आपल्या आजूबाजूचा आपल्या वर किती असर होतो नाही .
एखादी गोष्ट सारखी आपल्या समोर आली किवा कानावर पडली ती आपल्याला कधी आवडायला लागते हे आपल्याला पण समजत नाही 'गणपती मध्ये अनेक मंडळ कुठले पण गाणे लावतात पण काही असे पण मंडळ आहे ते फक्त सलग गणपती मंत्र लावतात .एकदा दोनदा ऐकून आपण आपल्या नकळत तो मंत्र कधी बोलयला लागतो समजत देखील नाही .हा अनेकांचा अनुभव असणार .रोज घरातील कोणी पण आरती किवा शुभम करोति बोलत असेल तर आपल्या नकळत ती आपली देखील कधी पाठ होऊन गेली हे आपल्यला देखील समजत नाही .आज एकदशी आज फेसबुक ओपन केले आणि सगळी कडेएकदशीच्या शुभेछ्या आणि विठू माऊलीचे फोटो बघून छान वाटले .चांगले विसरले जात नाही पण जेव्हा नको ते सारखे कानावर आदळते तेव्हा असेच होते .आपल्या नकळत मग आपण लुंगी डान्स किवा मुन्नी बदनाम गाणे गुंणगुणायला लागतो .जीवन खूप सुंदर आहे .पण कधी कधी अनेक गोष्टी करायच्या राहून जातात आयुष्यात एक निराशा भरून राहते आपण काही करू शकत नाही याची एक खंत असते .आजून पण आपण काही करू शकतो याची जाणीव होते . .जसा दिवस संपताना सूर्य मावळतो.पण त्याच वेळी मावळतीचे सुंदर रंग आकाशात दिसतात .मन प्रसन्न करून जातात .असाच माझा एक प्रयत्न @असेच-मनातले-काही ....... माझ्या शब्दात #,मावळतीचे रंग
Tuesday, 23 December 2014
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

No comments :
Post a Comment