आय लव यु .
तीन शब्द .
पण ते कुठे कोण कोणासाठी वापरते यावर खुप काही अवलंबून असते ना .
वयात येणारी मुले जेव्हा एखादा मुलगा आवडला किंवा मुलगी आवडली तर.हे तीन शब्द बोलताना किती विचार करतात.मनात मोठी घालमेल असते.आपण जिच्यावर प्रेम करतो तिला आपण कसे प्रपोज करणार ,तिला ते आवडेल का ? मग असा वेळो समोरून कोणी आय लव यु आधी बोलले तर .त्या वेळी ते तीन शब्द अमृताहून गोड वाटतात .स्वता बरोबर सगळे जग खूप सुंदर आणि खुश वाटते .प्रेमी साठी हे शब्द एक एनर्जींचे काम करते.
पती पत्नी मध्ये संसारातील छोट्या मोठ्या गोष्टी वरून कधी जर तक्रार झाली तर एकमेकाला हे तीन शब्द संसारातील गोडी वाढवण्यास मदत करतात.मरगळ आलेल्या रुटीन मधून एक वेगळे पण प्रेमाची जाणीव करून देतात हे शब्द.
पण सगळ्यात छान तेव्हा वाटतात हे शब्द जेव्हा आई आपल्या बाळाला जवळ घेऊन त्याच्या केसांन वरून हात फिरवून आय लव यु बोलते.त्या वेळी त्या आईच्या चेहऱ्यावरील भाव जगातील सगळ्यात सुंदर स्त्रीचे वाटतात .त्या वेळी त्या शब्दा मध्ये खूप माया प्रेम असते.तेच कोणते बाबा आपल्या मुलांना बोलताना वाटते .
मुले मोठे होतात.खूप काही करतात .पण जेव्हा दूर वरून ते घरी येतात .आय लव यु आई बाबा बोलतात .तेव्हा सगळ्या जगाची खुशी मिळाल्या सारखे वाटते.
हे शब्द किती प्रेम दाखवत असले तरी .पण जेव्हा एखादी व्यक्ती आवडत नाही आणि ती हे शब्द बोलते तेव्हा .ते नको वाटतात.
या उलट अनेकदा लग्न झालेले लोक छान संसार चालू असतो .मग तो सुखाचा असो नाही तर दुःखाचा .काही तरी अपूर्ण राहिले असे वाटून कधी समविचारी लोक एकत्र येतात.विचार जुळतात .छान मैत्री होते.त्यातील एखाद्याने जर अचानक मैत्री सोडून समोरच्याला हे शब्द वापरले तर.येथे मात्र भूकंप येतो .तो पण कोणा एकाच्या जीवनात .मग हे शब्द प्रेम ,माय असे राहत नाही तर ते गळ्याला फास लागला असे वाटते .एकीकडे संसार तर एकीकडे नको तो मनस्ताप .शोधायला जातात तणावातून दूर काही क्षण पण होतो मनस्ताप.
म्हणून हे शब्द कोण कोणाला कुठे कसे वापरतो यावर या शब्दाना महत्व प्राप्त होते.
असेच मनातले काही