Thursday, 11 December 2014

मदत

आयुष्यात अनेक कठीण प्रसंग येतात .त्या वेळी आपली आणि परकी कोण याची जाणीव
होते .मग ते एखादे  संकट असेल नाही तर आजार ,पण या वेळी जी माणसे आपल्या कामे येतात.
त्यांना  आपण कधी विसरत नाही .
माझी मुलगी सहा महिन्याची असतानी मला हॉस्पिटल मध्ये राहावे लागले .
पण मी मुलीला माझा बरोबर ठेऊ शकत नव्हते .तिला माझा सासूची सवय
होती .परंतु सासूने तिला सांभाळण्यास सरळ नकार दिला .दुसऱ्या दिवशी
अडमिट होयचे होते.आता काय करायचे हा प्रश्न ,आजच्या सारखे तेव्हा घरोघरी
फोन नव्हते . शेवटी गावी जाणाऱ्या एक बस ड्राईव्हार जवळ चिट्ठी दिली .
रात्री ११ ला गावी बस पोचली .माझा छोटा भाऊ निरोप भेटल्या  बरोबर  लगेच मुंबईला
सकाळी पोचला .९ वाजता मला अडमिट करायचे होते .
माझ्या पेक्षा लहान भाऊ असून तो मला धीर देत होता .
तो मुलीला घेऊन गेला .सकाळी ८ ची बस होती .गावी साडेपाचला पोचणारी .
मी जगणार का मरणार माहित नव्हते.पण माझा मुलीला काही त्रास नको म्हणून सात आठ
तासाचा प्रवास त्यांनी मुलीला मांडीवर घेऊन केला .मुली साठी हे सगळे नवीन होते .
पण तिला रडू दिले नाही .
गावी मुलीसाठी सगळे नवीन होते .शेतातील गहू सोडून सगळी कामे सोडून
त्यांनी आपले किती नुकसान होते याचा विचार देखील नाही केला .
स्वताच्या मुली सारखी काळजी घेतली.
जवळ जवळ दोन महिने .
सासू जे वागली ते मी कधी विसरले नाही.
आणि भावाने माझ्या  साठी जे केले ते पण कधी विसरले नाही .
या गोष्टीचा उच्चार देखील त्यांनी कधी केला नाही.त्यांनी माझ्यासाठी काही केले
याचा .
पण मी कधी विसरले नाही आणि विसरणार नाही .
त्यांनी माझ्यासाठी जे केले त्याची जाणीव मात्र कायम राहीन .

e masik या सख्यानो  या मधील लेख 

No comments :

Post a Comment