Sunday, 10 February 2019

अनुरूप जोड्या

काही जोड्या खूप सुंदर असतात. आणि त्यांना बघितल्यावर अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे असे बोलले जाते.तर काही जोड्या बघताक्षणी विजोड वाटतात. मग कधी तो  रंगामधील मधील फरक असेल नाहीतर उंची मधील ....त्यामुळे अशा जोड्या बघितल्यानंतर सहाजिकच वाटते. काय बघितले असेल याने किंवा हिने यांच्यात .....असे तेव्हा वाटते जर मुलगी सुंदर असेल आणि मुलगा तिला शोभणारा नसेल तर.... सहाजिकच  कोणाला देखील वाटते काय बघितले असेल या मुलीने या मुलांमध्ये .....किंवा जर मुलगा देखणा असेल आणि मुलगी त्याला शोभणारी नसेल तरी ...काय बघितल असेल या मुलाने या मुली मध्ये असेही बोलले जाते.

जोड्या तर स्वर्गातून बनून येतात असं बोलतात. काय माहिती हे खरे असेलही नाहीतर नसेलही. परंतु अनेकदा लग्न करताना मुली मुलगा कसा दिसतो ...यापेक्षा तो कसा आहे त्याचे वागणे कसे तो किती काळजी घेणार आहे ....एखाद्या परिस्थितीमध्ये तू कसा सांभाळून घेतो... चुका झाल्या असताना त्याचा बाऊ न करता समजून घेतो ....यावरही अनेकदा मुली मुलांना पसंत करतात ...अनेकदा मुलीचे दुसऱ्या मुलावर प्रेम असते परंतु जेव्हा प्रेमात धोका भेटतो. तेव्हा जर सावरणारे सांभाळून घेणारे कोणी भेटले तर नकळत मुली त्यांच्या प्रेमात पडतात ....तो मुलगा त्यांना शोभणारा आहे की नाही हे देखील त्या बघत नाही.
अशावेळी कोणाला वाटू शकते काय बघितले या मुलीने या मुलांमध्ये.

 अनेकदा मुलगा हुशार असतो. कर्तबगार देखील असतो. देखना असतो तरी त्याची जोडीदार सामान्य असते .अशावेळी तिच्याबरोबर लग्न करायचे ती आपले घर कसे सांभाळेल आपल्या माणसांना कशी सांभाळेल याचा विचार त्या मुलाने केलेला असतो .म्हणून तो त्या मुलीबरोबर लग्न करतो जरी मग कोणाला वाटले काय बघितले तिच्यामध्ये परंतु अशा अनेक जोड्या एकमेकांना अनुरूप असतात अर्थात सगळ्यात सुखी असतील असे नाही त्यांना अपवाद असू शकतात …तर काही जोड्या या नाईलाज म्हणून बनतात.त्याची करणे वेगवेगळी असतात.
असेच मनातले काही