Monday, 29 February 2016

नारळ चटणी

नारळ चटणी ...
साहित्य -एक वाटी ओले खोबरे .
चार पाच हिरव्या मिरच्या .चार  पाच  लसून पाकळ्या 
कोथांबीर थोडी .मीठ चवी नुसार ..
कृती -
सर्व साहित्य एकत्र करून बारीक वाटून घेणे .
एक लाल काश्मिरी मिरची थोडी मोहरी आणि कढी पत्याची 
फोडणी करून चटणी वर टाकून मिक्स करून  घेणे .
इडली .मेदू वडे .डोसे .घावन बरोबर खाण्यास छान लागते .


medu vade {मेदू वडे ....}

मेदू वडे ....
साहित्य -
एक कप उडीद डाळ {१०० ग्राम }
दोन हिरव्या मिरच्या किवा  { एक छोटा चमचा लाल तिखट }
मीठ चवीनुसार .
थोडे जिरे ,थोडी कोथांबीर 
कृती -उडीद डाळ पाच सहा तास भिजत घालावी .किवा{ रात्री ...}
भिजलेली डाळ पाणी  न घालता मिरच्या, जिरे,कोथांबीर ,जिरे टाकून  वाटून घ्यावी.
 गरज पडल्यास थोडे पाणी घालवे.
वाटलेली डाळ चांगली फेटून घ्यावी .थोड्या पाण्यात पीठ टाकून बघावे जर पसरले नाही तर 
वडे तळावे .तळताने तेल कडक तापलेले असावे .एका  भांड्यात पाणी घ्यावे .
आधी तळ हाताला पाणी लावून घ्यावे .त्यावर पीठ घेवून त्याला मध्ये होल पाडावे .
सोनेरी रंगावर वडे तळून घ्यावे .

 टिप-आधी हाताला   पाणी  लावल्या मुळे वडे उचलण्यास सोपे  होते.
नारळ चटणी किवा  सांभार बरोबर खावे  .






{tomato chatani}टोमॅटो चटणी ......

टोमॅटो चटणी  ......
साहित्य -
दोन मोठे टोमॅटो {वैशाली टोमॅटो}
दोन कांदे .
लाल  तिखट ,मीठ ,
दोन चमचे  जाडसर  शेंगदाणे पावडर .
थोडी बारीक चिरलेली  कोथांबीर  ....
कृती  ...
सर्वात  पहिले टोमॅटो बारीक कापून घेणे.कांदा बारीक कापून घेणे .
तव्यावर किवा कढाईत तेल टाकून त्यात कांदा  लालसर परतवून 
घेणे.त्यात चवी नुसार लाल तिखट आणि मीठ टाकणे.ते परतवून घेणे.
त्यात बारीक कापलेले टोमॅटो टाकणे चांगले परतवून घेणे .
थोड्या वेळ झाकण ठेवणे त्यात शेंगदाणे पावडर टाकून घेणे .वरतून कोथांबीर टाकणे 
ग्यास बंद करणे .
टीप -
हि चटणी  चपाती बरोबर खाण्यास चांगली लागते .जर वैशाली टोमॅटो नसतील 
तर चटणी करताने थोडी साखर टाकणे .वैशाली टोमॅटो कापतानी त्यातील बिया कडून टाकणे .

माझे पती सौभाग्यवती {मनातले काही प्रश्न }

मनात आलेले काही प्रश्न
माझे पती सैभाग्यावती मालिका एक पुरुष काम मिळत नाही म्हणून स्री पात्र रोल करतो .
खरे तर जन्मता एक स्री मध्ये नाजूक पणा असतो .तर पुरुषा मध्ये रांगडे पणा जो लपून राहत नाही .
पुरुषाने किती घोटून जरी दाढी केली तरी समजून येतेच.काही अपवाद असतील हि {बालगंधर्व}
 मग प्रश्न पडतो या मालिके मध्ये असणारेबाकी पात्र त्यांच्या लक्षात कसे येत नाही .
सगळ्यात महत्वाचे म्हणजे या लक्ष्मिला बघून यामधील तिचा बरोबर असणारातिचा 
कोस्टर तिचा मागे गोंडा घोळतात. ए. के .आणि भंडारी तिचा मागे कसे
वेडे चाळे करतात .ते बघून उगाच वाटते खरच असे असते या मालिकेच्या जगात..

सगळे बसलेले असतानी लक्ष्मिला फोन येतो त्यावर हे लोक घ्या फोन बोलतात.ती /तो 
दुसरीकडे जावून फोन घेणार असतो तर तिला/ त्याला जावू देत नाही.असे कोणी वागते का ? 
कोणत्या मालिकेची अभिनेत्री असे ऐकते का?
खाजगी लाईफ त्यांना नसते का ? असे वागतानी काही म्यानर्स असतात हे
या लोकांना काळात नसते का ?
सगळ्यात महत्वाचे म्हणजे जे दाखवतात ते बघून आमच्या सारख्या सामान्या
प्रेक्षकांना नक्कीच विचार करायला लावणारे आहे .म्हणजे मुलीनी या क्षेत्रात
जावे का नाही ?मुली बरोबर मालिकेचा निर्माता आणि अभिनेता असे खरच
वागत असतील का? असतील तर या क्षेत्रा पासून दूर राहावे का ?
आणि जर असे काही होत नसेल तर हे लोक या मालिके मधून असे खोटे का
दाखवतात .का चुकीचा संदेश देत आहे. त्यांना आपणच आपल्या क्षेत्रा बाबत
गैरसमज पसरवत आहे असे नाही का वाटत !
काही दाखवा लोक बघतात असा यांचा समज आहे का ?
पण आपण जे दाखवतो त्याचा काही प्रमाणात असर समजावर होतो हे यांच्या
लक्षात का नाही येत. असेच मालिका बघून काही प्रश्न मनात आले .
‪#‎असेच‬-मनातले-काही

Saturday, 27 February 2016

माझ्या फेसबुक पोस्ट,



वाईट लोकांना चांगल्या लोका मध्ये गेले कि आपण चांगले आहे हे दाखवण्यासाठी किती कसरत करावी लागते ना ?
पण चांगल्या लोकांना वाईट लोका मध्ये गेले तरी त्यांना वाईट आहे हे दाखवायला लागत नाही ना ?
असेच मनातले काही  12 feb





वचन म्हणजे काय तर दिलेला शब्द पाळणे .पण खरच आजच्या जगात याला कोणी किमत देतात का ? मग असे दिवस का साजरे करतात .
मी तुझा शिवय जगू शकणार नाही बोलणारे दुसर्या वर्षी हा डायलॉग अजून कोणाला तरी बोलतानी दिसतात तेव्हा तर असे दिवस म्हणजे फक्त नावाला साजरे केले जातात असे वाटते ..
म्हणजे काय कोणते दिवस साजरे करणे हे फक्त नावाला ,याचा अर्थ जी गोष्ट अमलात आणायची नसते त्याचे दिवस साजरे करा ,मग आठवण राहीन कधी तरी आपण कोणाला काही शब्द दिला होता नाही का?11 feb




हिऱ्याला गारगोटी समजले म्हणून त्याची किमत कधी कमी होत नाही {९ फेब}



भविष्यकाळात काय होणार माहिती नसते.भूतकाळात काय झाले आठवत राहते.कधी कधी काही लोक खूप आठवतात.जे आपल्या हाकेच्या पलीकडे गेलेले असतात.






आपण जेव्हा किशोरवयीन असतो तेव्हा आपल्यावर बंधने घालणारे आई वडील चुकीची वाटत असतात.पण तेच आपली मुले मोठी झाली कि ते जे वागतात (बंधना मुळे वागू शकलो नाही )ते चूक आहे असे का वाटते.
असेच मनातले काही




या फेसबुकच्या जगात



या फेसबुकच्या जगात 
रोज समाजात वावरत असतानी अनेक प्रकारचे लोक भेटतात ना ?
काही खूप बोलणारे ,ते पण नको ते ,नको त्या चौकश्या करतात ते समोरून
येतांनी जरी दिसले तरी आपण रस्ता बदलतो .तर काही लोक शांत काही बोलत नाही .त्यांनी काही तरी बोलावे असे वाटते .कधी कधी मग राग पण येतो .
देवाने यांना वाचा का दिली अशी वाटते .
हे झाले वास्तव जगात ...फेसबुक सारख्या अभाशी जगात देखील असे अनेक लोक भेटतात .रिक्वेस्ट पाठवतात .शांतपणे पोस्ट वाचतात ,लाईक कॉम्मेंत देतात अतिशय शांत आणि सभ्य असे हे लोक कधी तुमचा इनबॉक्समध्ये येत नाही .पण नेहमी नजरेत येणारे.काही अतिशय वाद ग्रस्त पोस्ट आणि कॉम्मेंत करणारे जशी काय हि एक जंग आहे असे वागणारे . इनबॉक्समध्ये पण तुम्ही कसे चूक असे सांगणारे .तर काही रिक्वेस्ट पाठवतात add होतात .कि लगेच इनबॉक्समध्ये हजर .असे लोक कधी कोणाच्या पोस्ट वाचत नाही त्यांना इंटरेस पण नसतो .काही अतिशय सभ्य आहे दाखवण्यासाठी वाल वर देवाचा फोटो ठेवतात .पण ते तसे नसतात .तर काही फक्त कोणाला मेसेज पाठवत बसतात .कधी तरी filtered मेसेज मध्ये जावून बघा .aad मी पासून अनेक प्रकारचे मेसेज दिसतील .अगदी नमुने म्हणता येतील असे .काही तर आमचा प्रोफाईल ला भेट द्या .आमच्या पोस्ट वाचा सांगणारे .तर काही लिस्ट मध्ये असून स्वता पलीकडे कोणाच्या पोस्ट न वाचणारे .काही तर फेसबुक वरील बायका म्हणजे यांची मालकी असल्या सारखे मस्त त्यांचे फोटो आपल्या वालवर टाकणारे सुद्धा लोक येथे भेटतात .गेले पाच वर्षात अनेक अजीब असे लोक येथे दिसले .स्वताच्या प्रोफाईल वर छान मुलीचा फोटो ठेवणारे का कशासाठी माहिती नाही कारण असे काही लोक कधी कोणाला काही त्रास देत नाही { असे फक्त अपवाद } असणारे लोक पण येथे भेटतात .आपल्या पोस्ट छान आहे असे बोलणारे अनेक पोस्ट बद्दल मत मांडणारे पण कधी असे लोक आम्हाला रिक्वेस्ट पाठवा किवा add करा न बोलणारे .तर काही फक्त आम्हाला add करा असे मेसेज करणारे .तर काही त्यांना ड्युटी दिली आहे असे समजून रोज गुड मोर्निंगचा एक फोटो पाठवत राहणारे . काही फ्रेंड अतिशय विनोदी पोस्ट टाकून पोटधरून हसायला लावणारे त्यांच्या पोस्ट वाचून मूड एकदम फ्रेश होतो .‪#‎असेचमनातलेकाही‬ {काल खूप दिवसांनी नाही वर्षाने इनबॉक्स चेक केला }

Thursday, 25 February 2016

का शिकावा स्वयपाक

"मला नाही लग्न करायचे ! कोण बसेल सासरच्या लोकांच्या पुढे पुढे करत ."
हे वाक्य होते एका पंचवीस वर्ष वय असलेल्या एका मुलीचे ! मी मुली बरोबर पार्लर मध्ये गेले होते .तिथे अनेक मुली काम करतात .त्यांच्यात बोलणे चालू होते .का करायचे लग्न ,लग्न करा सासरी जा त्यांच्या पुढे पुढे करा. घरातील सगळे आवरा मग कामावर या .त्या पेक्षा आता आहे ते काय वाईट आहे का ? सकाळी मस्त आरामशीर उठा आपले आवरा ,हातात येणारा आयता डबा घ्या .कामावरून घरी गेले कि मस्त चहा जेवण .वाटले तर करा थोडे काम नाही केले तरी चालते.हे सवांद ऐकले आणि होम मिनिस्टर मधील प्रत्येक भागात अनेक सासू आपल्या सुने बद्दल बोलातानी ऐकलेले वाक्य आठवले ."सून चांगली आहे पण उशीर उठते " असे का बरे.फेसबुक वर काही पोस्ट बघतो .मुलगी जर चांगली असते तर मग सासू सासर्यांना का वृद्ध आश्रमात पाठवते .हाच तो फरक असतो .अनेक आया एक चूक करतात ते म्हणजे आपली मुलगी शिकली पाहिजे .तिनी स्वताच्या पायावर उभे राहिले पाहिजे.हा विचार करून अनेकदा मुलीना किचन मध्ये काही करू देत नाही .मग मुलीना काही येत नाही .आणि जे काही येते ते थोडेसे .मुलगी शाळेत जाते .कॉलेज मध्ये जाते.नंतर कामावर जाते .आई काय करते तिचा सगळे हातात देते .तिला डबा देते .तिनी काही काम केले नाहीतरी स्वता करून घेते .{काही घरात मुली स्वता करतात पण मुबई मध्ये तरी खूप अपवाद }मागे मुलीच्या कॉलेज मध्ये मिटींगला गेले होते .माझा बरोबर असलेली एक महिला घरी जाण्याची घाई करत होती ,कारण विचारले तर बोलली मुली घरी आहे ना ? अजून स्वयपाक होयचा आहे .मला थोडे आश्चर्य वाटले कारण तिचा मुली म्हणजे एक वीस वर्षाची आणि एक बावीस वर्षाची .त्यांना चहा पण येत नाही .मी त्यांना काही करू देत नाही हे ती महिला अभिमाना ने सांगत होती .मग याच बायका जेव्हा सून आणतात तेव्हा तिनी सगळे करावे हि अपेक्षा का करतात .मुलगी उशिरा उठली तर चालते .मुलीने काम नाही केले तर चालते .मुलीला आयता डबा देणे चालते .पण सून आली का ? तिनी स्वताचे करावे आणि घरातील पण करावे अशी अपेक्षा केली जाते .अनेक मुलीना काही येत नाही. मग वादास सुरवात होते .नवीन सुनेस आई जवळची वाटते .सासू नको वाटते .येथूनच सुरावात होते दुराव्याची मग आपले पणा कधी निर्माण होताच नाही.मुली साठी जेवढे करता तेवढे नका करू पण थोडे सहकार्य नक्की करता येवू शकते .स्वताच्या मुलीला पण तसे सांगा.आज अनेकदा ऐकायला मिळते कि मुलींनीच /महिलांनीच का स्व्यापक करायचा बरोबर आहे पण मुलीना स्वता पुरते तरी करून खाता येईन एवढे तरी जेवण बनवणे शिकावयाला हवे ना ? अनेकदा मुली आम्ही नोकर ठेवू असे उत्तर देतात.पण नोकर तरी मिळायला हवे ना ?सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले तेव्हा मुंबई अघोषित अशी बंद झाली होती .मग अश्या वेळी हॉटेल बंद मग अनेकांचे खाण्याचे हाल झाले .तेच मुंबईत पूर आला होता तेव्हा झाले होते .मग अशी वेळ येईन तेव्हा तरी स्वता पुरते काही तरी करता आले पाहिजे हे तरी आपल्या मुलीना शिकवायला हवे ना ?तू मुलगी आहेस ,मुली सारखी राहा ,असे आमचा काळात आमच्या आया अनेकदा आम्हाला ऐकवत असायच्या.अगदी लहान असल्या पासून मनावर हे पूर्ण बिंबवले जायचे.मग अगदी लहान वयातच घरात आईला स्वयपाक मध्ये छोटी मोठी मदत करायला मुलींची सुरवात होत असे ."मुलीला काय चूल आणि मुल तर करायचे आहे " या विचार नुसार मुलीना वाढवले जायचे .आज परस्थिती पूर्ण बदलली आहे.तरी पण त्यांच्या नकळत आपण आपल्या मुलांना मग तो मुलगा असो कि मुलगी त्यांना छोटे छोटे काम सांगून सवय लावू शकतो ना ?बघा पटले तर ........‪#‎असेचमनातील‬ काही
{ फोटो  गुगल वरून  घेतला }

अशा काही प्रथा

\आमचा नाशिक आणि नगर जिल्ह्यात {बाकी माहिती नाही } लग्नात एक प्रथा असते .रुखवत आणणे. लग्नात फळ भरणे आणि कन्यादान या नंतर केला जाणारा विधी.मुलाच्या आईचा आणि त्याचा कडील महिलांचा मानपान करण्याची हि प्रथा. या मध्ये मग पाच भांडी आणि जमेल ते किवा काबुल केलेले 
असते ते ठेवले जाते .यात पुऱ्या आणि कुरड्या या महत्वाच्या असतात. खास या साठी पुऱ्या केल्या जातात.कुरड्या तर पंधरा ते वीस किलोच्या पेक्षा जास्त या साठीच केल्या जातात.
मुलाकडील बायकांनी पंगत मध्ये बसवून मग नवीन भांड्यात पुऱ्या आणि कुरड्या वाढल्या जातात. मग होते सुरवात गाण्याची.पण गाणे पेक्षा हि एक जुगलबंदीच असते.मुला कडील आणि मुली कडील एकमेकांना नावे ठेवणे सुरु
असते.मग होते सुरवात जे नाते ने मेहुणे असतात. किवा मेहुणी असते .त्याच बरोबर दीर वाहिनी आणि जे ज नात्याचे असतात त्यांच्या डोक्यावर कुरड्या फोडणे.त्या फोडतानी त्यांचा आवाज आणि ज्यांच्या डोक्यावर फोडली जाते.
त्यांची रिअक्शन बघण्यात मजा येते .आमचा कडे खूप चालते हे लग्नात.
मला कधी हे आवडले नाही. कुरड्या फोडण्यास सुरवात झाली कि कधी तिथे थांबत नसे .अनेकदा पुरुष कुरड्या फोडतात तेव्हा खूप जोरात लागते.याचा एकदाच अनुभव घेतला होता .डोक्यात सगळ्या कुरड्याचे तुकडे अडकतात ते आवडत नसे. अनेक वर्ष झाले कोणाच्या लग्नात गेले नाही त्यामुळे आता फोडतात कि नाही माहिती नाही.काल एक पोस्ट वरून आठवले हे सगळे..............

कोपरा

कोपरा ....मनाचा एक हळवा कोपरा असतो असे बोलतात .पण मनाचा नाही तर आपल्या आयुष्यात अनेक ठिकाणी एक आपला असा कोपरा असतो.अगदी खूप मित्र असतात पण एखादाचमित्र असा असतो.जो आपल्या आयुष्यात असला आणि नसला तरी त्याच्या
साठी आणि त्याच्या आठवणी साठी एक कोपरा असतो .
घर छोटे असो नाही तर मोठे पण त्या घरातील अशी एक जागा असते .
तिथे बसायला आपल्याला खूप आवडते .मनाला समाधान मिळते .
अगदी छोट्या मुलांना जर बघितले तरी लक्षात येते ते घरातील एक ठराविक जागी जावून बसतात.त्यांना तिथे आवडते .किवा गावी बघा गवताचे गंज {ढिगारा } किवा धान्याची थप्पी असते त्यावर मुले जावून बसतात .
अगदी घरातील एखादा कोपरा असतो तिथेच बसून वाचायला आवडते. किवा
घरातील छोटी छोटी कामे करायला आवडतात .
घरातील सोफां असो कि बेड त्यावर पण आपण नेहमी एका विशिष्ट ठिकाणी
बसतो तिथे आपण एकदम मोकळे वाटते .
ट्रेन मध्ये रोजचा प्रवास असतो पण तरी आपल्याला ट्रेन ज्या दिशेला जाते तिकडे तोंड करून बसायला आवडते.मग त्यात डाव्या किवा उजव्या वाजूला हे पण असते .
पुस्तक वाचायला आणि गाणे ऐकायला पण एक खास जागी छान वाटते.
एवढेच नाही तर घरात जेवतानी मग ते टेबलवर असो कि खाली विशिष्ट दिशेला
तोंड करून बसायला आवडते ना ? कधी काही कारणाने आपल्याला ती जागा नाही भेटली आणि दुसरी कडे बसायला लागले तर आपल्याला अवघडल्या सारखे वाटते ना?
म्हणजे काय हे सगळे आपल्या मनातील हळवे कोपरे असतात ना?
‪#‎असेचमनातलेकाही‬

Saturday, 20 February 2016

जगण्यासाठी

जगण्यासाठी ..............
काल सकाळी सकाळी एक बातमी आली ट्रेन च्या धडकेने रेल्वेचे चार कर्मचारी ठार ,मुंबई मध्ये अश्या बातम्या अजिबात नवीन नसतात .पण हि बातमी खूप वेगळी होती कारण रेल्वे सेवा सुरळीत चालावी म्हणून रात्री च्या वेळी रेल्वे ट्रक वर काम करणारी ती लोक होते .काही तरी चूक झाली आणि त्यांचा बळी गेला .पण यात मनाला चटक लावून जाणारी गोष्ट म्हणजे हे सगळे कंत्राटी कामगार होते .आणि सगळे खूप कमी वयाचे होते .घोटी इगतपूरी भागातील हे लोक होते .वय वर्ष १८ ,१९ ,२१ आणि एक कामगार २७ वर्ष वयाचा होता .१८ ,१९ वर्ष वयाचे मुले कॉलेज मध्ये असतात .असा वयाची हि मुले पोटा साठी रात्र पाळी मध्ये अतिशय धोक्याचे काम करत होते .बोलतात ना गरिबीला पर्याय नसतो .मिळेल ते काम करणे आणि पोट भरणे बस एवढेच माहिती असते .
अनेकदा अनेक घरात सकाळी एक दृश्य असते काही काम मिळते का ते बघायचे .काम भेटले कि खुशीचा ठिकाणा नाही .मग मिळणाऱ्या त्या थोड्या पैशात खूप सारे स्वप्न बघायचे .रोज रोजंदारी वर काम करायचे येणर्या पैशात पोटा साठी लागणारे समान घ्यायचे.सकाळी घरातून निघातानी आई जे काही देणार ते घ्यायचे .घरातून निघातानी आपला मुलगा कामावरून काही तरी घेवून येईन हि आशा त्या माउलीला असते .पण कुठे तरी नियती घाला घालते आणि मुलाचे
प्रेत घरी येते .मग त्यात नियती किती आणि मानव निर्मित चुका किती माहिती नाही .
मुंबई अनेक जण स्वप्न घेवून जगतात येथे .कोणी दोन मिनिटात हजारो रुपये कमवतात तर काही दिवसभर राबराब राबतात तरी पोटा पुरते मिळत नाही .
रोज गगन चुंबी बिल्डींग बनत आहे .कुठे कोणी काम करातांनी पडतो मरतो .
कोणाला खबर नसते .कोणी तरी मरते एक बातमी असते फक्त .....
पण खरच घरातून निघातानी आई तुझे औषध आणतो संध्याकाळी किवा मुलांना मी तुमचा साठी खाऊ आणतो हे सांगून बाहेर पडणारे लोक जेव्हा घरी
सफेद कपड्यात गुंडाळूनच जातात तेव्हा त्या लोकांचे आयुष्य खूप बदलून
गेलेले असते .
काही ओळी आठवतात .
कोणच्या खांद्यावर कोणाचे ओझे .....
कोण मेले कोणासाठी रक्त ओकून ..............
‪#‎असेचमनातलेकाही‬

Monday, 15 February 2016

बोलण्यामुळे अनेक प्रश्न सुटतात असे बोलतात .
पण कधीकधी जास्त बोलून अनेक प्रश्न पण निर्माण होतात .

काही  लोक   खूप  अबोल   असतात  त्यांच्या  मनात  काय  चालू  कधी  समजत  नाही  .
मग नेमके  याना  काय  हवे  असे प्रश्न  पडतात .तेव्हा वाटते  यांनी  काही  बोलावे .
तर  काही एवढे  एवढे  बोलतात कि अनेक प्रश्न निर्माण  करतात .मग वाटते  हे चूप बसले तर 
किती बरे होईल  .
म्हणून समतोल असावे म्हणजे कोणाला  त्रास नाही .

Sunday, 14 February 2016

रथ सप्तमी कथा ...

आज रथसप्तमी ....
संक्रातीचा सन आणि त्या नंतर घातले जाणारे हळदी कुंकू आज संपणार ...
आपल्या हिंदू संस्कृती मध्ये फक्त देवच नाही तर ग्रहाची देखील पूजा करण्याची पद्धत आहे .चंद्राची पूजा तर दर संकष्टीला केली जाते .त्या प्रमाणे 
सूर्याची पूजा देखील केली जाते ती रथ सप्तमीला .
रथ सप्तमी कथा ...
श्रीकृष्णाचा मुलगा शाम्ब याला आपल्या ताकदीचा आणि शरीर संपदेचा खूप अभिमान झाला होता.एकदा दुर्वासा ऋषी श्रीकृष्णास भेटण्यास आले होते .दुर्वासा ऋषी हे अत्यंत रागीट होते .हे श्रीकृष्णाचा मुलास माहिती नव्हते .दुर्वासा ऋषी हे नेहमी खूप तप करत असत .यावेळी पण ते खूप दिवसाच्या तपानंतर श्रीकृष्णास भेटवायास आले होते .दुर्वास ऋषी यांचे शरीर तपा मुळे कमजोर झाले होते .ते बघून श्रीकृष्णाचा पुत्र त्यांचे कमजोर शरीर बघून त्यांना हसले . जेव्हा तो का हसतो याचे कारण जेव्हा दुर्वासा ऋषिना समजले तेव्हा ,आधीच रागीट असलेल्या दुर्वासाना त्याचा अतिशय राग आला .आणि त्यांच्या स्वभावा नुसार त्यांनी त्याला शाप दिला .तुझे शरीर कुष्ठरोगी होईल .आणि त्याचा लगेच त्याच्या शरीरावर असर सुरु झाला .
अनेक वैद्यांनी त्यांची चिकित्सा केली पण फायदा झाला नाही .तेव्हा श्रीकृष्णाने
त्यांना सूर्याची उपसना करण्यास सांगितले .वडिलांची आज्ञा मानून शाम्ब याने
सूर्य आराधना केली आणि काही दिवसांनी त्यांचा रोग बरा झाला .
त्या प्रमाणे अजून एक कथा सांगितली जाते .
हर्षवर्धन राजाच्या दरबारात मयूर भट्ट नावाचा कवी होता .त्याला कुष्ठरोग झाला होता तेव्हा त्याने सूर्य सप्तक हे काव्य लिहिले .आणि त्याचा रोग बरे झाला .
रथ सप्तमीला ,अचला सप्तमी .आरोग्य सप्तमी असे सुद्धा म्हणतात .

फोटो  क्रेडीट गुगल 

Saturday, 13 February 2016

काय असते प्रेम

काय असते प्रेम
माणूस हा समूह प्रिय आहे त्याला आवडते समाजात राहणे ,
समाजाची अनेक बंधने मग त्याला पाळावी लागतात .
पण हे सगळ्यात त्याला हवे असते ते प्रेम ,माया ,जिव्हाळा ,
भावभावना वर आधारलेली अनेक नाती असतात .त्या तिला एक भावनिक नाते असते .
प्रेमाचे ,...कोण करत नाही प्रेम ,एक आईचे मुलावर असलेले प्रेम ज्याची कशा बरोबर
तुलना होऊ शकत नाही .
बहिणेचे भावावर असलेले प्रेम ,एका लेखकाचे आपल्या लेखनावर असलेले प्रेम ,
एका कालाकाराचे आपल्या कलेवरील प्रेम ,विध्यार्थ्याचे आपल्या शिक्ष्रका वरील प्रेम
एखद्या प्रियकराचे आपल्या प्रेयसी वरील प्रेम किती अलग अलग प्रेमच्या या भावना आहे .
आईचे प्रेम सगळ्यात अलग ते कशात मोजता येत नाही ,बहिणीची माया .मित्राचे निरपेक्ष
प्रेम याची कशात तुलना होऊ शकते का ?
साहित्या मध्ये आईच्या आणि प्रेयसीच्या प्रेमाला खूप महत्व दिले आहे .
पण आपले कर्तव्य करत आपल्या कुटुंबावर खूप प्रेम असते वडिलांचे ,
कोणत्या अपेक्षा नसलेले .
प्रेयसी वर असलेले प्रेम अलग असते ते ..
हृदयापासून मनातून जन्म घेते प्रेम ......
जोडीदारासाठी अवघं आयुष्य पणाला लावून जगणं म्हणजे प्रेम...
एकमेकाच्या गुणा बरोबर दोष समजून घेते ते प्रेम ....
कोणत्याही अपेक्षा च्या पलीकडे असते ते प्रेम ...
सहवासातून फुलात जाते मग प्रेम .
काय असते प्रेम ?
प्रेमाची व्याख्या होऊ सकते का ?
कारण ते अलग नात्यानुसार अलग अलग असत ना ?कधी न तुटणारा,
कधी न संपणारे .फुलाच्या सुवास सारखे कायम दरवळणारे ,
यालाच म्हणतात खर्‍या अर्थानं प्रेम.
म्हणून प्रेम निभावत असताना मनावर कोरलं गेलेलं नाव कधीच मिटलं जात नाही.
मग ते नाते कोणते असो .
मिटतो तो फक्त नात्याचा ओलावा आणि उरते ती फक्त ओल.
रिपोस्ट ‪#‎असेचमनातलेकाही‬
दिनांक   ६/११/१४