Tuesday, 23 December 2014

वट पोर्णिमा

तुळशीच्या लग्न पासून ते जुने महिना संपे पर्यंत अनेकांचे लग्न होतात .
जुने मध्ये वट पोर्णिमा असते ..दर वर्षी वट पोर्णिमेला अनेक घरातील नवीन सुना छान मस्त नटून सासू बरोबर पूजेला येतात .चेहरावर एक वेगळा आनंदा असतो .सासू सांगेल तशी त्या पूजा करतात .पहिली वटसावित्रीची पूजा असते ना.जन्मोजन्मी हाच नवरा भेटू दे म्हणून पार्थना करतात .पण आज जर बघितले तर पती बरोबर पटत नाही म्हणून पती पासून अलग होणर्या मुली देखील खूप आहे .जर असी पूजा करून एक जन्मी नाते टिकत नसेल तर असा पूजेला काही अर्था आहे का ?अनेक पती दारू पिऊन फक्त त्रास देतात .असा लोक साठी त्याच्या बायकांनी खरच पूजा करावी का ?पूर्वीच्या काळी बायकांना घर बाहेर पडता येत नसे ,असा व्रताच्या पूजेच्या निमित्तानी त्या घराबाहेर पडत.विधवा बायकांना समाजात कोणते स्थान नव्हते.असा वेळी आपला पती जगवा म्हणून त्या जमेल ते व्रत पूजा करत असत .आज स्रिया शिकतात स्वतच्या पाया वर उभ्या राहता आहे .घराची जबाबदारी सांभाळत आहे .आज या जमान्यात असा व्रत पुजेची त्यांना खरच गरज आहे का ?

No comments :

Post a Comment