Thursday, 11 December 2014

हसू ...........

हसू ...........
हसण्याचे पण किती प्रकार असतात ना .
खुदुखुदू हसणे ,खो खो हसणे ,मंदस्मित, गडगडाटी 
तोंडातून अजिबात आवाज न येऊ देता हसणे ,
पण सगळ्यात सुंदर हसू असते ते 
"छोट्या बाळाचे "
किती दु:खी किवा स्ट्रीक असणारी व्यक्ती देखील
निरागस असा बाळाचे हसू बघून खुश आणि आनंदी होते .
कधी हसावे ,कुठे हसावे ,किती हसावे याला काही नियम
नसतात .
व्यक्ती सगळ्या समोर रडू नाही शकत पण सगळ्या समोर
हसू शकते .
हसण्या मुळे क्षणात समोरची व्यक्ती बरोबर आपण ओळख
करू शकतो .
हसणारी माणसे सगळ्यांना आवडतात .
आपण हसलो कि आजूबाजूची माणसे देखील हसतात .
हसा आणि हसावत राहा ...............

No comments :

Post a Comment