला जाणवते "आमच्या वेळी नव्हते असे काही हे वाक्य "खूप चूक आहे.कारण बदल .............

असेच मनातले काही

Wednesday, 25 October 2023

अंतिम संस्कार आणि समाज

आपल्या आजूबाजूला असणारे लोक .....कोणी श्रीमंत कोणी गरीब.कोणाचा बंगला कोणाचा फ्लॅट तर कोणाची झोपडी.अनेक विविधता...त्यानुसार ठरत असते माणसांची योग्यता ...हा समाज ठरवतो.

माणसाला मान त्याच्या हुशारी वर किंवा त्याच्यातील कलागुण वर मिळत नाही त्याला मान मिळतो त्याच्या कडे असलेल्या पैश्यावर नाही तर एक गाण्यासाठी लाख रुपये घेणाऱ्या एखाद्या गायक असतो.त्याच्या सारखे कोणी तरी गाणी गात भिक मागत असतात तेव्हा त्याची किंमत काही नाणे असते.मग तो किती छान गात असेल तरी.हे एक उदाहरण झाले.असे उदाहरण अनेक बाबतीत दिसून येतात.

रोज जगताना आपण तरी वेगळे काय करत असतो.आपण देखील एखदया मोठ्या प्रसिध्द असलेल्या व्यक्तीला मान देतो.तो मान त्या व्यक्तीला नसतो तर त्याच्या कडे असणाऱ्या गाडी,बंगला त्याच्या अंगावर असणाऱ्या कपड्यांना असतो.माणसाच्या अंगावर चांगले कपडे नसू द्या त्याला कोणी जवळ उभे करत नाहीत.

आपण शाळेत असतो शाळेचा एक ड्रेस कोड असतो.तेव्हा त्या निरागस वयात जास्त विषमता जाणवत नाही.कधी तिथे एखाद्याचे रूप त्याचे मळके कपडे त्याच्या पायात नसणारी चप्पल किंवा त्याच्या दफ्तर ची क्वालिटी यावरून काही त्यांच्यापासून अंतर ठेवून राहतात.

शाळा मागे पडते आयुष्याच्या शाळेत प्रवेश केला की सगळे बदलते.आधीच सधन असलेले पुढे जातात.गरिबीतून आलेले गरिबी पाचवीला पुजल्या सारखी असते ते गरीबच राहतात.खूप अपवाद असतात.शिक्षणाने त्यांचा कायपालट होतो.या सगळ्यातून ते बाहेर पडतात.

एकच वर्गात असणारे एकच बाकावर बसणारे पुढे जावून खूप सामाजिक अंतर सहन करतात.पैश्या अभावी शाळा सोडावी लागते नाही तर घरातील कोणाच्या तरी मनमानी मुळे सुटते. कुठे तरी काम करून पोट भरणे सुरू असते.आपल्या बरोबरची लोक पुढे गेले याचे दुःख असते.लग्न होते परस्थिती बदलते नाही तर तशीच राहते.नकळत कधीकधी वाईट संगत लागते.व्यसन सुरू होते ते वाढत जाते तेव्हा नकळत सामाजिक दरी वाढत जाते.लोक आपल्याला टाळतात ही भावना अजून व्यसनाधीन करते.मग ती वेळ येते घरातील लोकांना नकोसे होऊन जातात.असे अनेक जीव मग एक दिवस जग सोडून जातात.त्यांच्या जाण्यामुळे कोणाला काडीचा फरक पडत नाही.

असे लोक मात्र अनेक प्रश्न मनात निर्माण करतात.यांना लोक टाळतात याचे दुःख होत आसेल ना?आपला संसार चार लोकासारखा नाही याची खंत असेल का,?त्यांच्या मनात खूप काही असेल का?त्यांना लोकाबरोबर बोलावं वाटत असेल का?
असे लोक जातात जिवंत असताना पोटासाठी वाटेल ते काम करतात.अगदी मिळेल त्या मोबदल्यात.अनेक वर्षानुवर्ष एखाद्या ठिकाणी ते काम करत असतील तर त्यांच्या मृत्यू नंतर ते काम असतील तेथील लोकांना त्यांच्या बद्दल नक्की काय वाटतं असेल.ते त्यांना शेवटाचा निरोप तरी द्यायला जात असतील का?
असे लोक जेव्हा जातात तेव्हा त्यांच्या अंत यात्रेत लोकांना जाण्याचा काडीचा रस नसतो.पण त्याच ठिकाणी एखादी मोठी व्यक्ती गेली तर हे लोक स्वतःहून जातात.येथे नाही गेले तरी कोणाच्या लक्षात येणार नसते तरी ही.

मुंबई सारख्या शहरात रेल्वे खाली येऊन बेवारस अनेक लोक मरतात.त्यांचा अंतिम संस्कार करण्याची मोठी जबाबदारी बी एम सी वर येते.अश्या वेळी कोणाला तरी पुढे जावं लागतं.हे सगळे बघून मुंबई पोलीस मधील एक महिला पोलिस हिने अश्या गोष्टी साठी पुढाकार घेऊन आज पर्यंत पाचशे पेक्षा जास्त लोकांचा अंतिम संस्कार केला आहे.ते कोण हे माहिती नसताना.
अश्या वेळी आपल्याला आजूबाजूला रोज दिसणारा एक व्यक्ती मृत्यू पावतो.पण त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या त्याला ओळखणाऱ्या लोकांना मात्र जावं वाटत नाही.हे खूप खटकते.

असेच मनातले काहीत