Tuesday, 23 December 2014

आषाढी एकदशी

आषाढी एकदशी म्हटले कि आठवते ती वारी आणि
पंढरपूर ,सगळ्यांना तर वारी मध्ये जाणे शक्य नसते .
किवा पंढरपूरला जाणे .
पण देव हा फक्त वारीत गेलो किवा पंढरपूरला गेलो तरच
पवतो का ?
अनेकदा माणूस संसारा मध्ये व्यापात अडकलेला असतो .
म्हणून हरिपाठ मध्ये अतिशय सुंदर अभंग आहे .
नाम संकीर्तन साधन पै सोपे ।
जळतील पापे जन्मांतरीची ॥१॥
न लगती सायास जावे वनांतरा ।
सुखे येतो घरा नारायण ॥२॥
ठायीच बैसोनि करा एक चित्त ।
आवडी अनंत आळवावा ॥३॥
रामकृष्ण हरि विठठल केशवा ।
मंत्र हा जपावा सर्वकाळ ॥४॥
याविण आणिक असता पै साधन ।
वाहातसे आण विठोबाची ॥५॥
तुका म्हणे सोपे आहे सर्वाहूनी ।
शहाणा तो धनी घेतो येथे ॥६॥

No comments :

Post a Comment