आज कुछ तुफानी करते है !
दर वर्षी पावसाळा आला कि अनेकजण पिकनिक साठी जातात .
कोणी रिसॉर्ट ,कोणी बीच ,तर कोणी धबधबे बघयला जातात .
आणि दर वर्षी पाण्यात बुडून एवढे मेले तेवढे मेले हि पण बातमी येत असते
पण हे सगळ्या कशा मुळे होते आणि अशा घटना परत परत का होतात .
याचा कोणी विचार करत नाही .
अति उत्साहः आणि बेजबाबदार वागणे काही प्रमाणत कारणीभूत असतेच ना ?
अनेकदा समुद्र किनारी जाणारे हे मजा करयला जातात .मग ड्रिंक पार्ट्या यात
आल्याच.मग भान विसरून जाणे आपण जिथे जातो त्या ठिकाणाची माहित नसते
तरी देखील पाण्यात आत जाणे .आपल्याच नादात राहणे .मग अशी वेळ येते
सावरायला वेळ मिळण्या आधीच काळाची झडप बसते .
अनेकाना हे पटणार नाही पण असे अनेकदा बघितले आहे .
काही वर्षा पूर्वी लोणवळ्यास गेलो होतो.बुशी धरण पूर्ण भरले नव्हते
पाऊस जोरात चालू होता .अनेक जण धरणात उतरले होते.
कमरेच्या वर पाणी होते .पाऊस चालू होता त्या मुळे पाण्याची पातळी
वाढत होती .तिकडे असणारा सुरक्षा रक्षक शिट्टी वाजून सगळ्यांना बाहेर पडायला
सांगत होता.पण हातात बाटल्या घेतलेले अनेक जण त्याचा ऐकत नव्हते .
दुसरे ठिकाण रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर ...
समुद्रला भरती असतानी एक १५ ,२० जणांचे असेच एक टोळके जवळच गाडी
पार्क करून पार्टी चालू, नन्तर किती तरी आत समुद्रात पोहणे .
आजूबाजूला बायका मुली बघून नेको ते बोलणे आरडा ओरड .हे सगळे बघून
आपल्या परिवारा बरोबर असलेले लोक तिकडून निघून गेले .
भरती मुळे मोठ्या मोठ्या लाटा वाढत होत्या .
पण यांना कसली पर्वा नाही .शेवटी त्यातील एक बुडायाला लागला
सगळे एकदम भान वर आले आणि त्याला घेऊन किनर्यावर आले .
"आपले आयुष्य एवढे स्वस्त असते का ?"
असे वागतानी घरी कोणी आपली वाट बघत असणार हे कसे विसरले
जाते .
आपण ज्या ठिकाणी जात आहे त्या ठिकाणाची ,तेथिल समुद्राची आपल्याला
माहिती नसते .मग एवढे पाण्यात का जातात लोक हे समजण्या पलीकडील आहे .
अशा घटना वारंवार घडत असतानी लोक त्या पासून काही शिकत का नाही .
शेवटी काय ?
आज कुछ तुफानी करते है !
पण या मुळे आपल्या परिवारा मध्ये आपण तुफान तर आणत नाही ना ?
याचे काळजी घेणे हि पण आपली जबाबदारी आहे हे विसरता कामा नाही
{फेसबुक पोस्ट ५ जुलै १४ }

No comments :
Post a Comment