Friday, 26 December 2014

कधी कधी वाटते आपण खरच कोणा साठी जगतो .
स्वतासाठी ,आपल्या माणसासाठी .कि या समाजासाठी ...
खरच हा प्रश्न अनेकदा प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी पडतोच .
माणूस हा नेहमी स्व:ता साठी कमी आणि दुसऱ्या साठी जादा जगतो .
आपल्या मानसं साठी .मग कधी आई वडिलांसाठी .कधी मुला साठी .
हि तर झाली आपली माणसे .....
पण जगतानी जादा विचार करतो तो या समाजाचा ...
अगदी दिवसाची सुरवात .बाप रे मी जर लवकर उठलो नाही तर
लोक मला काय म्हणतील {याला अपवाद शहर}
बाहेर जायचे चांगले कपडे घाला नाही तर परत लोक काय म्हणतील .
रसत्याने जात असतो मस्त डीजे वर गाणे वाजत असते .
छान मनसोक्त डान्स करावा वाटतो परत लोक काय म्हणतील .
असा अनेक गोष्टी असतात .ज्या आपण फक्त समाज काय म्हणेल
म्हणून करत नाही .
पण अनेकदा आपल्यला या विचाराने खूप त्रास होतो .
तेव्हा कुठे असतो हा समाज .
माणसाला प्रचंड यश भेटले कि पूर्ण समाज त्याला डोक्यावर घेतो .
पण जेव्हा माणूस अपयशी होती तेव्हा हाच समाज त्याच्या कडे ढूकून
बघयला तयार नसतो .
आपल्या साठी समाज आहे कि समाजासाठी आपण काळात नाही .

No comments :

Post a Comment