"आपण लक्षात घ्यायला हवे नलू ,म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असते "
नटसम्राट नाटकातील एक सवांद ,पण मनापर्यंत जाणारा ....आप्पा उर्फ गणपतरावांचा जावई त्यांच्या मुलीला बोलतो .यावर ती बोलते."हे ठीक आहे.पण या दुसऱ्या बालपणाला आई कुठून आणायची ?"किती विचार करायला लावणारा हा प्रश्न .....खरे तर हे नाटक जेव्हा लिहिले होते तो काळ ७० चा म्हणजे चाळीस पंचेचाळीसवर्ष आधीचा,तेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होती.मुलांनी आईवडिलांना सांभाळायचे असते.हा समाज मान्य असा नियम होता असे म्हंटले तरी चालेन.हळूहळू बिभक्त कुटुंब पद्धती आली आणि प्रत्येकाला स्वताची जागा {स्पेस ]हवी असे वाटायला लागले.त्यात मग कोणी लुडबुड करू नाही असे वाटायला लागले.मग ते आई वडील आसले तरी,येथून सुरवात झाली मग वृद्धाच्या समस्यांची."हे ठीक आहे.पण या दुसऱ्या बालपणाला आई कुठून आणायची ?"हा प्रश्न पुर्वी नव्हता का ? होता तेव्हा हि होता.पण तेव्हा तो जाणवत नव्हता.कारण "एका बालपणाला सांभाळायला दुसरे बालपण असायचे "!एकत्र कुटुंब पद्धती मुळे घरात सुना मुले आणि नातवंड असत आणि ती नातवंड म्हणजे वृद्धाचे बालपण सांभाळणारी आई असायचे ! आणि त्यांना समजून घेण्याचे काम करायचे लहान मुले.एकाच घरात सगळे एकत्र राहत त्यामुळे एका पेक्षा अनेक नातू आणि पणतू देखील असायचे.सुना कामात असतील तेव्हा मुले सांभाळण्याचे काम आजोबा आज्जी कडे असे.आई पेक्षा आज्जी आजोबा जवळचे वाटायचे मग.अगदी मग चिमुकल्या बोटांनी पकडून "चला आजोबा आपण मंदिरात जावू ,किवा आपण खेळू "असे म्हणून स्वता बरोबर आजी आणि आजोबाना जीव लावायचे.आज्जी किवा आजोबा जेवले तरच मी जेवणार म्हणून हट्ट करायचे.काही वर्षा पुर्वी असे दृश्य अनेक घरात दिसत असे.त्यामुळे आपल्या नातू पणतू मध्ये रमणारे आजी आजोबा मुळे बाकी कोणाला त्रास देखील होत नसे.कारण एका बालपणाला दुसरे बालपण सांभाळून घेत असायचे.मी वरळीच्या पोद्दार हॉस्पिटल मध्ये १५ दिवसातून एकदा जात असते.जवळ जवळ चार वर्षा पासून जाते.मला तिथे नेहमी दोन वयस्कर व्यक्ती भेटतात.सत्तरच्या पुढे वय असणार.त्यातील एकाला गुढघे दुखीचा त्रास आहे.म्हणून ते औषध घेण्यास येतात.आणि त्यांच्या बरोबर नेहमी त्यांचा मित्र असतो.अगदी सावली सारखा.दोघे येतात कधी दोन तास कधी तीन तास देखील बसायला लागते .मी त्यांना नेहमी बघते.पण या वेळी त्यांचा नंबर माझ्या पुढे होता.त्याना विचारले तुमचा घरी कोणी नाही का ? त्यांनी हो म्हणून फक्त मान हलवली.मी पुढे काही बोलले नाही.त्यांनी औषध घेतले ते माझ्या आधी बाहेर पडले.थरथरत्या हाताने एकमेकला आधार देत ते गेटच्या बाहेर पडत होते.मी नेहमीच त्यांना असे जातानी बघते.पण काल मी त्यांना जातानि बघितले आणि मी स्वताशीच बोलले............म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असते "" पण या दुसऱ्या बालपणाला आई कुठून आणायची ?"असेच मनातले काहीजीवन खूप सुंदर आहे .पण कधी कधी अनेक गोष्टी करायच्या राहून जातात आयुष्यात एक निराशा भरून राहते आपण काही करू शकत नाही याची एक खंत असते .आजून पण आपण काही करू शकतो याची जाणीव होते . .जसा दिवस संपताना सूर्य मावळतो.पण त्याच वेळी मावळतीचे सुंदर रंग आकाशात दिसतात .मन प्रसन्न करून जातात .असाच माझा एक प्रयत्न @असेच-मनातले-काही ....... माझ्या शब्दात #,मावळतीचे रंग
Sunday, 13 March 2016
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment