Monday, 18 April 2016

बंधन,सीमारेषा ,आणि धाडस यामध्ये काय फरक आहे .

बंधन,सीमारेषा ,आणि धाडस यामध्ये काय फरक आहे .
बंधन-
बंधन मग कधी आपणच आपल्याला घातली असतात तर काही बंधन
हे समाजाने घालून दिले जातात किवा समाजाच्या भीतीने पाळली जातात.
यात समाजाने घालून दिलेली बंधन अनेकदा समाजाची घडी व्यवस्थित 
राहावी या साठी असतात म्हणून ते समाज ते बंधन पाळतात.जेव्हा ती
तोडण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा त्या व्यक्तींना समाजाच्या रोषाचे बळी 

होयला लागते.बंधने आवडत नाही पण ते नाकारण्याची हिम्मत नसते तेव्हा
ती भीतीने पाळली जातात.मनातून ते आवडत नाही.पण समाजा विरोधी
जाण्याचे धाडस नसते.
सगळ्यात म्हत्वाचे बंधन हे स्वताच स्वताला घेतलेले असते .
यात कोणाची भीती असते असे नाही किवा समाज सांगतो म्हणून
देखील पाळली जातात असे नाही.तर ते मनावर झालेल्या खोल
संस्कारातून असे बंधन पाळली जातात.कुठे तरी नकळत्या वया पासून
येता जाता .किवा उठता बसता सांगितली जातात.त्यात आजूबाजूचे
वातावरण याच परिणाम देखील असतो.एखादी गोष्ट हि चूक आहे सांगितले
तर मनात पक्के होते ह चूक आहे .कधी कधी मोठ्या झाल्यावर समजते
हे चूक नाहीच .
सीमारेषा -जसे मनाचे बंधन आपण स्वताला घालतो तसेच सींमारेषा
सुद्धा आपणच ठरवतो.त्या देखील येतात संस्कारातून.कधी तरी कडक
शिस्त म्हणून आपण त्या स्वीकारलेल्या असले तरी अनेक ठिकाणी आपल्याला
त्याचा उपयोग होतो.उदाहरण-एखादी गोष्ट करायची नाही ती बरोबर नाही.
बाकी करतात तरी आपण करत नाही .
धाडस-धाडस कधी करावे जेव्हा ते केल्यावर काही तरी चांगले घडणार असेल .
ज्यामुळे कोणाला त्रास होणार नसेल तर ते नक्की करावे.पण असे धाडस करू नाही.

ज्यामुळे आपण लोकांच्या नजरेतून उतारून जावू.अनेक गोष्टी मनात असतात.त्याकेल्या 
नाही तर लोक तुम्हाला नाव ठेवू शकतात .पण तुम्हला
त्यायोग्य वाटत नाही तर कोणी काही बोलो नाही करायचे .कारणते तुम्ही करू
शकता पण तुम्ही त्या करत नाही कारण स्वताला घातलेले बंधन आणि स्वताच 

स्वता साठी आखलेल्या सीमारेषा ..............
असेच मनातले काही

Tuesday, 5 April 2016

आम्ही देखील माणसेच आहोत ..........




आम्ही देखील माणसेच आहोत ..........
रोज आपण अपघाताच्या बातम्या वाचतो. मग ते कधी वाईट रस्त्यामुळे होतात तर कधी वाहनचालकाच्या चुकामुळे होतात. कोणा मुळे जरी होता असले तरी त्याचे परिणाम मात्र खूप गंभीर असतात .कोणी स्वताचा जीव गमवतात तर कोणी आपल्या जवळच्या कोणाचा .कधी कधी कायमचे लाचार करणारे अपंगत्व येते .वाहनचालकाच्या चुका मुळे अपघात होतात.कारण आपल्याकडे कोणी गाडी चालवतात.अनेकदा अनेक तास सतत वाहन चालवण्यामुळे ,आराम न मिळाल्या मुळे नाही तर अपुरी झोप यामुळे अपघात होतात. खराब रस्ते आणि नेहमीची वाहतूक कोंडी यामुळे वाहनचालकाची होणारी चिडचीड हे एक कारण असते.
अनेकदा दहशतवादी कारवाया होवू नाही म्हणून पोलिसांना नाकेबंदी करायलालागते.त्यात अनेकदा वाहनचालकांना त्रास देणे हा हेतू असतोच असे नाही आपल्या वरिष्ठांना आपण किती वाहन चेक केले याचा रिपोर्ट दयायला लागतो.
पण पोलीस हे लाचखोर आणि नाक्यानाक्यावर पैसे जमा करणारे म्हणून बदनाम असतात. {अर्थात लोक देतात ते घेतात} दूरवरून पोलीस दिसले कि लोक आधीच शिव्या घालतात.पण कधी तरी निरीक्षण करा .नेहमी सगळ्या गाड्या ते चेक करतात का नाही. जेव्हा वरून आदेश असतो अमुक गाड्या बद्दल संशय आहे .जसे कधी स्कूटर ,तर कधी टेम्पो ,कधी taxi ,कधी रिक्षा. त्या गाड्या अडवून चेक केल्या जातात .अर्थात हे मी मुंबईतील बोलत आहे 
अशी नाकेबंदी हि सिग्नल नसते मधेच कुठेतरी असते.
पोलीसानकडून जर कधी चुकून कोणाला मारहाण झाली किवा पोलीस गाडीकडून कोणाला थोडा धक्का जरी लागला तरी मिडीया पासून तर सोशल मिडीया पर्यंत पोलिसांना शिव्या घालतात लोक ,पण अनेकदा नाकेबंदी करतांनी ड्रेस वर 
पोलिसांना गाडी थांबवण्याचा इशारा केला तरी त्यांना उडवून गाड्या जातात तेव्हा कोणाला काही वाटत नाही.का??
काल आमच्या येथील पोलिसाला कामावार असतानी गाडी थांबवण्याचा इशारा केल्या नंतर सरळ त्याच्या अंगावर गाडी घातली .ज्यात त्याचे दोन्ही पाय गेले.रस्त्यावरून आपण पळून जावू शकत नाही हे माहिती असतानी सुद्धा
त्या टेम्पो चालकाने हे कृत्य केले .त्याला शिक्षा होईल देखील .पण यात त्या काम करणर्या पोलिसाची चूक काय ? ज्याच्या घरी लहान मुले आहे.परिवार आहे.
पोलिसांना नावे ठेवताना कधी तरी ते पण माणसे आहे याचा विचार करा.
खूप मोठा विषय आहे हा.{ सिग्नल वर पैसे घेणारा पोलीस दिसतो ,पण कधी विचार केला.ते पैसे खरच त्यालाच मिळतात का ?}
आता पर्यंत खूप चांगले पोलीस फक्त अश्या बिनडोक लोकांमुळे स्वताच्या
प्राणाला मुकले आहे .

मत

आयुष्यात आपल्याला अनेक लोक भेटतात.काही बरोबर आपले छान जमते .तर काही लोक कारण
 नसतानी आवडत नाहीत .त्यांनी आपले काही बिघडवलेले नसते तरी सुद्धा.
पण काही लोक अगदी थोडा वेळ भेटतात आणि कायमचे लक्षात राहतात.तर काही बघितल्या बघितल्या

 आपली वाटतात. पण आपण हे सगळे तेव्हा ठरवतो जेव्हा आपण त्या व्यक्ती बरोबर बोलतो.
ती व्यक्ती आपल्याशी बोलते .तेव्हा आपण त्या व्यक्ती बद्दल आपले मत बनवतो.म्हणजे त्या व्यक्ती बद्दल 
तो आपला अनुभव असतो.पण अनेकदा एखद्या व्यक्ती बद्दल आपल्याला जो अनुभव येतो तो बाकीच्यांन
 येईन असे नाही. अनेकदा एखाद्या व्यक्ती बद्दल फक्त ऐकून मत बनवले जाते ." अमुकअमुक व्यक्ती 
चांगली नाही " असे सहज बोलणे कधी कधी दुसर्यांच्या मनात मोठा गैरसमजकरून जातो .म्हणून कधी 
कोणा व्यक्ती बद्दल ऐकीव माहिती वर कधी मत बनवू नाही आणि बोलू पण नाही.

एखादी व्यक्तीला आपण भेटतो तेव्हा ती व्यक्ती आपल्याला आवडते म्हणजे काय ?
कोणाचे बोलणे 

आवडते,तर काहीचे व्यक्तीमत्व ,तर कोणाचे हसणे,तर कोणाचे बोलणे.कोणाचे लिखाण आवडून जाते.नाही का ?
फेसबुक आभासी जग येथे कधी पोस्ट वरून तर कधी फोटो वरून एक मत बनवले जाते.आणि
 जेव्हा ती व्यक्ती समोर येते तेव्हा जाणवते .आपण चूक
होतो का बरोबर .अनेकजण छान लिहितात म्हणजे ते वास्तव जगात छानच
बोलतील असे नाही ,अनेकांना लिहून व्यक्त होता येते तसे बोलता येईनच असे नाही तर काही

 येथे काही न लिहिणार वास्तव जगात मात्र खूप छान बोलतात .
त्यांचे मते मांडतात .शेवटी काय येथे आपण जसे असतो तसेच वास्तव जगात
असूच असे नाही .म्हणून कधी त्या व्यक्तीला भेटा बोला मग त्या व्यक्ती
बद्दल एक ठाम मत बनवा .

कधी कधी बनवलेले मते चुकु देखील शकतात ,मग मात्र आपण माणसे
ओळखायला चुकले असे देखील होते.
असेच मनातले काही