Saturday, 28 February 2015

शिवजयंती ..

आज शिवजयंती ..
पण काही लिहायचे म्हटले कि सुचतच नाही ,
फक्त आणि फक्त विचार येतात .शिवाजी महारज या नावात काय जादू आहे.
आज पण आम्हला अभिमान वाटतो ,
आणि आठवतात त्यांच्या साठी स्वतच्या मरणाचा विचार न करणरे वीर ,
मग शिवा काशीद सारखा मावळ असो कि बाजी प्रभू ,नाही तर तानाजी मालुसरे ...
आणि असे अनेक ज्यांची नावे इतिहासात नाही असे अनेक ...
समोर मरण दिसत आहे ,आपण मरणार आहे हे माहित असून फक्त आपला राजा
सुखरूप राहावा म्हणून आपले बलिदान करणरे हे लोक किती असमान्य होते .
कुठला स्वार्थ नाही फक्त त्याग आणि त्याग .
आज आपण महाराजाचे नाव घेतो .पण खरच आपण काय करतो .
आपण एक तरी त्यांचे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो का ?
आज आम्ही आमच्यात जिजाबाई आहे का हे पाहतो का ?
अन्याय होतो हे दिसत असून आम्ही काय करतो .
आम्ही फक्त आणि फक्त राजे परत या असे बोलतो ,
त्यांचा अभिमान म्हणून त्यांचे नाव घेतो .
पण कृती करतो का ?
आज जेव्हा कुठल्या किल्ल्या बघितला कि मनात येते आज एक दिवस आम्ही
जातो पण किती अवघड वाटते ना आम्हला चढणे ..पण त्या काळात कोणत्या
गोष्टी ची सोय नसतानी ते लोक हे सगळे कसे करत असतील .
पन्हाळा गड बघितला कि मनात येते .न तेव्हा रस्ते होते ना आजच्या सारख्या
लाईट .पावसाळी रात्र असतानी शत्रू पाठी असतानी हे अंतर कसे पार केले असेल .
आणि त्या नंतर राजे सुखरूप राहावे म्हणून पावन खिंडीत झालेली लढाई .
खरच कोणत्या मातीची बनली होती हि माणसे .
डोळे भरून येतात .इतिहास वाच्तानी ,आणि मनात येते
आम्ही काय करतो ..........

१९/२/१५

एकतर्फ प्रेम

प्रेम म्हणजे जीव घेणे नव्हे .....
प्रेम एक सुंदर भावना ..........ज्याच्यावर प्रेम करतो, 
त्याच्यावर जीव ओवाळून टाकण्याचीही तयारी असते.
अगदी बाटल ते ,अभ्यास सोडून त्याच्या साठी
 तिच्या साठी वेळ देणे ,हे झाले एकमेकावर जे प्रेम करतात 
त्याचे पण ,परंतु, आपल्या देशात प्रेमासाठी जीव ओवाळून
 टाकणा-यांपेक्षा, आपल्याप्रियकराचा किंवा प्रेयसीचा जीव
 घेणा-यांचीच संख्या मोठी असल्याचं दुर्दैवी चित्र नेहमीच समोर येते .
कतर्फी प्रेम..........आज प्रत्येक मुलाला वाटते आपल्याला एक गर्लफ्रेंड असावी ,
कॉलेज मध्ये गेले आणि जर एखादी मुलगी फ्री बोलली किवा काही मदत केली 
कि मुलांना त्याचा अर्थ अलग वाटतो मग ते तिच्यावर एकतर्फी प्रेम करयला लागतात .
आपल्या मनातील मग ते तिला सांगतात पण जर मुलीनी नकार दिला तर ?
मग हे मुले सैरभैर होतात .आता आपण तिचा शिवय जगू शकत नाही अशा विचाराने .
."तु मेरी नही तो किसी ओर कि नही "अशे बोलत 
ते मग जीवापाड प्रेम करणऱ्या प्रेमचाच खून करतात .
प्रेम म्हणजे काय ?हेच आजच्या मुलांना समजत नाही .
प्रेम म्हणजे आपण ज्याच्यावर प्रेम करतो 
त्यांना नेहमी खुश ठेवणेकधी शिकणार आहे हे प्रेम करणारे .
आज टीव्ही वर बातमी बघितली एका अकरावीच्या मुलीची एक मुलाने 
एकतर्फी प्रेमातून हत्या केली .स्वताच पोलीसा कडे गेला .
दुसऱ्याचे आयुष्य संपवतात आणि स्वताचे पण वाटोळे करतात .
मग वाटते मुलगी असणे हि चूक आहे का ?
मुलीना पण मन असते त्यांना पण नाही बोलायचा अधिकार असतो ना ?
तुम्हाला मुलगी आवडते पण तिला तुम्ही आवडतात का हे का नाही विचार करत .
जगा जगू द्या ...........

फेसबुक पोस्ट

फेसबुक खरे तर एक आभासी जग ...........
पण काही लोक यात खूपच अडकून पडतात .......
वास्तव आणि आभास यातील फरक विसरतात ........
अनेकदा आपण खूप अलग आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात .....
येथे आपले कोणी नसते ,कोण कुठले ,कोण कुठले .एकत्र येतात ..
विचार आवडतात ,कधी पोस्ट आवडतात .कोणाशी सवांद होतो कोणाशी नाही .
पण वास्तव जगातील सारखे काही लोक येथे वागतानी दिसतात ..
मला चांगले म्हणा ,माझ्या पोस्ट लाईक करा .असे यांचे तत्व असते .
हे विसरतात येथे अनेक विचाराचे अलग स्वभावाचे लोक असतात .
ते ज्या परिस्थितीतून आलेले असतात .तसे त्यांच्या पोस्ट मध्ये दिसते .
कोणी खूप लिहितात तर काही एक ओळीत खूप काही सांगून जातात .
"पण आम्ही येथे मनोरंजन करायला येतो ,उपदेश ऐकयला नाही ,वैचारिक पोस्ट
कशाला टकतात लोक" .किवा जर कोणी देवा बद्दल बोलले तर त्यांना नावे ठेवणे
अंधश्रद्धाळू म्हणणे .आम्ही नाही हे करत आम्हला नाही हे पटत म्हणून नावे
ठेवणे ,या लोकांचा उद्देश नेमका काय असतो .समजत नाही यांना कोणी विरोध
पण करायचा नसतो .
पण ते हे का विसरतात ज्यांना पटते ते लोक वाचतात .तुम्हाला नाही पटत नका वाचू
पण नावे पण नका ठेवू .
एखादी पोस्ट किती मोठी असू दे लोक वाचतात ,कारण त्या असतात छान ..
लोकांना बदलण्या पेक्षा आपणच बदलू या काय फरक पडतो कोणाला
प्रोत्साहन दिले तर ...
आपण जर कोणाला चांगले नाही म्हणू शकत तर वाईट देखील बोलण्याचा
आपल्यला अधिकार आहे का ?
मला हे आवडत नाही ते आवडत नाही असे म्हणून आणि ते जाहीर पणे
लिहून आपण आपल्या मधील अहंकार दाखवतो असे नाही का होत .
चांगले शब्द माणसे जोडतात .......
वाईट शब्द माणसे तोडतात ...
आपण माणसे जोडू या .......
{कृपया तुम्हाला कोणी काही बोलले का असे विचारू नाही काही लोकांच्या पोस्ट असतात
नावे ठेवणाऱ्या त्या वरून हि पोस्ट आहे }

२०/२०१५

उतरण

वक्त बदलते देर नाही लगती ..............
हे वाक्य आपण अनेकदा ऐकतोना..........
एखादी गोष्ट आपल्या जवळ असते तेव्हा तिची किमंत नसते किवा एक प्रकारची 
बेफिकिरी असते .अहंकार असतो स्वताकडे ती असण्याचा ..........
ओबामा आले तेव्हा आपले पी एम मोदी यानी जो कोट घातला होता .त्यावर बरेच 
काही झाले .त्या नन्तर ते कोटाचा लिलाव करणार अशा बातम्या आल्या आणि 

खूप उलट सुलट त्यावर प्रतिक्रिया आल्या ..
काही लोक असतात त्यांना ज्या व्यक्ती आवडतात 
म्हणजे ते त्या व्यक्तीचे खूप मोठे fan असतात .त्या मुळे ते एक आठवण म्हणून ती ,
त्या व्यक्तीची लिलावातील वस्तू विकत घेतात .
परंतु जेव्हा मोदीच्या कोटाचा लिलाव होणार होता तेव्हा काही प्रतिक्रया ............
ईईईई.......पासून तर जुने कपडे कोण घेणार अश्या ......
हे सगळे वाचून मनात आले आमच्या देशात आज असे किती लोक आहे .त्यांना
घालायला कपडे नाही ,अनेक असे आश्रम आहे तिथे राहाणारी मुले हि दुसऱ्यांनी दिलेली
कपडे घालून जगत असतात .
अनेकदा नैसर्गिक आपत्ती येते ,पावसाळ्यात येणारे मोठे पूर .....
भूकंप होतात किवा अचानक आग लागते ...........
बिल्डींग पडतात ,जीव वाचतो पण फक्त अंगावरील कपड्या निशी .......
अशा वेळी कोण गरीब कोण श्रीमंत काही भेदभाव राहत नाही ....
तेव्हा देवाचा न्याय एक सारखा असतो ...
लाखो,करोडोची संपत्ती असणारे एक वेळचे जेवण मिळावे म्हणून एकाच लाईन
मध्ये उभे राहतात .कपडे घालयला राहत नाही ,मग मदत म्हणून येणारे जे असतील
मग ते जुने असो कि नवीन ते घालयला लागतात ,पर्याय नसतो .
मग त्यात असे म्हणणारे लोक पण असतात .आम्ही नाही कोणाचे कपडे घालत .

आम्हाला नाही आवडत .पण ते जेव्हा हे बोलतात .तेव्हा त्यांच्या कडे सगळे असते .
आणि त्यातून आलेला अहंकार असतो .
बोलतात न राजाचा रंक होतो ,तर रंकाचा राजा ......
नियतीने येणाऱ्या भविष्य काळात आमच्या साठी काय वाढून ठेवले हे
जेव्हा माहित नसते तेव्हा खरच अहंकार काय कामचा असतो ना .....
सगळ्या गोष्टी बोलण्याची गरज नसते ,तरी त्या का बोलल्या जातात .
कदाचित यालाच अहंकार हे नाव असावे का ?
काही दिवसा पूर्वी एक मालिका येत होती आज देखील तिचे गाणे
आठवते .........
नन्हे नन्हे से हातोमे गुडीया पुरानी
किस्मत अपनी तो जैसे कोई रुठी नानी
नन्हे नन्हे से हातोमे गुडीया पुरानी
किस्मत अपनी तो जैसे कोई रुठी नानी
किसीका जीवन सपना है
किसीका सपना है उतरन
किसी के उतरे सपनो से
सजे किसी का बचपन
वो नही समजे अभी क्या हो ती उतरन
वो नही समजे अभी क्या हो ती उतरन.

अर्थ हीन शब्द

बालपण किती निरागस असते नाही .अनेक गोष्टी का कशा साठी माहितच नसते .
पण अशा काही गोष्टी घडतात या बालपणात आणि त्या कायमच्या लक्षात राहतात .
नुसत्या लक्षात राहत नाही तर खूप काही शिकवून जातात .
नऊ दहा वर्षाची असेल तेव्हा मी .शाळेत जायचे छोट्या भावांना सांभाळायाचे घरातील 
छोटे छोटे काम करून ठेवायचे .आणि बाकी वेळेत खेळायचे .....

असेच एकदा शाळा सुटली सगळ्या आम्ही छोट्या मैत्रिणी एका मैत्रिणीच्या
घरी जमा झालो.आजचा खेळ लपाछपी असे ठरले .
बहुतेक लोक शेतात जात त्यामुळे अनेक घरे बंद असत मग लपणार कुठे कोणाच्या
भिंती आड .कधी कोणाच्या आवारात ....
आमचा खेळ सुरु झाला आणि मी एक घरातील भिंती आड लपले ,पण समोरच्या घरातील
एक आजी बसली होती तिनी बघितले .ज्या मुली वर राज्य होते तिला तिनी सांगून
टाकले ."येथे बघ येथे लपली आहे ."
मला त्या वेळी त्या म्हातारीचा प्रचंड राग आला .आणि मी रागाने तिला आज्जी वैगरे
काही न बोलता रागाने बोलले .
:हि म्हातारी लाई बाराबोड्याची हाय "
बाप रे मी असे बोलले आणि ती आजी सरळ काठी घेऊन आमचा वर धावून आली .
आम्ही मागे झालो .ती आमचा रस्ता अडवून उभी राहिली .
ती मला म्हणाली तुला माहित आहे का तू जे बोलली त्याचा अर्थ काय ?
तुझ्या आई बापाने तुला हेच शिकवले आहे का ?
झाले कारण नसतानी आई बापाचा उध्दार ....
मला असे म्हणती काय ? येऊ दे तुझ्या आईं बापला येतेच घरी आणि विचारते
बाराबोड्याची म्हणजे काय ?
बाप रे मला तर खूप रडू येत होते.खरच हि जर घरी आली तर ?
आई तर घर सोडून गेली म्हणून काही ऐकून न घेता मला चांगली धोपटून काढीन .
पण मी जे बोलले त्याचा अर्थ मला कुठे माहित होता .
म्हणजे मी खूप वाईट बोलले असावे आणि आता मार खावाच लागणार या विचारानेच
रडू येत होते .
निरागस असते ना बालमन .घरी गेले ,घर जवळ गणपतीचे मंदिर होते ,
देवा जवळ जावून बसले .देवाला नवस केला .ती आज्जी घरी नको येऊ दे .
नवस पण काय असत ना ,गोळ्या ठेवेल नाही तर १० पैसे देईन असेच काही पण .
घरातील कामे पटपट करून टाकली .आई आली शेतात तून .
पण आज लक्ष सगळे फटका कडे होते .जसा अंधार पडला आणि हायसे वाटले कारण 

आम्ही राहत होतो त्या बाजूला लाईट नव्हत्या .म्हणजे आता ती आजी येणार नव्हती .
पण भीती मात्र होती .{खरच रात्र भर विचार करत राहिली काय अर्थ असेल या शब्दाचा}
तो प्रसंग खूप काही शिकवून गेला .कधी अर्थ माहित नसेल तर बोलू नाही .
मोठ्या माणसाचा कधी अनादर करू नाही .
आज पण मला याचा अर्थ नीट माहित नाही.पण हा शब्द आज पण गाव कडे सरस
वापरतात .


२६/२/१५ 

मरठी भाषा दिवस ..............



आज मरठी भाषा दिवस ..............
‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो .
आपल्या देशात अनेक भाषा बोलल्या जातात .पण महाराष्ट्र असे राज्य आहे जिथे अनेक भाषा बोलल्या जातात .प्रत्येक भाषेत आपला अलग गोडवा आहे ,
मग ती वर्हाडी असो खानदेशी असो ,नाही तर कोकणी.
पुणेरी भाषा अलग तर मुबई ची भाषा अलग ,,,,,
परंतु शाळेत शिकतानी एकच भाषा ....
पण आज माझ्या राज्यात आणि महाराष्ट्र राज्याच्या राजधानीत आज माझ्या मराठीची किती हेळसांड होते आहे .आज मरठी मध्ये बोलणे लोकांना कमी पणाचे वाटत आहे .
आपल्या मुलांना इंग्लिश आले पाहिजे म्हणून मराठी शाळेत आता पालक घालयला तयार नाही .याचा परिणाम आज मराठी शाळा ओस पडत आहे .आणि आज खेड्यात अगदी छोट्या छोट्या गावात देखील इंग्लिश शाळा उघडत आहे .अशा वेळी वाटते .
मराठी भाषा दिवस अजून किती वर्ष साजरा होईल अजून ........
काही असो तरी मराठी भाषा दिनाच्या शुभेछ्या ..............
२७/२/१५ 

माझी फेसबुक पोस्ट

एखाद्या व्यक्तीला जीव लावणे ,माया देणे कधी कधी जास्त होते ,
मग ती आईची माया असो नाही तर मित्र ,नातेवाईक कोणी असो .
एक मर्यादे पर्यंत ठीक असते पण जेव्हा अति प्रेम समोरच्या आयुष्यात
जर दाखल अंदाजी करत असेल तर मग माणसावर जेवढ प्रेम कराव 
तेवढी ती दुर जातात .असे वाटते ,वाटू शकते .
सुंदर दिसणारे फुलांना नाजूक पणे हळुवार हाताळावे लागते नाही तर
त्यांच्या पण पाकळ्या गळून जातात .नात्याचे पण तसेच असते ..
जवळची नाते पण असेच हळुवार पणे जपावी लागतात .नाही तर ती दुरावतात .
मनापासून आपले मानले ते आपल्याला विसरून जातात .
नाते जपा काळजी घ्या पण ठाराविक अंतर मात्र नेहमी असू द्या .

काही समजुती ....

बस stop वर काही मुली उभ्या होत्या संध्याकाळची वेळ होती .
कुठे तरी कार्यक्रमाला जात असव्यात .आधुनिक पद्तीचा पेहराव केलेल्या मस्त चिवचिवत होत्या .पण एक गोष्टीने लक्ष वेधून घेतले ते म्हणजे सगळ्यांनी छान केस कापले होते .आणि सगळ्यांनी केस मोकळे ठेवले होते ."तिन्ही सांजाला असे केस मोकळे ठेऊ नाही,कुठे झिपऱ्या उडवत फिरत्या "असे म्हणारी आई आठवली .खरच अलग होता तो जमाना ,खूप काही आई वडील सांगत.हे करू नाही ते करू नाही .संध्याकाळी केस मोकळे सोडू नाही ,संध्याकाळी केर फेकू नाही .रात्री मीठ कोणाला देऊ नाही ,अगदी जेवतानी दारात बसू नाही ,झाडूला पाय मारू नाही ,असे खूप काय काय .काही गोष्टी पटत नसत .पण मोठे सांगतील ते ऐकायचे असते उलट प्रश्न नसतात विचारायचे .समजा कधी का नाही करायच्या या गोष्टीला उत्तर असे आमच्या आई बापाने सांगितले आम्ही ऐकले आम्ही अति शहाणे नव्हतो तुमच्या सारखे असे उत्तर मिळत असे खरे तर संध्याकाळी लक्ष्मी येते म्हणून हे नाही करायचे हे उत्तर होते त्यावर .लक्ष्मी म्हणजे गाई गुरे ,शेतातून येत .पण अनेक गोष्टीचा अर्थ कधी लागला नाही .पण आज पण नकळत या गोष्टी पाळल्या जातात सवयीने ...पण आजच्या पिढीला आता काहीच नाही पटत त्यांना पर्त्येक गोष्ट का नाही करायचे याचे कारण हवे असते .आणि आमची मधली पिढी मात्र आमच्या वेळी नव्हते असे एवढेच बोलते .कारण आधी आई बाप सांगेल ते ऐकले त्यांना प्रश्न नाही केले .आणि आज मुले जे काही नवीन तत्त्वज्ञान म्हणजे अक्कल पाजळतील ती पण ऐकयला लागते .कारण आमच्या कडे पर्याय कुठे आहे .नाही तर आई तुला काय कळत नाही .हे ऐकयला लागते .तुमचा जमाना अलग होता .पण आज आठवले गावात तेव्हा लाईट नव्हत्या .खूप अंधार असे .भुते असतात असा एक समज होता .आणि केस मोकळे सोडू नाही नाही तर भूत लागते .असे काही .....पण खरे कारण असणार मोकळे केस जर गाळले तर ते गायी गुराच्या तोंडात जाऊ नाही .जेवणात पडू नाही .असे काही असेल .पूर्वीच्या काळी प्रत्येक गोष्टीला जरी आजच्या सारखे वैनानिक कारण देत येत नसेल पण साधा पद्धतीनी समजेल असे हि करणे असू शकतात ना .संध्याकाळ होण्या आधी केर काढावा कारण त्यात जर आपल्यला इजा होणर्या काही वस्तू असतील तर त्या अंधार होण्या आधीच उचल्याला जाव्या अशा हेतू असू शकतो  ना .
२८/२/१५

तुझे येणे

तुझे येणे नुसते येणे नव्हते .
त्या बरोबर होती खूप सारी ख़ुशी 
जिने माझे जीवन देखिले आनंदी झाले .
स्वागत केले तुझा येण्याचे .
तुझ्या हसण्यात ,तुझ्या असण्यात विसरून गेले 
जग सारे .तुझ्या तालावर नाचत राहिले .
कधी चिंब भिजले .कधी गारठले .आणि
एक दिवस तू अचानक निघून गेला दूर 
आता फक्त अश्रू आहे डोळ्यात 
तुझ्या सारखे कधी रिमझिम
 तर कधी सरी सारखे .......
आता तुझी परत वाट बघणार .....
तू ये पण असा अवेळी नको रे 
तुझे हे येणे डोळ्यात पाणी आणते रे,
२१ नोव्हेंबर २०१४

Monday, 23 February 2015

जाणीव

जाणीव 
अलार्म वाजला आणि तो नाविलाजाने उठून बसला ,कामावर जायला हवे होते .
पूर्ण घरावर त्याची नजर गेली ,अस्तव्यस्त घर सगळी कडे पडलेला पसारा .उशीर झाला होता घाईने त्याने gas पेटवला पाणी ठेवले .एका बाजूने दुध तापत ठेवले चहाची तयारी करायला घेतली .तेवढ्यात दुध उकळून उतू जाऊ लागले काही न सुचून त्याने पटकन हाताने पातेले पकडले आणि चटका बसून पातेले हातातून सुटले .सगळे दुध ओट्यावर सांडले .आधीच उशीर झाला होता त्यात अजून भर ......
त्याला  आठवली ती कमी वेळेत भरभर काम करणारी .........त्याच्या नकळत त्याचे डोळे भरून आले समोर सगळे धूसर झाले ....
समोर आला तिचा नेहमी हसरा चेहरा ......
कोणत्या परस्थिती मध्ये ती नेहमी आनंदी चेहऱ्याने कशी वागू शकते याचे त्याला नवल वाटत असे .
ती साधी गरीब घरातील होती आणि आपल्या मुला साठी ठीक आहे म्हणून .त्याच्या वडिलांनी तिला सून करून आणले होते .पण ती जास्त शिकली हे त्याला आवडले नव्हते .नुसते शिक्षण मध्ये नाही तर ती सगळ्या गोष्टी मध्ये त्याच्या पक्षा हुशार होती .कोणत्या गोष्टीचा अभिमान नसलेली साधी सरळ .आपली बाजू ठाम मांडणारी होती .याच्या उलट तो होता कधी स्वताचे मत न मांडणारा स्वतावर प्रेम करणारामला चांगले म्हणावे ,माझेच ऐकावे असे विचार असलेला पुरुष असल्याचा प्रचंड अभिमान असलेला .म्हणून त्याने तिला नोकरी करू दिली नाही.बायकांनी नोकरी केली कि त्या डोक्यावर बसतात हे त्याचे विचार होते .
ती हुशार आहे हे त्याला सहन होत नसे तीचे कोणी कौतक केले कि त्याला आवडत नसे .
कोणत्या गोष्टीला कधी चांगले तो चांगले म्हणत नसे,जेवढे तिचे मन दुखावता येईन तेवढे तो दुखावत असे .तरी ती कधी उदास राहत नसे कधी त्याचा वागण्याचा परिणाम ती कोणाला दिसू देत नसे .उलट आपला नवरा किती चांगला आहे हेच ती सांगत असे कारण तो तिचा बरोबर जे वागत असे तो त्याचा कोणी न बघितलेला चेहरा होता .जगा साठी तो अतिशय सज्जन आणि सभ्य आणि शांत होता .तिनी कोणाला सागण्याचा प्रयत्न केला असता तरी कोणाला खरे वाटले नसते .
तिला जे आवडत नाही ते तो मुद्दाम करत असे त्या मुळे तिला होणारा त्रास बघून त्याला आनंद होत असे .एक छोटे स्वप्न होते तिचे स्वताचे घर पण त्याने मुद्दाम घेतले नव्हते .
तिनी कोणत्या गोष्टी मध्ये त्याला रिक्वेस्ट करावी .विनंती करावी .अगदी कोणत्या पण गोष्टी मध्ये ,तिनी आपल्या समोर शरणागती पत्करावी असे त्याला वाटत असे .
पण ती खूप स्वाभिमानी होती तिनी कधी कोणत्या गोष्टी साठी त्याला रिक्वेस्ट केली नाही . पत्नीचे सगळे कर्तव्य ती चोख पार पडत असे .त्याला बोलायला कधी संधी देत नसे . आजारी असेल तरी तिला तो बघत नसे .किती तिला उठवत नसेल तरी साधा चहा देखील तो करून देत नसे 
अशीच ती आजारी पडली नेहमी सारखा तो उठून कामाला निघून गेला .तिला उठवत नव्हते .खूप[ ताप होता अंगात, त्याचा वागण्याची तिला सवय होती .पण इतर वेळी मुलगा असे .पण आता मुलगा नोकरी साठी बाहेरच्या देशात गेला होता .ती तशीच झोपून राहिली .पण आज तिला खूप एकटे वाटले होते अंगातील तापा पेक्षा तिला मानसिक थकवा जादा आला होता .का वागतो नवरा अशा या विचाराने मी नेहमी तडजोड करत आले तरी का ?या विचाराने तिला खूप रडू येत होते .
दुपारी ती कसे तरी उठली डाळ भात केला पण न खाता तशीच झोपून राहिली .रात्री उशिरा कधी तरी तो आला जेवला आणि झोपला त्याने तिला जेवली का विचारले पण नाही .आज तिला खूप एकटे वाटले कोणी नसल्या सारखे .......सकाळी तो उठला आणि कामावर निघून गेला ...
काही वेळाने त्याला शेजारचा फोन आला .त्याची बायको सिरीयस आहे घरी या लवकर .
तो घरी आला घरात आणि घर बाहेर लोक जमा होते .त्याचा कडे वेगळ्या नजरेने बघत होते .शेजारील बाई समोर आली तिचा बरोबर जवळचे डॉक्टर होत्या .
आपण रात्री घरीच होते ना .? डॉक्टर ने विचारले .
"हो " तो बोलला .
"मग आपली बायको रात्री कधी तरी मरण पावली हे समजले नाही तुम्हाला ."?हार्ट अटॅक आला असावा कदाचित , एक घरात असून तुम्हाला हे समजू नाही .पोस्टमार्टेम मध्ये समजेलच ते . डॉक्टर 
"काय" ? 'नेहमीच सारखा ताप असेल उठेल ती आणि जाईन डॉक्टर कडे असे मला वाटले होते '. तो बोलला .
काय म्हणजे तुम्ही बायको आजारी पडली तर तिला कधी बघत नव्हते ?शेजारी एकदम बोलले .काय माणूस आहे हा ?त्याचा बद्दल उलट सुलट चर्च सुरु झाली .
ती तर जग सोडून गेली होती .कधी काही तक्रार न करता .त्याचा पुढे कधी हार न मानता .
पण जाता जाता त्याचा खरा चेहरा नियतीने उघडा केला होता .
तिचा बरोबर न्याय केला होता .
अचानक तो भानावर आला .ती गेली आणि ती काय होती हे त्याला समजले .कधी घरी कोणी आलेले त्याला आवडत नसे तरी तिनी किती माणसे जोडली होती .त्यात त्याचाशी कधी न बोलणारे त्याचे नातेवाईक देखील होते .तर काही फक्त ती त्याला चांगले बोलते म्हणून त्याला चांगले म्हणणारे होते .हे सगळे ती गेली आणि त्याचा पासून दूर होत गेले .स्वतचा मुलगा देखील .आज तो एकटा राहिला .
पदोपदी जाणवते तिचा एकाकी संसार आणि तिला आपण दिलेला एकटे पणा .
तिची माफी मागायची आहे .पण ती खूप दूर गेली आहे ..............
कायमचे एकटे करून ....

24/2/15

Tuesday, 17 February 2015

मनातील देव

नेहमी सारखे घरातील काम चालू होते .अचानक बेल वाजली कोण असावे या वेळी 
म्हणून दार उघडले .दारात आमच्या एरियातील तीन बायका उभ्या होत्या .
भाजी आणयला कधी कुठे जाता येत दिसणारे चेहरे नाव कोणाची माहित नाही .
या आपल्या कडे का आल्या असाव्या अशा प्रश्न मनात आला .
येऊ का घरात ,त्या बोलल्या .
हो का नाही .मी बोलले .
त्या घरात आल्या बसल्या .सुरवात झाली बोलण्यास .
तुम्ही घरीच असतात ना .मग काय करतात दिवसभर घरात ...
काही नाही पुस्तके वाचते ,नेट वापरते बाकी काही नाही आणि मला सवय झाली
आहे एकटी राहण्याची .मी बोलले .
उद्या एकदशी आहे माहित आहे ना ,आम्ही स्वधाय परिवारातून आलो आहे .आणि नेहमी
एकदशी आधी लोकांना घरी जाऊन भेटतो .त्यांना आपल्या धर्मा बद्दल सांगतो .
दिवसातील काही वेळ देवा साठी द्या म्हणून .
मी मनातून कुठे तरी हसले ,मी हे सगळे ऐकत लहानाची मोठी झाले होते .
पण मी तसे काही दाखवले नाही .आपला जन्म कशासाठी झाला .या धर्मात का
झाला .त्या बोलत होत्या मी ऐकत होते .
शेवटी त्यांनी मला विचारले ,आपण झोपतो ,सकाळी उठतो ,अचानक एखाद्या
अपघात मधून एखाद्या संकटातून वाचतो .हे कोण करते देवच ना ?
मी त्या बोलत होत्या त्याला मी हो बोलले .
मला त्यांना कुठे विरोध करायचा नव्हता .त्या जे करत होत्या ते त्यांना पटत होते .
अचानक त्या बोलल्या आपले माणसे आपल्याला साठी जेव्हा काही करतात तेव्हा त्या
आपल्याला आवडतात ,पण अचानक त्यांनी काही करणे सोडून दिले तर .मग आपण
ते काही करत नाही म्हणून त्यांना नाव ठेवतो .ती मग आपल्यला आवडत नाही .
मग आपण कधी विचार केला आहे का ?हे लाख मोलाचे शरीर आपल्याला दिले आहे .
त्या साठी जर आपण काही केले नाही तर त्या देवाला पण आपण आवडू का ?
मी फक्त ऐकत होते .
त्यांचे बोलून झाले आणि त्या बोलल्या आम्ही दर महिन्याला आलो तर आवडेल का ?
मी हो बोलले .
कारण मी अशा एक आज्जीनं ओळखत होते .त्याचा मुलगा आणि पती अचानक 

एक अपघात मध्ये गेले होते .नाते वाईक आले काही दिवस येत राहिले .आजी सैरभर झाल्या .
एकट्याच बसून असायच्या ,शेजारी किती दिवस येणार ,जगण्याची इच्छा संपलेल्या त्या
खूप एकट्या झाल्या बोलणे विसरल्या .आणि अचानक एक दिवस त्याची बेल वाजली .
चार पाच बायका दारात ,आम्ही स्वधाय परिवार कडून आलो .
आजी काही बोलली नाही .पण त्यांना आवडले पण नाही .आजी बद्दल जेव्हा
त्या बायकांना समजले तेव्हा त्या पुन्हा पुन्हा आज्जी कडे जात राहिल्या .
आजीने विचार केला कोण आहे या माझ्या तरी येतात माझ्या कडे .त्यांच्या
बोलण्याचा आजीवर खूप परिणाम झाला .आणि आज त्या सगळ्या कार्यक्रमात असतात .
त्या देखील असेच कोणाला आणि कोणाला भेटत असतात .
दोन दिवसा पूर्वी झालेली हि घटना .पण मला माझ्या वडिलांची आठवण करून गेली .
ते असतानी नेहमी काहीना काही सांगत असत .अभंग नुसता म्हणत नसत .
त्याचा अर्थ समजवत असत ते बोलत .
आपण कधी तरी अडचणीत उपयोगी पडावे म्हणून .बँकेत पैसे ठेवतो ना तसे
समज .आज तू देवाचे नाव घेसील ,वाईट झाले तर तुला राग येईन देवाचा ,
पण तेव्हा असे समज तू जे काही करते ते देवा कडे डीपोजीट समज ,ते तुला संकटात
उपयोगी पडेल ,
{असेच काही मनातील }
आशा १७/२/१५

Sunday, 15 February 2015

हमें तुम से प्यार कितना, ये हम नहीं जानते



हमें तुम से प्यार कितना, ये हम नहीं जानते
मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना
हमें तुम से प्यार


सुना गम जुदाई का, उठाते हैं लोग
जाने जिंदगी कैसे, बिताते हैं लोग
दिन भी यहाँ तो लगे, बरस के समान
हमें इंतज़ार कितना, ये हम नहीं जानते
मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना
हमें तुम से प्यार कितना, ये हम नहीं जानते
मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना

तुम्हें कोई और देखे, तो जलता है दिल
बड़ी मुश्किलों से फिर, संभालता है दिल
क्या क्या जतन करते हैं, तुम्हें क्या पता
ये दिल बेकरार कितना, ये हम नहीं जानते
मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना
हमें तुम से प्यार कितना, ये हम नहीं जानते
मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना

फिल्म : कुदरत 
सग़ीत : आर.डी.बर्मन
गीतकार : मजरूह सुल्तानपुरी
गायक : किशोर कुमार

छूकर मेरे मन को

फिल्म - याराना (Yaarana)
    गायक - किशोर कुमार

(छुकर मेरे मन को किया तूने क्या इशारा
बदला यह मौसम लगे प्यारा जग सारा

छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा
बदला यह मौसम लगे प्यारा जग सारा

छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा

तू जो कहे जीवन भर तेरे लिए मैं गाऊँ
गीत तेरे बोलों पे लिखता चला जाऊं
मेरे गीतों में तुझे ढूंडे जग सारा
छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा

आजा तेरा आँचल यह प्यार से मैं भर दूँ
खुशियाँ जहाँ भर की तुझको नज़र कर दूँ
तू ही मेरा जीवन तू ही जीने का सहारा
छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा
बदला यह मौसम लगे प्यारा जाग सारा

छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा
फिल्म - याराना 
    गायक - किशोर कुमार

ज़िंदगी एक सफ़र है सुहाना

ज़िंदगी एक सफ़र है सुहाना 

]यहाँ कल क्या हो किसने जाना
अरे ओ लेइयो लेइयो, ओलेइयो लेइयो
ओलेइयो लेइयो, ओलेइयो लेइयो
ओलेइयो लेइयो, ओलेइयो लेइयो 

चाँद तारों से चलना है आगे
आसमानों से बड़ना है आगे 
पिछे रह जाएगा यह ज़माना
यहाँ कल क्या हो किसने जाना
ज़िंदगी एक सफ़र है सुहाना
यहाँ कल क्या हो किसने जाना

हस्ते गाते जहाँ से गुज़र
दुनिया की तू परवाह ना कर
मुस्कुराते हुए दिन बिताना
यहाँ कल क्या हो किसने जाना
हाँ ज़िंदगी एक सफ़र है सुहाना
यहाँ कल क्या हो किसने जाना

मौत आनी है आएगी इक दिन
जान जानी है जाएगी इक दिन
ऐसी बातों से क्या घबराना
यहाँ कल क्या हो किसने जाना
ज़िंदगी एक सफ़र है सुहाना
यहाँ कल क्या हो किसने जाना

ज़िंदगी की ना टूटे लड़ी


ज़िंदगी की ना टूटे लड़ी
प्यार कर ले घड़ी दो घड़ी
लंबी लंबी उमरिया को छोड़ो
प्यार की इक घड़ी है बड़ी[/B]


उन आँखों का हँसना भी क्या
जिन आँखों में पानी ना हो
वो जवानी जवानी नही
जिसकी कोई कहानी ना हो
आँसू हैं खुशी की लड़ी

आज से अपना वादा रहा
हम मिलेंगे हर एक मोड़ पर
दिल की दुनिया बसाएँगे हम
गम की दुनिया का दर छोड़ कर
जीने मरने की किसको पड़ी

लाख गहरा हो सागर तो क्या
प्यार से कुछ भी गहरा नही
दिल की दीवानी हर मौज पर
आसमानों का पहरा ना हो
टूट जाएगी हर हथकडी 
चित्रपट -क्रांति
गायक: लता मंगेशकर,नितिन मुकेश 


वक़्त ने किया क्या हंसीं सितम

वक़्त ने किया क्या हंसीं सितम
तुम रहे न तुम हम रहे न हम
वक़्त ने किया...


बेक़रार दिल इस तरह मिले
जिस तरह कभी हम जुदा न थे
तुम भी खो गए, हम भी खो गए
एक राह पर चलके दो क़दम
वक़्त ने किया क्या हंसीं सितम
तुम रहे न तुम हम रहे न हम

वक़्त ने किया...
A
जाएंगे कहाँ पूछता नहीं
चल पड़े मगर रास्ता नहीं
क्या तलाश है कुछ पता नहीं
बुन रहे हैं दिल ख़्वाब दम-ब-दम
वक़्त ने किया क्या हंसीं सितम
तुम रहे न तुम हम रहे न हम

चित्रपट -कागज के फुल ,गायक -गीता दत्त 


चलो इक बार फिर से अजनबी बन जाएँ हम दोनों


चलो इक बार फिर से अजनबी बन जाएँ हम दोनों
न मैं तुमसे कोई उम्मीद रखूँ दिल नवाजी की
न तुम मेरी तरफत देखो गलत अंदाज़ नज़रों से
न मेरे दिल के धड़कन लडखडाये मेरी बातों में
न ज़ाहिर हो तुम्हारी कशमकश का राज़ नज़रों से
चलो इक बार फिर से..

तुम्हें  भी कोई  उलझन  रोकती  है  पेशकदमी  से
मुझे  भी  लोग  कहते  हैं  कि  यह  जलवे  पराये  हैं
मेरे  हमराह  भी  रुस्वाइयां  हैं  मेरे  माझी  की
तुम्हारे  साथ  भी  गुजरी  हुई  रातों  के  साए  हैं
चलो  इक बार  फिर  से ..

तारुफ़  रोग  हो  जाए  तो  उसको  भूलना  बेहतर
ताल्लुक  बोझ  बन  जाए  तो  उसको  तोड़ना  अच्छा
वोह  अफसाना  जिसे  अंजाम  तक  लाना  न  हो  मुमकिन
उसे  इक  खूबसूरत  मोड़  देकर  छोड़ना  अच्छा
चलो  इक  बार  फिर  से ..
चित्रपट -गुमराह 
गायक -महेंद्र कपूर 

मैं हर इक पल का शायर हूँ

मैं  हर  इक  पल  का  शायर  हूँ
हर इक पल  मेरी कहानी है
हर इक पल मेरी हस्ती है
हर इक पल मेरी जवानी है .

रिश्तों का रूप बदलता है,  बुनियादें ख़तम नहीं होती
ख्वाबों  और उमंगों की मियादें ख़तम नहीं होती
इक फूल मैं तेरा रूप बसा,  इक फूल में तेरी जवानी है
इक चेहरा तेरी निशानी है,  इक चेहरा मेरी निशानी है .

तुझको मुझको जीवन अमृत अब इन हाथों से पीना है
इनकी धड़कन में बसना है,  इनकी धड़कन में जीना है
तू अपनी अदाएं बख्श इन्हें,  मैं अपनी वफायें देता हूँ
जो अपने लिए सोची थी कभी,  वो सारी दुवायें देता हूँ .

मैं  हर  इक  पल  का  शायर  हूँ
हर इक पल  मेरी कहानी है
हर इक पल मेरी हस्ती है
हर इक पल मेरी जवानी है .
चित्रपट -कभी कभी .
गायक -मुकेश 

कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है

कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है
कि जैसे तुझको बनाया गया है मेरे लिए


तू अबसे पहले सितारों में बस रही थी कहीं
तुझे ज़मीन पे बुलाया गया है मेरे लिए |


कभी कभी मेरे दिल में ख़याल आता है
कि ये बदन ये निगाहें मेरी अमानत हैं
ये गेसुओं की घनी छाँव है मेरी खातिर
ये होंठ और ये बाहें मेरी अमानत हैं |


कभी कभी मेरे दिल में ख़याल आता है
कि जैसे बजती है शहनाइयां सी राहों में
सुहागरात है घूंघट उठा रहा हूँ मैं
सिमट रही है तू शरमा अपनी बाहों में |


कभी कभी मेरे दिल में ख़याल आता है .


कि जैसे तू मुझे चाहेगी उम्र भर यूँ ही
उठेगी मेरी तरफ प्यार की नज़र यूँ ही
मैं जानता हूँ कि तू गैर है मगर यूँ ही
कभी कभी मेरे दिल में ख़याल आता है |


चित्रपट -कभी कभी 
गायक -मुकेश ,लता 

    सब कुछ सीखा हमने


    • सब कुछ सीखा हमने, ना सीखी होशियारी
    • सच है दुनियावालों ,कि हम हैं अनाड़ी

    • कौन है अपना कौन पराया
    • दुनिया ने कितना समझाया
    • फिर भी दिल की चोट छुपा कर
    • खुद पे मर मिटने की ये ज़िद थी हमारी (२)
    • हमने आपका दिल बहलाया
    • सच है दुनियावालों कि हम हैं अनाड़ी

    • क्या क्या ख्वाब सुनहरे देखे
    • असली नकली चेहरे देखे
    • दिल पे सौ सौ पहरे देखे
    • मेरे दुखते दिल से पूछो
    • दिल का चमन उजड़ते देखा
    • टूटा जिस तारे पे नज़र थी हमारी (२)
    • सच है दुनियावालों कि हम हैं अनाड़ी

    • प्यार का रंग उतरते देखा
    • सच है दुनियावालों कि हम हैं अनाड़ी
    • हमने हर जीने वाले को
    • धन दौलत पे मरते देखा
    • दिल पे मरने वाले मरेंगे भिखारी (२)
    • चित्रपट -अनाडी 
    • गायक -मुकेश 


    जीना इसी का नाम है


    
    किसी की मुस्कुराहटों पे हो निसार
    किसीका दर्द मिल सके तो ले उधार
    किसीके वास्ते हो तेरे दिल में प्यार
    जीना इसी का नाम है
    किसी की ...
    
    माना अपनी जेब से फ़कीर हैं
    फिर भी यारों दिल के हम अमीर हैं !! 
    मिटे जो प्यार के लिये वो ज़िन्दगी
    जले बहार के लिये वो ज़िन्दगी
    किसी को हो न हो हमें तो ऐतबार
    जीना इसी का नाम है
    
    रिश्ता दिल से दिल के ऐतबार का 
    ज़िन्दा है हमीं से नाम प्यार का !!
    के मर के भी किसी को याद आयेंगे
    किसी के आँसुओं में मुस्कुरायेंगे
    कहेगा फूल हर कली से बार बार
    जीना इसी का नाम है!!
    चित्रपट -अनाडी 
    अभिनेता -राज कपूर 
    गायक -मुकेश 
    
    

    तेरी गलियों में


    तेरी गलियों में ना रखेंगे कदम, आज के बाद
    तेरे मिलने को न आएंगे सनम, आज के बाद

    तू मेरा मिलना
    तू मेरा मिलना समझ लेना एक सपना था
    तुझको आखिर मिल ही गया जो तेरा अपना था
    हमको दुनिया में समझना ना सनम, आज के बाद
    तेरे मिलने को...

    घिर के आएंगी
    घिर के आएंगी घटाएं फिर से सावन की
    तुम तो बाहों में रहोगी अपने साजन की
    गले हम ग़म को लगाएंगे सनम, आज के बाद
    तेरे मिलने को...

    चित्रपट -हवस 
    गीतकार ,महमद राफ्फी 

    Friday, 13 February 2015

    व्हॅलेन्टाईन्स डे

    प्रेम दिन 
    उद्या व्हॅलेन्टाईन्स डे म्हणजे प्रेमचा दिवस ,आपल्या संस्कृती नुसार असा दिवस कधी 
    साजरा करण्याची पद्धत नव्हती .प्रेम दाखवण्या साठी किवा आहे हे सिद्ध करण्यासाठी याची कधी गरज वाटली नसावी .मग आधीचे लोक प्रेम करत नव्हते का ?हो करत होते .
    पण प्रेम म्हणजे एखाद्या दिवशी काही तरी भेट देणे असे होते का ? नाही ते न बोलता देखील व्यक्त करता येते .अगोदर पण अनेक जन प्रेम करत, ते मनापसून असे .मग अशा प्रेमात जर त्या  व्यक्ती बरोबर लग्न नाही करू शकलो तर ती सुखी राहावी जिथे असेल तिथे हि भावना असे .अनेक जन मग परत आपल्या आयुष्यात कोणाला परत येऊ देत नसत .
    त्याला म्हणत अस्सिम प्रेम ,पण हे देखील बरोबर नसे .
    प्रेम आणि त्याची व्याख्या काय आहे, आजच्या तरुणाईची ,प्रेम म्हणजे चित्रपटात बघून ,कधी कथा कादंबरीतून ,तर कधी कोणी सांगितले त्या वरून .आज प्रत्येकला वाटते आपण पण प्रेम करावे .पण नक्की प्रेम म्हणजे काय ते समजले आहे का ?आजच्या तरुणाईची त्याची प्रेमाची व्याख्या अलग आहे .हॉटेल मध्ये जाणे मौज मस्ती करणे ,बाईक वर फिरणे ,एकमेकला महागडे गिफ्ट देणे .खरच हे प्रेम असते का ?
    या वर्षी जिच्या बरोबर व्हॅलेन्टाईन्स डे साजरा करतात ते पुढच्या वर्षी तिच्या किवा त्याच्या बरोबर असतीलच याचा पण भरवसा नाही .उद्या अनेक जन अगदी एखादे गिफ्ट देण्याची ऐपत नसेल तरी काही करून महागडे गिफ्ट देतील कुठे तरी मग फिरयला जातील .,पण जे खरच मना पासून जे प्रेम करतात त्यांना याची गरज का पडावी ,आपण शिकत आहे आपला बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंड हे अजून शिकत आहे मग ते कुठून गिफ्ट घेणार असा विचार करून "चल आजचा दिवस आपण एकमेका बरोबर घालवू ,थोड्या वेळ चौपाटीवर जाऊ .गप्पा मारू ,उद्याचे स्वप्न बघू असे केले तर ते प्रेम नसते का ?
    पण व्हॅलेन्टाईन्स डे साजरा करण्या मागे खरे अनेक करणे आहे .कोणी आणला हा ट्रेंड .
    माझ्या माहिती प्रमाणे ९० च्या नंतर हा ट्रेंड आला .जेव्हा केबल आले अनेक वाहिन्या आल्या .नवीन नवीन काही तरी करायचे .टी .आर.पी .वाढवा या तून मग अलग दिवस साजरे होतानी दिसू लागले .रंगीत टीव्ही घरोघर आले होते मग असे दिवस साजरे कारतानी टीव्ही वर ,एक सुंदर मुलगी किवा मुलगा दोघे एकमेकला सुंदर कार्ड ,फुले ,आणि गिफ्ट देतानी दिसू लागले आणि या सगळ्याची हळू हळू तरुणावर भुरळ पडू लागली .मग आपल्या गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड बरोबर असे दिवस साजरे करावे असे वाटू लागले .
    आणि हेच ओळखले मार्केटिंग मधील काही हुशार लोकांनी ,मग व्हॅलेन्टाईन्स डे च्या आधी काही दिवस मग बाजार पेठ फुलू लागल्या तरुणाईला खुणावू लागल्या .त्यात प्रेमाची परिभाषा बदलत होती .आज अगदी टीव्ही वर हिऱ्याचे दागिन्या पासून .छोट्या छोट्या गोष्टी व्हॅलेन्टाईन्स डे ला तुम्ही गिफ्ट देऊ शकता हे तुमच्या मनात भरवले जाते .
    मग ज्याच्या वर प्रेम करता त्याला गिफ्ट द्यावे किवा आपल्यला मिळावे असी अपेक्षा वाढली आणि प्रेम आज अशा गोष्टी मध्ये मोजले जाऊ लागले .
    आज या दोन तीन दिवसात अगदी छोट्या चोकलेट पासून सोन्याच्या दागिन्या पर्यंत मोठी उलढाल बाजारात बघयला मिळेल .
    अनेक गरज नसलेल्या गोष्टी खरेदी केल्या जातील .
    {आज बागे मध्ये एक मुलगी भेटली ,तिच्या मैत्रिणींची वाट बघत होती .एकटीच होती सहज बोलले कुठे आहे मैत्रीण, बोलली मित्राला भेटायला गेली आहे ,पण मला तिचा खूप राग आला आहे .कारण तिनी आज सकाळी स्वताची सोन्याची चेन विकली आहे ,व्हॅलेन्टाईन्स डे साठी ,आणि आईला सांगितले ट्रेन मध्ये चोरी झाली .मी काहीच बोलले नाही .माहित नाही असे अनेक मुले खोटे बोलत असतील का उद्याचा दिवस साजरा करावा म्हणून .}
    काही असो तरी सगळ्या प्रेमीना उद्या साठी प्रेम दिनाच्या शुभेछ्या.........