Thursday, 11 December 2014

प्रेम

प्रेम एक सुदर भावना .....
काही नशीबवान असतात त्यांना प्रेम भेटते .
काही कधी बोलू शकत नाही .
खूप काही असते ना मनात पण ते नाही सांगता येत .
मग ते मनातच राहते
आज इंटर नेटचा जमाना आहे
सगळे कसे fast .असे आमच्या वेळी नव्हते .
प्रेम झाले आणि ते त्या मुलीला किवा मुलाला सागे
पर्यंत मुलीचे लग्न होऊन जायचे .
आजच्या सारखे मोबाईल नव्हते ना
.मग काय प्रेमपत्र लिहिले जायचे .ते देणे एक दिव्य
असायचे .मग अनेक प्रेमवीर
"ये मेरा प्रेम पत्र पढकर नाराज ना होना"
हे गाणे नक्कीच म्हणत असायचे .
जर चुकून ते प्रेमपत्र मुलीच्या भावा कडे किवा वाडीला कडे जर गेले तर .
"बाबुल कि दुआ लेती जा "
म्हणून आई बाप मुलीचे लग्न उरकून टाकत असत .
आणि मग अनेक प्रेमवीर देवदास बनत .
आज जामाना किती बदलला आहे ना .
सगळे कसे fast.मोबाईल मेसेज कॉल.आणि आता सोशेल साईट .
facebook काय गम्मत आहे नाही .
जिकडे बघावे तिकडे प्रेम स्टोरी आणि प्रेम कविता
आणि आजचे बिनधास्त मुल आणि मुली
बोलतात आयुष्यात एकदा तरी प्रेम होते कोणी तरी आपल्यला आवडते
आपला नकळत, काही नुसते बघून प्रेमात पडणारे असतात
पण काही असे असतात न बघता प्रेमात पडतात
एकतर्फी ,एवढे प्रेम करतात पण कधीच सांगू नाही शकत मनातले मनातच राहते.
पण प्रेम अनेकाना बदलवते कोणाला खूप काही देऊन जाते तर काहीचे
खूप काही घेऊन जाते .
आशा {१/११/१४ }
.

No comments :

Post a Comment