Friday, 23 December 2016

मी एक छोट्या खेड्यातील शेतकरी कुटुंबातील आहे .मी बघितली आहे गरिबी येणारा दिवस कसा काढतात ,मुंबई सारख्या शहरात आल्यावर रस्त्याने जाणाऱ्या भारी गाड्याकडे लक्ष जाण्या एवजी हातगाडीवर समान ढकलत जाणाऱ्या कडे लवकर लक्ष जाते .मनात विचार येतो काय मिळत असेल याला दिवसभर कष्ट करून .माझ्या साठी तेव्हा फक्त तो एक माणूस असतो त्यांनी काय घातले आहे किवा ते किती महाग आहे का स्वस्त हा विचार मनात येतच नाही .रोज दिसणारे एक दृश्य आईवडिला पैकी कोणी तरी मुलाला हाताला पकडून शाळेत घेवून जात आहे .बेस्ट च्या बस स्टॉप वर उभे आहे .आई हा सगळा त्रास सहन करते आपल्या मुलांनी काही तरीबनवा म्हणून.माझे लक्ष तिकडे जाते .त्याच वेळी शाळेची बस जाते त्या कडे मी बघत नाही.करण मला माहिती त्या आईवडिलाना बस फी परवडत नाही. मी जी आहे जशी आहे तशा आणि तशा लोकांचा विचार मी करेल कारण मला माहिती आहे त्यांचेदुःख प्रोब्लेम कारण मी ते रोज अनुभवते मला ते माहिती आहे .पण मला नाही माहिती हाय सोसायटी मध्ये काय चालते.त्यांच्यादृष्टीने कोणती कार चांगली आहे तीची किंमत काय आहे .मला माहिती आहे छोट्या हॉटेल मध्ये किती पर्यंत काय भेटेल .पण मला नाही माहिती फाईव्ह स्टार मध्ये काय आणि कितीला भेटते .मला त्याची गरज पण नाही वाटत आणि विचार करावा पण नाही वाटत .कारण माझ्या या शहरात अर्ध्या पेक्षा जास्त लोक गाडीवर वडापाव खावून राहतात.ट्रेन ने प्रवास करतात.असेच मनातले काही

Monday, 12 December 2016

वानखेडे

वानखेडे स्टेडीयम 

क्रिकेट आवडत नाही असे फार थोडे लोक असतील .मला लग्ना अगोदर क्रिकेट आवडत नव्हते .खरे तर शेतकरी घरातील मी .आमच्या घरात रेडियो नव्हता .आणि टीव्ही देखील.क्रिकेटचानी  आमचा दूरदूर काही संबंध नव्हता.कपिल देवच्या टीमने वर्डकप जिंकला तेव्हा मी सातवीला किवा आठवीला असेल .


त्यानंतर शाळेतील प्रत्येक वहीवर क्रिकेटपटूचे फोटो असायचे .बस तेव्हडेच काय ते क्रिकेटर माहिती होते .लग्न झाले मुंबईत आले .वानखेडे स्टेडीयम जवळच आहे .कधी गिरगाव चौपाटीवर बसलो कि स्टेडीयम वरील लाईट दिसायच्या .अनेकदा येथे मैच चालू असायच्या .अनेकदा स्टेडीयम जवळून गेले पण कधी आता मध्ये जावून मैच बघावी असे कधी वाटले नाही .कारण क्रिकेटची आवड कमी .
अनेकदा मिस्टरांनी विचारले जाणार का ? पण जाणार कोणाबरोबर हा नेहमीचा प्रश्न कारण मिस्टरांना सुट्टी नसायची ते तिथेच अनेकदा बंदोबस्त साठी असायचे .क्रिकेट आवडायला लागले ते १९९६ मध्ये वानखेडेवर झालेली मैच .नक्की कोणा विरोधी होती आठवत नाही .पण सचिनची बॅटींग बघून मी क्रिकेटच्या प्रेमात पडले .तरी कधी वानखेडेवर जावून मैच बघावी नाही वाटली .

मागच्या आठवड्यात चितळे काकांची वानखेडेवरील पोस्ट वाचली .उगाच वाटले आपण किती जवळ राहतो तरी जात नाही .एकदा जायलाच हावे .वानखेडे स्टेडीयम कसे आहे ते बघावे .त्याच दिवशी मिस्टरांनी मुलीला विचारले जाणर का मैच बघायला .खरे तर तिला कॉलेज असून ती आली.


गेट नंबर सात शोधताना अनेक जण अक्षरशा हातात तिकीट घेवून धावत होते .स्टेडीयम मधून टाळ्या आणि वाद्याचे आवाज येत होते.वातावरण एकदम भारावलेले होते .गेट नंबर सात मधून आत गेले .आणि मस्त सुखद धक्का बसला. M C A Pavikion ची तिकीट होते बाजूला जिथे प्लेअर बसतात त्याच्या बाजूला ,त्याच्या समोर अजिंक्य राहणे बसलेला होता .सगळी कडे नुसता जल्लोष होता .त्याच दिवशी विराटने शतक ठोकले ,पूर्ण स्टेडीयम भरलेले होते .खरे तर टेस्ट मैच बघायला एवढे लोक येतात याचे ज्ञान मला प्रथमच झाले .अगदी समोरून गेलेला यादव आणि विराट बघितले .मैच संपली तेव्हा समोर ग्राउंड वर आलेला अश्विन ,.छोट्या मुलाना आटोग्राफ देणारा आश्विन ..........

त्याच वेळी समोर बघितले तर काय ? रवी शास्त्री समोरून चालत येत होते .नेहमी त्यांच्या मुलखाती बघितल्या आहे .त्यांची कॉमेट्री नेहमी ऐकली .मैच संपली कि काप्तानला मैच बद्दल विचारणारे रवी शास्त्री....एवढा आनंद झाला कि विचारायला नको .

मैच संपली तरी बाहेर अनेक लोक उभे होते .अगदी मरीन ड्राईव्हच्या .सिग्नलाजवळ  लोक खूप वेळ उभे होते .जेव्हा प्लेअर ची बस गेली तेव्हा लोक गेले ,
तेव्हा जाणवले आपण जवळ असून कधी आलो नाही हि चूक केली .


Tuesday, 29 November 2016

ती

रविवारी पुण्यावरून ट्रेन ने येत होते .महिलांचा डबा .गर्दी होती बसायला जागा नव्हती .एक घाणेरडे कळकट मळकट कपडे घातलेली वीस बावीस वर्षाची मुलगी दरवाजा समोर झोपली होती तिचा बाजूला छोटी मुलगी होती तिला बघून ती एक दीड वर्षाची असावी असे वाटत होते .गर्दी मुळे सगळ्या बायका तिला ओरडत होते येथे उभे राहिला जागा नाही आणि हि काय झोपली .पण तिने सगळ्यांचा बोलण्या कडे साफ दुर्लक्ष केले .तशीच झोपून राहिली .दरवाजात साधारणता पंचवीस वर्षाचा एक मुलगा बसला होता .तो तिचा नवरा होता .कर्जत गेले आणिती उठूनबसली .किती दिवसाची अंघोळ केली नाही असे वाटत होते .तिचा कडे नीट बघितले तेव्हा मला समजले तिला कावीळ झाली होती .तिला विचारले कुठे गेली होती .बोलली काविळीचे औषध टाकायला .दोन महिन्या पासून तिला कावीळ आहे .त्या छोट्या मुलीला पण कावीळ झाली होती .खूप अशक्त पणा आहे म्हणून झोपले होते बोलली

.कुठे तरी मुलुंड मध्ये गजरे विकते बोलली .राहायला कल्याण मध्ये कुठे तरी फूटपाथ वर राहते .कुठे पाणी पिणे अस्वच्छता या मुळे तिला कावीळ झाली असणार .तिला बोलले या मुलीला तुझा मुळे कावीळ झाली का .तर बोलली हि तीन वर्षाची आहे .हिचा नंतर एक मुलगा होता .छान होता .तिचा भाषेत टकाटक होता अचानक मेला .किती थंड पणे ती सांगत होती .ऐकून अंगावर काटा आला .आपले मुलं गेले .जसे ते जाणार होते असेच काही तिचे बोलणे .रस्त्यावर राहणारे म्हणून आपण त्याच्या कडे तुच्छातेने बघतो .पण आई हि तर आई असते ना ? ती मग बंगल्याील असो कि रस्त्यावरील .दुःख तर सारखेच ना .पण कशाचा बाऊ नाही कि रडारड नाही .हे असेच असते आणि होत राहणार हे त्यांनी स्वीकारेल असते का ? दोन बाळंतपण सहन केलेली ती मुलगी .फक्त आज म्हणून जगते का ? करणं त्यांना आपल्या मुलांची काळजी वाटत नसते का ? आपला धड ठिकाणा नाही मग आपण जन्म देतो त्या मुलांचे काय .असे त्यांना वाटत नाही का ?


दादर फुल मार्केट बाहेर असाच कमी वयाच्या मुली हार गजरे विकत असतात .उगाच मनात येते किती तफावत आहे समाजात .एक वर्ग आहे जो फक्त करियर चा विचार करून लग्न लवकर करत नाही .किंवा एक मुल बस महागाई आहे त्यांना चांगले भविष्य देऊ शकू का हा विचार करणारे .आणि हा एक वर्ग लवकर लग्न लवकर मुले .पुढे काय विचार नाही .कधी संपेल हि दरी .
असेच मनातले काही

आठवणीतील गाव

तिन्ही सांजेची वेळ , धुरळा उडवत आणि आवाज करत एस.टी स्टॅन्डवर येऊन उभी राहिली. तो बस मधुन उतरला एक नजर आजुबाजुला फिरवली. काही ओळखीचे चेहरे समोर आले. त्यांच्याकडे पाहून स्मित हास्य करून घराच्या वाटे कडे निघाला. गावच्या वेशी जवळ आल्यावर वेशीच्या उजव्या बाजूला दोन मंदिर होते . एक मारुतीच आणि दुसर संत मंदिर त्यासमोर मोठा सभागृह . जिथे गावातील भागवत सप्ताह संपन्न होतात. तर उन्हाळ्यात लग्न. रोज संध्याकाळी सांज आरती असते .आता पण आरती चालली होती . "युगे अठ्ठावीस विटेवरी उभा|"नकळतच त्याचे पाऊले मंदिराकडे वळाले . दर्शन घेतले आणि तो गावच्या ओबडधोबड रस्त्यावरून चालू लागला. मध्येच एखादी आज्जी ओट्यावर बसलेली दिसत होती. तिन्ही सांज म्हणुन झाडावर पाखरांची किलबिल ऐकु येत होती. शेतातुन घरी परतणारी माणसे. कोणाच्या डोक्यावर गवताचे भारे तर कोणाच्या हातात शेळी नाही तर बैल . अन बैलाच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज. हे सगळे बघत तो कधी घरा समोर आला  हे त्याला पण समजले नाही.

घराला कुलूप होते. म्हणजे आई अजून आली नव्हती. तो तिथेच ओट्यावर बसला .त्याला स्वताचे बालपण आठवले. शाळेतून घरी आला की तो अशीच आईची वाट बघत बसायचा . घरासमोर बोरीचे झाड होते. त्याचे बोर पाडायचा किंवा चिंचोके खात बसायचा . आई कधी येईल. भूक लागलेली असायची. दुर शेता कडून येणाऱ्या वाटे कडे डोळे लावून बसायचा. दुर वरुन डोक्यावर गवताचे ओझे आणि हातात शेळी घेऊन आई येताना दिसली की खूप आनंद व्हायचा त्याला. गवताचे भारे अंगणात टाकून शेळी बांधे पर्यत आईचा पदर धरून मागे मागे फिरत रहायचा. मग आई घरात जायची. पटकन चुली मधील राख भरून टाकायची. बाहेरून गोवऱ्या आणि बाभळीचे सरपण घेऊन घरात यायची. दिवा लावायची . चुल पेटवायची मग चुलीवर चहा ठेवायची. शेतातुन आणलेली भाजी काढायची . त्या बरोबर मुगाच्या किंवा चवळीच्या शेंगा काढून द्यायची. चहा होई पर्यंत तो शेंगा खात बसायचा . शेळीच्या दुधाचा चहा पिऊन झाला की तो दिवसभर शाळेत काय झाले ते आईला सांगायचा. चुली वरील गरम गरम भाकरी बरोबर भाजी खाऊन घ्यायचा.घरच्या ओट्यावर घरातील सर्व जण बसायचे. पौर्णिमेच्या आधी आणि नंतर काही दिवस छान चांदणे पडायचे. मग शेजारच्या आज्जी काकू कोणी येऊन बसत गोष्ट सांगत . आजु बाजुला पडलेला चंद्र प्रकाश . शांतता छान वाटायची उगाच जमिनीवर पडुन आकाशात किती तारे असतील ते मोजण्याचा वायफळ प्रयत्न करायचा. ते बघत बघत झोप लागायची समजत नसे.किती सुंदर दिवस होते ते. कुठून तरी बाईक चा आवाज आला आणि त्याची तंद्री तुटली. दुर वरुन येणाऱ्या पाय वाटे वरून एक बाईक येत होती. शेजारच्या काकू मुला बरोबर बाईक वरुन शेतातुन आल्या होत्या. आता गाव बदलले होते. कोणी पायी जास्त चालत नाही.
दूर वरून येणारी आई दिसली तशीच अनेक वर्षा पुर्वी होती तशीच डोक्यावर गवताचे ओझे हातात शेळी फक्त आई आता थकली होती. जवळ आली त्याला बघून आनंदी झाली. तो पुढे गेला गवत घेतले. शेळी बांधली. आई कडून चावी घेतली . घरात गेला पाणी आणले आईला दिले. त्याने आईला गॅस घेऊन दिला होता . त्यानेच चहा केला. गॅस वर आईने कुकर लावला. त्याच्या साठी चपात्या केल्या. तो नको नको म्हणत होता. पण तुला आता भाकरीची सवय नसेल राहिली ना . असे म्हणून तिने त्याला ते जेवण दिले. त्याला ओरडून आईला सांगावे वाटत होते. आई मला परत चुली वरील भाजी-भाकरी हवी गं . पण त्याने ते मनात ठेवले कारण त्याला माहीत होते .असे वरणभात चपाती आई फक्त तो आल्यावर करते . आपल्या बरोबर ती दोन तीन घास चांगले खाते . म्हणून तो गप्प राहतो . आईचे लक्ष नाही हे बघून तो दुपारची टोपल्यातील भाकर घेऊन खातो . त्याच्या कडे सगळे आहे पण आई त्याच्या बरोबर राहत नाही. तिला शहरातील वातावरण आवडत नाही. कारण तिचे आयुष्य शेतात गेलेले असते ना .

तो जेवून बाहेर येतो .आता पण तसाच प्रकाश पडलेला असतो . फक्त आता कोणी बसायला येत नाही. कारण आता शेजारच्या आज्जी काकू या घरात टीव्ही बघत असतात . एक होता राजा कधीच हरवलेला असतो .आकाशातील तारे मोजण्या पेक्षा मुले घरात मोबाइत वर गेम खेळत बसतात . तो मनात म्हणतो हरवलेला गाव माझा ..

निरागस

लहान मुले खूप निरागस असतात असे आपण म्हणतो .किवा त्यांनी काही मागितले कि आपण त्यांना जसे जमेल तसे देतो .मग गरीब असेल नाही तर श्रीमंत आपल्या ऐपती प्रमाणे खरेदी केली जाते .पण कधी कधी मुले नको तो हट्ट करतात .
मागे काही दिवसा पूर्वी मुंबई विमानतळावर{ डोमास्तिक} जाण्याचा योग आला होता.प्रतीक्षा विभागात वाट बघत बसले होते .समोर प्रवास करून येणारे प्रवाशी गेट मधून बाहेर येताना दिसत होते .कोणी एकटे कोणी परिवारा बरोबर काही एकदम खुश तर काही त्रस्थ ..........


गेट मधून असेच एक परिवार बाहेर आले त्यांचा बरोबर एक दोन तीन वर्षाचा मुलगा होता.आजी आई बाबा आणि तो ....आई च्या हाताला पकडून चालत होता .म्हणण्या पेक्षा त्याची आई त्याला खेचत घेवून जात होती आणि तो रडत होता.अचानक त्याने आईचा हात सोडला आणि तो जमिनीवर लोळायला लागला.छान ड्रेस घातलेला तोछोटा मुलगा आपले आई ऐकत नाही बघून त्याने असे केले असणार .ते बघून मला गम्मत वाटली .विमानतळ म्हणजे काही एखादी गल्ली किवा रस्ता नाही .त्याचे आई वडील पण चांगले श्रीमंत वाटत होते .
गाच मला दिवाळी खरेदी वेळी गावच्या बाजारात आईच्या मागे रडत जाणारे मुले आठवले .आईने घेतलेले कपडे आवडले नाही का ते सरळ आपण कुठे आहे हेबघत नसायचे आणि जमिनिवार मातींत लोळण घायचे त्याबरोबर जोरजोरात रडायचे.हात पाय आपटायचे आपल्याला हवे ते मिळत नाही तो पर्यंत हे चालू राहायचे.पण त्याच वेळी आईवडिलांची अवस्था काय होत असणार हे त्यांना समजत नसायचे.पैसे असेल तर हवे ते घेता येत असे नाही तर अजून मार मिळत असे .तसाच आपल्या रडणाऱ्या मुलाला घेवून मनातून दुखी होत ते जायचे.

ठिकाण कोणते असो ,परस्थिती कोणती असो .मुलांची मानसिकता सारखी असते हेच खरे .आपल्याला जे हवे ते मिळत नसेल तर असे काहीकरा बाकी लोकांचे लक्ष जाईन आणि आई बाबा आपल्याला हवे ते घेतील हा त्यांचा हिशोब असतो .

असे करताना सहज आपल्या आईबाबांना मुलाला काही वळण नाही लावले का असे बोलून जातात या गोष्टीचे त्या निरागस मुलांना जाणीव नसते .


चार लोकात कोणी नाव ठेवू नाही म्हणून आईबाबा हवे ते मुलांना घेवून देतात.मग मुले बरोबर लक्षात ठेवतात .आपण माणसांत असे वागले कि आपल्याला हवे ते मिळते .मग ते श्रीमंत असतील नाही तर गरीब ,मग तो गावचा बाजार असेल नाहीतर विमानतळ नाही का? 

असेचमनातले काही

मिस यु सो मच.

मिस यु सो मच.
.दिवसभर त्याचा एक पण मेसेज नाही बघून तिनी त्याला मेसेज पाठवला .s2u त्याचा रिप्लाय .तिला यावर काही बोलावे वाटलेच नाही .खरे तर तिला यावर वेगळे काही ऐकायचे होते .पण तो काही बोलतच नाही .मग तिनी आता चुपच बसू असे ठरवले .पण यावर तो काही बोलला नाही .तिला त्याचा काही थांगपत्ता लागत नाही .गेले अनेक वर्ष तो तिला ओळखत होता.त्याचे वागणे त्याचे बोलणे यावरून तिला नेहमी वाटायचे कि त्याला ती आवडते .तसा तो बिनधास्त वोलयचा त्याच्या आयुष्यात असणाऱ्या त्याच्या मैत्रिणी ,असलेली त्याची मैत्री आणि त्याची त्याला सोडून गेलेल्या मैत्रिणी बद्दल तिला सगळे सांगत असायचा .तरी तिला कुठे तरी वाटत राहायचे .त्याला ती आवडत असावी तो कधी बोललाच नाही .पण तिला जाणवत राहायचे .त्याला भेटली तरी तिला तो समजायचं नाही .


तो बोलत नाही तर आपणच बोलू या असा विचार करून ती त्याला भेटायला जाते .तिला असे अचानक बघून तो खुष होतो .तसे तिला ़सांगतो बस त्यानंतर तिला तो कळतच नाही .तिला वाटते त्याला ओरडून विचारावे तुला नक्की .काय वाटते पण ती काही बोलत नाही .त्याच्या नजरेत ती प्रेम शोधत राहते पण तिला ते जाणवत नाही आणि दिसत हि नाही .त्याच्या आयुष्यात आपली जागा काय असा प्रश्न तिला पडतो .कारण त्याच्या भोवताली असणारा त्याच्या मित्र मैत्रिणीचा घोळका नाही तर चालू असणारे त्याचे फोन .तिला प्रश्न पडतो आपण का आलो याला भेटायला .ज्या उत्साहाने ती त्याला भेटायला आली होती आता तो मावळतो .ती काही झालेच नाही असे दाखवते  '



.त्याला भेटून आल्यावर विचार करत राहते .तो मेसेज करेल खूप भरभरून बोलेन .तिला ऐकायचे असते .तिला अचानक बघून त्याला काय वाटले .? ती त्याच्या जवळ बसली तर त्याला नेमके काय वाटले .ती गेली तर त्याने खूप मिस केले .तिचा बरोबर खूप बोलायचे राहून गेले .असे प्रेमाचे खूप काय काय बोलेन असे तिला वाटत राहते .पण तसे काही होत नाही .ती आली गेली .त्याला काही फरक नाही पडत म्हणजे त्याच्या आयुष्यात तिला काही जागा नाही .हे तिच्या लक्षात येते .ती मनाशी ठरवते आता त्याचा विचार कधी करायचा नाही .स्वतःच्या कामात त्याला विसरण्याचा प्रयत्न करते .काही दिवस जातात .एक रविवारी अचानक सकाळी सकाळी बेल वाजते .दार तीच उघडते .समोर त्याच्या आई बाबा बरोबर तो उभा असतो ती अवाक होऊन बघते ."काय होणाऱ्या सुनबाई ,घरात तरी बोलवणार का नाही ".ती एकदम भानावर येऊन त्याच्या कडे बघते तो मिश्किल पणे गालात हसत असतो .(काल्पनिक )

स्वकौतुक .

काही लोक स्वता बद्दल खूप बोलतात .अर्थात ते बोलतात ते खरे असेल त्यांनी समाजासाठी मोठे काम केले असेल तर कोणी त्यांचे बोलणे मन लावून ऐकतात .कारण त्यांच्या कडून खूप काही असते शिकायला .पण याउलट काही लोक काही नसताना किवा आपण काही विचारले नाही तरी स्वता बद्दल सांगत असतात .

असे लोक कुठे भेटतात .अगदी बस मध्ये एखाद्या रांगेत .मला नेहमी प्रश्न पडतो का असे करतात हे लोक .

माझे मते माणसांची खरी संपत्ती त्याचे ज्ञान आणि त्याची मुले हि असतात .तुमच्या कडे मोठे घर आहे .अनेक गाड्या आहे .सगळ्या सुख सुविधा आहे .पण त्या तुम्ही कधी बरोबर घेवून नाही फिरू शकत .पण ज्ञान अशी गोष्ट नेहमी तुमच्या बरोबर राहते .अर्थात याबद्दल देखील काही लोकांना खूप अहंकार असतो .न विचारता ते किती शिकले .काय जॉब करतात .त्यांना पगार किती .हे सांगत असतात .

काही दिवसा पूर्वी एक हॉस्पिटल; मध्ये आलेला अनुभव ,अर्थात हॉस्पिटल सरकारी आयुर्वेदिक,बाहेरच्या पेक्षा येथे खूप कमी ,फक्त २५% फी घेतली जाते अर्थात सरकारी म्हणजे काही अडचणी असतात तश्या येथे आहे .पण येथे एक महिला अडमीट होती .अगदी पहिल्या दिवसापासून .जेवण बरोबर नाही चहा बरोबर नाही .आम्ही असे नोकरांना पण नाही देत .अर्थात त्या जेवणा बद्दल बाकी लोकांना काही प्रोब्लेम नव्हता .कारण हॉस्पिटलचे जेवण चमचमीत कसे असणार असे त्यांचे मत होते आणि ते बरोबर होते
.
हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या महिला बरोबर ती बाई सकाळी सकाळी भांडत होती मला येथे नाही राहायचे मला मला डिस्चार्ज द्या कारण पंचकर्म विभाग तिच्या वार्ड पासून लांब आहे .तिला खूप चालावे लागते ."आमच्या घरी फोर व्हीलर आहे .दारात गाड्या उभ्या असतात ."चालण्याची सवय नाही .हे बोलून झाल्यावर ती थोड्या वेळाने बोलली ."उगाच बाहेर दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये परवडत नाही म्हणून येथे आलो " हॉस्पिटल मधील महिला कर्मचारी हिने माझ्याकडे बघितले .तिच्या नजरेत प्रश्न होता .दारात गाड्या आहे .मग हिला 
दुसरीकडे परवडत नाही .नेमके काय खरे .
हे एक उदाहरण आहे .का बोलतात लोक हे ,त्यांच्या कडे किती असेल ते आपल्या काही उपयोगाचे असते का ?
ज्यांचे मुले निर्व्यसनी ,आईवडिलांचा आदर करणारी असतात .त्यांचे नाव मोठे करणारी असतात .ती खरी कमाई.नाही तर तुमच्या कडे अनेक गाड्या अनेक बंगले आहे .मुले व्यसनी आहे .रोज घरात तमाशा करतात .आईवडिलांना त्रास देतात .तर काही कमवले नाही असे समजायला काय हरकत असते .
ज्ञानच गर्व नक्की असावा .पण तेव्हा त्या ज्ञाना मुळे तुम्ही कोणाच्या उपयोगी पडत असाल तर .कौतुक नक्की करावे .पण आपण आपले नाही तर समाजाने आपले ........
असेच मनातले काही .

Tuesday, 23 August 2016

मनातील बोचरे शल्य


मनातील बोचरे शल्य

मनातील शल्य खूप आहेत ,पण नेहमी जाणवणारे शल्य ते म्हणजे एखादी महिला शिकलेली असेल आणि ती नोकरी न करता गृहिणी असेल तर तिचा बद्दल बाकीच्यांना नेमके काय वाटते .अनेक महिला अशा आहेत त्यांना घरातील लोक नोकरी करू देत नाही .किवा जर नोकरी असेल आणि मुले झाल्या नंतर त्यांना बघयला जर कोणी नसेल तर मग जर नोकरी सोडण्याची जर वेळ आली तर ती स्रीलाच सोडावी लागते .मुले मोठी होतात तो पर्यंत स्रीचे वय वाढते मुले आपल्या विश्वात रममाण होतात .मग ती स्री एकटी पडते .तेच आधी पासून गृहिणीचे असतात त्यांचे बरोबर पण होते .गृहिणी असल्या मुळे तिला खुपदा गृहीत धरले जाते .मग अगदी त्याची सुरवात उठल्या पासून होते ,आपल्या नवऱ्याचा डबा ऑफिसची तयारी सकाळचा नाष्ट,मग मुलाचा डबा शाळेची तयारी यात तिला स्वताकडे बघायला देखील वेळ मिळत नाही .आणि कधी काही वाटले तर "तुला कुठे जायचे आहे ,घरीच तर आहेस "!असे म्हणून तिचा कडे दुर्लक्ष होते .कधी तरी तिला वाटते सुट्टी घ्यावी ,फिरावे ,पण हे सगळे घरातील बाकीच्याना वेळ असेल तर फिरयला जायचे यात तिची आवड निवड कुठे विचारत घेतली जात नाही ,अगदी जेवण बनवतानी देखील मुलांना काय आवडते ,नवऱ्याला काय आवडते हेच पहिले जाते त्यात ती स्वताची आपली एक आवड आहे हे पण विसरून जाते .मग आपण घरात नसतानी हि दिवस भर काय करते याचा पण विचार केला जात नाही .अनेकदा नोकरी करणऱ्या बायका सहज बोलून जातात .यांना काय काम आहे घरी तर असतात.यांना काय काम आहे गोसिपिंग शिवाय .पण खरच सगळ्या तशाच असतात का ? पण अनेकदा बोलयला कोणी नसते ,टीव्ही किती बघणार .मग येतात अशा बायका एकत्र स्वताचे सुख दुख बोलतात पण यांना काय काम असे म्हणून नावे ठेवली जातात .या उलट नोकरी करणार्या बायका काही प्रमाणत आपली आवड निवाड जपू शकतात ,स्वत साठी काही घेऊ शकतात .त्या बाहेर पडतात घर मुले नवरा यापासून अलग वातावरणात काही तास का होईन असतात .मग त्यांना अलग अलग व्यक्ती अलग अनुभव येत राहतात .घर आणि घराचे विचार यापासून दूर असतात . हो त्यांना त्यांची मुले सोडून जावे लागते .मग कधी ते आजारी असतील तरी याचे त्यांना वाईट वाटते मग त्या ते बोलून दाखवतात .स्वता आजारी असेल तर घरी राहून आराम करू शकतात .त्या स्वता कमवतात त्या मुळे त्याच्यात खूप आत्मविस्वास असतो .
पण गृहिणी आजारी जरी असेल तरी तिला सगळी कामे करयला लगतात .याचा कोणी कधी विचार करते का ?नोकरी करणारी असेल तर घरातील तिला मान देतात ,काही प्रमाणत का होईना कामात मदत करतात .पण गृहिणी ला कोणी मदत करत नाही 
खूप असे छोटी छोटी कामे असतात .ती देखील केले जात नाही .
{हे माझे विचार आहे माझे शल्य आहे बाकीचे त्याचासी सहमत असतीलच असे नाही }


रेणुका आर्ट्स  साहित्य  संमेलन  २०१५  साठी लिहिलेला  लेख  

!!आशा !!

Tuesday, 9 August 2016

माझ्या बद्दल

मी  आशा  नवले  .........
वाचनाची  आवड असणारी ,आजूबाजूला जे  काही  घडते ,त्याचा  चांगला वाईट परिणाम आपल्यावर होत असतो .तो असेच  मनातले काही  म्हणून  लिहिण्याचा  प्रयत्न  करते .वाचनाची आवड  जास्त  त्यामुळे  आपल्याला लिहिता येणार  नाही असे वाटायचे .जे  लिहितो  ते कोणाला आवडेल  का  असे  वाटायचे .मनात  कुठे  तरी एक  भीती  होती  .मग नाव न  टाकता ब्लॉग  वर  लिहियाला सुरवात  केली .जेव्हा  माझ्या ब्लॉग ला भेट देणारे  पाच हजार वाचक होतील तेव्हा फोटो आणि  नाव टाकायचे .आजपासून माझा ब्लॉगवर माझे  नाव दिसणार ...............
आता पर्यंत ज्या ज्या  वाचकांनी  माझ्या ब्लॉगला भेट दिली .त्या सगळ्यांचे मनापासून आभार .........

Saturday, 6 August 2016

कहाणी नागपंचमीची

श्रावण महिन्यातील पहिला सन म्हणजे नागपंचमी .
शहरात नाही पण खेड्यात हा सन मोठ्या उत्साहात साजरा होतो .
झाडाला  मोठे मोठे  झोके बांधले  जातात .संध्याकाळी सगळ्या लेकी सुना
एकत्र येतात .आणि झिम्मा फुगडी  खेळतात .
 कहाणी नागपंचमीची .........
ऐका नागोबा देवा, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला पांच सुना होत्या. चातुर्मास्यात श्रावणमास आला आहे, नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी आपल्या पणजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वात धाकटी सून होती तिच्या माहेरचं कोणीचं नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून, नागोबा मला माहेराहून न्यावयास येईल, असं म्हणू लागली. इतक्यात काय झालं? शेषभगवानास तिची करुणा आली. त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला. त्या मुलीला नेण्याकरिता आला. ब्राह्मण विचारात पडला. हा इतके दिवस कुठं लपून राहिला? व आताच कुठून आला? पुढे त्यानं मुलीला विचारलं. तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली. त्या वेषधारी मामानं तिला आपल्या वारुळात नेलं, खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवा बसवून आपल्या बिळात घेऊन गेला. आपल्या बायकामुलांना ताकीद दिली की, हिला कोणी चावू नका.
एके दिवशी नागाची नागीण बाळंत होऊ लागली, तेव्हा हिला हातांत दिवा धरायला सांगितलं. पुढं ती व्याली, तिची पिलं वळवळ करू लागली. ही मुलगी भिऊन गेली. हातांतला दिवा खाली पडला. पोरांची शेपूटं भाजली. नागीण रागावली. तिनं सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली, तो म्हणाला, “तिला लौकरच सासरी पोचवू”. पुढं ती पूर्ववत आनंदानं वागू लागली. एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पावती केली. नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली. आमची शेपूटं कशानं तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यास फार राग आला, त्याचा सूड घ्यावा म्हणून ते हिच्या घरी आले. नागपंचमीचा दिवस. हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली. ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागांची चित्रं काढली. त्यांची पूजा केली. जवळ नागांना, लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिलं पहात होती. सरतेशेवटी तिनं देवाची प्रार्थना केली. “जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत”. असं म्हणुन नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार त्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला. मनात तीजविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली. दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून आपण निघून गेले. दुसऱ्या दिवशी तिनं हार उचलून गळ्यांत घातला.
एके दिवशी नागाची नागीण बाळंत होऊ लागली, तेव्हा हिला हातांत दिवा धरायला सांगितलं. पुढं ती व्याली, तिची पिलं वळवळ करू लागली. ही मुलगी भिऊन गेली. हातांतला दिवा खाली पडला. पोरांची शेपूटं भाजली. नागीण रागावली. तिनं सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली, तो म्हणाला, “तिला लौकरच सासरी पोचवू”. पुढं ती पूर्ववत आनंदानं वागू लागली. एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पावती केली. नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली. आमची शेपूटं कशानं तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यास फार राग आला, त्याचा सूड घ्यावा म्हणून ते हिच्या घरी आले. नागपंचमीचा दिवस. हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली. ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागांची चित्रं काढली. त्यांची पूजा केली. जवळ नागांना, लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिलं पहात होती. सरतेशेवटी तिनं देवाची प्रार्थना केली. “जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत”. असं म्हणुन नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार त्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला. मनात तीजविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली. दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून आपण निघून गेले. दुसऱ्या दिवशी तिनं हार उचलून गळ्यांत घातला.तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हा होवो. ही साठां उत्तराची कहाणी, पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण! 
{संपूर्ण चातुर्मास पुस्तकातून  साभार }{ फोटो -गुगल सर्च }

Monday, 1 August 2016

मैत्री

दोस्ती ,मैत्री ,सखा किवा सखी.जिवलग असे अनेक नावे आहेत ना ?" मैत्रीचे" !
मैत्रीचा अर्थ खूप व्यापक आणि मोठा आहे .सगळे नाते मिळवणे किवा ते असणे हे आपल्या हातात नसते .पण मैत्री हे असे नाते आहे कि ते आपल्याला नशिबाने मिळते .आईवडील भाऊ बहिण नंतर सगळ्यात जवळचे नाते म्हणजे मैत्री .कधी कधी आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला काही सांगू शकत नाही तेव्हा कामे येते ती मैत्री .पण वयपरत्वे मैत्री बदलत जाते .


हातात हात घालून शाळेत जाणारे मित्र ,एकच बेंचवर बसणारे मित्र .एकत्र अभ्यास करणारे मित्र ,हातात हात घालून शाळेत जातानाची मैत्री अतिशय निरागस असते .कोणताही स्वार्थ नसलेली .निरगस असते .पण शाळा संपून जाते आणि "मोत्याची माळ धागा तुटून ,मोती जसे बिखारतात तसे मित्र देखील पांगतात .कोण कुठे कोण कुठे जातात .कॉलेज लाईफ सुरु होते .आपण काही करू शकतो हा विस्वास असतो .आणि या काळत होणारी मैत्री आयुष्यात सगळ्यात महत्वाची ,आयुष्याला वेगळे वळण देणारी ठरते .जादुई काळ असतो अनेक मोहाचे क्षण समोर असतात .याच कळत चांगले मित्र भेटले तर आयुष्याचे सोने होते .असे मित्र मग कायम कोहिनूर हिऱ्या सारखे हृह्द्याच्या कोपऱ्यात जपून ठेवले जातात .याउलट आयुष्य बेफिरीने जगणारे मित्र भेटले तर आयुष्य वेगळ्या वाटे कडे जाते .आयुष्याची वाट लागते .मग असे मित्र एक वाईट आठवण बनून राहतात .
कामा मुळे वेगवेगळे सहचारी भेटतात .त्यांच्या बरोबर काम करता करता सहवासातून मैत्री होते . नकळत सुख दुखात साथ देवून जाते हि मैत्री .मनापासून हवीहवी आणि गरज असणारी मैत्री असते उतार वयातील .आयुष्य जगून झालेले असते .चांगल्या वाईट गोष्टी आणि सुख दुखाचे अनेक क्षण सोबत असतात . पण वेळ घालवायला तर कधी जीवन साथी अचानकसाथ सोडून गेलेला असतात.आयुष्यातील एकटे पणा वाटून घेण्यासाठी मग मैत्री खूप उपयोगी पडते . वय कोणते असो आपल्याला एक तरी मित्र असावा असे वाटतेच वाटते .आपण न सांगता आपल्या मनातील ओळखणारा......सुखात साथ देणारा ,दुखात पाठी मागे उभा राहणारा .एक तरी मित्र असावा असे वाटतेच .



हर एक फ्रेंड कामिना होता है............
त्यापेक्षा हर एक फ्रेंड जरुरी होता है

Saturday, 30 July 2016

दीप पूजनाची कहाणी

ऐका दीपकांनो, तुमची कहाणी. एक नगर होतं, तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आहे, तेव्हां आपण तिचा सूड घ्यावा. 

त्यांनी रात्रीं हिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली. दुसर्‍या दिवशी फजिती झाली. सासू-दिरांनी निंदा केली, घरांतून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे. रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडीसाखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या आमावस्येच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. ही घरांतून निघाल्यावर तें बंद पडलं.

पुढं अमावस्येच्या दिवशी राजा शिकार करून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार घडला. आपले गावातले सर्व दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी गप्पा मारीत आहेत. कोणाच्या घरी जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली, वगैरे चौकशी चालली आहे. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्यामागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचा, माझा थाटमाट जास्ती व्हावचा, त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत. 

इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो, काय सांगू? मी ह्या गावाच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती, तिनं एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घेतला. तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. असा उदरांनी विचार केला. रात्रीं तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली. दुसर्‍या दिवशी तिची फजिती झाली. सासू-‍‍दिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. म्हणन मला हे दिवस आले. 

ती दरवर्षी मनोभावे पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो! असं म्हणून तिला आशीर्वाद दिला. घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरीं आला. कोणी प्रत्यक्ष पाहिलें आहे काय? म्हणून चौकशी केली. तिला मेणा पाठवून घरी आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. सार्‍या घरांत मुखत्यारी दिली. ती सुखानं रामराज्य करु लागली. जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो! साठा जन्माची ही कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
संपूर्ण चतुर्मास  पुस्तकातून  साभार  

Friday, 24 June 2016

}तिन्ही सांज} नाटक बघताना

नाटक बघणे अलग अनुभव असतो तो चित्रपटा सारखा नाही बघता येत .
चित्रपट बघतानी किती आवाज करा बोला .मोबाईल रिंग वाजो काही फरक नाही पडत .पण नाटकाचे असे नसते .मुलांचा आवाज किवा मोबाईल रिंग चा आवाज
त्या नाटकात काम करणाऱ्या अभिनेता किवा अभिनेत्रीला डिस्टर्ब करू शकतो .
अनेक प्रेषकाचे मोबाईल पुन्हा पुन्हा वाजत होते .तर कुठे लहन मुले मधेच रडत होते .नाटका मधील पात्रांचे सवांद हे पण मोठे मोठे होते .त्यामुळे तीन वेळा नाटक 
बंद करावे लागले .त्यांना रिक्वेस्ट करावी लागली .मोबाईल साईलेंट वर ठेवा .लहान मुलांना बाहेर घेवून जा .
आठवत नाही .मग हे लोक तर संपूर्ण नाट्यगृहा मधील प्रेषका समोर आपला प्रयोग
सादर करत असतात .त्यांना आपली लिंक तुटली तर त्रास नक्कीच होत असणार ना ?मग एकदा सांगितल्या वर देखील मोबाईल वाजत राहिले .
म्हणजे मुले आलीच .मोबाईल हा अनेकदा पर्स मध्ये असतो आणि तो नेमका
वाजतो तेव्हा पटकन सापडत नाही .दुसरी गोष्ट अनेकजणी घरात चित्रपट
बघत असताना कधी एका जागेवर बसून बघत नाही .चित्रपट जर चित्रपट गृहात
चित्रपट बघताना काही बोलणे हि सवय असते .सैराट मधील शेवटचा सीन चालू असताना .आर्ची चहा करते .तेव्हा त्यांचे किचन दिसते .त्यावेळी एक महिला
"अग्ग बाई बघ तिचे घर किती भारी झाले .डब्यात काजू बदाम सुद्धा भरले "अश्या
टोन मध्ये बोलली कि त्या पाच मिनिट शांतता असणर्या सीन मध्ये त्या महिलाच्या बाजूचे शांत बसण्या पेक्षा हसत होते .आणि किती मूर्ख लोक म्हणून बाकी लोक त्यांच्या कडे पाहत होते .
असे बोलून त्यांना सांगणाऱ्या लोकांना वेड्यात काढतात .कुठे किती मोठ्याने कसे वागावे कसे बोलावे याची काही गरज काही लोकांना वाटतच नाही .
असेच मनातले काही


याचा अनुभव ३० तारखेला दादरच्या शिवाजी मंदिर मध्ये "तिन्हीसांज" या नाटकाच्या प्रयोगा वेळी आला .अतिशय सुंदर असलेले हे नाटक बघत असतानी 
खरे तर आपण दोन मित्र किवा कोणी दोन जन जरी गप्पा मारत असलो आणि मध्ये काही करणा मुळे जर सवांद तुटला तर आपण काय बोलत होते ते आपल्याला 
आता असे का होते त्या प्रयोगाला महिलांची संख्या जास्त होती.महिला असणार 
पण अश्या लोकांना आपण काही चुकतो असे वाटतच नाही .मग काय झाले त्यात 
१जुन २०१६ 

माझा दहावीचा निकाल

आज मुलांना मिळणारे मार्क्स हा अनेकांच्या चर्चेचा
विषय आहे.आमच्या वेळी एवढे मार्क्स मिळत नव्हते हे अनेकांचे मत अगदी
माझे सुद्धा,का तेव्हा मुले हुशार नव्हते का ? आतची मुले जास्त हुशार आहेत का?
खरे तर तेव्हा मुले हुशार होते .

आजच्या सारखे तेव्हाचे पालक जागरूक नव्हते .गरिबी मुळे वह्या घेणे परवडत
नसायचे .जुनी पुस्तके वापरली जात .गाईड घेणे परवडत नव्हते .खरे तर त्यावेळचे
शिक्षक अतिशय चांगले असायचे .शिकवणी कोणी लावत नव्हते.वर्गात होईल 
तेवढाच आभ्यास असे अनेक मुला बाबत होते.अनेका कडे लाईट देखील नसायची .
आईवडील जर शेतकरी असतील तर मग आधी शेतातील काम करावे लागायचे.
अभ्यास हा नेहमी दुय्यम होता.
याउलट आज आहे आपल्याला जेजे नाही भेटले तेते स्वता पालक आधी मुलांना
आणून देतात .पुस्तके ,गाईड.आणि त्याबरोबर अनेक शिकवणी वर्गाच्या नोटस,
मोठे मोठे क्लास. आणि आईवडिलांचे मुलांच्या अभ्यासावर असलेले बारीक लक्ष.
मार्क्स मिळवण्या साठी किती अभ्यास करायचा हे बरोबर क्लास मध्ये शिकवले जाते.
अनेकदा परीक्षा घेतल्या जातात .मुलांची मग चांगली तयारी होते.हेच आज
चागले मार्क्स पडण्याचे कारण आहे असे मला तरी वाटते.
दुसरा मुद्दा म्हणजे अनेक आईवडील मुलांना चांगले मार्क्स मिळून देखील खुश
का नसतात.त्याचे कारण आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे हि अनेक आई
वडिलांची इच्छा असते.पण आज प्रचंड स्पर्धा आहे .ज्यांना चांगले मार्क्स त्यांना
चांगले कॉलेज हे समीकरण झाले आहे.अगदी एक मार्कस वरून सुद्धा चांगल्या
कॉलेज मध्ये प्रवेश मिळत नाही.अनेकदा मुलांना जे कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो
ते लांब असते .येण्या जाण्यात वेळ जातो .म्हणून अनेकदा जवळचे कॉलेज मिळावी
हि अपेक्षा असते .म्हणून भरपूर मार्क्स मिळून मुले खुश नसतात.तर अनेक मुले हे
कमी मार्क्स असून पण चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेशाचा हट्ट करतात.तेव्हा आपल्याला
जेमार्क्स जास्त वाटतात ते त्या आईवडिलांना वाटत नाही .आणि मुलांना देखील
आजचे मुले पण खरच मेहनत करतात मनापासून.
प्रचंड स्पर्धा आहे हे असेच होणार,पण यासगळ्यात कमी मार्क्स असणारे जाणार
कुठे हा आजचा मोठा प्रश्न आहे .आजच बातमी बघितली ज्यात उपलब्ध जागा आणि
आवश्यक जागा यात मोठी तफावत आहे .सगळ्यांना प्रवेश मिळणे मुश्कील
आहे.
असेच मनातले काही

दहावी कालची आणि आजची

आज मुलांना मिळणारे मार्क्स हा अनेकांच्या चर्चेचा
विषय आहे.आमच्या वेळी एवढे मार्क्स मिळत नव्हते हे अनेकांचे मत अगदी
माझे सुद्धा,का तेव्हा मुले हुशार नव्हते का ? आतची मुले जास्त हुशार आहेत का?
खरे तर तेव्हा मुले हुशार होते .

आजच्या सारखे तेव्हाचे पालक जागरूक नव्हते .गरिबी मुळे वह्या घेणे परवडत
नसायचे .जुनी पुस्तके वापरली जात .गाईड घेणे परवडत नव्हते .खरे तर त्यावेळचे
शिक्षक अतिशय चांगले असायचे .शिकवणी कोणी लावत नव्हते.वर्गात होईल 
तेवढाच आभ्यास असे अनेक मुला बाबत होते.अनेका कडे लाईट देखील नसायची .
आईवडील जर शेतकरी असतील तर मग आधी शेतातील काम करावे लागायचे.
अभ्यास हा नेहमी दुय्यम होता.
याउलट आज आहे आपल्याला जेजे नाही भेटले तेते स्वता पालक आधी मुलांना
आणून देतात .पुस्तके ,गाईड.आणि त्याबरोबर अनेक शिकवणी वर्गाच्या नोटस,
मोठे मोठे क्लास. आणि आईवडिलांचे मुलांच्या अभ्यासावर असलेले बारीक लक्ष.
मार्क्स मिळवण्या साठी किती अभ्यास करायचा हे बरोबर क्लास मध्ये शिकवले जाते.अ
नेकदा परीक्षा घेतल्या जातात .मुलांची मग चांगली तयारी होते.हेच आज
चागले मार्क्स पडण्याचे कारण आहे असे मला तरी वाटते.
दुसरा मुद्दा म्हणजे अनेक आईवडील मुलांना चांगले मार्क्स मिळून देखील खुश
का नसतात.त्याचे कारण आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे हि अनेक आई
वडिलांची इच्छा असते.पण आज प्रचंड स्पर्धा आहे .ज्यांना चांगले मार्क्स त्यांना
चांगले कॉलेज हे समीकरण झाले आहे.अगदी एक मार्कस वरून सुद्धा चांगल्या
कॉलेज मध्ये प्रवेश मिळत नाही.अनेकदा मुलांना जे कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो
ते लांब असते .येण्या जाण्यात वेळ जातो .म्हणून अनेकदा जवळचे कॉलेज मिळावी
हि अपेक्षा असते .म्हणून भरपूर मार्क्स मिळून मुले खुश नसतात.तर अनेक मुले हे
कमी मार्क्स असून पण चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेशाचा हट्ट करतात.तेव्हा आपल्याला
जेमार्क्स जास्त वाटतात ते त्या आईवडिलांना वाटत नाही .आणि मुलांना देखील
आजचे मुले पण खरच मेहनत करतात मनापासून.
प्रचंड स्पर्धा आहे हे असेच होणार,पण यासगळ्यात कमी मार्क्स असणारे जाणार
कुठे हा आजचा मोठा प्रश्न आहे .आजच बातमी बघितली ज्यात उपलब्ध जागा
आणि आवश्यक जागा यात मोठी तफावत आहे .सगळ्यांना प्रवेश मिळणे मुश्कील
आहे.
असेच मनातले काही

असेच मनातले काही {माझ्या फेसबुक पोस्ट }

सुखाचे क्षण अनेका बरोबर वाटून घेता येतात .तसे दुखाचे नसते.काही वेदना कधी कोणाला सांगता येत नाही .तसे विस्वसाचे कोणी असायला हवे .नाही तर अनेकदा तोंडातून बाहेर पडलेले शब्द वार्या सारखे कुठे कुठे पोचतात .मग अजून दुखात भर पडते .कोणावर विस्वास नाही राहत .
मग मनातले कोणाला तरी सांगायचे असते मन हलके करायचे असते .अश्या वेळी सरळ लिहून काढावे .जो पर्यंत मन हलके होत नाही .आपले शब्द कुठे जात नाही .नाही जमत लिहिणे सरळ देवाच्या फोटो समोर उभे राहावे सगळे बोलून टाकावे .देव ऐकायचे काम करतो का नाही माहिती नाही पण .तो कधी कोणाला सांगयला जाणार नाही हा पूर्ण विस्वास असतो .असेच मनातले काही 
पण मनात येते ,काही मन हरवलेली माणसे देखील असतात नाही .
अनेकदा असी माणसे नेहमीचे आयुष्य हे सुरळीत जगत असतात .
असे वाटते त्यांच्या आयुष्यात काही समस्या नाहीच आहे .जसे काही डोळ्याने
बघणारे मनापासून बघतातच असे नाही.कारण मन भलतेच कुठे फिरत असते .
शरीर जसे आजारी होते तसे मन सुद्ध आजारी होते नाही ,आजारी शरीर दिसते.
आजारी मन दिसत नाही .डोळे रडतात तसे मन पण रडते नाही.रडणारे डोळे दिसतात.रडणारे मन दिसत नाही .
पण मनाचे रडणे अति झाले कि ते पण हरवते .मग त्या मनाला कोणत्या व्रेद्ना 
राहत नाही.सुख दुख यापलीकडे ते जाते .
"मग जग त्याना वेडे म्हणतात "
असेच मनातले काही






घर हरवलेली माणसे मागे वपु चे हे पुस्तक वाचले .



मौनात मोठी ताकद असते म्हणतात.पण तेच मौन कधी कधी मनस्ताप देते .मन दुखावले चूप बस हवे तर राडा पण ज्याने मन दुखावले त्याला काही बोलू नका .कारण त्याला जसे वागायचे तसे तो वागला तो त्याचा स्वभाव असे समजून चूप बसने म्हणजे मुर्ख पणा असतो कारण तुमच्या मौनाचा लोक वेगळा अर्थ लावतात .तुम्हाला चूक समजतातत त्या . पेक्षा जास्त त्रास तेव्हा तुमच्या मौनाचा वेगळा अर्थ घेवून तुमच्या वर अविस्वास दाखवला जातो .अपेक्षा असते तुम्ही कोणावर पूर्ण विस्वास ठेवता त्या व्यक्तीने पण तुमच्या वर विस्वास ठेवावा .जेव्हा असे होत नाही तेव्हा खूप मन दुखावले जाते .

शाप

शाप 
कोणी तरी कोणाचे वाईट केले हकनाक त्रास दिला कि ज्या व्यक्तीस त्रास
झाला ती व्यक्ती तळतळाट देते ,"तुमचे वाईट होईल ,किवा तुझे वाटोळे होईल"
वाईट बोलत असेल तर "तुझ्या जिभेत किडे पडतील "
असे बोलणे म्हणजे काय ,शाप देणे .
जेव्हा आपण आपल्या हिंदू धर्माचे अनेक धर्म ग्रंथ वाचतो तेव्हा आपल्या लक्षात
येईन कि अनेक देव देवता यांना कोणी ना कोणी शाप दिला होता.आणि नंतर त्यांना
ते शाप भोगावे लागले होते.ऋषी दुर्वासा यांचे नाव तर याबाबत सगळ्यात आधी आठवते.शाप दिला 

तो लागू पडला म्हणून ज्या व्यक्तीला शाप दिला त्याचा त्रास
त्या व्यक्तीला जर होत असेल तर ज्याने दिला त्याला पण होत असेल का?
आता पुराणातील शाप साठी माहिती असलेल्या काही कथा . कंसाला मिळालेला शाप "देवकीचा 

पुत्र तुझा अंत करीन "
दशरथ राजाला श्रावणाच्या आईवडिलांनी दिलेला शाप....सगळ्यानाच माहिती आहे.ज्या शापाचा परिणाम म्हणून दशरथ राजाला पुत्रवियोग झाला .
आहिलेला शिळा होण्याचा शाप ,तर अहिलेचा इंद्रास शाप तुझ्या शरीरात अनेक
भोके पडतील .खोटो बोलून विद्या शिकलात म्हणून कर्णास परशुरामाचा शाप
"गरज असेल तेव्हा तुझी विद्या विफल होईल" आणि ती झाली महाभारत युद्धात .
"अर्जुनाने स्रियांना दिलेला शाप " स्रीयांच्या पोटात कोणते गुपित राहणार नाही "
{ याची कथा माहिती नाही } राजा परीक्षित यास ऋषीच्या गळ्यात मेलेला साप
घातला म्हणून ऋषीच्या मुलाने शाप दिला "आज पासून सात दिवसात साप चावून मारशील "त्याशापाचा प्रभाव होऊ नाही म्हणून परीक्षित राजाने सात दिवास श्रीशुकदेव यांनी राजा परिक्षीत यास भाग्वात कथा सांगितली आहे .जी आज भागवत महापुराण म्हणून आहे .ज्यात बारा खंड आहे .या कथा सांगितल्या तरी
परीक्षित राजा हा साप चावून सातव्या दिवशी मरण पावला.
हिंदू धर्मात अश्या अनेक कथा आहेत .बाकी धर्मात पण असतील का ?
काल भागवत पुराणावरील एक पोस्ट वाचून असेच काही आठवले .

कधी न पुसल्या जाणाऱ्या आठवणी

कधी न पुसल्या जाणाऱ्या आठवणी 
सगळे पावसाची वाट बघत आहे .पाऊस सगळ्यांना हवाहवासा वाटणारा ,,,,,,,,,,,,
पण सगळ्या साठी वेगळाच असणारा,तो येतो कधी चोर पावलांनी कधी येतो .ढोल
नगारे वाजवत .तो येतो मग कोणाला आठवतात कविता कोणाला आठवतात
भजी तर कोणाला खुणवतात सह्याद्रीच्या वाटा ,आणि धबधबे ,तर कोणाला
नेवून सोडतात मनावर आघात झालेल्या वेदानाच्या गावी,मग कधी त्या असतात पुरात वाहून गेलेल्या ,डोक्यावर छप्पर हरवलेल्या माणसांच्या ...........
आज फेसबुक फ्रेंड ज्ञानदेव पोळ यांची पोस्ट वाचली .आणि चौथी मध्ये
असतानाची आठवण परत जागी झाली .छोटे गाव पक्के घरे कमी आणि कच्चे घरे जास्त .साधे मातीचे घर त्यावर उसाच्या पाचटाचे छप्पर .आमचे चुलीचे घर असेच होते .आईवडील शेतात मीआणि लहान दोन भाऊ शाळेत .दुपारी जेवणास घरी येत असू.एक दिवस दुपारी जेवायला घरी आलो .अचानक जोराचा वारा सुटला.वाऱ्याचा आवाज आल्याबरोबर दारा कडे धावले दार बंद कारे पर्यंत वारा आता घुसला आणि सगळे छप्पर उडून गेले .भीतीने तिघे एकमेकाला पकडून बसलो .वारा शांत झाला होता.पण घरात पसरलेल्या पालापाचोळाच्या रूपाने भीती सोडून गेला होता .त्या निरागस मनाला फक्त एकाच जाणवत होते आपले घर उडून गेले .आपण लवकर दार बंद नाही केले .आता आई मारणार .
भास होईल असा अंधार पसरला .अजून चैत्र पण संपला नव्हता अनेक ठिकाणी
लग्न चालू होती .मनी ध्यानी नसतानी वळवाचा पाउस आला होता.शेतकरी म्हणजे घरात कमी आणि त्याचा संसार बाहेर जास्त.अचानक आलेल्या पावसामुळे घर बाहेरील सामान आत घेण्या साठी धावपळ सुरु झाली कोण गोवर्या झाकतो कोण
वळ्याय झाकतो .पण पावसा कडे वेळ नव्हता त्याचा धीगाना सुरु झाला ,मोठ्या मोठ्या थेंब बरोबर आडवा तिडवा वारा सुरु झाला .घरात आई मी आणि भाऊ .दरवाजा बंद असून वाऱ्याच्या धडकेने दरवाज नक्की तुटणार यांभीतीने हाताने दरवजा दाबून ठेवण्याची केविलवाणी धडपड.त्याच वेळी दरवाज्या वरील एक पत्र
वर उचलला गेला आणि जोरात आपटला .आणि आईने देवाचा धावा सुरु केला .
एक पत्र उचकने म्हणजे घराचे छप्पर उडून जाणे.वखराची पास दरवज्याला आडवी लावली आणि धान्याच्या थाप्पीवर चढून उडणारा पत्रआईने दाबून ठेवला .घरातील चादरी पत्र्याच्या फटीत आम्ही दाबून ठेवल्या .त्याअर्धा तास वार्या बरोबर धीगाना घालणाऱ्या पावसात आम्ही देवाची पार्थांना करत होतो .
आर्ध्या तासाने पाऊस थांबला ,मनावर कधी न संपणारी भीती मनात बसवून .
येत असणार.आज मुंबईत राहते .मुंबईत नेहमी शांत पाउस पडतो तरी पावसामुळे अंधारून आले.वारा सुटला कि आज पण माझ्या मनाचा थरकाप होतो .नकळत मन माझ्या शेतकरी बंधावाच्या घरात जावून येते .मला नाही वाटत पावसात भजी खावी.माझे मन पुन्हा सुन्न होते .कुठे तरी कोणी तरी आशा असाच पावसाचा सामना करत असेल .कोणाला तरी असाच पाउस बेघर करत असेल , कोणच्या अंगणातील अनेक वर्षाचे मायाने जपलेले झाड उन्मळून पडत असेल .मागे एक भकास पणा सोडून .
आज असेच आठवणीतील काही


फेसबुक वर अश्याच एक पोस्टने आज त्या आठवणी मध्ये नेवून सोडले.
मध्ये काही वर्ष गेले नेहमी सारखा कडक उन्हाळा पण तो दिवस काही वेगळाच होता बघता बघता आकाशात काळे ढग जमा झाले .सकाळचे नौ वाजता रात्रीचा 
शेतकऱ्याचे जीवन असेच असते .अनेकांना असा अनुभव आला असणार काहीना 

"कल्पनेच्या जगात ".

"कल्पनेच्या जगात ".
स्वताच्या विश्वात जगणारा आपले काम भले नि आपण भले असा वागणारा काहीसा अबोल .खरे तर अत्माविस्वसाची कमी स्वताचे म्हणणे नीट मांडता न येणारा, जगासाठी नेभळट समजायचे त्याला सगळे .आपले हसू नको म्हणून तोच दूर राहायचा सगळ्या पासून .बाकीचे फेसबुक वापरतात त्याची चर्चा करतात आपण पण फेसबुक चालू करावे म्हणून त्याने फेसबुक चालू केले .एक अनोखे जग त्याच्या पुढे खुले झाले
.चार लोका समोर दोन शब्द निट न बोलू शकणारा तो आता रोज मोठे मोठे लेख लिहू लागला हळू हळू त्याचा मित्र परिवार वाढला तो आता खुश राहू लागला .त्याच्यात बदल झाला .आपण काही आहे असे वाटू लागले .कधी तरी त्याला हसणारे आता त्याला छान लिहितो म्हणून मेसेज करायचे .दिवस जात होते आपली आता एक ओळख आहे यात तो खुश होता .थोडा खुश होता .थोडा हवेत .आता आपल्याला कोणी नेभळट म्हणणार नाही या भ्रमात तो जगू लागला .
अशातच एका नातेवाईकाच्या लग्नाला जाण्याचा त्याला योग आला .मोठ्या घरचे लग्न असल्या मुळे झाडून सगळे नातेवाइक जमा झाले होते हा पण पोचला .तिथे गेल्यावर नमस्कार चमत्कार झाला .नंतर जो तो आपल्या नादात मग्न झाला .हळू हळू याच्या लक्षात आले आपण आहे तसोच आहे आपण आज पण वास्तव जगातील लोका मध्ये मिक्स नाही होऊ शकत .आभासी जगात रोज बोलायला अनेक जन असणारा तो आज स्वताला गर्दीत एकटा समजत होता .या विचाराने त्याच्या डोळ्यात पाणी आले .
पण त्याच वेळी आभासी जगातील मिळालेला आत्मविस्वास कमी आला .आणि त्याने मनाशी निश्चय केला काय झाले माझ्यात काही कमी असेल तर मी जसा आहे तसा लोकांना समोर जाईन.त्यांनी आजू बाजूला बघितले काही छोटी मुले होती त्यांच्या कडे गेला .त्यांचाशी बोलला .आणि त्यांचात तो रमला .नकळत त्याला या निरागस मुला मध्ये तोच त्याला भेटला .आता तो कल्पने पेक्षा वास्तवात जगणार होता .सगळ्यात आधी त्याने फेसबुक स्टेटस टाकले " मी आता लवकरच आपल्या समोर एक कादंबरी घेवून येत आहे .तो पर्यंत फेसबुकवर नसणार भेटू लवकरच " त्याने पेपर समोर घेतला त्यावर मोठ्या अक्षरात लिहिले "कल्पनेच्या जगात ".

Wednesday, 22 June 2016

फादर्स डे

प्रिय दादा ....
हो दादाच बोलत असू ना आम्ही ...
आज तुम्ही या जगात नाही ,फादर डे काय असतो हे माहिती नसलेले तुम्ही ,कशाची अपेक्षा नाही कोणाचा कधी राग नाही .तुमचा दिवस सुरु होत असे पहाटे चार वाजता हरिपाठाने होत असे .आपण आयुष्यभर खूप कष्ट आणि कष्ट केले पण आपण शिकू शकलो नाही आपल्या मुलांनी खूपशिकावी हि तुमची इच्छा होती .स्वत काम केले पण मुलांना शिकवले.आज पण मला आठवते स्वता बद्दल तुम्ही खूप कमी बोलत ,आत जून महिना चालू आहे शेतात पेरणी चालू असे आणि तुमच्या बरोबर मी असे त्या वेळी तुम्ही तुमच्या बालपणा बद्दल बोलत .वयाच्या अवघ्या अडीच वर्षाचे तुम्ही असतानी आई गेली होती.मग तुमचे वडील हेच आई आणि बाबा सुद्धा.आई काय असते आईची माया काय असते हे तुम्ही कधी अनुभवले नव्हते .त्या वेळच्या प्रौढा साठी {डांगरी शाळा } असेलेल्या शाळेत लिहिता वाचता येतील एवढे शिकले .त्याचा उपयोग तुम्ही कायम कोणत्या ना कोणत्या पोथ्या वाचयला केला.नेहमी तुम्ही धार्मिक गोष्टी सांगत त्या मुळे आज मला पुराणातील सगळ्या कथामाहिती आहे .

तुम्ही माळकरी म्हणून लोक तुम्हाला खूप मानत कारण तेव्हा दारू पिणार्यांनावाईट समजत .आम्हाला आमचे वडील व्यसनी नाही याचा खूप अभिमान वाटत असे .कधी कधी मी विचारत असे काय भेटते तुम्हला देव देव करून .त्या वर तुमचे उत्तर असे "आपण बचत का करतो कारण ती आपल्याला अडचणीच्या वेळी उपयोगी यावी ,तसेच आहे हे आज मी ठीक आहे म्हणून मी देवाचे नाव घेतो जे आपल्याला आपल्या दुखाच्या वेळी उपयोगी पडेल.मी दहावीला पास झाले तेव्हा किती आनंद झाला होता तुम्हाला आज पण आठवते.आज मी जीकाही आहे ,जे काही आज येथे लिहू शकते ते तुमच्या मी शिकले पाहिजे या हट्टामुळे,दहावीझाले आणि पुढे कॉलेज साठी बाहेर जावे लागेल म्हणून आई ने खूप विरोध केला तरी तुम्ही मला कॉलेजला पाठवले.मुलीना कॉलेजला पाठवले कि मुली बिघडतात असे लोक बोलत तेव्हा तुमचे उत्तर असे "माझा माझ्या मुलीवर विस्वास आहे.ती मला कधी मान खाली घालयला लावणार नाही" मी शिकले पदवी घेतली पण नोकरी नाही केले याची खंत मात्र कायम राहिली तुमच्या मनात

.तुम्हाला कधी दुखी बघितले नव्हते मी पण जेव्हा मला लग्ना नंतर फक्त दीड वर्षात टीबी झाला.मी हॉस्पिटल मध्ये होते माझी मुलगी गावी तुमच्या कडे .मुंबईची माहिती नाही तरी मला भेटायला आले.माझ्या समोर शांत असणारे तुम्ही घरी जाऊन पहिल्यांदी रडले.माझी बहिण लहान मुली सोडून टीबी मुळे गेली आता माझी मुलगीतरी बरी होऊ दे म्हणून पहिल्यांदी देवा समोर बोलले होते.एक पण व्यसन नसलेले तुम्ही पण तुमचा एक मुलगा मात्र पूर्ण व्यसनी झाला.आणि मनातून तुम्ही खूप खचले.कधी तसे दाखवले नाही तुम्ही.कधी सुपारी न खाणारे आणि चहा सुद्धा न पिणारे तुम्ही पण केवळ मुलगा व्यसनी झालाआणि त्याचा त्रास नको म्हणून पूर्ण आयुष्य जिथे घालवले ती जागा सोडून शेतात राहायला गेले.शेवट पर्यंत एकदशी आणि हरिपाठ न सोडणारे तुम्ही .आज खूप खूप आठवण येते आहे.असे वाटते आज तुम्ही हवे होते.खूप काही बोलावे वाटते खूप काही सांगावे.पण आता ते मनातच राहणार ............

असेच काही

आज बातम्या मध्ये एक बातमी दाखवत होते .एक व्यक्तीने ट्रेन समोर आत्महत्या केली .अश्या बातम्या आजकाल नेहमीच येत आहेत .आपण पण पण बघून च्यानल बदलतो .रोजमरे त्याला कोण रडे असे असते.
पण खोल विचार केला तर एक व्यक्ती स्वताच्या आयुष्याला कंटाळते आणि जीव देते .पण त्यावेळी तिथे अनेक वयोगटातील लोक हजर असतात .त्यांच्या मनावर अश्या घटनाच किती परिणाम होतो .रेल्वे पोलिस,रेल्वे कर्मचारी आणि मोटारमन 
हि माणसेच असतात.हि काय त्यांचे काम आहे असे आपण सहज म्हणून जातो.
सगळ्यात मोठा फटका बसतो तो प्रवास करणाऱ्या लोकांना .ट्रेन थांबते .रूळ साफ करणे .यासगळ्यात वेळ जातो .एक छोटी घटना पण अनेकांच्या जीवनावर असर करून जाते.जर परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी जात असेल तर त्याच्या मनावर परिणाम होतो .त्याचा पेपर अवघड जावू शकतो .यामध्ये त्याची काही चूक नसते..
वाढती महागाई ,रोजचे टेन्शन ,कमी होत चाललेला संयम यामुळे माणूस मानसिक विकाराचा शिकार होत चालला आहे .सवांद कमी होत चालला त्याचा परिणाम आज एकटेपणा वाढला आहे .यातूनच टोकाचे निर्णय घेतले जातात .
पण जेव्हा अश्या आत्महत्या होतात तेव्हा कोणाला सहानुभूती नाही वाटत .उलट
लोक शिव्या घालत असतात ."त्याला मरायला ट्रेनच सापडली का ?"
आयुष्य सुंदर आहे तेअसे गमावू नका, माघार घेण्या पेक्षा चालत राहा मार्ग सापडेल

आठवणीतील ती

काय कमी राहिली होती माझ्या प्रेमात ??
मनापासून प्रेम केले होते तुझा वर .तू काय केले त्या बद्द्ल्यात दिले ते फक्त दु:ख 
आणि केला विस्वासघात मी कायम तुझा बरोबर राहीन असे वचन दिले होते तु तरी पाठ फिरवून गेलास ..........
आता काही अपेक्षा नाही कारण मी चूक केली होती चुकीच्या माणसा कडून अपेक्षा ठेवली होती मी, 
पण गेलास जा .आता मी तुला माफ केले कारण या पुढे आता मी तुला कधी दिसणार नाही ना माझा 
आवाज आता तुला ऐकयला भेटेल ....आज त्याला तिचे हे सगळे बोलणे आठवत होते .त्याचे डोळे अश्रुनी भरले होते .त्यालाच समजत नव्हते आज खूप दिवसाने त्याला तिचे बोलणे आणि तिची एवढी आठवण का येत आहे .
साधी होती ती मनापासून प्रेम करत होती ."बस तु मला कधी विसरू नको ".
"तुझे असणेच माझ्या साठी खूप आहे ".फक्त तू भांडत नको जाऊ सारखा सारखा
 "राग नुसत्या नाकाच्या शेंड्यावर असतो तुझा" .
कारण काय मला फोन का केला नाही .कधी माझा फोन का घेतला नाही .हि काय करणे आहेत का रे .
असे बोलून खळखळून हसायची ती ...
आज हे सगळे का आठवते आहे समजत नाही ...कोण चुकले ,ती नाही आपण चुकलो, 
समजू नाही शकलो तिला...शहरात आलो आपण आजूबाजूल्या असलेल्या मुली त्याचे राहणे
 त्याचा आपल्या वर प्रभाव पडत गेला .तिचे विचार तिचे राहणे आपल्यला आपल्याला आता
 गावंढळ वाटायला लागले .आपण हळू हळू मेसेज करणे कमी केले .नंतर फोन करणे .
ती विचारात राहायची काय झाले तू बदलला आहेस .आपण बहाणे करत राहायचो बिझी असण्याचे ......
गावी गेलो आपण ,धावत आली ती नेहमीसारखी ....माझ्यात झालेला बदल जाणवला तिला ...
..शांत राहिली ती ...शहरात परतत असतानी रस्त्यावर समोर आली ती .."जा माफ केले तुला 
,माझ्या प्रेमात कमी राहिली असेल ."वाऱ्याच्या वेगाने निघून गेली ती ....कुठे गेली ,
नाही माहित पण आज तिचा प्रत्येक शब्द आठवत आहे .आज ती खूप आठवत आहे ....
माफी मागायची संधी पण नाही दिली ....पण आता वेळ गेली माहित आहे ...
काल्पनिक !!!आशा!!! 23/11/15Ripost

Tuesday, 3 May 2016

सैराट माझ्या नजरेतून



सैराट माझ्या .नजरेतून ....

या चित्रपटावर ,चित्रपट येण्या आधीच खूप लिहिले गेले होते.आणि बघितल्या नंतर पण खूप लिहिले गेले .अर्थात दोन्ही मध्ये खूप फरक होता.आता पर्यंत अनेक प्रेम हा विषय घेवून चित्रपट आले आहेत .अर्थात नायक नायिका कसे भेटतात नंतर अनेक विरोध पत्करून लग्न करतात.किवा एक होतात .मग अनेकदा ते एका समाजाचे असतात किवा नसतात देखील .
पण सैराट या चित्रपटाचे विशेष कौतुक या साठी .....हळुवार फुलत जाणारे प्रेम आणि त्यानंतर त्यांचे पळून जाणे.येथ पर्यंत कसे सकाळच्या प्रसन्न वातावरणा सारखे तर त्यानंन्तर उ त्तरार्ध मात्र एकदम वाळवंटातील दुपार सारखा ........
येथेच चित्रपटाचे वेगळे पण जाणवते .अनेकदा फक्त प्रेम खूप सुंदर भावना प्रेमासाठी वाटेल ते असेच काही दाखवले जाते
 .
पण खरी सुरवात असते ते पळून गेल्यावर पुढे काय .आधी सगळे सुंदर आणि सोपे वाटते ते किती अवघड असते याची जाणीव होते.मग आधी तू छान मी छान असे वाटणारे प्रेमी मग एकमेकचे गुणदोष दाखवत बसतात.यातून अनेकदा मग पश्चाताप देखील होतो.पण परतीचा मार्ग बंद झालेला असतो .ज्या आईवडिलांनी खूप जीव लावलेले असते त्यांच्या इज्जतीचा त्यांच्या
प्रेमाचा विसर पडलेले असतो.मग परत फिरता येत नाही नाविलाज झाल्या सारखे आयुष्याला सामोरे जावे लागते .याची जाणीव किती प्रेम करणाऱ्यांनाअसते.पण प्रेमात जे आंधळे झालेले असते त्यांना काही दिसत नाही .
प्रेमाच्या शेवटा बद्दल काही बोलणार नाही .कारण अनेकदा मुलगी कोणत्या समाजातील जाती मधील असो,मुलगी आईवडिलांचा अभिमान असतो .तिचा लग्नाचे स्वप्न अनेक आई वडील बघत असतात.तिला सगळे हवे ते देण्याचा
प्रयत्न करतात .तिचे लग्न एक चांगल्या मुलाबरोबर होवे असी अपेक्षा असते.यात चूक काही नाही.जेव्हा मुलगी असे पळून जाते तेव्हा.अनेकदा काही लोक बेभान होतात.आपली मुलगी असे वागू शकते हे त्यांना सहन होत नाही .तर काही गेली आम्हाला मेली ेअसे समजतात तिचा साठी घराचे दारे बंद करतात.आणि स्वताचे आयुष्य जगायला लागतात .पण हा समाज त्यांना विसरू देतो का.मोठ्या शहरात ठीक आहे पण जेव्हा गावच्या ठिकाणी सगळे एकमेकाला ओळखतात तिथे लोक एक संधी सोडत नाही अस्या पळून गेलेल्या परीवारचा अपमान करण्याची .मग तिचा भाऊ असो कि वडील." तू बोलूच नको रे ,तुला तुझी मुलगी सांभाळता आली नाही .किवा तुझी बाहिणीने बघ काय दिवे लावले माहिती आहे ." असे ऐकायला
लागते .मुलगी जाते तिच्या वाटेने .पण अगदी मरणाहून मेल्या सारखे जीवन
जगायला लागते परिवाराला ................
"हे मात्र एवढे प्रभावी नाही दाखवले असे वाटले कुठे तरी" ............
सैराट मधून अजून एक गोष्ट जाणवली ती म्हणजे आपली मुलगी आपला मुलगा काय करतो याची आईवडील कुठे दखल घेतानी दिसत नाही .एकदाम ते प्रेमात पडतात .पकडले जातात मग मुलीचे सरळ लग्न ठरवणे सुरु होते.यातून एक बोध नक्की घ्यावा मुली कुठे जातात काय करतात त्यांचे मित्र कोण  हे नेहमी आईवडिलांना माहिती असावे नाही का?
प्रेम कोणाला कुठे कधी होते हे जरी खरे असले तरी ..............त्यातील धोके ओळखून पुढे जायचे का नाही याचा विचार नक्की करावा .नाही का ? किवामुलांना समजून द्यावे त्यांच्या साठी काय योग्य काय अयोग्...........
असेच मनातले काही{मी काही कोणी समीक्षक नाही जे मनात आले ते लिहिले }

पोहे

पोहे
कोणता पदार्थ करणे आणि तो करता येणे या वेगळ्या गोष्टी आहे असे मला वाटते. पदार्थ करणे जेव्हा फक्त करायचा म्हणून केला जातो तेव्हा त्याला चव असेलच असे नाही.करणे म्हणजे तो छान झाला पाहिजे म्हणून मनापासून करणे.
आज एक पोह्याची पोस्ट पहिली आणि मला जुने काही आठवले.


एप्रिल मे लग्नाचे महिने आणि लग्न जुळण्याचे महिने.मग मुलीला बघयला येणार असेल तर कांदे पोहे केलेच पाहिजे हा नियमच.पण खेड्यात अनेकदा भाजीपाला हा फक्त बाजाराच्या दिवसी मिळत असे,म्हणजे हिरवी मिरची ,कोथांबीर फक्त
बाजाराच्या दिवसी मिळे.आमच्या गावात मंगळवारी बाजार असे .म्हणजे त्यादिवसी घेतलेला भाजीपाला आठ दिवस वापरायचा .पण जर कोणी पाहुणे रविवारी किवा सोमवारी आले तर मग खूप पंचाईत होत असे.पोहे करायचे तर हिरवी मिरची एक तर सुकून जात असे नाही तर लाल होवून जायची .कोथांबीर तर कधीच मरून गेलेली असे .{अर्थात सुकवून ठेवेल असे}
मला माझी सासू आणि घरातील अचानक बघायला आले .तेव्हा गावात फक्त चिवडा करतो तसे पातळ पोहे मिळत असे.ते भिजवताने खूप काळजी घायलालागे नाही तर सरळ गोळा बनत असे.आमच्या सासू बाई आल्या आणि सरळ स्वयपाक घरात येवून बसल्या .असा कोणापुढे कधी स्वयपाक केला नव्हता .त्यामुळे माझी गडबड झाली.आणि पोहे भिजवताना पोहेंचा गोळा झाला . पटकन ते बाजूला ठेवून दुसरे पोहे भिजवले . आणि बघितले तर हिरवी मिरची नाही आता काय करा
मनात आले." मुलीला बघायला आले कि पोहे करा " हे कोणी शोधले काय माहिती.
मिरच्या लाल झालेल्या होत्या आणि त्या पण सुकल्या होत्या.नाविलाज होता त्याच टाकल्या. पोहे केले छान झाले असे वासावरून तरी वाटत होते .आणि अचानक आठवले मीठ राहिले.आता काय करा,कारण आमच्या कडे खडे मीठ वापरत .तेच बारीक करून टाकले जायचे.आता पोहे तर करून झाले.आता मीठ त्यात मिक्स पण होणार नाही .सासू बाई मागे बसल्या आहे .सरळ त्यांच्या कडे पाठ केली आणि मीठ वाटून त्यात थोडे पाणी टाकून ते पोहेत टाकले.
"इज्जत का सवाल होता "खूप वेळ हलवून नंतर त्यावर झाकण ठेवले.तेवढ्यात छोटा भाऊ स्वयपाक घरात आला .त्याला खुणेने चव घेवून बघ म्हणून सांगितले.त्याने दिसणार नाही असे थोडे पोहे घेतले आणि बाहेर गेला.परत आला आणि खुणेने सांगितले ठीक आहे.लाल मिरची त्यात सुकलेली कोथांबीर पोहे भारीच दिसत होते.तेव्हा खोबरे आणि शेव बीव घालण्याची काही पद्धत नव्हती .
एकदाचो आम्ही ती परीक्षा पास झालो .पण लग्न झाल्यावर आमच्या सासू बाई बोलल्या " तू काय काय केले ते बघितले होते ",पदार्थ येण्यापेक्षा बिघडत असतानातो सावरून घेणे जमले पाहिजे .सासू बाई खूप सुगरण होत्या.तू छान स्वयपाक करते हे त्या कधीच बोलल्या नाही .मी कधी जास्त विचार केला नाही.छान असे नाही पण ठीक करते मी स्वयपाक .......
असेच एक पोस्ट वरून आज पोहे आठवले.
फोटो-गुगल सर्च

चित्रपटा आणि समाज

कोणाकोणाला करिस्मा कपूरचा प्रेम कैदी आठवतो .१९९१ कि ९२ मध्ये आला होता.एक प्रेम कथा होता तो पण जवळजवळ २५ वर्षा पूर्वी अश्या कमी वयात येणार्या प्रेमकथा तेव्हा चालत होत्या .आणि  आज अनेकांना सैराट मुळे मुले बिघडतील असे वाटते.त्यावेळची आमची पिढी नाही बिघडली हि नाही बिघडणार.

मी अजून चित्रपट बघितला नाही पण एक वय असतेत्या वयात सावरायचे असते.
आणि सावरणारे असतात आई वडील ...आईवडिलांना बरोबर जर मुलांचा सवांद असेल तर काही होत नाही .आठवा आपल्या कॉलेजचा जमाना ......त्याकाळात मुली मुला बरोबर बोलायचे देखील नाही .तरी कुठे तरी बोलावे वाटायचे ना ?घराबाहेर उभे राहायचे नाही .रस्त्याने चालाताने खाली मान घालून चालायचे.चुकून कधी कोण्या मुलाबरोबर बोललो तर घरातून खूप मोठी चूक केली .असे बोलणे बसत .पण तेव्हा वाटायचे ना ? काय होते बोललो तर ? पण आई वडिलांना उलट उत्तर न करण्याचा तो जमाना होता.पण मनात रागतर यायचा ना? हे असे का वागतात ? खरे तर दोन पिढी मधील अंतर म्हणून आईला समजून सांगता येत नसे ,मग त्यांचे सांगणे म्हणजे रागावणे असे.पण का रागवतातअसा प्रश्न पडायचा ना ? त्या वयाचा तो दोष होता .एक सोळा ते अठरा असे काही वर्ष सरली कि स्वतालाच काय वाईट काय चांगले याची जाणीव होते..
.
आज आपण शिकलेले समजदार पालक आहोत .आपण आपल्याला त्या वयात
काय वाटत होते यावरून ,आपण मुलाबरोबर जे वागतो त्याबद्दल त्यांना काय वाटते किवा काय वाटेल ते समजू शकतो .जास्त विरोध करणे म्हणजे .अजून एखादी गोष्ट करून बघण्याची उर्मी वाढणे.आज मुले मोठे झाल्यावर नाही तर
ती लहान असतानी त्यांना समजून घेतले तर मुला समोर काही आले तरी ते आधी
तुमच्या जवळ येवून बोलतील ..
मुलांचे पालक राहून मित्र बना ,वेळ पडली तर पालक म्हणून शिस्त हवी .आणि
समजून घेतानी काय चूक हे पटवून देतानी एक मित्र ......
खूप पोस्ट बघून असेच मनातले काही

Monday, 18 April 2016

बंधन,सीमारेषा ,आणि धाडस यामध्ये काय फरक आहे .

बंधन,सीमारेषा ,आणि धाडस यामध्ये काय फरक आहे .
बंधन-
बंधन मग कधी आपणच आपल्याला घातली असतात तर काही बंधन
हे समाजाने घालून दिले जातात किवा समाजाच्या भीतीने पाळली जातात.
यात समाजाने घालून दिलेली बंधन अनेकदा समाजाची घडी व्यवस्थित 
राहावी या साठी असतात म्हणून ते समाज ते बंधन पाळतात.जेव्हा ती
तोडण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा त्या व्यक्तींना समाजाच्या रोषाचे बळी 

होयला लागते.बंधने आवडत नाही पण ते नाकारण्याची हिम्मत नसते तेव्हा
ती भीतीने पाळली जातात.मनातून ते आवडत नाही.पण समाजा विरोधी
जाण्याचे धाडस नसते.
सगळ्यात म्हत्वाचे बंधन हे स्वताच स्वताला घेतलेले असते .
यात कोणाची भीती असते असे नाही किवा समाज सांगतो म्हणून
देखील पाळली जातात असे नाही.तर ते मनावर झालेल्या खोल
संस्कारातून असे बंधन पाळली जातात.कुठे तरी नकळत्या वया पासून
येता जाता .किवा उठता बसता सांगितली जातात.त्यात आजूबाजूचे
वातावरण याच परिणाम देखील असतो.एखादी गोष्ट हि चूक आहे सांगितले
तर मनात पक्के होते ह चूक आहे .कधी कधी मोठ्या झाल्यावर समजते
हे चूक नाहीच .
सीमारेषा -जसे मनाचे बंधन आपण स्वताला घालतो तसेच सींमारेषा
सुद्धा आपणच ठरवतो.त्या देखील येतात संस्कारातून.कधी तरी कडक
शिस्त म्हणून आपण त्या स्वीकारलेल्या असले तरी अनेक ठिकाणी आपल्याला
त्याचा उपयोग होतो.उदाहरण-एखादी गोष्ट करायची नाही ती बरोबर नाही.
बाकी करतात तरी आपण करत नाही .
धाडस-धाडस कधी करावे जेव्हा ते केल्यावर काही तरी चांगले घडणार असेल .
ज्यामुळे कोणाला त्रास होणार नसेल तर ते नक्की करावे.पण असे धाडस करू नाही.

ज्यामुळे आपण लोकांच्या नजरेतून उतारून जावू.अनेक गोष्टी मनात असतात.त्याकेल्या 
नाही तर लोक तुम्हाला नाव ठेवू शकतात .पण तुम्हला
त्यायोग्य वाटत नाही तर कोणी काही बोलो नाही करायचे .कारणते तुम्ही करू
शकता पण तुम्ही त्या करत नाही कारण स्वताला घातलेले बंधन आणि स्वताच 

स्वता साठी आखलेल्या सीमारेषा ..............
असेच मनातले काही