Friday, 26 December 2014

मैत्री-2
शाळेतील मैत्री किती निरागस असते ना.गरीब, श्रीमंत,जात पात धर्म या पलीकडील ,जसे जसे वर्ष जातात मैत्री अजून घट्ट होत जाते.बघता बघता शाळेतील दिवस संपून जातात.दहावी नन्तर शिक्षणाच्या वाट अलग होतात.पण मैत्री तरी राहते.शिक्षण संपते एक एक मैत्रीनीचे लग्न होते .मग कोण कुठे कोण कुठे स्वतचा संसार घर नोकरी मैत्री-1
या मध्ये दिवस आणि वर्ष संपून जातात .शाळेतील दिवस आणि मैत्रिणी मात्र नेहमी आठवणीत असतात.पण अनेक वर्ष त्याची भेट नसते .अचानक कोणी भेटते.मैत्रिणीची माहित भेटते आपण मग तिला संपर्क करतो.मैत्रीण भेटणार याचा आनंद असतो. खूप वर्ष पूर्वीची आपली मैत्रिणी आहे तशीच असेल असा गोड गैरसमज असतो मनात .मैत्रिणीचा फोन वरून समजते तिला पण आपल्यला भेटायची ओढ आहे .पण भेटल्या वर आपल्या समोर येणारी मैत्रीण आपली वाटतच नाही.शाळेतील निरागस पणा संपलेला असतो.आणि त्याची जागा मी ने घेतलेली असते.मी ह केले मी ते केले आणि आपण का भेटलो असे होते मग ,अनेकाचा असा अनुभव असेल नाही .

No comments :

Post a Comment